मदिरा प्राशन - पार्श्वभूमी, परिचय, व्यसनमुक्ती , अनुभव व मनःशांती

Submitted by भूत on 8 February, 2011 - 06:42

इतरत्र वाचलेल्या एका धाग्याच्या धर्तीवर हा धागा सुरु करण्यात येत आहे .
येथे सदस्यांनी आपले मदिरानुभव लिहावेत.
दारु कोणती प्यावी ?
किती प्यावी ?
कशी प्यावी ?
कोठे प्यावी ?
कॉकटेलची पाककृती .....ह्याला आपण कॉककृती म्हणुयात ...
सोबतीला काय घ्यावे ? ( चकना ह्या अर्थाने विचारत आहे )
मुजिक कोणते आवडेल ?
मैफील जमणार असेल तर शेरोशायरी वगैरे काही की अजुन ..?
त्या नंतर जेवणाचे काय ? .
उतारा घ्यावा का ? किती आणि कधी घ्यावा ?
दारूमुक्ती
दारूचे परिणाम टाळण्यासाठीचे उपाय
दारू प्यायल्यानंतर घडलेले विनोदी प्रसंग

दारु कशी सोडावी ?
.
.
.
चीअर्स!!

( स्टॅचुटरी वॉर्निंग : मद्यपान शरीरास हानीकारक आहे . २१ वर्षा खालील व्यक्तींना आणि दारु पिण्याचा परवाना न बाळगणार्‍या व्यक्तींना येथे प्रवेश नाही .)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

चातका, अरे मला तर वाटतय इतके वर्ष तू बहुधा "मदिरेच्या धाग्याचीच" चातकासारखी वाट पहात होतास........

धाग्याच्या जोडीला तू पण प्रवाही झालायस... Rofl Biggrin

मदिरेमुळे पुरुषाचा तोल ढळतो(बायकांच्या कमी कपड्यांमुळे ढळतो तसाच) त्यामुळे पुरुषांसाठी दारुबंदी झाली पाहिजे!
<<<
हो, हो पुरुषां साठी दारुबंदी झालीच पाहिजे !
१. काही पुरुष पिउन तोल ढळण्या व्यतिरिक्त आंतर्जालावर स्त्रियांबद्दल गलिच्छ कॉमेन्ट्स, ड्रिंक अ‍ॅन्ड ड्राइव्ह ला उत्तेजन देणार्‍या कॉमेन्ट्स लिहिणे यालाही बळी पडतात.
२. काही मुठ भर दारुड्यांच राग येऊन एखाद्या स्त्रीची स्वाभाविक रिअ‍ॅक्शन म्हणून ती दुसर्‍याच गरीब , निर्व्यसनी पुरुषाला बेदम बदडु शकते, थोडक्यात पिणार्‍यांमुळे अनेक न पिणारे गरीब पुरुष अशा शोषणाला बळी पडु शकतात.

>>(बायकांच्या कमी कपड्यांमुळे ढळतो तसाच)>>> १०००% चुक खुप फरक आहे....मदीरेत जी 'नजाकत' आहे ति >>त्यांच्यात नाही....चुक होतेय्....बायकांच्या कमी कपड्यांमुळे लिंगपिसाट्च ढ्ळतात्...क्रुपया मदीरेस बदनाम करु >>नये...! उलटपक्षी मदिरा प्राशन करणारा, तो आहे तसा वागतो. (पिसाट असल्यास तसा)

>>पंतांच्या मदिरा प्राशनक्रिया आजमावुन बघा म्हणजे कळेल नजाकत्... स्मित

>>रच्याकने, कपड्यातुन जेवढं शरीर सुंदर दिसतं तसं प्रत्यक्षात नसतं...स्मित

Lol

कृपया गुत्यावरील नियमित "गिर्‍हाईकांनी" कोणाच्याही चिथावणीस बळी न पडता या धाग्याची पवित्रता राखून तो भरकटू देऊ नये...... Proud

विषयेतर अश्या कुठल्याच कमेंटवर प्रतिवाद करू नये....... निव्वळ मज्जा चालू द्या.... Happy

मतलब छुपा हुआ है यहां हर सवाल मे..... मतलब छुपा हुआ है यहां हर सवाल मे.....
दो सोच कर जवाब........ जमाना खराब है.... Proud Biggrin

जास्त पिणार्‍यांमुळे अनेक थोडे पिणारे 'गरीब पुरुष' अशा शोषणाला बळी पडु शकतात.>>>

आणि मग असे थोडे आणि जास्त पिणारे शोषित पुरुष कुणाच्याही "गळी" पडू शकतात..... Rofl Lol

भिन्न मद्याच्या चवी आम्हि क्रमाने चाखतो,
पेल्यातली घेउन आधी ओठातली मग चाखतो,
वेगळी cocktails ऐसी, एकत्र ना मिसळायची
सांगतो, याची मजा चार चैउघात नाही यायची........

- भाउसाहेब पाटणकर

दिवसातुन तीन वेळा माबो वर आलो पण हा धागा नव्हता. झोपायच्या आधी एक चक्क्र मारावी म्हणून आलो आणि १५० प्रतिसाद पाहून उडालोच.

पण मुळ मुद्दा भरकटतो आहे.....

पंतांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कोणीच देत नाहीये........

पंतांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे माझ्या केस मधे प्रसंगानुसार बदलतात.

general occasions....

दारु कोणती प्यावी ? कोणताही चांगला ब्रांड.

किती प्यावी ? दुसर्‍या दिवशी सुट्टी असेल तर अर्धा खंबा, नसेल तर एक क्वार्टर ;-ड

कशी प्यावी ? कोक, पाणी, आणि बर्फ (असला तर )

कोठे प्यावी ? जिथे चान्स मिळेल तिथे.... Happy

सोबतीला काय घ्यावे ? ( चकना ह्या अर्थाने विचारत आहे ) मूग डाळ ( प्रथिनांचे प्रमाण यामधे
सगळ्यात जास्त असते. शिवाय छान लागते...)

मुजिक कोणते आवडेल ? रफी, किशोर, आशा, लता, गावरान मराठी, सलील-संदिप ची निवडक गाणी,

मैफील जमणार असेल तर शेरोशायरी वगैरे काही की अजुन ..? वपूंचे, पुलंच कथाकथन, वपुर्झा, भाउसाहेब पाट्णकर, चंद्रशेखर गोखले आणि जेव्हा मी एकटा असतो तेव्हा काहि निवडक ईंग्रजी
चित्रपट
.

त्या नंतर जेवणाचे काय ? पिल्यावर जेवण जास्त जात नाही तात्पर्य चकणा म्हणून दाबुन चिकण खाणे. Happy

दारु कशी सोडावी ? सर्वात महत्वाचे हे कि का सोडावी ?????????? :-द

धागा आवडला.
जमेल तशी भर टाकू.
पंत्,तुमच्या प्राशनक्रिया आवडल्या.
सगळीकडे बायको किंवा गर्लफ्रेंड सोबत आहेच. एका ठिकाणी (हार्ड रॉक कॅफेत) चक्क दोघीही Happy

Special occasions....

दारु कोणती प्यावी ? टिचर्स ५० पासुन ते सिंगल मॉल्ट पर्यंत कोणतीही,

किती प्यावी ? दुसर्‍या दिवशी सुट्टी असेल तर अर्धा खंबा, नसेल तर एक क्वार्टर

कशी प्यावी ? preferably on the rocks ज्यांना झेपत नसेल त्यांच्या साठी कोक, पाणी आणि बर्फ आहेच...

कोठे प्यावी ? निवांत ठिकाणी, रो हाउसेस प्रेफरड, ( मला स्वताला या साठी एम.टि. डि.सी चे रेसॉर्ट खुप आवडतात, काहि काहि खुप सुंदर आहेत....

सोबतीला काय घ्यावे ? ( चकना ह्या अर्थाने विचारत आहे ) चिकन च्या वेगवेगळ्या पाककृती,

मुजिक कोणते आवडेल ? शांत, सुमधुर असणे महत्वाचे. शास्त्रीय सगळ्यात बेष्ट.....

मैफील जमणार असेल तर शेरोशायरी वगैरे काही की अजुन ..? वपूंचे, पुलंच कथाकथन, वपुर्झा, भाउसाहेब पाट्णकर, चंद्रशेखर गोखले आणि जेव्हा मी एकटा असतो तेव्हा काहि निवडक ईंग्रजी
चित्रपट.

पंत,

बोलता बोलता तुम्ही प्यायलेले नसल्यामुळे चुकून बायको व गर्लफ्रेन्ड असे एकाच स्पॉटवर म्हणून गेलात!

ते खरे असले तर आपण एकदा बसूच! कारण समसुखी लोकांनी नेहमी बरोबर असावे.

ते खरे नसले तर त्रिवार निषेध या शोषक वृत्तीचा!

भिन्न मद्याच्या चवी आम्हि क्रमाने चाखतो,
पेल्यातली घेउन आधी ओठातली मग चाखतो,
वेगळी cocktails ऐसी, एकत्र ना मिसळायची
सांगतो, याची मजा चार चैउघात नाही यायची..>>>

अभिजीत, आपल्या सर्व पोस्ट्स आवडल्या, ही वरची सोडून!

हो, हो पुरुषां साठी दारुबंदी झालीच पाहिजे !
१. काही पुरुष पिउन तोल ढळण्या व्यतिरिक्त आंतर्जालावर स्त्रियांबद्दल गलिच्छ कॉमेन्ट्स, ड्रिंक अ‍ॅन्ड ड्राइव्ह ला उत्तेजन देणार्‍या कॉमेन्ट्स लिहिणे यालाही बळी पडतात.
२. काही मुठ भर दारुड्यांच राग येऊन एखाद्या स्त्रीची स्वाभाविक रिअ‍ॅक्शन म्हणून ती दुसर्‍याच गरीब , निर्व्यसनी पुरुषाला बेदम बदडु शकते, थोडक्यात पिणार्‍यांमुळे अनेक न पिणारे गरीब पुरुष अशा शोषणाला बळी पडु शकतात.>>>

Rofl

कृपया गुत्यावरील नियमित "गिर्‍हाईकांनी" कोणाच्याही चिथावणीस बळी न पडता या धाग्याची पवित्रता राखून तो भरकटू देऊ नये..>>> Lol

आणि मग असे थोडे आणि जास्त पिणारे शोषित पुरुष कुणाच्याही "गळी" पडू शकतात..>>>

Rofl

जबरदस्त धागा आहे हा!

-'बेफिकीर'!

रच्याकने, कपड्यातुन जेवढं शरीर सुंदर दिसतं तसं प्रत्यक्षात नसतं.>>>

लालू, स्टेटमेन्ट ऑफ द वीक! (येथे वीक = आठवडा)

जबरी!

Lol

सकाळी सकाळी भेट दिली या धाग्याला,
झाली नजरा नजर अड्खळला पाय
सहकारी विचारते झाले घेतलीस का काय?

रच्याकने, कपड्यातुन जेवढं शरीर सुंदर दिसतं तसं प्रत्यक्षात नसतं.>>>

लालू, स्टेटमेन्ट ऑफ द वीक! (येथे वीक = आठवडा)> बेफिकीरजी, ही स्टेट्मेंट लालुची नाही, पण लालुला आवड्ली वाट्तं.?

वा वा चातकराव!

सकाळी सकाळी मिळे हाच धागा
कशाला अता यार कामास लागा?
हवी जिंदगी झिंगलेली मनाला
अम्हाला पिऊदे, तुम्ही छान वागा

सकाळी सकाळी मिळे हाच धागा
कशाला अता यार कामास लागा?
हवी जिंदगी झिंगलेली मनाला
अम्हाला पिऊदे, तुम्ही छान वागा

>>>> क्याबात है !!!

समसुखी लोकांनी नेहमी बरोबर असावे. >>> Rofl नक्कीच !

लालू, स्टेटमेन्ट ऑफ द वीक! !!!

पंत,

योग्य वाटल्यास तेवढा बिस्किटांचा उल्लेख काढाल का? उगाचच गैरसमज नकोत व्हायला.

धन्यवाद!

माझ्या जुन्या कवितांमधील काही ओळी !

मदिरा खराब आहे तुम्हि सांगता कुणाला
कुणि ऐकण्यास तुमचे शुद्धीत पाहिजे ना

===============================

मदिरा खराब आहे हे सांगतो मला जो
येता समोर मदिरा तोही तयार आहे

==============================

मदिरा खराब आहे हे सांगण्यास आले
तेही पिऊन गेले, सगळी धमाल आहे

=============================

मदिरा खराब आहे, उपदेश सपला की
सांगा मला भरू मी प्याला कुणाकुणाचा?

----------------------------------------------

(माझ्या प्रथम कवितासंग्रहातून, 'आलास तू उशीरा' यातून घेतलेल्या ओळी)

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

बिस्किटे काढून अच टाका.......... चखन्यात मारी बिस्किट आल्यासारखी वाटतात... Proud Biggrin

त्याच कवितासंग्रहात मदिरेवर खालील दोन पूर्ण कविताही आहेत.

१. मदिरा खराब आहे

२. जाळून पीत आहे

त्या काही वेळाने देतो.

त्यावेळेस मला वृत्तांचे ज्ञान नसल्यामुळे अनेक मात्रा दोष होते. पण होत्या तशाच त्या कविता देत आहे.

=================================================================

जाळून पीत आहे

मदिरा खराब आहे जे सांगतात मजला
असल्या सुधारकांना टाळून पीत आहे

माझ्या घराकडेला विकतात ते मदिरा
शेजारधर्म साधा पाळून पीत आहे

डोळे तिचे असे की, डोळ्यातली तिच्या मी
डोळ्यांवरी तिच्या त्या भाळून पीत आहे

विश्वास नाही माझा मिळतेच शुद्ध यावर
प्रत्येक थेंब मित्रा चाळून पीत आहे

जाई घशामधूनी, डोळ्यांमधून वाही
अश्रूस गाल माझा वाळून पीत आहे

अभ्यास लागतो रे बदनाम व्हायलाही
मी एक एक प्याला कोळून पीत आहे

मदिरेत राम नाही सांगायचा मला जो
हल्ली स्वतः स्वतःची गाळून पीत आहे

पाण्यास जीवनाची उपमा कुणा मुर्खाची
किति काळ हा घसा मी जाळून पीत आहे

-आलास तू उशीरा या काव्यसंग्रहातून - रचनाकाल - जानेवारी २००८

-'बेफिकीर'!

त्याच कवितासंग्रहातील ही दुसरी कविता!

मदिरा खराब आहे

ही वाट ना धरावी हा छंद ना करावा
म्हणती जगात सारे मदिरा खराब आहे

दिसते तशीच असते खोटी तिच्यात नाही
चाखून बघ चवीला मदिरा खराब आहे

किति यातना मनाला देते खुशाल दुनिया
घेते कुशीत तरिही मदिरा खराब आहे

बदले जशी हवा ही, माणूस रंग बदले
बदले कधी न तरिही, मदिरा खराब आहे

दु:खात साथ देई, सोडी न एकट्याला
किति भिन्न माणसाहुन, मदिरा खराब आहे

ही लाडक्यांप्रमाणे देई नव्या कधीना
बुजवी जुन्याच जखमा, मदिरा खराब आहे

मन मोडले कुणी जर, उपचार काय त्यावर
बुडुनी हिच्यात सावर, मदिरा खराब आहे

पिउदेत चार पेले, आमचे जमून आले
मैत्री समानशीले , मदिरा खराब आहे

- आलास तू उशीरा - रचनाकाल डिसेंबर २००७

-'बेफिकीर'!

व्वा!! भूषणजी जुन्या कविता ऐकायला मिळाल्या

मदिरेस 'सोमरस' हे नाव आहेच की नंतर देण्यात आले आहे? सोमरस हे नाव का पडले असावे?

Pages