विवाह बाह्य संबंध

Submitted by Kiran.. on 28 November, 2010 - 14:50

लिव्ह इन वर एक लेख वाचला. तिथं छान चर्चा चालू आहे. ती वाचतांना विवाहबाह्य संबंध हा विषय वेगळा आहे असं मत झालं म्हणून हा प्रपंच. इथं लिव्ह इन बद्दल चर्चा अपेक्षित नाही.

मित्राची बायको एका खाजगी इंशुरन्स कंपनीत मोठ्या पदावर आहे. बॉस आणि दुस-या एका महिलेचे संबंध आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. दोघंही विवाहीत आहेत. बॉसची आर्थिक स्थिती चांगली आहे तरीही तिच्या नव-यापुढं काहीच नाही. भावनिक गुंतवणूक वगैरे काहीही प्रकार नाही. कामाच्या बहाण्याने त्यांना बाहेरगावी जाता येतं. ही दिसायला वगैरे आहे. बॉसच्या घरीही काहीच प्रॉब्लेम नाही तरीही दोघांमधे संबंध निर्माण झालेत...

एक प्रौढ कुमारिका ओळखीची आहे. तरूणपणी सौंदर्याचा अभिमान असल्यानं खूप जणांना नकार दिले. अपेक्षा खूप होत्या. तडजोड केली नाही. आता वय उलटलं...एका विवाहीत पुरूषाबरोबर संबंध जोडलेत. त्याला त्रास देते. घरी जाऊन बायकोला मारहाण वगैरे प्रकार झाले... त्या प्रौढ कुमारिकेला आपण माफ करू, पण ज्याने तिचा फायदा घेतलाय त्याचं काय ? सोन्यासारखा संसार आहे. काहीच गरज नव्हती.

एका मित्राला फिरतीवर रहावं लागतं. आताशा त्याला बायकोचे आणि सोसायटीतल्या एका इसमाचे संबंध असल्याचं कळालंय. त्यांना रेड हँड पकडलं. समज देऊन झालं. सुशिक्षित असल्यानं मारहाण वगैरे काही नाही. मुलांचा विचार करून खूप टेन्शन मधे असतो. मध्यंतरी बायकोलाही पश्चात्ताप झाला होता. पण आता पुन्हा पहिले प्रकार सुरू झालेत. आता कळालंच आहे तर... भीड चेपली गेलीय. सतत कुरबुरी आणि भांडणं चालू असतात. घटस्फोट कुणालाच नकोय हे ही विशेष.

वरील उदाहरणांमधे आपला जोडीदार कमी पडतोय असं काही नाही. लग्नाबाबत असमाधान असंही नाही. ती तक्रार नाही. विवाहाच्या बंधनात गरजा पूर्ण होत नाहीत हा प्रकारच नाही इथं... गरजा पूर्ण होत असूनही एक्स्ट्राची हाव.. या गोष्टींकडं कसं पाहणार ? परपुरूष किंवा परस्त्रीचं सुप्त आकर्षण कि ते शमवायला निर्माण झालेल्या संधी ? संयम सुटत चाललाय का ? सहज उपलब्ध होणारे एस्कॉर्टस, गिगोलो, पॉर्न मॉव्हीज, साहीत्य यामुळं संयम पाळणे फोल वगैरे आहे असं वाटतंय का ? पूर्वीसारखा अपराधीपणा, जोडीसाराला फसवत असल्याची बोच हे देखील दिसत नाही आता. माझ्या गरजा मी पूर्ण करतोय/ करतेय आणि जोडीदाराबरोबर सुखाने संसार देखील करतोय / करतेय असं काहीसं दिसून येतं..

समाजात झालेला बदल म्हणजे माहीत असूनही सहकारी त्याच्या / तिच्या घरी कळवत नाहीत. आपल्याला काय त्याचं हा उदारमतवादी दॄष्टीकोण तयार होतोय.

नैतिकतेच्या कल्पना सैलावल्यात वगैरे बोलण्यात अर्थ नाही. तर आपण करतो ते बरोबर असा एक अहंगंडं आढळतो. आपण केलेल्या प्रत्येक अनैतिक कृत्याला आता समर्थन देता येऊ शकतं. लांबचा विचार करण्याची क्षमता हरवत चाललीय. बुद्धीमान लोक वाढलेत , शहाणे कमी होत चाललेत.

उद्या दुस-याच्या पैशाचा मोह निर्माण होईल. मग ते मिळवणार का आपण ? कायद्याने ती चोरी ठरते म्हटल्यावर शिक्षेच्या भयानं आपण ते विचार दाबून टाकतो. पैशाची गरज तर असतेच.. अर्थात ज्यांना संधी मिळते ते भ्रष्टाचार वगैरे मार्गाने पैसे लुबाडतातच. त्यात अनैतिक काही आहे हेच आता लोकांना मान्य नाही..

कुणाला समाजवणार आणि कोण ? करिअर, पैसा, स्पर्धा या सगळ्यात संस्कारमूल्यं क्षीण होताहेत असं म्हटलं तर चालेल का ? काय वाटतं ?

गुलमोहर: 

पण तुम्हाला मध्यरात्री यावे लागेल. कारण दिवसभर हेच बावळट लो'कं' फिया न भरता माझ्या ट्युशनला येऊन बसतात.
---- किती दिवसां पासुन आपली अशी मानसिक अवस्था आहे ? कुणा चांगल्या डॉ ना का दाखवत नाही ? Happy हलके घ्या...

निधप यांच्या वरिल मताशी पुर्ण सहमत... धाडसी पणाने मोजक्या शब्दात मांडल्याबद्दल अभिनंदन.

वाह वाह !!!

जियो !!!

बेफीकीरजी क्लासेस घेणार का याचे ? एक एकलव्य आणि एक अर्जुन तयार आहे !!!...
>>
पंत जर आपण विबास मध्ये अर्जुनाहुन(भुंग्याहुन) जास्त पुढे गेलात तर गुरुदक्षिणा म्हणुन काट्छाट होइल.
Happy दिवे घ्या

काय भंकस चर्चा चाललीय!
अनुमोदन.
तत्ववेत्याच्या आणि संस्कृतीरक्षकाच्या थाटात निबंध लिहिणार्‍यांना नीती, पावित्र्य, शील, प्रतारणा अशा मानवनिर्मीती व निसर्गाला अजिबात अभिप्रेत नसलेल्या फुटकळ संकल्पनांना शरण जाण्यात अभिमान वाटत असला तर वाटो!

मला वाटते बेफिकीर यांनी हे सगळे गमतीने लिहीले आहे.
फुक्कट स्वतःची प्रौढी. उद्या तुम्ही 'मानवनिर्मीती व निसर्गाला अजिबात अभिप्रेत नसलेल्या' अश्या स्वच्छतागृहात न जाता भर रस्त्यावर चड्डी सोडून बसाल! (खरेच बसतहि असाल!),मान्य आहे, आम्ही तसे करत नाही, पण त्यात काही कौतुक करून घेण्यासारखे काही नाही.

उद्या जनावरांशीहि विबासं ठेवाल!

पंत,
फेसबूक, ट्विटर ही नुसती निमित्ते आहेत हो! या नवीन पिढीला उगीचच वाटते आपण फेसबूक वापरून विबासं केले म्हणजे काहीतरि वेगळे केले! हजारो वर्षे चालू आहेत या गोष्टी, यांना आत्ता समजल्या!

अ‍ॅडमिन,

मला वाटते आता या चर्चेचा समारोप करायची वेळ आली आहे. व्यक्तीगत वाद सुरु झाले आहेत.

विबासं असावेत किंवा असले तर असु द्या यावर "एक"मत झालेय मग पुढे कसली चर्चा? Happy

फेसबुक ट्विटर यांचा असाही उपयोग होतो हे वाचून वाईट वाटले ...
ह्या गोष्टी तर आम्ही आमच्या प्रोफेशन मधल्या बाप लोकांना वाचण्यासाठी वापरतो .
आणि निसर्गाला अभिप्रेत तर लग्नसंस्था पण नाही.
म्हणून असली वाह्यात गोष्ट पण नैसर्गिक मला तरी वाटत नाही.
बाकी कोणी हे करो न करो ... आपल्याला काय देणे घेणे.
आपण करणार नाही .. आणि सहनही करणार नाही.
तशीही हिंसा निसर्गाला अनादिकलापासून अभिप्रेत आहेच.
असो ... आधी विवाह करू का हाच प्रश्न आहे त्यामुळे विवाह बाह्य संबंध तर अलहिदाच ....
...

चालू देत. ब र्‍याच दिवसांनतर डोक्याला ताण पडणार नाही असे वाचायाला मिळाले.
पुढील प्रतिसादांसाठी शूभेच्छा.

<ब र्‍याच दिवसांनतर डोक्याला ताण पडणार नाही असे वाचायाला मिळाले.>
तुम्हाला डोक्याला ताण पडणारे असे इथे मायबोलीवर कधी कुठे वाचायला मिळाले?

मायबोली म्हणजे आजकाल -
डोक्यावर इतरत्र ताण पडतो तो घालवायला इथे यायचे! आणि मग कविता करायच्या, बी ग्रेड कोलाज सारख्या. किंवा 'चांगले' साहित्य व 'चांगले' वाचक यांची 'गणिते' मांडायची! नाहीतर अश्लीलतेवर चर्चा करण्याच्या निमित्ताने भरपूर अश्लील लिहायचे.
इथे ज्या तर्‍हेने चर्चा चालते तशी चर्चा बाहेर केल्यास 'दारुडे आहेत' म्हणतील!

Pages