दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जयदेवजींना श्रंध्दांजली... प्रायोगिक रंगभूमीला एकापाठोपाठ एक हादरे - काही महिन्यापूर्वी चेतन (दातार) आता जयदेव हट्टंगडी..

जयदेव यांना श्रद्धांजली... वाईट झालं,
रंगभूमीचे दिग्गज तारे गळून पडतायंत... Sad

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अलूरकर म्युझिक हाऊसचे सुरेश अलूरकर यांचे खुनी हल्ल्यात निधन....

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

अविश्वसनीय घटना.. Sad
पुलंना 'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व' असं सर्वप्रथम त्यांनीच म्हटलं होतं.
मायबोलीच्या गणेशोत्सवात व दिवाळी अंकासाठी त्यांनी मदत केली होती.
गेल्या आठवड्यातच एका नाटकाच्या वेळी त्यांची भेट झाली होती.
त्यांना विनम्र श्रद्धांजली.

धक्कादायक बातमी.
पुणेकरांच्या हृदयावर सुरेल राज्य करणार्‍या माणसाला कुणी इतकं निर्घृणपणे का मारावं? Sad

अलूरकरांचा खून ही खरोखरच धक्कादायक बातमी आहे! इतर दुकानांमध्ये/वितरकांकडे न सापडणार्‍या ध्वनिमुद्रिका, दांडग्या बजेटाअभावी मोठ्या रेकॉर्ड कंपन्यांकडून दुर्लक्षिलेल्या नवोदित कलाकारांच्या गायन-वादनाच्या सीड्या-कॅसेटा, मराठी नाटकांच्या डीव्हीड्या, प्रभात फिल्म कंपनीच्या जुन्या चित्रपटांच्या सीड्या बाजारात आणण्याची फार मोलाची कामगिरी त्यांनी केली!
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

फारंच धक्कादायक घटना. खरंच जुन्या मराठी गाण्यांचा ठेवा आपल्या (आणि पुढच्या) पिढीपर्यंत पोचवण्याचं लाखमोलाचं काम तर त्यांनी केलंच. जेव्हा जेव्हा दुकानात जाऊ तेव्हा ते नवीन, उभरत्या कलाकारांचं गाणं, वादन ऐकवत असत. शशांक मक्तेदारचं गाणं असं त्यानीच एकदा ऐकवलं. एखादा विशिष्ट राग शोधताना हा राग ह्या instrumentवर ऐका, छान वाटेल किंवा ह्या कलाकाराने तो चांगला गायला/वाजवला आहे अशा मोलाच्या सुचना ते नेहेमी करत असत. त्यांना भावपूर्ण आदरांजली..

काल रात्री ९ च्या सुमारास ज्येष्ठ कवी, लेखक श्री. गंगाधर महांबरे ह्यांचे दु:खद निधन झाले..
http://www.esakal.com/esakal/esakal.nsf/C12CC76BCDEBF20965256FCB007B4CD1/$file/spl-news.gif
त्यांचे चिरंजीव सध्या नोकरी निमित्ताने दक्षिण अमेरिकेच्या जवळ समुद्रात आहेत. ते २८ तारखेस परत आल्यावर श्री. महांबरे ह्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.. तोपर्यंत ससून हॉस्पिटलमध्ये त्यांचे पार्थिव शीत कपाटात ठेवण्यात आले आहे..

मायबोलीवरील मनाकु१९३० म्हणजेच माझे आजोबा ह्यांचे ते खूप जवळचे मित्र होते.
आजोबांनी त्यांच्या अनेक गीतांना चाली दिल्या होत्या. त्यांच्या 'पूर्व पश्चिम' ह्या पुस्तकातील आजोबांनी चाली दिलेल्या चीजांवरील 'सूर शब्द लहरी' हा पूर्णपणे शास्त्रीय संगीतावर आधारीत कार्यक्रम रघुनाथ खंडाळकर, मंजिरी आलेगांवकर, रघुनंदन पणशीकर, मंजुश्री पाटील ह्यांनी अनेक वेळा सादर केलेला आहे.

कायम हसतमुख आणि मनमोकळ्या असणार्‍या महांबरे आजोबांना मनपूर्वक श्रद्धांजली...
==================

गंगाधर महांबरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! Sad

महाम्बरेना श्रद्धान्जली . हिम्सची माहिती महत्वपूर्ण आहे. धन्यवाद.

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

प्रख्यात चित्रकार श्री. मनजीत बावा यांचं निधन.

ज्येष्ठ दिग्दर्शक श्री. राम गबाले यांचं निधन.

***
अजनबी सा, दोस्त सा, दुश्मन सा ये बहरूपिया
मेरे अंदर कोई बतलाए खुदा-रा कौन है?

गंधर्वगायक म्हणून माहीत असलेले लालजी देसाई ह्यांच निधन.
छ्छे! विश्वास नाही बसत. येत्या भारत भेटीत त्यांची एक झक्कास मुलाखत मायबोलीसाठी घ्यायची होती Sad
लालजींबरोबर काही कार्यक्रम वाजवलेत, मी. ते अनुभव शिकण्यासाठी जी शिदोरी देऊन गेले आहेत.... ती अजून वापरतेय. ते स्वतः एक सुरेख तबला वादक होते. ठेक्यांचं विलक्षण ज्ञान होतं त्यांना.
माझी श्रद्धांजली.... लालजींना, त्यांच्यातल्या कलाकाराला आणि त्याहुनही त्यांच्यातल्या माणसाला!

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3980032.cms

ज्येष्ठ साहित्यिक श्री. बाळ सामंत यांचे निधन.

***
अजनबी सा, दोस्त सा, दुश्मन सा ये बहरूपिया
मेरे अंदर कोई बतलाए खुदा-रा कौन है?

भारताचे माजी राष्ट्रपती श्री. आर. वेंकटरामन यांचे निधन.

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

ज्येष्ठ संगीततज्ञ, बासरीवादक आणि इंग्रजीचे प्राध्यापक अजित सोमण यांचे निधन Sad
==================
वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलात चाललो

ओहो! Sad
अजित सोमण यांना श्रद्धांजली!

श्री. अजित सोमण यांना श्रद्धांजली. त्यांची बासरी ऐकणं हा एक स्वर्गीय अनुभव असे. श्री. सुधीर फडके, यशवंत देव, आशाताई या सार्‍यांबरोबर त्यांनी भरपूर काम केलं होतं. अतिशय निगर्वी होते ते..

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

श्रीमती सुमा करंदीकर यांचं निधन. 'रास' हे त्यांचं आत्मचरित्र गाजलं होतं..

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

सुमा करंदीकरांना श्रद्धांजली.

वर्‍हाडकार डॉ.लक्ष्मण देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

-----------------------------------------
सह्हीच !

डॉ.लक्ष्मण देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली....

०-------------------------------------०
तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला,
सीतेच्या वनवासातिल, जणू अंगी राघव शेला..

प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे याना श्रद्धांजली.

माहीतिचा स्त्तोतः ई पत्र.

वऱ्हाडकारांचा जीवनप्रवास संघर्षाचा होता. एक उत्तुंग प्रतिभेचा कलावंत अशी मान्यता त्यांना वऱ्हाड निघालंय लंडनला या एकपात्री नाटकाने मिळाली. हे नाटक त्यांनी स्वतःच लिहिलेले होते. त्याचे दिग्दर्शक व सादरकर्तेही तेच होते. मराठवाड्यातील ग्रामीण जीवनशैली, व्यक्तिरेखांचे अस्सल सादरीकरण असलेल्या वऱ्हाडमध्ये डॉ. देशपांडे 52 व्यक्तिरेखा खास शैलीत सादर करत.

वऱ्हाडकारांचा जन्म पाच डिसेंबर 1943 रोजी झाला. त्याकाळी ते गणेश मेळ्यांमध्ये सहभाग घेत. तेथेच त्यांच्यातील कलावंताची जडणघडण झाली. घरची परिस्थिती प्रतिकूल असूनही त्यांनी एम.ए. व त्यानंतर एमडी (मास्टर इन ड्रॅमेटिक्‍स)चे शिक्षण घेतले. मौलाना आझाद, सरस्वती भुवन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यावर 1980 मध्ये ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रमुख म्हणून कार्यरत झाले. याच दरम्यान त्यांनी वऱ्हाड निघालंय लंडनला निर्मिती केली. या नाटकाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. हजारोंच्या संख्येने लोक प्रयोगांना उपस्थित असत. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, मस्कत, ऑस्ट्रेलिया, कतार, कुवैत, सिंगापूर, थायलंड, नायजेरिया येथेही वऱ्हाडचे प्रयोग झाले. एकाच व्यक्तीने 52 व्यक्तीरेखा साकारण्याचा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल डॉ. देशपांडे यांची 2004 मध्ये गिनिज बुकातही नोंद झाली. रेशमगाठी, पैंजण या मराठी चित्रपटांत त्यांनी काम केले. याशिवाय द्विपात्री नटसम्राटमधील 2000 मध्ये वऱ्हाडकारांनी विभागप्रमुखपदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली. याच वर्षी त्यांची परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाध्यक्षपदीही निवड झाली होती.

अनेक पुरस्कार

2003 मध्ये महाराष्ट्र शासनाने कलावंत पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले. 2004 मध्ये विष्णुदास भावे त्यांना प्रदान करण्यात आला. छत्रपती शाहू महाराज, बेंडे स्मृती, राम श्रीधर, अल्फा टीव्ही, पुरुषोत्तम करंडक, वसंतराव नाईक कृषी संशोधन प्रतिष्ठान, सयाजीराव महाराज, अखिल भारतीय नाट्यपरिषदेतर्फे साहित्यसम्राट आचार्य अत्रे यासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. "वऱ्हाड निघालंय लंडनला' या नाटकाचे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले. त्याच्या दोन आवृत्त्या निघाल्या. प्रतिकार हे त्यांनी लिहिलेल्या एकांकिकांचे पुस्तकही रसिकांना भावले. मौलाना आझाद - पुर्नमूल्यांकन तसेच शासनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या अक्षरनाद या पुस्तकाचे संपादनही त्यांनी केले होते

अरेरे! Sad लक्ष्मणराव देशपांडेंचं 'वर्‍हाड ....' हे माझं अत्यंत आवडतं नाटक, सीडी खास विकत घेतलेली... मागच्याच आठवड्यात पारायण केलं.
मन:पूर्वक श्रद्धांजली!

Sad
Sad
Sad
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...

प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे याना श्रद्धांजली.

प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे याच्या वर्‍हाडाने नेहमीच निखळ करमणुक केली. भावपुर्ण श्रद्धांजली.

मला वाटते ह्या बीबी चा वापर फक्त निधनाच्या बातम्या आणि मृताच्या कार्याचा परिचय आवश्यकता असल्यास या पुरताच ठेवावा. श्रद्धांजलीसारख्या औपचारिक बाबीसाठी करू नये. त्याने विनाकारण स्पेस तर वाया जातेच. पण नेमकी नवी बातमी पटकन लक्षात येणारही नाही. अर्थात सगळ्यांच्या भावनांचा आदर करून मी लिहीत आहे. दिवंगताबद्दल तर आदर असतोच.

बापू वाटवे यांचं निधन.

ज्येष्ठ भावगीत गायक व संगीतकार श्री. गजाननराव वाटवे ह्यांचे आज पुण्यात दु:खद निधन... Sad
=========================

Pages