विवाह बाह्य संबंध

Submitted by Kiran.. on 28 November, 2010 - 14:50

लिव्ह इन वर एक लेख वाचला. तिथं छान चर्चा चालू आहे. ती वाचतांना विवाहबाह्य संबंध हा विषय वेगळा आहे असं मत झालं म्हणून हा प्रपंच. इथं लिव्ह इन बद्दल चर्चा अपेक्षित नाही.

मित्राची बायको एका खाजगी इंशुरन्स कंपनीत मोठ्या पदावर आहे. बॉस आणि दुस-या एका महिलेचे संबंध आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. दोघंही विवाहीत आहेत. बॉसची आर्थिक स्थिती चांगली आहे तरीही तिच्या नव-यापुढं काहीच नाही. भावनिक गुंतवणूक वगैरे काहीही प्रकार नाही. कामाच्या बहाण्याने त्यांना बाहेरगावी जाता येतं. ही दिसायला वगैरे आहे. बॉसच्या घरीही काहीच प्रॉब्लेम नाही तरीही दोघांमधे संबंध निर्माण झालेत...

एक प्रौढ कुमारिका ओळखीची आहे. तरूणपणी सौंदर्याचा अभिमान असल्यानं खूप जणांना नकार दिले. अपेक्षा खूप होत्या. तडजोड केली नाही. आता वय उलटलं...एका विवाहीत पुरूषाबरोबर संबंध जोडलेत. त्याला त्रास देते. घरी जाऊन बायकोला मारहाण वगैरे प्रकार झाले... त्या प्रौढ कुमारिकेला आपण माफ करू, पण ज्याने तिचा फायदा घेतलाय त्याचं काय ? सोन्यासारखा संसार आहे. काहीच गरज नव्हती.

एका मित्राला फिरतीवर रहावं लागतं. आताशा त्याला बायकोचे आणि सोसायटीतल्या एका इसमाचे संबंध असल्याचं कळालंय. त्यांना रेड हँड पकडलं. समज देऊन झालं. सुशिक्षित असल्यानं मारहाण वगैरे काही नाही. मुलांचा विचार करून खूप टेन्शन मधे असतो. मध्यंतरी बायकोलाही पश्चात्ताप झाला होता. पण आता पुन्हा पहिले प्रकार सुरू झालेत. आता कळालंच आहे तर... भीड चेपली गेलीय. सतत कुरबुरी आणि भांडणं चालू असतात. घटस्फोट कुणालाच नकोय हे ही विशेष.

वरील उदाहरणांमधे आपला जोडीदार कमी पडतोय असं काही नाही. लग्नाबाबत असमाधान असंही नाही. ती तक्रार नाही. विवाहाच्या बंधनात गरजा पूर्ण होत नाहीत हा प्रकारच नाही इथं... गरजा पूर्ण होत असूनही एक्स्ट्राची हाव.. या गोष्टींकडं कसं पाहणार ? परपुरूष किंवा परस्त्रीचं सुप्त आकर्षण कि ते शमवायला निर्माण झालेल्या संधी ? संयम सुटत चाललाय का ? सहज उपलब्ध होणारे एस्कॉर्टस, गिगोलो, पॉर्न मॉव्हीज, साहीत्य यामुळं संयम पाळणे फोल वगैरे आहे असं वाटतंय का ? पूर्वीसारखा अपराधीपणा, जोडीसाराला फसवत असल्याची बोच हे देखील दिसत नाही आता. माझ्या गरजा मी पूर्ण करतोय/ करतेय आणि जोडीदाराबरोबर सुखाने संसार देखील करतोय / करतेय असं काहीसं दिसून येतं..

समाजात झालेला बदल म्हणजे माहीत असूनही सहकारी त्याच्या / तिच्या घरी कळवत नाहीत. आपल्याला काय त्याचं हा उदारमतवादी दॄष्टीकोण तयार होतोय.

नैतिकतेच्या कल्पना सैलावल्यात वगैरे बोलण्यात अर्थ नाही. तर आपण करतो ते बरोबर असा एक अहंगंडं आढळतो. आपण केलेल्या प्रत्येक अनैतिक कृत्याला आता समर्थन देता येऊ शकतं. लांबचा विचार करण्याची क्षमता हरवत चाललीय. बुद्धीमान लोक वाढलेत , शहाणे कमी होत चाललेत.

उद्या दुस-याच्या पैशाचा मोह निर्माण होईल. मग ते मिळवणार का आपण ? कायद्याने ती चोरी ठरते म्हटल्यावर शिक्षेच्या भयानं आपण ते विचार दाबून टाकतो. पैशाची गरज तर असतेच.. अर्थात ज्यांना संधी मिळते ते भ्रष्टाचार वगैरे मार्गाने पैसे लुबाडतातच. त्यात अनैतिक काही आहे हेच आता लोकांना मान्य नाही..

कुणाला समाजवणार आणि कोण ? करिअर, पैसा, स्पर्धा या सगळ्यात संस्कारमूल्यं क्षीण होताहेत असं म्हटलं तर चालेल का ? काय वाटतं ?

गुलमोहर: 

भरतजी, चपखल उदाहरण........

एवढे वलयांकित असुनही धर्मेंद्र - हेमामालिनी संबंधांवर कधीच शिंतोडे उडवले नाहीत तठाकठित समाजाने...... बहुढा त्यांनी घेतलेल्या स्टँडमुळेच समाजाची तोंडं बंद झाली असावीत....... !!!!

सो कॉल्ड समाजाचा सगळा माज आता उतरलाय.........

लळा जिव्हाळा शब्दच खोटे, माश्या मासा खाई
कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही......

पिसे तनसडी काड्या जमवी चिमणी बांधी कोटे (घरटे)
दाणादाणा आणुनी जगवी जीव कोवळे छोटे
बळावता बळ पंखांमधले पिल्लू उडुनी जाई.......
कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही......

रक्तही जेथे सूड साधते तेथे कसली माया
कोण कुणाचे बहीण भाऊ पती पुत्र वा जाया (पत्नी)
सांगायाची नाती सगळी, जोतो आपुले पाही
कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही......

ही आहे खरी समाजाची अवस्था.....

महाभारतामधल्या द्रौपदीच्या नात्याला काय म्हणणार ? मला वाटत आपल्याकडे हे असे एकमेव उदाहरण असावे की एका स्त्रीने अनेक पुरूषांशी लग्न केले आणि त्याला सर्वांची मान्यता होती.

नीधप, खूप छान पोस्ट. तुम्ही हे लिहिल्यावर लिहिण्यासारखे काही उरले नाही.
तरी पण
दोन माणसातली नाती ही बीजगणितातल्या नाही, तर रसायनशास्त्रातल्या समीकरणासारखी असतात. आणि प्रत्येक माणूस हा एक वेगळे रसायन असतो, तेही बदलत जाणारा.

एक पुरुष आणि एक स्त्री यांच्यात निखळ मैत्री असूच शकत नाही, असेही टोकाचे विधान यासंदर्भात केले जाते. म्हणजे घराबाहेर भेटणारी प्रत्येक व्यक्ती, उदा: कलीग, बॉस स्त्री आहे की पुरुष आहे याचा विचार करतो की काय आपण? अगदी आपला भाऊ आनि बहिण यांच्यात पण भेद करतो का?

असं का वाटतंय सगळ्यांना की मी समर्थन करतेय म्हणून?
>>
मला अजुनतरी असं वाटलं नाहीय.

आता तुझी कारणं-
१. हे अगदीच अपवादात्मक परिस्थितीत घडेल, जसं मुल होत नसेल तर वगैरे.
२,३ आणि ४ समाजात बहुतेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे.
५. इथे थोडाफार जोडीदाराच्या भावनेचा, इच्छेचा आदर केला जातोय.
६. मिले नही तो अंगुर खट्टे टाईप.
७. तु म्हणतेयस त्या प्रमाणे संतपद.

महेश Lol

नीधप...... मस्त वर्गीकरण केलेस......

योडी, स्त्री असो वा पुरुष....... जेंव्हा मी समाजाला फाट्यावर मारणे म्हणतो तेंव्हा शब्दशः ते असेच असायला हवे....... इतर तिसरा त्याविषय्यी काय बोलतोय त्याकडे दुर्लक्ष करणे..... आणि असे लोक असतात गं..... आहेत....!!!!

'

.द्रौपदी सोडून.. सर्वांची मान्यता होती

>>> आपण काय द्रौपदीची मुलाखत घेतली होती काय ?

काय सांगता ....ती ते एन्जोयही करत असेल !

शिवाय "कर्णाचा" तिला मोह पडला होता ५ पती असताना सुध्दा असे कोठे तरी वाचनात आले आहे !

नी, इथे तसे कोणीच समर्थन करत नाहिये..... पण समाजाचा घटक म्हणून तिसर्‍याने यावर भाष्य करणे योग्य मानणारे आणि त्या दोघांत तिसर्‍याने पडावेच का असे मानणारे हे दोन गट पडलेत बहुतेक....

७ वे म्हणजे संतपद....... थोडक्यात " सातच्या आत घरात" वाले खो खो<<
सातच्या आत घरात वाले ५ आणि ६ मधले. ७ मधले नव्हे... Happy

ज्याला रोज भाकरी खायचिये त्यने ती खावी.....
ज्याला एखाददिवशी पिझ्झा खायचाय त्याने तो स्वतच्या पैशाने खावा.....
ज्याला घरात केक आहे तो खाल्लाय आणि बाहेर गेल्यावर भुक लागली म्हणून बाहेरही केकच खायचाय त्यानेही तो खावा......

जोपर्यंत या सर्व गोष्टीत तुमचे पैसे जात नाहीत, तुमच्या खिशाला चाट लागत नाही..... तर गप्प बसा ना....

उगाच आपले... उफ्फ ये समाज.... उफ्फ ये अधःपतन....... Proud

विबासं हा विषय एकुणच भारी आकर्षक दिसतोय.. नुसत्या विषयावर एवढी चर्चा तर आपला शेजारी असे काय करतोय याची आवई उठल्यास किती चर्चा होईल.... Proud

साधना, चर्चा नाही होणार,,,,,,

कदाचित कुतुहलापोटी वॉच ठेवला जाईल... पण अशी दुहेरी चर्चा नाही होणार असे वाटते.....

मित्रांनो.
मी आहे इथंच. पळून बिळून गेलेलो नाही. नेट मिळत नाही सध्या. पूर्ण वाचून आवडलेल्या पोस्टबद्दल लिहायचं होतं खरं पण निवांत सुरूवात करू म्हणतांना धागा पुढंच पळतोय. असो. विषय आहेच महत्वाचा. कांही जणांचे मुद्दे सहमत नसलो तरीही मांडण्याची त्यांची पद्धत आवडली..

चर्चा होईल ना.. थोडे दिवस होईल आणि मग प्रकरण जुने झाल्यावर लोक गप्प बसतील... जरी तोंडावर कोणी बोलले नाही तरी मागुन बोलतात, पण थोड्या दिवसात सगळे पुर्ववत होते. हल्ली बाहेर कोणाला फरक पडत नाही.

इथली चर्चा मात्र खरेच चांगली वाटली.

एक गोष्ट - काहीजणांना असे लोक विश्वासार्ह वाटत नाहीत हे वाचुन मनात आले की लोकांना भ्रष्टाचारी नेते चालतात, दर पाच वर्षांनी देश परतपरत त्यांच्याच तावडीत देतात, पोलिस चालतात, घरात चोरी झाली तर पोलिसांकडेच धाव घेतात. दुकानदार चालतात, मालात भेसळ करणारच हे माहित असुनही त्याच्या दुकानात मुकाट जातात. पण कोणी आपल्या घरात बसुन असले काही करतोय, ज्याचा आपल्याशी प्रत्यक्ष संबंध काही नाही असला माणुस मात्र लगेच अविश्वासार्ह.

नीधपचे १-७ पटले आणि आवडले. ७ वा खरेच संत... Happy

माणसाच्य (स्त्री/पुरुष) गरजा: अन्न, वस्त्र, निवारा, स्नेही, शिक्षण्,मनोरंजन, सेक्स .................अशा बरयाच गरजा आहेत.

आता या गरजांची पुर्तता करताना उगीच धार्मिक व सामाजीक नियम वेळो वेळी लादण्यात आली. कालांतरने नियमात शिथीलता देण्यात आली. प्रत्येकाला वरिल गरजांची पुर्तता करण्याचं स्वातंत्र्य आहे. मग ते उगीच सेक्सच्या संबंधित समाजाची दखल का बरं? लग्न आणि शारिरीक गरज यात फरक आहे. कारण लग्नामुळे शाररिक गरजेची सोय उपलब्ध होते पण गरज भागेलच असे नाही. सेक्स फक्त शरिर मिलन नसुन तो एक थ्रिल असतो, जो लग्नाचा जोडिदार पुर्ण करेलच असे नाही. प्रत्येक सेक्स कंजुमेबल व्यक्तिचं हा नैसर्गिक अधिकार आहे की, त्याने त्याला वाटेल तेंव्हा सेक्सचं थ्रिल उपभोगावं. आता समाज उगीच मधे टांग अडवत असल्यास तो चोर वाटा शोधणारच. लग्न म्हणजे संसार नावाचा प्रोजेक्ट चालविण्यासाठी दोघानी एकत्र आलेला एक सामाजीक करार होय. त्यामुळे एखाद्याला बाहेरची व्यक्ती आवडु लागल्यामुळे तिकडे मानसिक गुंतवणुक करताना संसार नावाच्या प्रोजेक्टला धक्का लागु देत नसेल तर मग काय हरकत आहे?

जसं घरी जेवण तयार नसल्यास बाहेर ती भुक मिटविल्यास काहीच तक्रार नसते अगदी तसच सेक्स बद्दलही स्विकारायला हवं. पण आपण हे स्विकारत नसण्याचं कारण एकच आहे, आपल्यावर समाजाच्या कृत्रिम नियमांचा पगडा आहे. बास!

वरिल इतर गरजा पुर्ण करण्याचं स्वातंत्र्य आहे तसच सेक्स ही गरज पुर्ण करण्याचंही स्वातंत्र्य असावं. उगीच संस्कार व सामाजीक नियम लादुन एक नैसर्गिक गोष्टीला नियमाच्या कचाटयात बांधुन ठेवण्याचा फसवा प्रयत्न करण्यापेक्षा त्याला नैसर्गीक रुपात स्विकारने जास्त महत्वाचं.

-----------------------

बेफिक्रीर,

तुम्ही उगीच मैत्रिणीना प्रेयसी समजताय. Happy

धागा थंडावला....... सगळे जेवायला गेले वाटते.....

सेक्सपेक्षा "उदरभरण" हीच प्रायॉरिटी आहे याच ज्वलंत उदाहरण.... Proud Biggrin

मला एक उदाहरण द्यायचं आहे इथे... माझ्या ओळखीतल्या एकाने आपल्यापेक्षा सुमारे १५ वर्षं लहान मुलीशी विबासं ठेवले... त्याचा संसार उत्तम, एक मुलगा आणि तिचं लग्न नाही झालेलं... काही दिवसांनी ते एकत्र राहू लागले... पण लवकरच आकर्षण संपलं आणि ते वेगळे झाले... या दरम्यान तो रोज सकाळी तिच्याकडून आपल्या घरी जायचा आणि रात्री परत तिच्याकडे राहायला जायचा... काही दिवसांनी बहर ओसरल्यावर अपेक्षा आल्या आणि नातं तुटलं...
जवळपास ९० टक्के विबासं असेच तुटतात... आकर्ष्णावर आधारित नाती किती दिवस टिकतात? माणसाचा स्वभाव लहान मुलासारखा असतो... आपल्याकडे असलेलं खेळणं जुनं वाटतं आणि नव्याची ओढ लागते...

>>एक गोष्ट - काहीजणांना असे लोक विश्वासार्ह वाटत नाहीत हे वाचुन मनात आले की लोकांना भ्रष्टाचारी नेते चालतात, दर पाच वर्षांनी देश परतपरत त्यांच्याच तावडीत देतात, पोलिस चालतात, घरात चोरी झाली तर पोलिसांकडेच धाव घेतात. दुकानदार चालतात, मालात भेसळ करणारच हे माहित असुनही त्याच्या दुकानात मुकाट जातात. पण कोणी आपल्या घरात बसुन असले काही करतोय, ज्याचा आपल्याशी प्रत्यक्ष संबंध काही नाही असला माणुस मात्र लगेच अविश्वासार्ह.<<<

@ साधनाजी
तुमचे पोस्टस मला आवडतात. एखादा मुद्दा पटवून देण्यासाठी तिकडे असे चालवून घेता तर मग इथे का नाही हे तर्कशास्त्र मलाही मान्य आहे. फक्त इथं दोन तुलना न होऊ शकणा-या गोष्टी विचारात घेतल्या गेल्यात असं मला वाटतं.

दीवार मधला अमिताभ आणि निरूपाय यांच्यातला संवाद आठवला..
जाऑ पहले उस आदमी का साईन लेके आओ.
याला माय निरूपायने दिलेलं उत्तर इथंही लागू होतं... जिसने तुम्हारे हाथ पे यह लिख दिया वो तुम्हारा कौन था......... वो तुम्हारा कौन था......................वो तुम्हारा कौन था !! लेकिन तुम्हारी मां तो तुम्हारी अपनी थी

>>>>आपल्याकडे असलेलं खेळणं जुनं वाटतं आणि नव्याची ओढ लागते...
कोमल, तु म्हणतेस ते बरोबर. पण शेवटी ते व्यक्तीसापेक्ष. नुसतच शारिरीक आकर्षण असेल तर तु म्हणतेस तस होईल. पण विचारांनी आकर्षित झालेल्या काही जोड्या पाहण्यात आहेत माझ्या. ज्या अजून टिकून आहेत.

"अन्न, वस्त्र, निवारा, स्नेही, शिक्षण्,मनोरंजन"
यांच्याइतका सेक्स हा विषय सहज साधा असता तर या विषयाबाबत इतकी चर्चा इथे घडलीच नसती.

विषय गहन आहे आणि त्यामुळेच त्यावर इतका विचार करावा लागतोय, ही वस्तुस्थिती नाकारणं किंवा या विषयाची वरील गरजांबरोबर तुलना करणं योग्य वाटत नाही.

हा विषय किती गहन आहे, का गहन आहे, त्याचे तात्कालिक व दूरगामी परिणाम इ. इ. बद्दल वरील सर्व पोस्टमध्ये उहापोह झालेलाच आहे.

(त्यामुळे त्यातील गांभीर्य परत विषद करण्याची आवश्यकता वाटत नाही. )

पाबा, त्या जोड्या नियमाला अपवाद Happy

पण बाकीच्या तुटलेल्या, विभक्त झालेल्या जोड्यांचं काय??

शेवटी "ultimate goal is hole".

>> विचारांनी आकर्षित झालेल्या काही जोड्या पाहण्यात आहेत माझ्या

इतरांच्या पाहण्यात आल्यावर जोड्यांचे नाही पण बघणार्‍यांचा नजरा नक्कीच बदललेल्या असतात.

पाबा, हे एक उदाहरण होतं... विचारांचं आकर्षण असलेलं नातंच वेगळं आहे... त्याला विवाहबाह्य किंवा अनैतिक म्हणता येईल का प्रश्न आहे... आणि लोक विचारांवर प्रेम करत असले तरी त्यांच्यामध्ये सेक्स येतो का हाही प्रश्नच... मी काही जणांच्या विचारांवर प्रेम करते... माझा नवरा माझा सोलमेट नाही, तो दुसराच कुणीतरी आहे... मग यालाही समाजमान्य भाषेत विबासं म्हणणार? एखादी किंवा एखाद्याचा आपल्या जोडीदाराशी संवाद होत नसेल पण दुसर्‍या भिन्नलिंगी व्यक्तीशी होत असेल... तर त्यालाही तेच लेबल लावायचं? नाती खरंच कॉम्प्लेक्स आहेत... शारिरीक संबंध हा नात्यांतला एक महत्त्वाचा टप्पा आहेत आणि आपण त्याला नात्यांचा परमोच्च बिंदू मानतो... हेच चुकतं... असो... थोडं विषयांतर झालं, सॉरी...

Pages