मदिरा प्राशन - पार्श्वभूमी, परिचय, व्यसनमुक्ती , अनुभव व मनःशांती

Submitted by भूत on 8 February, 2011 - 06:42

इतरत्र वाचलेल्या एका धाग्याच्या धर्तीवर हा धागा सुरु करण्यात येत आहे .
येथे सदस्यांनी आपले मदिरानुभव लिहावेत.
दारु कोणती प्यावी ?
किती प्यावी ?
कशी प्यावी ?
कोठे प्यावी ?
कॉकटेलची पाककृती .....ह्याला आपण कॉककृती म्हणुयात ...
सोबतीला काय घ्यावे ? ( चकना ह्या अर्थाने विचारत आहे )
मुजिक कोणते आवडेल ?
मैफील जमणार असेल तर शेरोशायरी वगैरे काही की अजुन ..?
त्या नंतर जेवणाचे काय ? .
उतारा घ्यावा का ? किती आणि कधी घ्यावा ?
दारूमुक्ती
दारूचे परिणाम टाळण्यासाठीचे उपाय
दारू प्यायल्यानंतर घडलेले विनोदी प्रसंग

दारु कशी सोडावी ?
.
.
.
चीअर्स!!

( स्टॅचुटरी वॉर्निंग : मद्यपान शरीरास हानीकारक आहे . २१ वर्षा खालील व्यक्तींना आणि दारु पिण्याचा परवाना न बाळगणार्‍या व्यक्तींना येथे प्रवेश नाही .)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

जनाब अकबर ईलाहाबादी
------------------------------------
हन्गामा है क्यूं बर्पा थोडी सी जो पी ली है
डाका तो नहीं डाला चोरी तो नहीं की है

ना-तजुर्बाकारी से वाईज़ की ये बातें हैं
इस रन्ग को क्या जाने पूछो तो कभी पी है

उस मय से नहीं मतलब दिल जिस से है बेगाना
मकसूद है उस मय से दिल ही में जो खिंचती है

वां दिल में कि सदमे दो यां जी में के सब सह लो
उन का भी अजब दिल है मेरा भी अजब जी है

हर ज़र्रा चमकता है अनवार-ए-इलाही से
हर सांस ये कहती है हम हैं तो खुदा भी है

सूरज में लगे धब्बा फ़ितरत के करिश्मे हैं
बुत हम को कहे काफ़िर अल्लाह की मर्ज़ी है

हो भूषणजी,

गुलाम अलीचे ते लाईव रेकॉर्डींग आहे माझ्याकडे. अर्थात लाईव्ह परफॉर्मन्स की तो बातही कुछ और है!! Happy

मुकु, अशीच चटक लागते रे मग...

नाही कित्येक वेळा दारुच्या दुकानवर बसलो
मी औरंगाबादला नोकरी करित असताना आमच्या त्यावेळच्या मालकाचा बिअर बारही होता मी संगणक्चे काम करित होत त्यामुळे मला माहीत आहे. मला मालकाने कितीवेळा म्हटले पण आजही हात लावत नाही

मद्यपाश (दारुचे व्यसन)
मद्यपाशाचे दुष्परिणाम
मद्यपाशामुळे नेमक्या कोणत्या बाबींना महत्त्व द्यावे या विषयी संभ्रम निर्माण होतो. महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य न दिल्या गेल्यामुळे आपोआपच ताणतणाव वाढत जातो. राहणीमानावरही प्रभाव पडतो, कौटुंबिक संवादात दरी निर्माण होत जाते.

दारुच्या व्यसनामुळे आपली प्रतिकार क्षमता तर कमी होत जातेच शिवाय ताणतणावाचे नियोजन करणे हळूहळू अवघड होऊन बसते म्हणजेच प्रतिक्रिया देण्याची गती मंदावत जाते.

अतिसेवनामुळे मेंदुच्या पुढील भागावर यामुळे परिणाम होतात व मेंदुचा आकार कमी होत जातो. त्याचप्रमाणे मज्जासंस्थेवर व शरीराला स्थिर ठेवणार्‍या पाठीच्या कण्यावर वाईट परिणाम होतात. कालांतराने शरिराचा तोल सांभाळणेही अवघड होऊन बसते. दारुच्या सेवनामुळे शरिरास आवश्यक असणारे प्रथिने व जीवनसत्वाची कमतरता जाणवते. याशिवाय थरथरी येणे, झोप न येणे, भूक न लागणे व कदाचित मृत्यूही ओढवू शकतो.

लक्षणे
मद्यपाशाचे मुख्य चार महत्त्वाची लक्षणे आहेत
व्यसनाची प्रबळ इच्छा
नियंत्रण न राहणे. यात व्यसनावरही नियंत्रण राहत नाही.
शारिरीक अवलंबत्व: व्यसन न करण्याच्या काळात आपोआपच शरीराचे निर्विषिकरण होत असते. पण त्यावेळेस काही शाररिक त्रासही होत असतो. उदाहरणार्थ घाम फुटणे शरीराची थरथर होणे, भिती वाटणे छातीत धडधड होणे इत्यादी त्रास होत असतो. हे सर्व त्रास थांबवण्यासाठी व्यसनी माणसाला दारु पिणे भाग पडते म्हणूनच या अवस्थेला शाररिक अवलंबत्व येणे असे म्हणतात.
व्यसनाच्या क्षमतेत वाढ: मानसिक समाधान प्राप्त होण्यासाठी दारुचे प्रामाण दिवसेंदिवस वाढवत जावे लागते

उर्वरित माहिती लवकरच................

पंत HIV च्या धर्तीवर व्यसनमुक्ती हा वेगळा धागा काढा
आपंण येऊ शक्य तेवढे

"एकच प्याला"तील तळीराम दारु पिण्याचे जे समर्थन करतो ते मोठे मासलेवाईक आहे. तो म्हणतो-
"दारु एकदा घेतली म्हणजे ती सुटत नाही,पण तेवढ्याने दारु वाईट कशी ठरते ? विश्वविद्यालयाची एकदा पदवी मिळवली म्हणजे ती जन्माची चिकटते. एकदा नुसती माळ घातली की बायको कायमची बिलगते.मग पदवीला न बायकोला जर लोक वाईट समजत नाहीत तर दारुलाच तेवढे लोक वाईट का समजतात ? प्रेमाचे दुष्परिणाम तर दारुपेक्षा वाईट असूनसुद्धा प्रेमाला जगात काय भाव आला आहे. ? प्रेमात राजासुद्धा गुलाम होतो,पण मदिरेत गुलामाला आपन राजा आहोत असे वाटते.प्रेमामुळे काही सुचेनासे होते-तर मदिरेमुळे कल्पनाशक्ती अनिवार वाढते.लोक म्हणतात,मद्यपान हे अनीतिकारक आहे. साफ खोटे. मद्यपान नीतिमत्तेला फार पोषक आहे.मद्यपी कधी खोटे बोलत नाही. कारण खोटे रचून त्याला सांगताच येत नाही. तो कधी कोणाचा विश्वासघात करी नाही. कारण त्यावर कोणी विश्वास ठेवीत नाही.चोरीच्या बाबतीत तर तो अजाण असतो. एखादी लहानशी गोष्टसुद्धा त्याला दुस-याजवळून चोरुन ठेवता येत नाही"

त्यावर भगीरथ तळीरामाला विचारतो,"दारु जर इतकी चांगली आहे असे तुम्ही म्हणता, तर मग तिची जगात एवढी निंदा का होते ?"

त्याला तळीराम उत्तर देतो की, "मद्यपान हे बहुतांशी हलक्या लोकांच्या हाती गेल्यामुळे संभावित समाजाकडून दारुची हेटाळणी होते असते. ती बंद व्हावी आणि मद्यपानाच्या व्यसनाला सभ्य स्वरुप यावे एवढ्यासाठी सर्व धर्माच्या, सर्व जातींच्या आणि पोटजातींच्या दारु पिणा-यांचे एक "आर्य मदिरा मंडळ" काढण्याचे आपण ठरविले आहे"

या मंडळाच्या नावाबद्दल आणि उद्देशाबद्दल तळीरामाने जे टाचण केलेले आहे त्यातला उपरोध आणि उपहास अतिशय मार्मिक आहे-

"मद्यपानाच्या व्यसनाला सभ्य स्वरुप यावे एवढ्यासाठी संस्थेच्या नावात "आर्य" हा शब्द घालण्यात आलेला आहे.मंडळाच्या प्रत्येक सभासद दारु पिणारा आणि आपण दारु पितो हे चारचौघात बोलून दाखविणारा असा पाहिजे. मांसाहाराला हे मंडळ उत्तेजन देते. साडेआठला दारुची दुकाने बंद होतात. तो कायदा मोडून सर्रास अहोरात्र ती दुकाने उघडी ठेवावीत एवढ्यासाठी हे मंडळ सरकारला विनवण्या करीत राहणार.बिनवासाची प्यायची दारु शोधून काढण्यासाठी हे मंडळ शिष्यवृत्ती देऊन विद्यार्थ्यांना परदेशी पाठवणार. प्रत्येक सभासदाने नवीन सभासद मिळवून मद्यपानाचा जारीने प्रसार करावयाला हवा.त्याप्रमाणे व्यसने सोडण्याचे आजकाल समाजात जे खूळ बोकाळले आहे, कोणी चहा सोडतो,कोणी विडी सोडतो,त्या खुळाला या मंडळाने आळा घातला पाहिजे

व्यसनाच्या क्षमतेत वाढ: मानसिक समाधान प्राप्त होण्यासाठी दारुचे प्रामाण दिवसेंदिवस वाढवत जावे लागते>>
सर्व त्रास थांबवण्यासाठी व्यसनी माणसाला दारु पिणे भाग पडते म्हणूनच या अवस्थेला शाररिक अवलंबत्व येणे असे म्हणतात>>>
डॉ. उपयुक्त माहीती दिली आपण..आभारी

मला मालकाने कितीवेळा म्हटले पण आजही हात लावत नाही>>> डायरेक्ट घश्यात ओतली " Wink Happy

डॉ़, तुमची माहिती म्हणजे

"प्रथमग्लासे मक्षिकापातः " असा प्रकार झाला.......... तुम्ही म्हणजे अचानक चालणारी लाईव्ह गझल बंद करून दारूचे दुष्परिणाम यावर्ची डॉक्युमेंट्रीच लावलीत.......

पंतांची पापापापापापापापारराररररर्रररररररर्रररररररर्र उतरली ना राव...... Rofl

बाकी याचा निषेध म्हणूनही पिता येईलच..... Wink

पीने वाले को पिने का बहाना चाहिये Rofl

आणि या प्रतिसादाबरोबरच पंत यांचे नामकरण आता द्विशतकीय तुफानी बल्लेबाज पंत पिंडुलकर असे करण्यात येत आहे.

दारु पिल्याने माणसे मोठ्ठी...महान होत नाहीत हे मान्य !

पण मग बरीच मोठ्ठी...महान माणसे दारु पिताना दिसतात ...यात काही कार्यकारण भाव असावी की नाही ? Uhoh

यावरुन मी मागे मांडलेले एक मत के " कर्तृत्ववान व्यक्तींना सामान्य समाजाची बंधने बंधन कारक नसावीत " हे सिध्द होते काय ?

नाही आता ३ शतकाकडे वाटचाल
सेह्बागचा विक्रम मोडायचा आहे
मग पंत एकदम वर्डकप मध्येच चमकतील Biggrin

जालावर इतरत्र प्रसिद्ध कविता.

ऐक क्वार्टर कमी पडते

दारु काय गोष्ट आहे
मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पिणारा म्हणतो
मला काहीच चढली नाही

सर्व सुरळीत सुरु असताना
लास्ट पॅकपाशी गाडी अडते
दर पार्टीच्या शेवटी मात्र
एक क्वार्टर कमी पडते

पिण्याचा प्रोग्राम म्हणजे जणू
वीचारवंतांची गोलमेज परीषदच भरते
रात्री दिलेला शब्द प्रत्येकजण
सकाळच्या आत विसरते

मी इतकीच घेणार असा
प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
पॅक बनविनारा त्यदिवशी
जग बनवणार्यापेक्षा मोठा असतो

स्वत:च्या स्वार्थासाठी
प्यायच्या आग्रहाचा कार्यक्रम घडते
दर पार्टीच्या शेवटी मात्र
ऐक क्वार्टर कमी पडते

पिण्याचा कार्यक्रम पिणार्याला
दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा
पीण्याचा क्षमतेवर गर्व असते

आपण हिच घेतो म्हणत
ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
वेळ आली आणि पैसा नसला की
देशीवरही तहान् भागवतात

शेवटी काय दारु दारु असते
कोणतीही चढते
दर पार्टीच्या शेवटी मात्र
ऐक क्वार्टर कमी पडते

पिण्यार्यामध्ये प्रेम हा
चर्चेचा पहिला विषय आहे
देवदासचे खरे प्रेम पारो की दारु ?
मला अजून संशय आहे

प्रत्येक पॅकमागे तिची
आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते

तिच्या आठवणीत थर्टीची लेवल
लगेच सिक्स्टीला भीडते
दर पार्टीच्या शेवटी मात्र
एक क्वार्टर कमी पडते

चूकुन कधीतरी गंभीर
विषयावरही चर्चा चालतात
सर्वेजण मग त्यावर
Ph.D केल्यासारखे बोलतात

प्रत्येकाला वाटतेकी त्यालाच
यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
गावच्या पोटनिवडणूकीकडे वळते

जसा मुद्दा बदलतो
तसा आवाज वाढते
दर पार्टीच्या शेवटी मात्र
ऐक क्वार्टर कमी पडते

फेकणे, मोठोपणा दाखवणे याबाबतीत्
यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सींगल समोसा खाणारा
गोष्टीत पीझ्झा शिवाय् खात नाही

पैशे पैशे काय आहे ते फक्त
खर्च करासाठीच असतात
पॅकजवळ झालेली अशी गणिते
सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात

रात्री थोडी जास्त झाली
मग त्याला कळते
दर पार्टीच्या शेवटी मात्र
ऐक क्वार्टर कमी पडते

यांच्यामते मद्यपान हा
आयूष्याचा महत्वाचा पार्ट आहे
बीयर पिण्यामागे सायन्स
तर देशी पिण्यामागे आर्ट आहे

यामुळे धीर येते ताकत येते
यात वेगळीच मजा असते
आयूष्याभराचा मावळा माणूस
त्या क्षणी राजा असते

दारुमुळे आपल्याला घराच्या
चिवड्याचे महत्व कळते
दर पार्टीच्या शेवटी मात्र
ऐक क्वार्टर कमी पडते

Pages