दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुदालीसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अनेक सिनेमातून तिनी उत्तम वेगवेगळ्या भुमिका पण केल्या आहेत. मला तिचा अभिनय आवडायचा. फारच खेळकर वाटायची.

रुदालीसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अनेक सिनेमातून तिनी उत्तम वेगवेगळ्या भुमिका पण केल्या आहेत. मला तिचा अभिनय आवडायचा. फारच खेळकर वाटायची. >>
सुपुत्रा जागा हो! सिंपल गेलीय .... ती कुठे दिसली रुदालीत? तुला डिंपल वाटतेय बहुदा!

अरेरे अनुरोध मध्ये तिला पाहिलेय.
गाणी मस्त होती त्यातली. मला वाटते जानबाझ मधील डिम्पल चे हेप टॉप्स
व कपडे तिनेच डिजाइन केले होते.

आते जाते खूब सूरत आवारा सड्कोंपे
कभी कभी इत्तफाकसे कितने अनजान लोग मिल जाते है.
उनमेंसे कुछ लोग भूल जाते हैं कुछ याद रह जाते हैं

कम्युनिस्ट नेते श्री ज्योती बसु(९५) यांचे निधन
लेखिका मंदाकिनी गोगटे यांचे निधन.................
=========================
श्रद्धांजली ...

कम्युनिस्ट नेते श्री ज्योती बसु(९५) यांचे निधन.

विचारांशी निष्ठा असणारा नेता॑ हरपला.

ऑस्ट्रेलियातील बातमीपत्रात ते पंतप्रधान न होउ शकल्याची टिप्पनी केली गेली. अन त्याबद्दल त्यांच्या पक्षाला दोष दिला.

हो, इथेही. खुद्द बसुनी नन्तर त्याचे वर्णन 'ऐतिहासिक घोडचूक' असेच केले होते. पण म्हणून बसुनी कधी पक्षविरोधी वर्तन केले नाही की पक्ष सोडला नाही. पॉलीटब्यूरोचे फार चुकले असे नाही. उगाच औट घटकेचे पंतप्रधान पद घेऊन पुन्हा अपयश पदरात घेऊन उतरायचे त्यालाही अर्थ नव्ह्ता. मात्र कम्युनिस्टांचेही राज्य भार्तावर येऊन गेले ही ऐतिहासिक नोंद झाली असती.
भाजपने मात्र ही नामुष्की पदरात घेतली....

पं दिनकर कायकिणी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन्.एक गुणी , सुरेल व प्रामाणिक कलाकार हरपला.

पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ बी पी आपटे (८९) यांचे निधन. कमला नेहरू गार्डन मद्ये ते सकाळी फिरायला नेहमी दिसत . Sad

ओह... कधीकाळी मी यांचे नाट्यसंगित भरपुर ऐकलेय....
माझी श्रद्धांजली Sad

अरे अरे.. फार वाईट बातमी..
सारेगमप मध्ये दोन पर्वांपूर्वी आलेल्या केतन गोडबोलेचे हे काका..

अभिनेता निर्मल पांडे यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
Thursday, February 18, 2010 AT 06:48 PM (IST)
Tags: nirmal pandey, actor, bollywood
मुंबई - अभिनेता निर्मल पांडे यांचे आज (गुरुवार) दुपारी हृदयविकाराने निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते.

निर्मल पांडे यांनी सुरवातीला नाटक व दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले. १९९४ मध्ये शेखर कपूर यांच्या "बॅंडिट क्वीन' या चित्रपटाद्वारे त्यांची चित्रपटातील
कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर "दायरा' (१९९६), गॉडमदर (१९९९), ट्रेन टू पाकिस्तान व इस रात की सुबह नही या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या.
"दायरा' चित्रपटातील भूमिकेसाठी निर्मल पांडे यांना फ्रांसमध्ये पुरस्कार मिळाला होता.

त्यांना दोन मुले. Sad

मी रात्री आयपॉड वर नेटसर्फ करते ना तेव्हा रीडिफ वर वाचले. दोन तास झोप आली नाही.
इस रात की सुबह नही, बॅन्डिट क्वीन यादगार पर्फोर्मन्सेस. दायरा त्रुतीयपंथीयाचा रोल आहे मला वाट्ते.
उत्तम हिन्दी डिक्षन.

दायराचा रोल म्हणे आधी शाहरुख करणार होता मग त्याने शेपूट घातले. नन्तर फिरत फिरत निर्मलने ते धैर्य दाखवले.

Pages