Submitted by भूत on 8 February, 2011 - 06:42
इतरत्र वाचलेल्या एका धाग्याच्या धर्तीवर हा धागा सुरु करण्यात येत आहे .
येथे सदस्यांनी आपले मदिरानुभव लिहावेत.
दारु कोणती प्यावी ?
किती प्यावी ?
कशी प्यावी ?
कोठे प्यावी ?
कॉकटेलची पाककृती .....ह्याला आपण कॉककृती म्हणुयात ...
सोबतीला काय घ्यावे ? ( चकना ह्या अर्थाने विचारत आहे )
मुजिक कोणते आवडेल ?
मैफील जमणार असेल तर शेरोशायरी वगैरे काही की अजुन ..?
त्या नंतर जेवणाचे काय ? .
उतारा घ्यावा का ? किती आणि कधी घ्यावा ?
दारूमुक्ती
दारूचे परिणाम टाळण्यासाठीचे उपाय
दारू प्यायल्यानंतर घडलेले विनोदी प्रसंग
दारु कशी सोडावी ?
.
.
.
चीअर्स!!
( स्टॅचुटरी वॉर्निंग : मद्यपान शरीरास हानीकारक आहे . २१ वर्षा खालील व्यक्तींना आणि दारु पिण्याचा परवाना न बाळगणार्या व्यक्तींना येथे प्रवेश नाही .)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Private - accessible only to group members
शेअर करा
एकूण दहा शेर आहेत मुळ गझलेत
एकूण दहा शेर आहेत मुळ गझलेत
पंत, या धाग्याच्या सुरुवातीला
पंत,
या धाग्याच्या सुरुवातीला 'बिस्किटे कशी खावीत' हा उल्लेख असण्याची मला तरी आवश्यकता वाटत नाही. तो एक वेगळा धागा होता. या धाग्याचे स्वरूप वेगळे आहे. बघा, पटलं तर तो उल्लेख काढा! आपले स्वातंत्र्य व त्याचा आदर आहेच! ही केवळ विनंती समजा, रागावू नयेत.
-'बेफिकीर'!
हा पंकज उधास, खुदा का शुक्र
हा पंकज उधास,
खुदा का शुक्र है वरना, गुजरती कैसे शाम
शराब जिसने बनाई, उसे हमारा सलाम
उसे हमारा सलाम!
भैराप्पा पाटील यांच्या पर्व
भैराप्पा पाटील यांच्या पर्व मध्ये महाभारतकालीन सुरा आणि ती कशी बनवली जायची याचे वर्णन आढळते. त्याकाळी सुरापान हे नशा येण्यापेक्षा जोम आणि उत्साह वाढविण्यासाठी केले जात असावे. विशेष करून युद्धादीप्रसंगी...
नाशिक च्या जगप्रसिद्ध वाईन
नाशिक च्या जगप्रसिद्ध वाईन 'सुला' बद्दल महिती इथे वाचा-
http://sulawines.com/
मतला असा आहे, सोझ-ए-गम देके
मतला असा आहे,
सोझ-ए-गम देके मुझे उसने ये इरशाद किया
जा तुझे कश्म-कश-ए-दहार से आझाद किया
भैराप्पा पाटील यांच्या पर्व
भैराप्पा पाटील यांच्या पर्व मध्ये महाभारतकालीन सुरा आणि ती कशी बनवली जायची याचे वर्णन आढळते. त्याकाळी सुरापान हे नशा येण्यापेक्षा जोम आणि उत्साह वाढविण्यासाठी केले जात असावे. विशेष करून युद्धादीप्रसंगी..>>>
माहिती आवडली आशीष!
धन्यवाद!
मला वाटते हत्तींनाही पाजायचे बहुधा!
चातकराव,
शराब इतनी शरीफाना चीज है आदम
के पीके आदमी सच बोलता है सुबहो शाम
विजयराव, माझ्याकडे असलेल्या
विजयराव,
माझ्याकडे असलेल्या एका पुस्तकात त्या गझलेचे चारच शेर आहेत. उरलेले मला इमेल कराल का? मतला आठवला. गझल छान आहेच.
माझे भूषणजींना अनुमोदन...
माझे भूषणजींना अनुमोदन... अन्यथा आकसापोटी हा धागा काढला गेला आहे असा समज व्हायला वाव आहे
नक्कीच पाठवीन भूषणजी...उद्या
नक्कीच पाठवीन भूषणजी...उद्या पाठवले तर चालेल ना?
बेफीकीरजी, लेखक, कवि, आणी
बेफीकीरजी,
लेखक, कवि, आणी गजलकारांना साधा चहा सुधा 'किक' देतो
मान्य आहे.
मान्य आहे.
चातक, अनुमोदन, गझलकार असे
चातक,
अनुमोदन, गझलकार असे लिहा
ईकडे फक्त शेरो शायरी पोस्ट
ईकडे फक्त शेरो शायरी पोस्ट करणे आणि वाह वाह पोस्ट करणे अपेक्षीत आहे, त्यावर ऊहापोह अपेक्षित नाही. बाफ भरकटण्याचे कुटिल कारस्थान ऊधळळे जाईल.
-- हुकुमावरुन

(No subject)
बाफ भरकटण्याचे कुटिल कारस्थान
बाफ भरकटण्याचे कुटिल कारस्थान ऊधळळे जाईल. >>
म्हमईकर, 'पेग' मारुन आलात वाट्तं..
म्हमईकर, कबूल, अर्थात इथे
म्हमईकर,
कबूल, अर्थात इथे फक्त मदिरेवरचे शेर लिहीले जावेत ही खबरदारी घेण्यात येईल
हा घ्या गालीब चा
कहां मयखाने का दरवाजा 'गालीब' और कहां वाईज
पर इतना जानते है, कल वो जाता था के हम निकले
चातक, ५ वाजल्यापासुन ह्या
चातक,
५ वाजल्यापासुन ह्या धाग्यावर आहे, त्याचाच हा परिणाम.
जाहिद शराब पीनेदे मस्जिदमे
जाहिद शराब पीनेदे मस्जिदमे बैठकर
या वो जगा बता जहांपे खुदा न हो
बेफिकीर तुझे सलाम
बेफिकीर तुझे सलाम
हत्तींना दारू पाजण्याचा
हत्तींना दारू पाजण्याचा उल्लेख मला वाटतं पुरु आणि सिकंदर यांच्या युद्धादरम्यान वाचला होता. पुरू राजाकडे हत्तींची भली थोरली फौज होती. त्या हत्तींना चिलखत घातले जायचे आणि सोंडेत दुधारी पट्टा (तलवार) दिली जायची. आणि हे सशस्त्र अवाढव्य योद्धे दारू पाजून शत्रुसैन्यावर सोडले जायचे. ही अशी बेभान अजस्त्र धुडे तलवार फिरवत येताना पाहूनच शत्रुसैन्य गर्भगळीत होत असे. परंतु सिकंदरने आपल्या पायदळाची अशी रचना केली की त्यामुळे त्याचे सैनिक हत्तींच्या तडाख्यात न येता त्यांना भाल्याने बेजार करू शकले. त्यामुळे बिथरून हत्ती उलटे वळले आणि त्यांनी पुरुच्या सैनिकांचीच धुळदाण उडवली.
असो ही फारच अवांतर माहिती झाली...
पण माहिती आवडली आशीष!
पण माहिती आवडली आशीष!
मुझको कदम कदम पर भटकने दो
मुझको कदम कदम पर भटकने दो वाईजो
तुम अपना कारोबार करो, मै नशे मे हूं
Chateau Indage, Sula,
Chateau Indage, Sula, Chintilli ह्या तीन प्रमुख वायनरीज भारतात वाईन बनवतात. तिन्ही ब्राण्ड्स च्या नाशिक मध्ये ही वायनरीज आहेत.
मस्त माहिती आशु, गिरीश
मस्त माहिती आशु, गिरीश
छान शेर विजयराव, मला वाटते
छान शेर विजयराव, मला वाटते जगजीतने गायला आहे का?
गिरिशराव,
सुला व्हाईट मस्त लागते. नाही??
हो जगजीतनेच गायला आहे. फिर
हो जगजीतनेच गायला आहे.
फिर बेखुदी मे हदसे गुजरने लगा हूं मै
मेरा ना ऐतबार करो मै नशे में हूं
पंतांचा धागा खूपच प्रवाही
पंतांचा धागा खूपच प्रवाही झाला राव! मजा आली!!
दारु कोणती प्यावी ? - हे
दारु कोणती प्यावी ?
- हे ठरवण्याचा हक्क नेहमी इतरांना द्यावा. त्यामुळे वेटर शेवटी ती बिलाची पुसट दिसणारी काळी वही घेऊन त्याच्याकडेच जातो.
किती प्यावी ?
- ते पिता पिताच ठरवता येते. सुरूवात करण्याआधी कसलेही नियिजन करू नका.
कशी प्यावी ?
- सुरवात तोंडानेच करा. व शुध्द असेपर्यंतच तसेच पीत रहा. नंतर कशिही पिलात तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही.
कोठे प्यावी ?
- हातभट्टी - सार्वजनिक शौचालयापासून ते म्हसरांच्या गोठ्यापर्यंत आडोसा बघून कुठेही प्यावी. ग्रामीण संस्कृतीशी आणि भारतीय संस्कारांशी हिचा असलेला घनिष्ट संबंध जोपासण्यासाठी कृपया तिला बार मधे नेऊन तिच्यात पाश्चात्य विकृती मिसळू नये. पिल्यानंतर बाटली त्यात काहिही न भरता दगडामगे दडवावी.
इंग्लिश दारू - ही अनधिकृत परप्रांतिय असली तरी आपण सवयीप्रमाणे तिला जवळ केले आहे. हिला घरी घेऊन जावे. सकाळ संध्याकाळ कधिही प्यावी. हिच्यापुढे हातभट्टीचा पानउतारा करावा. पण आम्ही हिचे उत्तान चाळे भर रस्त्यात चालवू देणार नाही. २००० पुर्विचे ब्रँड नियमीत करून घ्या, बाकी हाकलून द्या!!!
सोबतीला काय घ्यावे ? ( चकना ह्या अर्थाने विचारत आहे )
- उकडलेले मके आणि खुडूबळी. दोन्हीतला फरक स्पष्ट होत राहिल तोवर खात रहावे.
मुजिक कोणते आवडेल ?
- सुरूवात करताना पंकज उदास. मध्यंतरी आनंद शिंदे. शेवटी पंडीत भिमसेन जोशी.
मैफील जमणार असेल तर शेरोशायरी वगैरे काही की अजुन ..?
-अजुन बरेच काही!
त्या नंतर जेवणाचे काय ?
- ते जेवणालाच माहिती.
उतारा घ्यावा का ? किती आणि कधी घ्यावा ?
- ते उद्या सकाळी बघू रे... आधि अंथरून कुठे आहे शोधले पाहिजे...
पंतांचा धागा मदिरे सारखाच
पंतांचा धागा मदिरे सारखाच वहात चालला आहे.....
Pages