मदिरा प्राशन - पार्श्वभूमी, परिचय, व्यसनमुक्ती , अनुभव व मनःशांती

Submitted by भूत on 8 February, 2011 - 06:42

इतरत्र वाचलेल्या एका धाग्याच्या धर्तीवर हा धागा सुरु करण्यात येत आहे .
येथे सदस्यांनी आपले मदिरानुभव लिहावेत.
दारु कोणती प्यावी ?
किती प्यावी ?
कशी प्यावी ?
कोठे प्यावी ?
कॉकटेलची पाककृती .....ह्याला आपण कॉककृती म्हणुयात ...
सोबतीला काय घ्यावे ? ( चकना ह्या अर्थाने विचारत आहे )
मुजिक कोणते आवडेल ?
मैफील जमणार असेल तर शेरोशायरी वगैरे काही की अजुन ..?
त्या नंतर जेवणाचे काय ? .
उतारा घ्यावा का ? किती आणि कधी घ्यावा ?
दारूमुक्ती
दारूचे परिणाम टाळण्यासाठीचे उपाय
दारू प्यायल्यानंतर घडलेले विनोदी प्रसंग

दारु कशी सोडावी ?
.
.
.
चीअर्स!!

( स्टॅचुटरी वॉर्निंग : मद्यपान शरीरास हानीकारक आहे . २१ वर्षा खालील व्यक्तींना आणि दारु पिण्याचा परवाना न बाळगणार्‍या व्यक्तींना येथे प्रवेश नाही .)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

एक एक पेग संपवून जेव्हा तू छद्मी हसतो
पोटच्या पोरांचा त्यात मला हंबरडा दिसतो>>

व्वा!

पंत,

अफलातून वातावरण!

करूण सांज भोवती, नसांत 'वारुणी' भिने
तुझा सुगंध बोचतो, अशात मीर पाहिजे>>>>>

व्वा!! व्वा!! मीरच्या एखाद्या शेराचा स्वैर अनुवाद आहे की काय हा?

स्थळ - सुवर्णा गार्डन, हडपसरच्या पुढे!

वेळ - साडे सात

वातावरण -

१. खाली कछुआ छाप लावलेली

२. आपण एकटेच

३. टेबलवर वही व पेन... काहीही सुचलेले लिहायला

४. अ‍ॅन्टिक्विटी ब्ल्यू आणि सोडा आणि बिसलरी

५. गुडांग गरम

६. मंद आणि थंड झुळुका

७. एखादा ओळखीचा ग्रूप येऊन फर्माईश करणे, त्या दिवशीसारखे ऐकवा ना काहीतरी...

८. आणि मग रात्री दिड वाजता कशीबशी आटोपणारी मैफील..

एक प्रश्न (पहिलाच) : एक पेग प्यायला एक तास घ्यावा असे म्हणतात, असे केल्याने आरोग्यदृष्ट्या काय फायदा होतो?

धन्स स्वराली...

भूषणजी : तुमचाच आहे हे महित आहे...अशात वाचायला/ऐकायला 'मीर' पाहिजे असे म्हणायचे आहे ना? आणि तुम्ही पामर वगैरे नाही आहात हां..उगाच काहीतरी काय?

एक पेग घ्यायला एक तास लावल्यासः

फायदे:

१. चढत नाही पटकन

२. अधिक प्यायली जात नाही

३. हॅन्ग ओव्हर ची शक्यता कमी होत राहते

४. त्रास होत नाही.

तोटे:

१. मग प्यायची कशाला?

२. लोक आपल्यापुढे जातात आणि बाटली संपते

३. थट्टा होते

४. व्यर्थ वेळ गेल्याची भावना तीव्र होते.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

एक प्रश्न (पहिलाच) : एक पेग प्यायला एक तास घ्यावा असे म्हणतात, असे केल्याने आरोग्यदृष्ट्या काय फायदा होतो?

देवाघरी लवकर जातो Biggrin

दुसरा प्रश्न : उतार्‍याने खरेच उतरते का? असल्यास त्यामागची शास्त्रीय कारणमीमांसा काय असावी?

उतार्‍याने उतरते असे ऐकलेले आहे. ट्राय केलेले नाही. सकाळि उठल्यावर लगेच कोण चूळ भरणार? आधीच पश्चात्तापाची भावना सबळ झालेली असते.

शास्त्रीय मीमांसा मात्र माहीत नाही.

लोकेशन : गाडा डा विडा (स्पॅनिश : गार्डन ऑफ लाईफ ) जुहु बीच
वेळ : साधारण सुर्यास्तानंतर ... ६:३० -७:००
कंपनी : गर्लफ्रेन्ड , समोर मस्त बीच आहे ..साईडला लॉन आहे ..स्विमिन्ग पुल आहे ... बीन बॅग्स आहेत ... एक बजुला दोन बीन घेवुन बॅग्स दोघांना निवांत रोमॅन्टिक गप्पा मारत बसता येईल ...शिवाय एकच बीन बॅग घेवुन बसलात तरी त्याला हरकत घ्यायला कोणी ही येणार नाही...कळाले का Wink
म्युजिक : सॉफ्ट हिन्दी रोमॅन्टिक ( ना तुम हमे जानो ...ना हम तुम्हे जाने ...)
कॉकटेल : नको ...ह्यापेक्षा रेड वाईन मस्त ...एनी ओरीजीनल फ्रेन्च रेड वाईन विल डु ! Wink
जेवणासाठी : पिझ्झा

कॉशन : प्रचंड कॉस्टली अफेयर आहे हे ! मी ऑफीस ग्रुप बरोबर गेलेलो तेव्हा २० हजार बिल झालेले ५ जणांचे ....सो थिन्क ट्वाईस...१० टाईम्स अबाउट इट ...

चीअर्स !!

किशोर पाठकांना भेटा विजयराव, ते पितात, पण तुम्हीन पिताही प्यायल्यासारखे वाटेल अशा मैफिली होतील.

१८ तारखेला त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी आम्ही येत आहोत.

व्यसनापासून मुक्तता हवी असल्यास एकच उपाय!

व्यायाम, भरपूर खाणे आणि इतर गोष्टींमध्ये मन रमवायला शिकणे! हे जमू शकते.

दारू प्यायल्याशिवाय झोप न येणे हे व्यसन लागल्याचे लक्षण आहे.

आपली मुले व पत्नी यांच्या अनुपस्थितीत पिणे अधिक चांगले (पत्नीही घेत असली तर गोष्ट वेगळी आहे).

असे करण्याचे कारण हे की नवरा ड्रिन्क घेताना कितीही वेळ त्या जागी रमू शकतो व इतरांना अत्यंत कंटाळा येतो. त्यामुळे मोठे वाद निर्माण होतात.

बीअर म्हणजे दारू नव्हे =

सरसकटपणे म्हणायचे झाले तर बीअर ही दारूच म्हणायला हवी! दोन्ही बनवण्याच्या प्रक्रिया वेगळ्या असतात. अल्कोहोल कन्टेन्टही वेगळे असते. मात्र परिणाम तोच होतो.

Pages