मदिरा प्राशन - पार्श्वभूमी, परिचय, व्यसनमुक्ती , अनुभव व मनःशांती

Submitted by भूत on 8 February, 2011 - 06:42

इतरत्र वाचलेल्या एका धाग्याच्या धर्तीवर हा धागा सुरु करण्यात येत आहे .
येथे सदस्यांनी आपले मदिरानुभव लिहावेत.
दारु कोणती प्यावी ?
किती प्यावी ?
कशी प्यावी ?
कोठे प्यावी ?
कॉकटेलची पाककृती .....ह्याला आपण कॉककृती म्हणुयात ...
सोबतीला काय घ्यावे ? ( चकना ह्या अर्थाने विचारत आहे )
मुजिक कोणते आवडेल ?
मैफील जमणार असेल तर शेरोशायरी वगैरे काही की अजुन ..?
त्या नंतर जेवणाचे काय ? .
उतारा घ्यावा का ? किती आणि कधी घ्यावा ?
दारूमुक्ती
दारूचे परिणाम टाळण्यासाठीचे उपाय
दारू प्यायल्यानंतर घडलेले विनोदी प्रसंग

दारु कशी सोडावी ?
.
.
.
चीअर्स!!

( स्टॅचुटरी वॉर्निंग : मद्यपान शरीरास हानीकारक आहे . २१ वर्षा खालील व्यक्तींना आणि दारु पिण्याचा परवाना न बाळगणार्‍या व्यक्तींना येथे प्रवेश नाही .)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

यापुढे या ब्रॅन्डचे उत्पादन होणार नाही. >>>
काहो???????????????/
असच उत्सुकता म्हणुन विचारतोय.
चालणारा धंदा बंद करण्याच्या मागची कारणमीमांसा कळण्यासाठी.

मला माहीत नव्हते की ती बातमी खोटी आहे, मला आलेली ईमेल तशी विश्वासार्ह माणसाकडून आलेली आहे

बातमी खोटी असल्यास दिलगीर

मायबोलीकरांच्या काव्यस्वादासाठी कोठेतरी वाचलेल्या सोमरसाशी संबंधित या दोन रचना देत आहे. सोमरसपानाआधी वाचल्यास समजतील आणि सोमरसनिष्ठावंतांच्या या रचना असल्याने सोमरसप्रीति शतपटीने वाढवतील :
( ज्या कोणाची ही काव्ये असतील त्यांनी पक्के पुरावे सादर करून क्रेडिट घ्यावे )

[१] एक किंचित कवी म्हणून गेला आहे की:

दारूबंदीवर काव्य वाचुनी, शपथ ईश्वराची घेउनी
तत्क्षणी दिली सोडूनी.... संवय वाचनाची!

[२] दारुमहती दारुदास जाणे - (कवीचे नाव माहित नाही)

दारू-दारू ऐसा, लागलासे ध्यास । शेवटचा श्वास - दारूसंगे //
दारू दारू ऐसे, करोनी चिंतन । ठिबक-सिंचन बसविले //
फुका म्हणे नाही, पीत म्यां फुकट । देतो ज्ञानामृत, लोकांआधी //
बरे झाले देवा, धाडलीत दारू । संगतीला पारू, पाठवावी //
काय सांगू देवा, दारूचे उपकार! स्वर्गाचेच द्वार, उघडले //
कोणी देखिली गा, स्वर्गाची वसती । दृष्टीआड सृष्टी, खरीखोटी //
जाणूनी घ्या बापा, दारूची महती । स्वर्गची खालती, आणियेला //
कृपाळू देवाने, निर्मियली व्हिस्की । भूवरी दु:खी, आता कोण //
दयाळू देवाने, निर्मियली रम । मोक्षमार्ग सुगम, सर्वांसाठी //
देवा दयाघना, निर्मियली ब्रॅण्डी । सानथोरा तोंडी, समभावे //
कृपाळू देवाने निर्मियली जीन । रिझवण्या मन, अबलांचे //
कृपाळू दयाळा, निर्मिली बिअर । अतीव सुंदर सर्वकाळी //
सर्वांसाठी खुले, हातभट्टीचे ज्ञान । आता दारूविण, कोण जगी //
फुका म्हणे देवा, उपकारांचे ओझे । घेऊनिया नाचे, जन्मोजन्मी //
मदर्स डे, फादर्स-डे, वर्षामाजी एक । दारू-डे उदंड, अगणित //
नेकीचा दारूडा कळवळे ओरडे । कशाला ड्राय-डे अधेमध्ये //
बाकी सारे डे, वर्षातून एक । ड्राय-डे अनेक, कैसा न्याय //
फुका म्हणे आम्ही, जातीचे दारूडे । पाऊल वाकुडे, पडो देवा.......... //

या रचना मी माझे मित्र शाम कुलकर्णी यांचेकडे 'ढकलल्या' त्यावर त्यांचा आलेला काव्यात्म प्रतिसाद :
कानउघाडणी -

अरे अरे भाऊ कैसा बिघडला
दारूच्या काव्याला प्रशंसशी ॥
आता तरी तुला सांगतो ते ऐक
अशी पुन्हा चूक करू नको ॥
ठीक आहे आता दारूच्या काव्याला
हात तू लावला ठीक आहे ॥
पण ध्यानी राहो दारूच्या प्याल्याला
स्पर्श करण्याला जाऊ नको ॥
तुझा मित्र
श्याम

>>बघा, वर 'ळी' चा 'ळू' झाला
हे कळाले तर ही ओळू लिहिण्याऐवजी लगेच जागच्या जागी दुरूस्ती का केली नाहीत ? स्टेफनी बदलतात तशी. Happy

हे कळाले तर ही ओळू लिहिण्याऐवजी लगेच जागच्या जागी दुरूस्ती का केली नाहीत ? स्टेफनी बदलतात तशी. >>

कारण मी मनापासून मदिरा प्राशन करतो.

इतर करतात, मला करायचे असून करता येत नाही, याचा हेवा वाटतो, वगैरे, माझ्याबाबतीत घडत नाही Happy

थोडेसे अवांतर-peyote हे spiritual drug असून याला कायद्याने बंदी नाही, कोणाला माहित आहे का?

>>सोमरसपानाआधी वाचल्यास समजतील>>
मग मी उद्या सकाळू वाचतो
बघा, वर 'ळी' चा 'ळू' झाला<< <<

ळीचा ळू झालेला पाहून काव्यास्वाद घेण्यात तुम्हाला आलेली तात्कालीन अडचण समजली.
सकाळी मात्र पुन्हा तत्काळ घेण्याआधी वाचा म्हणजे सोमरस पावला!

>>हे कळाले तर ही ओळू लिहिण्याऐवजी लगेच जागच्या जागी दुरूस्ती का केली नाहीत ? स्टेफनी बदलतात तशी<<
अहो महेश, त्यांनी वाचायला आणि घ्यायला एकदम सुरुवात केली असावी आणि ळीचा ळू होईतो त्यांच्यापुढे या ओळी आल्या असाव्यात :तत्क्षणी दिली सोडूनी.... संवय वाचनाची!

पण दुसरी कविताही त्यांनी सकाळी वाचली असेल कारण तिचे शीर्षक दारुमहती दारुदास जाणे त्यांना त्या सुहृदाकडे नेणारच! दारुमहती दारुदास जाणे
मंदार कात्रे ,
अहो,
आध्यात्मिक (?) बुवा आणि बाया घालतात तो रतीब तुम्ही विचारता आहात त्याच पेयाचा असतो असा आमचा समज आहे. चूक भूल द्यावी घ्यावी.

>>काय दामोदरसूत सकाळी सकाळी झापताय गरीबाला<<

नाही हो! आम्ही कोण तुम्हाला झापणारे?
आणि तुम्ही काय फिकीर करताय कि काय कोणाच्या झापण्याची? आमचे फंडामेंटल्स अगदी क्लीयर आहेत.

विकी बाबा कि जय->
Lophophora williamsii ( /loʊˈfɒfərə wɪlˈjæmsiaɪ/), better known by its common name Peyote ( /pəˈjoʊti/; from the Nahuatl word peyotl), is a small, spineless cactus with psychoactive alkaloids, particularly mescaline.[2]
It is native to southwestern Texas and Mexico. It is found primarily in the Chihuahuan desert and in the states of Tamaulipas and San Luis Potosi among scrub, especially where there is limestone.
Known for its psychoactive properties when ingested, it is used world wide as an entheogen and supplement to various transcendence practices, including meditation, psychonautics, and psychedelic psychotherapy. Peyote has a long history of ritualistic and medicinal use by indigenous Americans. It flowers from March through May, and sometimes as late as September. The flowers are pink, with thigmotactic anthers (like Opuntia).

मदिराप्राशन करताना मातापिता यांनी कोणती खबरदारी घ्यावी ,तसेच त्यानी मुलांकडून काय अपेक्षा ठेवाव्या हा अजुन एक prashnavalit असावा असे वाटते .
माझी एक मैत्रिण पापभिरू , सोज्वल , एकदम ओके आहे .ती वयाच्या १८ पासून मदिरा प्राशन करते.म्हणजे
आई वडिल बहिणी या सगळे एकदमच घेतात . नवराही कम्पुत सामिल झाला . तीचा मुलगा इंजीनियरिंग
द्वितीय वर्षाला आहे . तीला रात्री फोन केला तर ती म्हणाली जरा वेळाने फ़ोन करते. नन्तर सांगत होती
की हल्ली मुलगा रात्री रोज पार्ट्या करतो. रात्र झाली की आम्ही त्याच्या खोलीला बाहेरून कुलुप
लावतो .थोडा गड़बड़ करतो . त्यामुले फोन घेता आला नाही.
मुलीची मैत्रिण दर शुक्रवारच्या potluck , मदिरा प्राशन यातच मोठी झाली. एकीकडे पार्टी अणि दुसरीकडे
तीथेच तीचा होम वर्क . मुलीची मैत्रिण म्हणाली मदिरा ही ओल्ड पीपलसाठी. teenagers ला more
कूल काहीतरी हवे.(drugs ) इत्यादी .
पालकांनी मुलांकडून काय अपेक्षा ठेवाव्या बाळ राजांची योग्य समजूत कशी घालावी

अरेरे...
शेळी, तुलसीदासांचे दाखले देऊन बायकोला मारण्याचे समर्थन करणारा, हुंडा हा घेतलाच पाहिजे अश्या विचारसरणीचा बाप असेल तर जास्त वाईट संस्कार होतील मुलांवर.

एक सैतान एका शेतकर्‍याला म्हणतो , तू तीनपैकी एक गोष्ट कर, मी तुला भरपूर सुख देईन ...

१. मित्राचा खून कर
२. बायकोला बडव
३. दारू पी.

शेतकरी तिसरा पर्याय निवडतो.

तो दारु पितो.

मग दंगा करतो.

त्यामुळे बायको त्याला अडवायला जाते तर तिला बडवतो.

मित्र तिला वाचवायला मध्ये पडतो तर तो त्याचा खूनच करतो.

शेळी, तुलसीदासांचे दाखले देऊन बायकोला मारण्याचे समर्थन करणारा, हुंडा हा घेतलाच पाहिजे अश्या विचारसरणीचा बाप असेल तर जास्त वाईट संस्कार होतील मुलांवर.

होक्क्का? मग तुम्ही हुंडा देऊ / घेऊ नका,

( टीप - हुंडा देणे/ घेणे/ प्रवृत्त करणे हा कायद्याने गुन्हा आहे. )

आज हा धागा वाचुन एक नवी प्रेरणा मिळाली.
इथं कीबोर्ड थकला, कि घरी जावून
ओल्ड मोऩ्क + थ.अप + बर्फ आणि मग जेवण झाल्या नंतर एक गुडांग गरम.
हा प्रोग्राम २ व. नंतर करत आहे , ह्यावर माझाच विश्वास बसत नाहीये. Happy

मला एका रुग्णाने ब्लॅक लेबल जॉनी वॉकर ची अक्खी बाटली भेट म्हणून दिली आहे.....मला तिचा काहीच उपयोग नाही........कुणी दर्दी तिला उपयोगात आणेल काय???

Pages