दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं.

चंद्रकांत गोखले हे उत्कृष्ट कलाकार तर होतेच, पण त्याहीपेक्षा फार मोठे ते एक माणूस म्हणून होते. चंदन असच म्हणता येईल त्यांच्या आयुष्याला. माझी विनम्र श्रद्धांजली.

माजी सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांचे सोमवारी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८८ होते.

------कवी कल्याण इनामदार यांचं निधन------------------------------------------------------------------------------------------------------------------------------हितगुज दॅट इ़़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

स्टार व्हॉइस ऑफ इंडिया १ 'इश्मित सिंग' चा अपघाती मृत्यु !!!!!!!!!!!!!!:((
http://www.ddinews.gov.in/Breaking+News/asggsgdsg.htm

इश्मित ला मनःपूर्वक श्रध्दांजली !

Sad धक्कादायकच आहे, परवाच कार्यक्राच्या सुरवातीला ट्रोफी हातात घेतलेला पाहिले होते.

खरच फार वाइट झालं इश्मित च Sad
~Do u know who is the best couple in the universe? SMILE and TEARS.
Rarely they meet, but if they meet that will be the most gorgeous moment ever! ~

माझ्या एका मैत्रीणीने इष्मीत ला दिलेली श्रध्दांजली !
ishmeet.jpg

माजी कसोटीपटू अशोक मंकड यांचे आज पहाटे मुंबईतील निवासस्थानी झोपेतच निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते.

प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक चेतन दातार यांचं निधन. ते ४० वर्षांचे होते.

चेतनच्या जाण्याचा शॉक भयंकर आहे. ४-५ दिवस झाले पण त्याचा चेहरा डोळ्यासमोरून हलत नाहीये. तिकडे परक्या राज्यात, परक्या लोकांच्यात ही बातमी कळाली आणि पायातलं बळंच गेलं. आपला चांगला मित्र, चांगलं काम करणारा माणूस ज्याच्याकडून खूप चांगल्या लिखाणाची अपेक्षा असते असा माणूस अकाली जातो हे अतर्क्य आहे.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

चेतन दातार ह्यांना माझी भावपुर्ण श्रद्धांजली. ते ४० नसून ५५ वर्षांचे होते.

उगाच वाट्टेल ते तारे तोडू नका. चेतन ५५ वर्षांचा नव्हता.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

पहिल्या लिंकमधल्या अभिप्रायातच वयाबद्दलची चूक निदर्शनास आणून दिलेली आहे.
असो.
शेवटी आमचा मित्र किती वर्षांचा होऊन गेला, जाणं योग्य नसून गेला.. हे आम्हाला माहितीये. कुठल्याच लिंकची जरूरी नाही.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

प्रसिद्ध भयकथा आणि विज्ञानकथालेखक नारायण धारप (वय ८२) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांना श्रद्धांजली!!

भयकथा आणि विज्ञानकथा हा माझा आवडता प्रांत. त्यांच्या ब-याच गोष्टी वाचल्यात.

त्यांना माझीही श्रद्धांजली.

साधना.

माझी ही...

भयकथा आणि गूढकथा यांच्याशी माझी ओळख धारपांच्याच पुस्तकांमधून झाली...

Sad

Sad
खुप एकले होते मी "नारायण धारप" बद्दल..........
त्यांचे लेखन online कुठे वाचायला मिळेल का???
असेल तर plz मला link द्यावी..........

त्यांचे लेखन online कुठे वाचायला मिळेल का???
असेल तर plz मला link द्यावी..........

ही अपेक्षा मोठी अजबच म्हनावी लागेल. कोण टाकणार हे ऑन लाईन लेखन? आणि कुठे ? त्याच्या कॉपी राईटचे काय? अधिकाराशिवाय असे लेखन कोणत्याही माध्यमातून करणे म्हनजे फौजदारी गुन्ह्यास आमन्त्रण नाही काय? मायबोलीवर प्रसिद्ध होणार्‍या नामवन्त लेखकांच्या कविता आदि. लेखन कॉपी राईटचा भंग असू शकतो....

सगळेच कसे फुकट हवे असते लोकाना काही कळत नाही....अन तेही विनासायास एक दोन क्लिका मारून. अर्थात ही ही एक दु:खद घटनाच आहे....

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांचे आज सकाळी निधन झाले.

माझी जयश्री गडकर ला श्रद्धांजली.

खुप छान दिसायची, गोड हसायची. सामाजिक आणि तमाशाप्रधान दोन्ही चित्रपटात शोभुन दिसायची.

'बुगडी माझी सांडली..' मधला तिचा चेहरा नजरेसमोर येतोय आणि त्याचवेळी 'जे वेड मजला लागले..' मधलाही. काय गोड दिसलीय दोन्हीमध्ये.

माझी एक सिंधी शेजारीण तिला मराठी चित्रपटाची मीनाकुमारी म्हणायची. बहुतेक लोकप्रियतेच्या बाबतीत असेल..

साधना.

साधना, ईव्हन पडद्यावरील ऋजुतेबाबत अथवा सभ्यतेच्या संदर्भात जयश्रीबाई मीनाकुमारीशी कम्पेरेबल होत्याच...

लीला नायडू म्हणून जुन्या जमान्यातल्या गायिका निधन पावल्या अशी बातमी सकाळला आहे. लीला नायडू या जुन्या पिढीतील एक नायिकाही होत्या त्या याच का?

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

नाही. त्या लीला नायडू वेगळ्या. त्या अजून हयात आहेत.

ओह, Sad जयश्री गडकर गेली का? माझी श्रद्धांजली.
'एक गाव बारा भानगडी' मध्ये वेगळ्या रोल मध्ये पण शोभली. नऊवारीत सोज्वळ पण दिसायची आणि **** पण. Happy

जयश्री गडकरला श्रद्धांजली. मला ती साधी माणसे मधे खूप आवडली होती. एरवी पण छानच दिसायची.

माझिहि श्रध्दांजलि जयश्रिबाईंना. मलाहि त्या "साधि माणस" मध्ये सगळ्यात जास्त आवडल्यात. 'ऐरणिच्या देवा...' मध्ये काय सुरेख दिसतात.

"जयश्री गडकर" यांना श्रद्धांजली

Pages