दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह गॉड....

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

अप्रील २००९मध्ये झालेल्या आंध्रातल्या निवडणुकात निरीक्षक म्हणून गेलो असताना श्री रेड्डी यांचे काम आणि लोकप्रियता पाहण्याची संधी मिळाली. एवढी जबरदस्त लोकप्रियता असलेला नेता भारतात दुर्मीळ .महाराष्ट्रातले सर्वच नेते त्यांच्यापुढे लुंगे सुंगेच वाटतात. म्हणून कॉन्ग्रेसला ३३ खासदार आणि विधानसभेत हल्ली दुर्मीळ झालेली क्लीअर मेजॉरीटी मिळवू शकले. हा शेवटचा दौरा सरकारी योजनांची अम्मलबजावनी कशी होते पहाण्यासाठी गुप्तपणे खेड्यात जाण्यासाठी होता. आणि तेच हेलिकॉप्टर डोंगराला धडकून निधन. फारच मोठे नुकसान Sad

हा शेवटचा दौरा सरकारी योजनांची अम्मलबजावनी कशी होते पहाण्यासाठी गुप्तपणे खेड्यात जाण्यासाठी होता. आणि तेच हेलिकॉप्टर डोंगराला धडकून निधन. फारच मोठे नुकसान
<<< हा अ‍ॅक्सिडेंट घडवून आणलेला तर नाही ? Sad

हूड आपण इथे आला होतात? एक फोन तरी करायचा. माझी कल्पना तुम्ही बारामधे राहता! खरच इथे अगदी कर्फ्यु समान वातावरण आहे. मोठा नेता गेला. पित्रुपंध्रवड्याची सुरुवात तर धडाक्यात झाली इथे. असे मरण का यावे. इथे ते सिटीत फिरायचे तर सात गाड्या, एक अ‍ॅम्ब्युलन्स, जॅमर गाडी, कितीतरी सुरक्षा रक्षक असा लवाजमा असे.

त्यान्चा पायलट ते भाटिया जे गेले, ते माझ्या नणंदेच्या मुलीच्या मित्राचे वडील. एक तारखेलाच त्यान्ची
लग्नाची अनिवर्सरी झाली होती. फारच वाइट. आणी अनपेक्षित.

मामी वास्तविक हा काही सिक्युरिटी घेऊन फिरणारा नेता नव्हे. पण नक्षलवाद्यांमुळे आंध्रात सुरक्षेला पर्याय नाही. उमेशचन्द्र नावाच्या आय्पीएस अधिकार्‍याची सकाळी दहा वाजता हैद्राबादच्या सिग्नल्वर नक्षलीनी हत्या केली. बाय्दवे मी खम्मम या नक्षली जिल्ह्यात होतो हैद्राबादला नाही.

>><<< हा अ‍ॅक्सिडेंट घडवून आणलेला तर नाही ? >> माझ्या डोक्यातही अगदी हिच शंका आली.
टेक्नॉलॉजी इतकी अ‍ॅडव्हान्स असूनही बेपत्ता हेलिकॉप्टर शोधायला तब्बल २७ तास लागावेत ही
निव्वळ शोकांतिका आहे. Sad

नक्षल प्रश्न तर इथे आहेच. वादच नाही. मला ते नाकारायचे नाही हो. फक्त जेन्वा म्रुत्यु येतो तेन्वा हे सगळे किती दूर राहते असे वाटून हळह्ळ वाट्ली. मी कितीतरी वेळा त्यान्चा ताफा जाइपरेन्त ट्रॅफिक मधे थाम्बलेली आहे. त्यानी नायडूंचा शहरी प्रगती वरील फोकस ग्रामीण जनतेच्या भल्याकडे वळवला. ३० लोक तर दु:खाने गेले काल. सर्वांना एकत्र बांधून घेणारा माणूस होता.

सांगलीतील बुद्धिबळपटू-मार्गदर्शक-कार्यकर्ते असे ज्येष्ठ भाउसाहेब पडसलगीकरांचे आज सकाळी निधन झाले.

साहित्यिक श्री. अशोक देवदत्त टिळक यांचं निधन. लक्ष्मीबाई टिळकांचे हे नातू. 'स्मृतिचित्रे' यांनीच प्रसिद्ध केले होते.

ज्येष्ठ हार्मोनिअम वादक सखाराम प्रभाकर उर्फ अप्पा जळगावकर यांचे आज (ता.१६) सकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.

ते माझ्या बाबान्चे व सासुबाइन्चे जवळचे होते. सन्गीत क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व. श्रद्धान्जली.

चित्तरंजन कोल्ह्टकर वारले ८६ वरषांचे होते. श्रद्धांजली. मटाऑनलाइन मध्ये पूर्ण बातमी आहे.

दुसरे म्हणजे मी आजच्या डे. क्रोनिकल मध्ये वाचले. रानडे म्हणून सर्पतज्ञ होते केवळ ३७ वर्षे वय. १५००० च्या वर सापांना वाचविलेले. हॉस्पिट्लच्या आवारातच त्यान्चे घर. एक कोब्रा आण्ला होता व घरी होता.
ते रात्री अडिचला उठ्ले व त्याला खाणे द्यायला गेले. तर त्या सापाने एकदम चावा घेतला. ते थोड्या वेळाने
लोकांना वीषाच्या प्रभावाखाली तळ्मळताना सापड्ले. त्याना ट्रीट्मेन्ट देण्याचा प्रयत्न झाला पण यशस्वी झाला नाही. हे घड्ले तेन्वा बायको व दोन मुली ( १० व ३ वर्शे वयाच्या) तिच्या माहेरी मालाड्ला गेल्या होत्या.

मला वाचून अगदी कसेतरी झाले. लहान वय. इतके काम केलेले. त्याच सापांना वाचवायचे मोठे कार्य पार पाड्त असलेले. म्हण्जे स्वतःचे कार्मिक बर्डन कमी केलेच असणार. घरी इतर माणसे असती तर त्याना
वैद्यकीय मदत लवकर मिळाली असती. साप म्हणू नये आपला चे प्रत्यंतर आले. जीएंच्या गारुड्याच्या
गोष्टीची आठ्वण झाली. मुली किती लहान अरेरे.

मामी,
आता सांग. अशा माणसाच्या उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला समाजाने नको का मदत करायला? कुणी थोडा प्रयत्न करून त्यांचा घरचा पत्ता माबोवर टाकू शकेल का? मला त्यांना मदत करायची आहे. लहान वयात पोरींचे वडिलांचे छत्र हरपले. अरेरे!

हे सर्पमित्र नेहमीच ओव्हरकॉन्फिडन्ट असतात. साप हे विजेच्या प्रवाहासारखे असतात. बरेचसे वायरमन चपला न घालता , ग्लोव न घालता खाम्बावर कामे करतात. त्यामागे हा ओव्हरकॉन्फिडन्स असतो .मी गेली ३० वर्षे लाईटची कामे करतोय वगैरे. पण ३० वर्षानन्तरही शॉक बसतोच ना. पुण्याचे प्रसिद्ध सर्पतज्ञाला एकदा साप चावला. त्याना ससून मद्ये अ‍ॅडमिट करावे लागले. सापांचा अभ्यास केल्याने त्याना त्याचे थोडेबहुत ज्ञान होते नाही असे नाही. पण हे गृहस्थ डॉक्तरांची ट्रीटमेन्ट न घेता त्याना डोके लावू लागले व स्वतःच औषधे घेत. परिणामी त्याना गँगरीन होऊन हात कापावा लागला. नगरला एक मुसलमान सर्प पकडणारे होते. अल्पशिक्षीत. त्याना आम्ही एकदा घरी साप धरायला बोलावले होते .त्यानी साप पकडलाही. नन्तर गप्पा मारताना त्यानी सांगितले की यात मंत्रतंत्र काही नाही. टेक्निक आहे. हा साप आम्हाला चावून आम्ही मरूही शकतो.मला साप चावल्यास मी दवाखान्यात अ‍ॅड्मिट होतो. दुर्दैवाने एकदा साप पकडताना ते एका लाकडावरून घसरून पडले आणि पकडलेल्या सापाने तेवढ्यात चावा घेतला अन ते गृहस्थ त्यात वारले.

दिल्ली केन्द्रावरचे एक प्रसिद्ध मराठी न्यूज रीडर चा मुलगा पुणे विद्यापीठाच्या होस्टेल मध्ये रहात असताना तो व त्याचे झूलॉजीचे पार्टनर होस्टेलच्या रूममध्ये साप पाळत्.एकदा ते सापाना बन्द करून आठ दहा दिवस बाहेर गेले. आल्यावर सापाना खुले करताच सापाने त्याला चावा घेतला अन आठेक दिवस कोंमात जाऊन तो मुलगा गेला. मी त्याच्या त्या रूममध्ये नन्तर रहात होतो. तेव्हाही त्या मुलाने लवकर डोक्टर कदे न जाता स्वतःला माहीत असलेले उपचार करत राहिला.

दुर्दैवाने सापापेक्षा त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स त्या मंडळींचा घात करतो असे माझे मत झाले आहे.

अगदी अगदी हूड, मी तर रात्री ८ नंतर सापाची डॉक्युमेंट्री पण बघत नाही. लहान पणी ते मुठा नदीला पूर यायचा त्यातून साप वाहात जायचे त्याला पण मी घाबरायचे. मोठी मुले आता तो साप घरी येणार असे सांगून घाबरवायचे. आमचे घर अगदी पांचाळेश्वराला लागून. त्यामुळे साप जिना चढून येणार असे वाटून मी चूप बसलेली असायची. त्यात ती बिल्डिन्ग पुरात वाचलेली त्यामुळे वडिल नेहमी गप्पा मारायचे पूर येवून गेल्यावर कसे साप होते वगैरे.

लहान वयात पोरींचे वडिलांचे छत्र हरपले. अरेरे!>> अगदी अगदी बघ माबो वर सगळ्या ग्रूप मध्ये मेम्बर वाढ्त असतात पण मला एकटे पालक वर कोणी नवे मेम्बर नकोच यायला असे वाट्ते. मला वाट्ते मटाऑन लाइन वर मिळेल.

पण वाईट एवढ्यासाठी वाटते की, कायम ज्यांना वाचविले तेच कृतघ्न झाले
त्यांना सदगती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

अरे! Sad

Pages