Submitted by भूत on 8 February, 2011 - 06:42
इतरत्र वाचलेल्या एका धाग्याच्या धर्तीवर हा धागा सुरु करण्यात येत आहे .
येथे सदस्यांनी आपले मदिरानुभव लिहावेत.
दारु कोणती प्यावी ?
किती प्यावी ?
कशी प्यावी ?
कोठे प्यावी ?
कॉकटेलची पाककृती .....ह्याला आपण कॉककृती म्हणुयात ...
सोबतीला काय घ्यावे ? ( चकना ह्या अर्थाने विचारत आहे )
मुजिक कोणते आवडेल ?
मैफील जमणार असेल तर शेरोशायरी वगैरे काही की अजुन ..?
त्या नंतर जेवणाचे काय ? .
उतारा घ्यावा का ? किती आणि कधी घ्यावा ?
दारूमुक्ती
दारूचे परिणाम टाळण्यासाठीचे उपाय
दारू प्यायल्यानंतर घडलेले विनोदी प्रसंग
दारु कशी सोडावी ?
.
.
.
चीअर्स!!
( स्टॅचुटरी वॉर्निंग : मद्यपान शरीरास हानीकारक आहे . २१ वर्षा खालील व्यक्तींना आणि दारु पिण्याचा परवाना न बाळगणार्या व्यक्तींना येथे प्रवेश नाही .)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Private - accessible only to group members
शेअर करा
यांच्यामते मद्यपान
यांच्यामते मद्यपान हा
आयूष्याचा महत्वाचा पार्ट आहे
बीयर पिण्यामागे सायन्स
तर देशी पिण्यामागे आर्ट आहे>>
मी इतकीच घेणार असा
प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
पॅक बनविनारा त्यदिवशी
जग बनवणार्यापेक्षा मोठा असतो>>>> जबराट्ट
लोकेशन : निर्मनुष्य बीच (आपण
लोकेशन : निर्मनुष्य बीच (आपण सोडुन). कन्याकुमारी जवळचा चेट्टिकुलम (मी नुकताच जाऊन आलोय)
वेळ : साधारण दुपारी ३:००...... डिसेंबर / जानेवारी महिना (इकडे यावेळी वातावरण अगदी मस्त....) ...समोर समुद्र...
कंपनी : जास्तीत जास्त ४ मित्र
म्युजिक : लाटांचे नैसर्गिक म्युझिक
कॉकटेल : नको
ब्रॅन्ड : सिग्नेचर व्हिस्की, ऑर्फियस रम
सोबतीला: उकडलेले मुग
जेवणासाठी : चिकण
अॅडीशन : साधारण संध्याकाळी ७.०० पर्यन्त हा कार्यक्रम चालु ठेवावा...... मस्त सुर्यास्त दिसतो इथुन........ नंतर कन्याकुमारीत जाऊन हॉटेलवर झोपावे व सकाळी कन्याकुमारी फिरावे.....
चीअर्स !!
पी+अन्+डुल कर
पी+अन्+डुल कर
वा राज्या वा! मस्त!
वा राज्या वा!
मस्त!
करायला गेले काय नि झाले काय??
करायला गेले काय नि झाले काय?? पंतांची अवस्था कदचित अशी असेल.
माझ्या आजच्या एका भाबड्या
माझ्या आजच्या एका भाबड्या प्रश्नाचे कुणीच उत्तर दिलेले नाहीये
अल्कोहोलोक अॅनॉनिमसची
अल्कोहोलोक अॅनॉनिमसची मीटींग
लोकेशन : शिक्षण प्रसारक मंडळाची शाळा/ मनपा दवाखान्याची १० बाय १५ ची कोपर्यातली रिकामी खोली
वेळ : संध्याकाळी ७.०० ते ८.००
कंपनी ::२ पासून १०-१५ कितीही
म्युझिक : चेहरा स्तब्ध व मनात प्रचंड खळबळीचे म्युझिक
कॉकटेल : दारु सोडू की नको अश्या दोन विचारांचं कॉ़कटेल
ब्रॅन्ड : अल्कोहोलिक अॅनॉनिमसला येणारे सगळेच अव्यक्त ब्रँड अँबॅसिडर असतात,
सोबत :,ए.ए. ची पुस्तके.
जेवणासाठी ::घरी जावून जेवावे.
अॅडीशन : दारु पिल्यामुळे, बेवडा हा लौकिक कसा प्राप्त झाला याचे विवेचन केले जाते.आपली ओळख करुन देवून आपल्याला आलेले कटू अनुभव कथन केले जाते. नवीन पिणारा व दारु सोडण्यास आलेला पहिल्याच भेटीत व्यक्त होत नाही.... व हळू हळू अनुभव ऐकुन तोही स्वःतास व्यक्त करतो व दारुपासून दूर रहाण्याचा निग्रह करतो.
साधारण संध्याकाळी८.०० पर्यन्त हा कार्यक्रम चालु ठेवावा...... मस्त सुर्यास्त दिसतो इथुन........ नंतर घरी जावून न पिता (दारु) झोपावे व सकाळी मोकळ्या हवेत फिरावे...
३ चीअर्स !!
कैलासराव, ई सारखी डब्ल्यु ए
कैलासराव,
ई सारखी डब्ल्यु ए पण असते का? वाईफ अॅनॉनिमस
सोमरस- सोम नावाच्या वल्ली
सोमरस- सोम नावाच्या वल्ली (वेली) पासून हा रस काढीत आणि यज्ञादींमध्ये तो प्रसाद म्हणून प्यायला
जाई.
अतिशय उग्र अशी चव असते याची त्यामुळे थोडी 'किक' चढू शकते (पण नो अल्कोहोल)
फक्त किक चढणे या साधर्म्यामुळे 'सोमरस= मद्य' असे घेतले जात असावे.
आणि मद्यप्राशनाचा पुरस्कार करणार्यांना, " मग तुमच्या यज्ञात सोमरस प्यायला जातोच की" अशी एक पळवाट मिळाली.
मद्याच्या बाबतीत निंदाजनक अवतरणे आहेत तर सोमरसाची मात्र प्रशंसाच केलेली आढळेल.
उदा: मद्यं कुलविनाशकं (यादववंशातील युद्धाचं मद्यप्राशन हे एक कारण होतं.)
उदा: ये ब्राह्मणास्त्रिसुपर्णं पठन्ति | ते सोमं प्राप्नुवन्ति| (जे ब्राह्मण त्रिसुपर्णाचा पाठ करतात त्यांना सोम मिळते.) म्हणजेच सोम हि प्राप्त करण्याजोगी (स्वर्ग इ. सारखी) गोष्ट मानली गेली आणि मद्य हे त्याज्य मानले गेले
बाकी,
मी दारूला हातसुद्धा लावत नाही हे विधान फारच हास्यास्पद आहे.
हात कशाला लावायचा दारूला? ओठच लावायचे (किंवा दारू ओठाला लावायची)
ई सारखी डब्ल्यु ए पण असते का?
ई सारखी डब्ल्यु ए पण असते का? वाईफ अॅनॉनिमस>>>>
मला रोजच युद्ध करावं लागतं!
मला रोजच युद्ध करावं लागतं! मग चालेल का प्यायली तर??
चैतन्या, लई आभार गड्या!! आणी
चैतन्या,
लई आभार गड्या!!
आणी मधून मधून ह्या धाग्यावर येत जा, संस्कृत सुभाषितांनी धाग्याला जरा अभिजाततेचं पण स्वरूप यायला हवे
उदा: मद्यं कुलविनाशकं
उदा: मद्यं कुलविनाशकं (यादववंशातील युद्धाचं मद्यप्राशन हे एक कारण होतं.)>>>>
भूषणजी,मद्यामुळे युद्ध होतं.......युद्ध होतं म्हणून किंवा युद्धाकरिता मद्य घ्यावं असं नाही.
नाही काल आशूचॅम्प म्हणाले ना?
नाही काल आशूचॅम्प म्हणाले ना? रणमद चढावा म्हणून हत्तींना मद्य पाजलं जायचं! आपण हत्ती नसलो तरी रणमद चढणं ही गरज आहेच की आपली?
निदान दुसरे 'तरीसुद्धा' आपल्याला घाबरत नाहीत हे कळणार तरी नाही ना?
नाही काल आशूचॅम्प म्हणाले ना?
नाही काल आशूचॅम्प म्हणाले ना? रणमद चढावा म्हणून हत्तींना मद्य पाजलं जायचं! आपण हत्ती नसलो तरी रणमद चढणं ही गरज आहेच की आपली?
निदान दुसरे 'तरीसुद्धा' आपल्याला घाबरत नाहीत हे कळणार तरी नाही ना?>>>>>>>>>
आणि मद्यप्राशनाचा पुरस्कार
आणि मद्यप्राशनाचा पुरस्कार करणार्यांना, " मग तुमच्या यज्ञात सोमरस प्यायला जातोच की" अशी एक पळवाट मिळाली >>> नाहितर काय....
संस्कृत सुभाषितांनी धाग्याला जरा अभिजाततेचं पण स्वरूप यायला हवे>>> मोदक
बेफी
बेफी
सह्ही मज्जा चालईये या धागावर
सह्ही मज्जा चालईये या धागावर !! मी कृतार्थ झालो
चीअर्स !!
सोमरस- सोम नावाच्या वल्ली (वेली) पासून हा रस काढीत आणि यज्ञादींमध्ये तो प्रसाद म्हणून प्यायला जाई.
>>>> हा आपल्याला तयार करता येईल काय ?
बाकी मद्याचा सगळी कडेच निशेध केलाय हे मान्य !
भांग मांगे मिठाई | गांजा मांगे घी ||
दारु मांगे जुता चप्पल | जो इच्छा सो पी || असं पांडेजी सांगायचे दिल्लेत असताना ......मग आम्ही चीअर्स टाळायचो |
बम बम भोले
सोमरस- सोम नावाच्या वल्ली
सोमरस- सोम नावाच्या वल्ली (वेली) पासून हा रस काढीत आणि यज्ञादींमध्ये तो प्रसाद म्हणून प्यायला जाई.
>>>
सोम वल्ली आम्हा सोयरे.. निशाचरे....
सोम वल्ली आम्हा सोयरे.. निशाचरे....
पंतही सुमुखे ... पाजविती......
"दारू सोडणे खूप सोपे आहे. मी
"दारू सोडणे खूप सोपे आहे. मी दारू अनेकवेळा सोडलेली आहे." असं कुणीतरी सांगितलं आहे.
दारुड्याला औषध "बाटली" तुन
दारुड्याला औषध "बाटली" तुन द्यावं, लवकर "गुण" येतं.
(आंतरजाल वरुन साभार)
भुंगा... अशक्य
भुंगा...
अशक्य हसलो...
तुकाराम तळमळले असतील तिकडे....
मधुशाला वैकुंठ हमारा, जन्नत मधुशाला |
दे दे साकी,मोक्षरूप हाला का इक प्याला |
इस प्याले को कहे बुरा कोइ, कहे नरक का द्वार|
मै कहता,'मय' खुद को भुला दे, कर दे बेडा पार |
'खुद मे मगन हो जाने का' यह साधक-पंथ निराला,
दे दे साकी, मोक्षरूप हाला का इक प्याला |
(कसे काय लोक्स?)
पंत सावधान नाहीतर एलबीडब्ल्यु
पंत सावधान नाहीतर एलबीडब्ल्यु व्हाल
असे म्हणतात, दारु हळुहळू जीव
असे म्हणतात, दारु हळुहळू जीव घेते.
इथं घाई कोणाला आहे.
(आंतरजाल वरुन साभार)
भारी लिहिताय सगळेच....अशक्य
भारी लिहिताय सगळेच....अशक्य हसतेय
सानी, कालचा हँग ओवर अजुन उतरत
सानी,
कालचा हँग ओवर अजुन उतरत नाहिये.
होतकरू तळीरामाची मुक्ताफळे ही
होतकरू तळीरामाची मुक्ताफळे
ही माझीच माबोवरचीच का.का.क. उर्फ मुक्ताफळे
ही गावठी घेऊन एकदातरी (पहावे)
कसे विमान उडते अधांतरी?
ओली उचकी आली जरी
करू हिक् हिक् हिक् हिक् नाक्यावरी
----------------------------------------------------
बाटलीतून उतरली पहिली-वहिली धाSSSSर
नरड्यातून थेट
लिव्हरची भेट
जहरी झाSSSSली !
----------------------------------------------------
हलके भासे जगSSS
सगळे दिसती नगSSS
पिऊन साक्षात्कार
निराळे होSSSSती
----------------------------------------------------
देशी-विदेशी भेदभाव हा
मदिरेमध्ये बुडवून टाका
राजरोस 'त्या' जाता द्वारी
कशास भांडे आपुले झाका?
----------------------------------------------------
दारूबाज हे म्हणती सारे
पिऊन पहा, ती चवच न्यारी!
आपण बुवा दूरच बरे
बुडेल आपुली दुनिया सारी
----------------------------------------------------
दारूबाज हे म्हणती सारे
"कंबख्त तूने पी ही नहीं"
आपण बुवा दूरच बरे
राहूदे आपली कोरडीच वही!
----------------------------------------------------
बंधन हे ड्राय डे चे
झुगारून द्यावे म्हणतो
फ्रीज मधले थोडे बर्फ
ग्लासात टाकावे म्हणतो
या बाटलीत माझ्या
उरली सुरा न फार
बर्फात घोळवावी
पेल्यातली 'नीट'
_/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_
आणि आता माझा नेहमीचा
आणि आता माझा नेहमीचा प्रोग्राम ....
लोकेशन : यवतेश्वरचे पठार, सातारा ( दोस्तहो , यवतेश्वर हा गडही नाही अन किल्ला तर मुळीच नाही त्यामुळे " गड किल्यांवर मद्यपान करु नये" हा शिवरायांचा आदेश कोठेही मोडला जात नाही
)
वेळ : संध्याकाळी ७.०० ते पुढे
कंपनी : काही जिवलग मित्र ...थोड्या कविता ... ...कॉलेजमधील मस्ती ...दुसृया गृप्ला दिलेला डोस ... कालपरवाचा प्रपोज ...
म्युझिक : इथे इतका मस्त वारा वाहत असतो...त्याचे ते संगीत ... की दुसरे म्युजीक नॉईझ वाटते
कॉकटेल : कॉलेजच्या दिवसात गरीब भुक्कड लोकांना परवडेल तो ...अर्थात व्होडका + लिमका
ब्रॅन्ड : व्हाईट मिस्चीफ ...स्वस्तात मस्त ,
सोबत :दिवाळीचा उरलेला चिवडा . न सांगता संपवतोय म्हणल्यावर घरचेही खूष होतात.
जेवणासाठी :..व्यवस्तीत पिवुन झाल्यावर हायवे कडचा" कणसे ढाबा" ...ही एकच अशी जागा जिथे मी वेज इस प्रीफर्ड ओव्हर नॉन व्हेज ...काजुकरी + रोटी !
कॉशन : आजकाल पोलीस स्ट्र्रेक्ट झालेत सातार्यातले आणि यवतेश्वर चोर्या मार्या हमखास होतात ...आणि बिबट्याचा वावर आहे ...बस्स बाकी काही खास रिस्क नाही
यवतेश्वरचे पठार मी मुक्तेश्वर
यवतेश्वरचे पठार
मी मुक्तेश्वर वाचल
यवतेश्वरचे पठार मी मुक्तेश्वर
यवतेश्वरचे पठार
मी मुक्तेश्वर वाचल
>>
इतक्यातच चढली?
Pages