दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निर्धनकुमार भुकेकंगाल फूटपाथकर ,वय.३५ व. रा.मुंबई यांचे निधन.
गेली अनेक वर्षे परीस्थितीशी ते झगडत होते.
त्यांच्या आत्म्यास शांती मिळो.

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=71886:2...

प्रशासकीय सेवेवर कर्तृत्वाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे आणि कडक शिस्तीचे भोक्ते असणारे, मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त सदाशिवराव तिनईकर यांचे आज जसलोक रुग्णालयात निधन झाले.

सत्यजित राय यांच्या 'गोपी गाइन बाघा बाइन' या चित्रपटात गोपीची भूमिका करणार्‍या तपन चट्टोपाध्याय यांचं निधन. बंगालीतील असंख्य उत्तमोत्तम चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या होत्या. श्री. शंभू मित्रा यांच्यासमवेत त्यांनी बंगाली रंगभूमीही गाजवली.

पार्श्वगायिका ललिता (देऊळकर) फडके यांचे निधन. कै. सुधीर फडके यांच्या पत्नी व श्रीधर फडके यांच्या मातोश्री.

Sad

Sad

Sad

वाइट झाले. खरे तर लग्न झाल्यावर त्यानी बहुतेक गायन बंदच केले होते, पण त्यांची पुर्वीची काही गाणी आठवताहेत.

तरुण भारतचे माजी सम्पादक श्री. वि ना देवधर (८१) यांचे निधन. संघाचा खन्दा कार्यकर्ता गेला...

पं अरविंद गजेंद्रगडकर -सृजनशील innovative -कलावन्त्-अरेरे!!!
त्यांना श्रध्दांजली

ओ. ग. प्र. प्रधान गेले Sad माझ्या आजोबांचे मित्र होते त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

प्रख्यात अभिनेत्री व श्री. आत्माराम भेंडे यांच्या पत्नी श्रीमती आशा भेंडे यांचं निधन.

आशा भेंडे, (पुर्वीच्या लिली इझिकेल) दूरदर्शनवर छान कार्यक्रम सादर करायच्या.
गोबर्‍या गालाचा आर्नोल्ड पण आठवतोय अजून. दोघांना श्रद्धांजली.

गोबर्‍या गालाचा आर्नोल्ड,कित्ती सुंदर अन सहज काम करायचा तो ! माझा फार लाडका होता तो . Sad

ज्येष्ट अतिरेकी मुस्तफा अहमद मुहम्मद उस्मान अबु अल याझिद यांना दोन आठवड्यांपूर्वी वीरगती लाभली.
अमेरिकेच्या द्रोणास्त्रांनी त्यांना हुतात्मा केले. Sad Sad Sad

अल काईदाचे हे क्रमांक ३ चे नेते. म्हणजे अजून दोन बाकी आहेत.:( Sad Sad

शेन्डेनक्षत्र

काही तरी गांभिर्य व तारतम्य बाळगा.
थोडी तरी संवेदन् शीलता ही अपेक्षित आहे.

पहिल्या वाक्यामधील बातमीने शेंडेनक्षत्र पराकोटीचा मानवतावादी (जो सर्वांच्या जवळ कदाचित नसेल, माझ्या कडे तर नाही आहे) दृष्टिकोन बाळगतात असे मी समजतो. पण पुढील वाक्यात ``दोन बाकी आहे`` सोबत ३ दु:खी चेहरे विरोधाभास दर्शवतात.

काही लोकांच्या मानवा बद्दलच्या संवेदना खुप नाजुक असतात. कसाबला माफ करणारे महाभागही, ज्यांचे आप्त २६-११ ला कसाबने गिळले... , या पृथ्वीवर आहेत.

Pages