दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे देवा!!! खूपचं वाईट वाटलं. सुनिताबाईंना अश्रुपुर्ण श्रद्धांजली!!!!

आहे मनोहर तरी ला माझा दंडवत प्रमाण!!!!सोयरे सकळ मधील माधव आचवल वाचताना डोळे भरुन आले होते इतके सुरेख लिहिले होते त्यांनी!

अरे रे.. पुलं गेले पण सुनिताबाई तरी आहेत असं वाटत रहायचं. आता त्याही गेल्या Sad

काय वाईट बातमी आहे!! त्याच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना.

परवाच त्याचं जी ए ची पत्रे वाचत होते Sad

मला ही बातमी वाचून का कुणास ठाऊक आतून खूप बरं वाटलं. गेले बरेच महिने त्या आजारी होत्या. केवढं चिंतन केलं होतं त्यांनी आपल्याला कसा मॄत्यू यावा याबद्दल.सुनीताबाईंची मॄत्यूवरची मतं खूप ठाम होती. कुणाकडून सेवा करुन घेऊन, अंथरुणात खितपत पडून आलेलं मरण त्यांना नको होतं. आणि तीच वेळ त्यांच्यावर यावी ... केवढा मोठा दैवदुर्विलास ! म्हणूनच त्यांच्या आजारपणाची बातमी ऐकल्यानंतर देवाने त्यांची लवकरात लवकर शांतपणे सुटका करावी असं मनापासून वाटलं होतं

अरे बापरे. ही काहीच कल्पना नव्हती मला. मग खरंच सुटका झाली असंच म्हणायला हवं.

Sad

अरेरे Sad

गेलं वर्षभर सुनीताबाई खूप आजारी होत्या. पण अनेक महिने कोमात वगैरे नव्हत्या. त्या बोलू मात्र शकत नव्हत्या. Sad
उद्या आठ नोव्हेंबर. पुलंचा नव्वदावा वाढदिवस.

सुनीताबाईंनी एक कणखर, स्वतंत्र विचारांची आणि संवेदनशील स्त्री म्हणून आपली वेगळी प्रतिमा उमटवली, याची खूण 'आहे मनोहर तरी' वाचल्यावर पटते. स्थित्यंतराचा केवढा कालखंड पाहिला त्यांनी?
आता केवळ 'गमते उदास' Sad

चिनूक्स, सांगितल्याबद्दल धन्यवाद. पुलंच्या एका परिचितांकडून बातमी ऐकली होती. माझं पोस्ट मी एडिटलं आहे.

पुलं गेले पण सुनिताबाई तरी आहेत असं वाटत रहायचं. आता त्याही गेल्या. >>>> अगदी खरं!
Sad
श्रद्धांजली.

मामी अगदी बरोबर.
बरं झालं.
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

Sad

श्रद्धांजली. प्रतापवारांची कविता आहे इथे आता तू कधी भेट्णार? तिथे मी प्रतिसाद लिहिला होता परवा. " भेट्णार
ना बस कुछ सांसोंकी देरी है. ते असे खरे व्ह्यायला नको होते. त्यान्ची दोघांची रीलेशन शिप किती परिपक्व होती.
खरी स्वतंत्र विचारांची स्त्री. शतशः वंदन.

गेलि १० वर्शे कधि कधि त्या कमल नेहरु पर्क मधे येत असत सकाळि .तेव्हा भेटत असत. हल्लि
फार थकल्या सारख्या दिसत. कधि कधि १.रुपालि च्या गॉलरित त्याना पाहिल होत.
आता तेहि संपल.
एक मनस्वि लेखिका त्याचि व्यक्ति चित्र व आहे मनोहर.... असच हुर हुर लावणार लेखन.
जुन्या काळच नोस्टलजिआ वाढवणार लेखन अगदि जुन्या पैठणि सारख मनात राहिल.

ती ड्रग अ‍ॅडिक्ट होती. आणि ड्रेस डिझायनर. ट्विंकल्चे बरसातमधले ड्रेस तिनेच डीझाईन केलेले होते. (डिंपलची तर ती बाय डीफॉल्ट डीझायनर होती)

Pages