मदिरा प्राशन - पार्श्वभूमी, परिचय, व्यसनमुक्ती , अनुभव व मनःशांती

Submitted by भूत on 8 February, 2011 - 06:42

इतरत्र वाचलेल्या एका धाग्याच्या धर्तीवर हा धागा सुरु करण्यात येत आहे .
येथे सदस्यांनी आपले मदिरानुभव लिहावेत.
दारु कोणती प्यावी ?
किती प्यावी ?
कशी प्यावी ?
कोठे प्यावी ?
कॉकटेलची पाककृती .....ह्याला आपण कॉककृती म्हणुयात ...
सोबतीला काय घ्यावे ? ( चकना ह्या अर्थाने विचारत आहे )
मुजिक कोणते आवडेल ?
मैफील जमणार असेल तर शेरोशायरी वगैरे काही की अजुन ..?
त्या नंतर जेवणाचे काय ? .
उतारा घ्यावा का ? किती आणि कधी घ्यावा ?
दारूमुक्ती
दारूचे परिणाम टाळण्यासाठीचे उपाय
दारू प्यायल्यानंतर घडलेले विनोदी प्रसंग

दारु कशी सोडावी ?
.
.
.
चीअर्स!!

( स्टॅचुटरी वॉर्निंग : मद्यपान शरीरास हानीकारक आहे . २१ वर्षा खालील व्यक्तींना आणि दारु पिण्याचा परवाना न बाळगणार्‍या व्यक्तींना येथे प्रवेश नाही .)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

वाईनमधेही अल्कोहोल असते का?

मोहाची दारू हा काय प्रकार आहे...बरेचदा लोक त्यावर 'एक्साईट' होऊन बोलत असतात..म्हणून कुतुहल आहे इतकच!

सोडण्याची वेळ एकच असते, पहिला प्याला घेण्याआधी - हे खरे नाही. माणूस पुढेही सोडू शकतो.

आपण अनेकदा पाहतो की चांगल्या घरातील (येथे आर्थिक स्तर, शैक्षणिक स्तर वगैरे अभिप्रेत आहे, बाकी काहीही नाही) लोक दारू सोडतात. याचे कारण मुळातच ते नियंत्रण ठेवून पितात. तसेच, दारूशिवाय ते जगू शकत असतात. याचा अर्थ दारू प्यायला हरकत नाही असा नाहीच, पण दारू सोडणे नंतरही शक्य आहे इतकाच आहे.

बियर म्हणजे दारू नव्हे हा युक्तीवाद कितपत सत्य आहे?>>> असत्य अगदिच नाहि तेवढाच जितका त्यात किती ट्क्के 'अल्कोहोल' आहे.

वाईनमधील अल्कोहोलच वेगळे असते व खूप कमि असते. मोहाची दारू मी ऐकलेले आहे. माहीत काहिच नाही.

जरू,

हा विडंबन धागा आहे. येथे फक्त गंमत व काही उपयुक्त माहिती असल्यास ती देणे इतकेच अभिप्रेत आहे.

याचे कारण मुळातच ते नियंत्रण ठेवून पितात. तसेच, दारूशिवाय ते जगू शकत असतात. याचा अर्थ दारू प्यायला हरकत नाही असा नाहीच, पण दारू सोडणे नंतरही शक्य आहे इतकाच आहे.>>>पटलं बेफीकीर..!

येथे उपदेश करणार्‍यांनी फक्त मदिरा ह्या विषयावरचेच उपदेश करावेत हे मी पंतांच्या परवानगीने सांगत आहे

मदिरा प्राशन केल्यावर त्याचे साईड ईफेक्ट्स नाही होण्यासाठी ही चर्चा झाली पाहिजे.

उदा :-
गटारात न पडण्याचे कौशल्य
सोसायटी मध्ये गोंगाट न करणे
खरे बोलण्याचे वाईट परिणाम

प्रगो, तू भन्नाट आहेस. कधी कुठल्या विषयावर धागा काढशील नेम नाही.
बाकी मला यातल काय कळात नाही आणि मी घेत नाही त्यामुळे काय बोलू??
तुम्ही मजा करा, नवनविन माहिती घ्या.

गटारात न पडण्याचे कौशल्य>> Lol

काही विशिष्ट प्रकारची दारू प्यायल्यामुळे हे अधिक होण्याचा संभव!

तसेच, ती दारू अधिक प्याय्ल्यामुळे!

वडील आणि मुलगा>>

मी सातवीत असताना माझा एक वर्गमित्र होता. तो आणि त्याचे वडील कॅरम खेळताना बीअर घ्यायचे. धक्का बसला. पण आज ते सर्रास चालत असावे.

आमच्या घरी आर एस एस चे वातावरण असल्यामुळे हे निषेधार्ह मानले गेलेले आहे. म्हणजे मुळात पिणेच!

वा वा, काय उपयुक्त माहितीचा खजीना उघडला गेला आहे बुवा...! छान करमणूक आहे... Rofl
जरु, तुझ्या साठी हे स्पेशल ---
Mango lassi.jpg

मदिरेच्या उतपत्तीचा इतिहास उपलब्ध आहे काय? जुजबी माहिती असल्यास शेअर करावीत>>

नाही बुवा काही माहीत! पण येथे कुणालातरी माहीत नक्कीच असेल!

बाय द वे -

गालीब हे नेहमी ओल्ड रम किंवा कॉस्टेलन ही दारू प्यायचे. नंतर ती परवडेनाशी झाल्यामुळे कर्ज काढू लागले व दिवाळे वाजले.

सांगायचा मुद्दा हा की जगभरात गाजलेला हा कवी व्यक्तीगत आयुष्यात व्यसनाधीनतेमुळे कर्जबाजारीही झाला होता आणि अपयशीही ठरलेला होता.

कर्जकी पीते थे मय लेकिन ये कहते थे की हां
रंग लायेगी हमारी फाकामस्ती एक दिन

हम्म्म्म्म्म,

अवांतर : भूषणजी, परवा 'जोश मलिहाबादी की शायरी' असे एक पुस्तक घेतले. प्रकाश पंडित यांनी लिहीले आहे

मदिरेच्या उतपत्तीचा इतिहास उपलब्ध आहे काय?>>>'मदीरा' हा प्रकार यवनी लोकांनी भारतात आणला, तरी आपल्या धार्मिक कथेत शंकराचे आवड्ते पेय 'भांग' असे नमुद केलेले आढळते.

नाशिक जवळ 'पिंपळ्गाव" येथे असलेल्या एका वाईनरी मधे एक्स्पोर्ट ग्रेड ची शॅम्पेन बनते.. तिचं ब्रॅन्ड नेम आहे - "पिम्पेन"
विजय जी ना माहित असेल...
३ चियर्स !!!

कुछ नही इसके सिवा 'जोश' हरीफों का कलाम
वस्ल ने शाद किया, हिज्र ने नाशाद किया

Pages