दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

> अभिनेता निर्मल पांडे (४६)यांचे निधन.
Sad फार चांगला अ‍ॅक्टर होता Sad
कोणाची वेळ कधी येईल सांगता येत नाही Sad
शांति मिळो जिवाला Sad

ह. फॅ. चे आणि अनेक चित्रपटांचे संकलक अमित पवार यांचे निधन.

http://epaper.esakal.com/esakal/20100227/5575506944930513414.htm
नानाजींना श्रद्धांजली.

चित्रकूट (मध्य प्रदेश) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे माजी सदस्य, पद्मभूषण नानाजी देशमुख (वय 94) यांचे आज सकाळी येथे निधन झाले. जनसंघाच्या संस्थापकांपैकी ते एक होते.

नानाजी गेले काही दिवस आजारी होते. उपचारासाठी दिल्लीला घेऊन जाण्यास त्यांनी नकार दिला होता, असे शारदाप्रसाद द्विवेदी यांनी सांगितले. नानाजी यांनी देहदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांचा देह वैद्यकीय संशोधनासाठी दिला जाणार आहे. ते अविवाहित होते.

गोविंद उर्फ भाऊ साहेब केळकर, ७८
१९५२ साली वडिलांच्या व्यवसायाला हात भार लावला अन १० लाखाची कंपनी अडीच कोटी पर्यंत नेली.
एक यशस्वी उद्योजक म्हणून २००७ साली त्यांना अत्तर आणि सुगंधी क्षेत्रात अमूल्य योगदान केल्याबद्दल तत्कालीन उद्योग मंत्री कमलनाथ ह्यांच्या हस्ते लाइफ्टाइम अचीव्मेंट पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांना लोक 'परफ्यूम किंग' म्हणून ओळखायचे.

१९५२ साली वडिलांच्या व्यवसायाला हात भार लावला अन १० लाखाची कंपनी अडीच कोटी पर्यंत नेली.
एक यशस्वी उद्योजक म्हणून २००७ साली त्यांना अत्तर आणि सुगंधी क्षेत्रात अमूल्य योगदान केल्याबद्दल तत्कालीन उद्योग मंत्री कमलनाथ ह्यांच्या हस्ते लाइफ्टाइम अचीव्मेंट पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांना लोक 'परफ्यूम किंग' म्हणून ओळखायचे.>> पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता शोक सभा आहे. फॅक्ट्री किंवा
कॉलेज यापैकी एका ठिकाणी आहे. एक आदरणीय पित्रुतुल्य व्यक्तिमत्त्व. त्यांचे आत्मचरित्र मराठी व इन्ग्रजीत उपलब्ध आहे. परफ्युमरी उद्योगासाठी एक पायोनीअरिन्ग व्यक्तिमत्त्व. केळकर कॉलेज सारखी संस्था काढून त्यांनी समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. देवा त्यांच्या आत्म्याला शांती दे व त्यांनी आखून दिलेल्या मार्गावरून चालण्याची शक्ती दे.

मोगरा चमेली केतकी गुलाब झाले आज उदास.
ते आपल्यात नाहीत पण कुपीत उरला सुवास.

प्रविण महाजन याचे निधन
आता प्रमोद महाजन यांच्या खुनामागचे खरे रहस्य कधीच कळणार नाही.
कदाचित अनेक अनेक वर्षांनी कळेल, तो पर्यंत लोक सर्व विसरले असतील.

विंदांना भावपूर्ण श्रध्दांजली
जुन्या पिढीतील एका प्रथित् यश साहित्यिकास मुकलो.

Sad

Sad

विंदांना श्रद्धांजली .

___________

संगमनेर - येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व सहकार नेते भाऊसाहेब संतूजी थोरात (वय 87) यांचे वृद्धापकालीन प्रदीर्घ आजाराने आज दुपारी एक वाजता निधन झाले.
http://72.78.249.107/esakal/20100314/4970647846677486387.htm

देणा-याने देत जावे, घेणा-याने घेत जावे....' असे म्हणत मराठी साहित्य रसिकांना भरभरुन देणारे मराठीतील महान काव्य तपस्वी गोविंद विनायक तथा वि. दा. करंदीकर यांचे आज सकाळी निधन झाले.
"वि. दा. करंदीकर " यांना भावपुर्ण श्रद्धांजली Uhoh

Sad

Pages