विवाह बाह्य संबंध

Submitted by Kiran.. on 28 November, 2010 - 14:50

लिव्ह इन वर एक लेख वाचला. तिथं छान चर्चा चालू आहे. ती वाचतांना विवाहबाह्य संबंध हा विषय वेगळा आहे असं मत झालं म्हणून हा प्रपंच. इथं लिव्ह इन बद्दल चर्चा अपेक्षित नाही.

मित्राची बायको एका खाजगी इंशुरन्स कंपनीत मोठ्या पदावर आहे. बॉस आणि दुस-या एका महिलेचे संबंध आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. दोघंही विवाहीत आहेत. बॉसची आर्थिक स्थिती चांगली आहे तरीही तिच्या नव-यापुढं काहीच नाही. भावनिक गुंतवणूक वगैरे काहीही प्रकार नाही. कामाच्या बहाण्याने त्यांना बाहेरगावी जाता येतं. ही दिसायला वगैरे आहे. बॉसच्या घरीही काहीच प्रॉब्लेम नाही तरीही दोघांमधे संबंध निर्माण झालेत...

एक प्रौढ कुमारिका ओळखीची आहे. तरूणपणी सौंदर्याचा अभिमान असल्यानं खूप जणांना नकार दिले. अपेक्षा खूप होत्या. तडजोड केली नाही. आता वय उलटलं...एका विवाहीत पुरूषाबरोबर संबंध जोडलेत. त्याला त्रास देते. घरी जाऊन बायकोला मारहाण वगैरे प्रकार झाले... त्या प्रौढ कुमारिकेला आपण माफ करू, पण ज्याने तिचा फायदा घेतलाय त्याचं काय ? सोन्यासारखा संसार आहे. काहीच गरज नव्हती.

एका मित्राला फिरतीवर रहावं लागतं. आताशा त्याला बायकोचे आणि सोसायटीतल्या एका इसमाचे संबंध असल्याचं कळालंय. त्यांना रेड हँड पकडलं. समज देऊन झालं. सुशिक्षित असल्यानं मारहाण वगैरे काही नाही. मुलांचा विचार करून खूप टेन्शन मधे असतो. मध्यंतरी बायकोलाही पश्चात्ताप झाला होता. पण आता पुन्हा पहिले प्रकार सुरू झालेत. आता कळालंच आहे तर... भीड चेपली गेलीय. सतत कुरबुरी आणि भांडणं चालू असतात. घटस्फोट कुणालाच नकोय हे ही विशेष.

वरील उदाहरणांमधे आपला जोडीदार कमी पडतोय असं काही नाही. लग्नाबाबत असमाधान असंही नाही. ती तक्रार नाही. विवाहाच्या बंधनात गरजा पूर्ण होत नाहीत हा प्रकारच नाही इथं... गरजा पूर्ण होत असूनही एक्स्ट्राची हाव.. या गोष्टींकडं कसं पाहणार ? परपुरूष किंवा परस्त्रीचं सुप्त आकर्षण कि ते शमवायला निर्माण झालेल्या संधी ? संयम सुटत चाललाय का ? सहज उपलब्ध होणारे एस्कॉर्टस, गिगोलो, पॉर्न मॉव्हीज, साहीत्य यामुळं संयम पाळणे फोल वगैरे आहे असं वाटतंय का ? पूर्वीसारखा अपराधीपणा, जोडीसाराला फसवत असल्याची बोच हे देखील दिसत नाही आता. माझ्या गरजा मी पूर्ण करतोय/ करतेय आणि जोडीदाराबरोबर सुखाने संसार देखील करतोय / करतेय असं काहीसं दिसून येतं..

समाजात झालेला बदल म्हणजे माहीत असूनही सहकारी त्याच्या / तिच्या घरी कळवत नाहीत. आपल्याला काय त्याचं हा उदारमतवादी दॄष्टीकोण तयार होतोय.

नैतिकतेच्या कल्पना सैलावल्यात वगैरे बोलण्यात अर्थ नाही. तर आपण करतो ते बरोबर असा एक अहंगंडं आढळतो. आपण केलेल्या प्रत्येक अनैतिक कृत्याला आता समर्थन देता येऊ शकतं. लांबचा विचार करण्याची क्षमता हरवत चाललीय. बुद्धीमान लोक वाढलेत , शहाणे कमी होत चाललेत.

उद्या दुस-याच्या पैशाचा मोह निर्माण होईल. मग ते मिळवणार का आपण ? कायद्याने ती चोरी ठरते म्हटल्यावर शिक्षेच्या भयानं आपण ते विचार दाबून टाकतो. पैशाची गरज तर असतेच.. अर्थात ज्यांना संधी मिळते ते भ्रष्टाचार वगैरे मार्गाने पैसे लुबाडतातच. त्यात अनैतिक काही आहे हेच आता लोकांना मान्य नाही..

कुणाला समाजवणार आणि कोण ? करिअर, पैसा, स्पर्धा या सगळ्यात संस्कारमूल्यं क्षीण होताहेत असं म्हटलं तर चालेल का ? काय वाटतं ?

गुलमोहर: 

आर्च,

आनंद मिळतो म्हणून या वाटेने गेलेले अशी कॅटेगरी नाही का? सगळ्या निगेटिव कॅटेगर्‍या का?

भास्कर आनंद वाटतो म्हणूनच करत असणार. त्रास होत असता तर ठेवलेच नसते असे संबंध. पण त्यात नवरा/बायको किंवा मुलांचा विचार नाही. म्हणजे परत स्वार्थ किंवा स्वतःपुरतं पहाणच आलं न?

हीच मानसिकता असेल तर मुळात विवाह करण्याचे कष्ट का घ्यावे बुवा?>>>

मामी,

माझे लग्न माझ्या तेवीसाव्या वर्षी झाले आणि आता मी एक्केचाळीस वर्षांचा होणार आहे.

अठरा वर्षांमध्ये .... तुमचं काय म्हणणं आहे? की जे तेवीसाव्या वर्षी होतं 'तसच" असावं???

अशक्य आहे हे! निसर्ग हा घटकच वगळला जात आहे थॉट प्रोसेसमधून!

( 'इच्छेविरुद्ध' हा शब्द पूर्णपणे मान्य! आधीच्या प्रतिसादात त्या विषयावर लिहीताना मी 'अ‍ॅक्युरसी' हे माझे ध्येय ठेवलेले नव्हते. अन्यथा मीही तेच लिहीले असते. किंवा कदाचित नसतेही लिहीले! कारण 'शोषणाला बळी पडले' ही कारणमीमांसा देणार्‍या नेमक्या किती विधवांना ते शारिरीक संबंध, भले बळजबरीचे असोत, हवे होते आणि नको होते हे सांगायला तुमच्याहीकडे काही पुरावा नाही आणि कुणालाही असे म्हणायला 'वगैरे' वाव आहे की त्यातील एकोणनव्वद टक्के विधवांना ते संबंध हवेसे वाटत होते.) (हा वेगळा कंस आहे - आधीच्या विधानाचा अर्थ असा नाही की स्त्रियांना 'छुप्या' पद्धतीने हे हवेच असते असे 'माझे' मत आहे. हा फक्त एक युक्तिवाद आहे.)

तेव्हा, शब्दच्छल न करता आपण या मतावर अ‍ॅग्री होऊ शकतो का की विवाहबाह्य संबंध हा नुसताच 'आजचा' फॅक्ट नाही तर ती एक मानसिक गरजही आहे?

'अ‍ॅग्री होऊ शकत नसलो तर तशी मते मांडा' असे सांगायचा अधिकार माझ्याकडे नाही कारण 'मूळ धागा' मी प्रकाशित केलेला नाही.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

आशुचँप,

बर वाटल की माझ्या पोस्ट्मुळे तुमच्या चेहर्‍यावर हसू आल.

माझ्या एका भारतीय कलीगचे विवाह-बाह्य संबध आहेत. त्याच हसण पण मला खोटारड्च वाटत. दिवाळीला त्याला बायको अणि मुली बरोबर देवळात पाहिला आणि कानाखाली द्याविशी वाटली. दांभिक पणाची हाईट वाटली मला. प्रतारणा ही एक मानसिक विकृती आहे या मताची मी आहे. त्याला मानसिक कोंडमारा, शारिरिक गरज इ. गोंडस स्वरुप देण्यात येत हे जास्त हास्यास्पद आहे. असो.

ज्यांनी विवाहबाह्य संबंध ठेवलेत त्यांचे विचार वाचायला आवडतील>>>

श्री...

मी ठेवलेले आहेत. आणि 'एकी'शी नाहीत! काय वाचलंत? 'एकाच स्त्रीशी' नाहीत! चोवीस! मोजून चोवीस! नावे देणे या इथल्या फोरमसाठी योग्य होणार नाही. ही अभिमानास्पद बाब वगैरे मुळीच वाटत नाही मला! 'मी काय आणि कोणत्या मानसिक अवस्थेतला माणूस आहे' हेच 'मायबोली'ला माहीत नाही आहे. 'खरे सांगीतल्याने एवढे थैमान झाले' अशी परिस्थिती आहे बावळटासारखी इथे! बाय द वे (म्हणजे 'रच्याकने') यावरून मला ब्लॅकमेल करणे माझ्या सख्या मेहुण्यालाही शक्य नाही कारण माझे लव्ह मॅरेज आहे आणि या 'फेसलेस एन्काऊंटर्स प्लस सिरियस मॅटर्स' च्या पलीकडला 'भूषण कटककर' काय आहे हे माझी पत्नी जाणते. रिअल लव्ह इज बियॉन्ड द........ ' व्हिजिबल थिन्ग्ज'!

हां! आता लगेच 'माझी पत्नी सोशिक आहे, तिने मला सहन केले आहे' वगैरे मते कृपया देऊ नयेत. हास्यास्पद मते देण्याआधी 'चोवीस' हा आकडा स्वतःला झेपू शकेल का याचा विचार व्हावा ही नम्र विनंती! आणि तो यदाकदाचित झेपलाच तर स्वतःचे कौटुंबिक आयुष्य व्यवस्थित ठेवणे झेपेल का याचाही विचार व्हावा!

इतर वाचकांसाठी! आय हॅव नेव्हर हॅड सेक्स विथ एनी अदर वूमन दॅन माय वाईफ!

But sex is not everything. Even talking to an another woman with a purpose to calm her down with regards to her own personal problems, could be viewed as flirting. I have no feeling of having done a great thing at all while doing this. But the thing is that, I am a man who loves supporting others emotionally and it is regardless of sex, whether I am supporting a woman... or a man itself!

Most of us need to grow up. Really!

A relation with opposite sex, which does not have a 'known' name (like sister, sister in law, etc.) needs to be handled very carefully and with the entire knowledge of the one whom you love. Whom you love more than you love yourself! That's it. Rest of the things are just 'TIMEPASS'!

-'बेफिकीर'!

बेफिकीर तुमच्या वरच्या पोस्ट मध्ये वरच्या पॅराचा खालच्या पॅराशी अजिबात ताळमेळ लागत नाही .
ह्यातनं दोन अर्थ निघतात
१) तुमचे विवाहबाह्य संबंध नसावेत , किंवा
२) तुम्हाला २४ बायका असाव्यात. Light 1
एखाद्याला स्त्रीला धीर देणे विवाहबाह्य संबंधात कसं काय मोडेल? हां जर एखादा धीर देण्याच्या बहाण्याने उठसुठ मिठ्या मारत असेल , किंवा मुके घेत असेल तर शक्य आहे म्हणा.

बेफिकीर तुमच्या वरच्या पोस्ट मध्ये वरच्या पॅराचा खालच्या पॅराशी अजिबात ताळमेळ लागत नाही .
ह्यातनं दोन अर्थ निघतात
१) तुमचे विवाहबाह्य संबंध नसावेत , किंवा
२) तुम्हाला २४ बायका असाव्यात. Light 1
एखाद्याला स्त्रीला धीर देणे विवाहबाह्य संबंधात कसं काय मोडेल? हां जर एखादा धीर देण्याच्या बहाण्याने उठसुठ मिठ्या मारत असेल , किंवा मुके घेत असेल तर शक्य आहे म्हणा.

बेफिकीर तुमच्या वरच्या पोस्ट मध्ये वरच्या पॅराचा खालच्या पॅराशी अजिबात ताळमेळ लागत नाही .
ह्यातनं दोन अर्थ निघतात
१) तुमचे विवाहबाह्य संबंध नसावेत , किंवा
२) तुम्हाला २४ बायका असाव्यात. Light 1
एखाद्याला स्त्रीला धीर देणे विवाहबाह्य संबंधात कसं काय मोडेल? हां जर एखादा धीर देण्याच्या बहाण्याने उठसुठ मिठ्या मारत असेल , किंवा मुके घेत असेल तर शक्य आहे म्हणा.

इट्स ओके श्री!

बहुधा तुमचेच बरोबर असेल! कारण मी मायबोलीवर जे काही लिहीतो ते फक्त प्रसिद्धीसाठी हपापल्यामुळे!

इथं आधी दिलेली प्रतिक्रिया गंमतीने दिली होती पण कदाचित त्यातून टोमणा वगैरे मारलाय असा अर्थ निघत असावा असं नंतर वाटल्यानं मीच बदलली.. असो . या आधी लिव्ह इन रिलेशनशिपच्या धाग्यावर यासाठी प्रतिक्रिया दिली होती कि व्यवस्थेला पर्याय येतोय अशी समाजात भीती निर्माण होऊ पाहतेय. मात्र, विवाहबाह्य संबंध ही गंभीरपणे घेण्याची गोष्ट आहे असं मला वाटत नाही. कारणे हजार असतील.

पूर्वीपासून समाजात ऑड वन आउट असतातच. नियमाला अपवाद वगैरे. ते आहेत म्हणूनच नियमांचं महत्त्वं अधोरेखीत होत असतं. पुढच्यास ठेच या न्यायाप्रमाणे ठेचकाळणारे लोक मार्गदर्शक असू शकतात. त्यांच्या अनुभवातून इतर अनेक जण शहाणे होत असतात. आणि आयुष्य जगण्याची कला म्हणजे दुसरं तिसरं काही नसून शहाणपण आहे. मग ते दुस-याच्या उध्वस्त होण्याने का आलेलं असेना.

आता पुन्हा समाजाच्या प्रगल्भतेचा मुद्दा इथं द्यावासा वाटतो. ज्यांना गरज आहे (जोडीदार अपंग होणे इ.) त्यांच्यासाठी समाज दुर्लक्ष करतो.. सहानुभूती बाळगतो. अशा प्रत्येक केसमधे संबंधित विवाहबाह्य संबंध ठेवतात असंही नाही.

ज्या जोडप्यांमधे दोघांपैकी एक सौख्य देऊ शकत नाही असं वाटतं त्यांनी सरळ विभक्त होऊन पुढचा अनर्थ आणि एकमेकांवरचा अन्याय टाळावा.

दुर्दैवाने विवाहबाह्य संबंध हे ज्या जोडप्यामधे समाधान आहे / आलबेल आहे तिथंच जास्त असतात (असलेच तर). भ्रमरवृत्तीचं समाधान कधीही होऊ शकत नाही. सुदैवाने हे लोक आजही अपवाद या कॅटेगरीतच मोडतात. पूर्वीसारखं छुप्या पद्धतीनं चालत नसल्याने आता हे प्रकार वाढले असं वाटत असेल कदाचित..

पुन्हा बाळबोध : रानटी अवस्थेतून समाज या नागरी संस्कृतीकडे आपण प्रवास केला. मधल्या काळात माणूस जीवनाच्या खूप जवळ होता. आयुष्य सुखी करणे याची व्याख्या अनुभवातून शिकला होता. माणूस या विषयाबद्दलचं शिक्षण समाजातून मिळत होतं.. त्यामुळं जोडीदाराला कशानं वाईट वाटेल, आपल्या जबाबदा-या काय हे चांगलं समजत होतं. पुढे प्राथमिकता बदलत गेल्या. चौकोनी कुटूंब, आई वडील करिअरच्या मागे धावणारे....... मुलं टीव्ही, आया, मोलकरीण यांच्या हवाली. संस्कारासाठी उन्हाळी वर्ग. त्यांना माणूस, भावभावना या चौकटीत जितक्या कळाल्या तितकंच त्यांचं जग... तितकाच समाज. डिग्र्या मात्र भरपूर मिळाल्या आणि म्हणून पाचामुखी परमेश्वर वगैरे म्हणी बोथट होऊन स्वतःला कळेल तेच तत्वज्ञान रूढ होत गेलं.

जुनं ते कालबाह्य म्हणतानाच आदिम संस्कृतीतल्या काही कालबाह्य गोष्टीं आवडू लागल्या..खरंतर अनैतिक मानल्या गेलेल्या गोष्टींसाठी हा बचाव असावा. समाजाला जर आपण देणं लागतच नाही तर समाजाचे नियम पाळावेत कशाला ? नियमांमागची तपःश्चर्या / मंथन वगैरे जाणून घ्यायला वेळ आहे कुणाला ?

शेवटी असं म्हणावं लागेल.. समाजात जर मोठ्या प्रमाणावर एखादी गोष्ट स्विकारली जात असेल तर समाजाला बदलण्यापेक्षा आपण स्वतःला बदलावं..

असो. गॉसिपिंगच्या हक्काच्या विषयावरच्या या जाहीर परिसंवादातील ही माझी अखेरची पोस्ट Happy ( हा टोमणा नाही )

लग्न मानवनिर्मीत आहे , अनैसर्गीक आहे ह्या मताची मी देखिल आहे. पण हेच लग्न केलं तेंव्हाच त्याचा अर्थ, नियम (दोघांनी मान्य केलेले) आपल्याला माहिती असतात. जोडीदारापैकी एक जण ह्या विवाहबाह्य संबधात असेल आणि दुसरा जोडीदार त्या बद्दल अनभिज्ञ असेल तर हे चुकीचेच आहे. फसवणूक आहे. जर असे संबध हवे असतील तर ओपनली आपल्या पार्टनरशी बोलावे आणि मार्ग काढावेत. जर दोन्ही जोडीदार ओपन मॅरेज ला ओके असतील तर काही गरज नाही निती , अनिती वगैरे बद्दल डोकेफोड करायची. व्यक्तीस्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे. पण जर जोडीदाराच्या डोळ्यात धुळ फेकून हे संबध चालु असतील तर ते चुकच आहे.

बेफिकीर यांचा प्रतिसाद वाचुन विवाहबाह्य संबंध म्हणजे नक्की काय असाच प्रश्न पडला आहे ?? कोणी त्याची व्याख्या स्पष्ट करेल का ??

माझ्या समजुतीप्रमाणे विवाहबाह्य संबंध म्हणतानाच त्याच्यात शारीरिक संबंध अंतर्भुत आहेत , असे वाटते. किन्वा अगदी शारीरिक संबंध येउ शकले नसले तरी आपल्या जोडीदारापेक्षा महत्वाचे स्थान त्या व्यक्तीस आप्ल्या आयुष्यात असणे असे होउ शकेल. त्यामुळे बेफिकीर यांनी वर्णन केलेले संबंध 'विवाहबाह्य' हे लेबल लावण्याजोगे वाटत नाहीत. फारतर खुप घट्ट मैत्रीचे म्हणता येतील. पुर्वीच्या काळी , अशा संबंधाकडे संशयाने बघितले जात असेलही पण अता नविन पिढीत मात्र असे मैत्रीचे , जिव्हाळ्याचे संबंध अनेक स्त्री पुरुषात मोकळेपणी पहायला मिळतात. त्यात कोणालाही काही वावगे वाटत नाही.

रच्याकने, ही दोन मजेशीर उदा. बघा

मधे ओपराच्या शोवर एक कुटुम्ब आले होते. त्या माणसाला ४ बायका आणि १६ मुले आहेत. पण त्या बायकांचे आणि त्याचेही म्हणणे असे आहे की 'चीटींग' ( विवाहबाह्य संबंध ) त्यांना मान्य नाही , चालणार नाहीत. जेव्हा त्याचे चौथ्या बायकोबरोबर अफेअर सुरु झाले ते पहिल्या तिघींना माहित होते. बाकी त्यांचे सेटींग ही अतिशय भारी आहे. त्याच्या एकट्याच्या पगारात एव्हढ्यांचे अर्थातच भागु शकत नाही त्यामुळे त्यातल्या २ बायका नोकरी करतात. २ घी घर संभाळतात.
त्याचे सर्व बायकांवर अतिशय प्रेम आहे. अगदी सुखी कुटुम्ब आहे, नो जेलसी म्हणे.

दुसर्‍या एका शोमधे एक बाई आली होती. तिने एका जन्मकैद झालेल्या कैद्याशी लग्न केले आहे. तो कधीच तुरुंगातुन बाहेर येउ शकत नाही. त्यामुळे त्यांचे शारीरिक संबंध येणे कधीच शक्य नाही.

डेलिया | 30 November, 2010 - 13:55
रच्याकने, ही दोन मजेशीर उदा. बघा

मधे ओपराच्या शोवर एक कुटुम्ब आले होते. त्या माणसाला ४ बायका आणि १६ मुले आहेत. पण त्या बायकांचे आणि त्याचेही म्हणणे असे आहे की 'चीटींग' ( विवाहबाह्य संबंध ) त्यांना मान्य नाही , चालणार नाहीत.
>>
पण 'चीटींग' = ( विवाहबाह्य संबंध ) असे कशावरुन?
जर हे संबंध जोडीदाराला माहित असतील तर मग ती चीटींग' होत नाही?
विवाहबाह्य संबंध करा!, लिव्ह इन करा ! माझे काय जाते?

फक्त 'चीटींग' हा प्रकार योग्य नाही कारण इथे जोडीदाराला फसवुन विवाहपुर्व, बाह्य संबंध ठेवले असतात आणि दुर्दैवाने इथे न्याय देणारा कायदा नाही.
मध्यमवर्गातील पुरुषांचा आणि स्त्रियांचा देखिल "आईवडिलांनी जबरदस्ती केली म्हणुन लग्न केले नाहीतर मला करायचे नव्हतेच म्हणुन आता चीटिंग" हा मुद्दा पण मान्य नाही "आईवडिलांनी जबरदस्ती केली म्हणुन हुंडा घेतला " असे सांगणार्या पुरुषांमध्ये आणि या लोकांमध्ये फरक काय? केवळ आपल्यात हिम्मत नाही म्हणुन दुसर्याला फसवायचे.
आणि आता पण एवढी धमक असेल तर चीटिंग न करता (जोडीदाराला सांगुन) जरुर ठेवा हवे तेवढे संबंध.
असे फसवण्यात आणि आर्थिक द्रुष्ट्या फसवण्यात काय फरक आहे?
दोन्हीकडे implied contract मोडले आहे आणि दुसर्या व्यक्तिचा वेळ्/श्रम एकतर्फी दुय्यम दर्जाचे ठरविले आहेत.

आज विश्व एच आय व्ही दिवस आहे त्यामुळे सर्व मोटिव्हेटेड अनुभवी लोकांना वैधानिक इशारा.
स्वतःला जपा तुमच्या सहचरालाही जपा. Happy

अहो तुम्ही जे उदाहरण सांगता आहात तसे माझ्या नात्यात होते खुद्द पुण्यात आणि ते सुद्धा पुणे सनातनी होते तेव्हा.
हे गृहस्थ किर्तनकार, पुजारी, इ. होते आणि ४ लग्ने केली होती. चारी बायका एकाच इमारतीमधे रहात होत्या आणि सर्वांनी एकमेकांशी जमवून घेतले होते. त्या चारपैकी एक बायकोपण किर्तनकार होती. म्हणजे त्या काळच्या सनातनी समाजात मिळून मिसळून रहात होते.
हे माझ्या आजोबांच्या वयाचे होते म्हणजे आत्ता असते तर ८० / ९० च्या वर वय असते. यावरून काळ लक्षात यावा. मी स्वत: माझ्या लहानपणी आजोबांबरोबर त्यांच्या घरी गेलेलो आहे. आम्हाला त्यावेळी फार कुतुहल वाटायचे पण कोणाला विचारायची सोय नव्हती लहान असल्याने.

आता पण एवढी धमक असेल तर चीटिंग न करता (जोडीदाराला सांगुन) जरुर ठेवा हवे तेवढे संबंध.
असे फसवण्यात आणि आर्थिक द्रुष्ट्या फसवण्यात काय फरक आहे?
दोन्हीकडे implied contract मोडले आहे आणि दुसर्या व्यक्तिचा वेळ्/श्रम एकतर्फी दुय्यम दर्जाचे ठरविले आहेत.

अग्गदी बरोब्बर !

महेश द्विभार्या प्रतिबंधक कायदा जवळपास १९५५ ला अस्तित्वात आला असेल, त्याच्याआधी आणि नंतरही बरीच वर्ष एका पेक्षा जास्त बायका असणं सामान्य बाब मानलं जायचं, पण तेव्हाही विबासं असले की गदारोळ होतच असे.
<<<जुनं ते कालबाह्य म्हणतानाच आदिम संस्कृतीतल्या काही कालबाह्य गोष्टीं आवडू लागल्या.>>> अनुमोदन मैत्रयी , आधी अंगावरचे कपडे इंचा-इंचाने कमी होऊ लागले होते आता विबासं किंवा लिव्ह-ईन रिलेशनशीप वाढीला लागलेत.
असचं राहील तर तो दिवस जास्त दुर नाही जेव्हा अंगावर कपडे नसतील अन नवरा-बायकोचं नातं संपुष्टात आलेलं असेल.

>>असचं राहील तर तो दिवस जास्त दुर नाही जेव्हा अंगावर कपडे नसतील अन नवरा-बायकोचं नातं संपुष्टात आलेलं असेल.
म्हणजे मानव परत सुरूवातीच्या जंगली काळात जाईल. Happy ? Sad ?

रचनाचं पोस्ट अतिशय उत्तम.
विबासं हे विवाह जेव्हापासून अस्तित्वात आला तेव्हापासून होते आणि असतील. हल्ली दिसून येतात इतकेच.
आपल्या जोडीदाराने जे केलेलं आपल्याला चालणार नाही ते आपण करू नये इतका साधा न्याय पाळून, गुंतलेल्या कोणालाही(जोडीदार, दुसरी व्यक्ती इत्यादी) न फसवता/ विश्वासात घेऊन कोणी काय करत असेल तर बाकीच्यांनी त्यासंदर्भात मतप्रदर्शन करायची काय गरज हे मला कळत नाही.
असे संबंध ठेऊन असणारी व्यक्ती बाकी जगात खोटी, अमुक तमुक इत्यादी असते हे म्हणणं म्हणजे 'होलियर दॅन दाऊ' अश्या नकचढ्या वृत्तीपलिकडे काही नाही. लगेच असे टॅग्ज लावणार्‍यांनी आयुष्यात एकही चूक केली नाही, एकही थाप मारली नाही असं तर मुळीच नाहीये.

फसवाफसवीवर जेव्हा हे संबंध आधारीत असतात तेव्हा ते संबंध चुकीचे हे ठिकच आहे. पण चूक फसवण्यात आहे.

बेफिकीर,

उगाचच चमकदार आणि सो कॉल्ड सेन्सेशनल विधाने करण्यापूर्वी तुमच्या डोक्यातील विचार लॉजीकली तपासून आणि मांडून बघावे अशी विनंती. तुमचे चोवीसच काय चारशे संबंध का असेनात.. जोवर तुमच्यात ज्या भावनिकद्रुष्टया गुंतलेल्या असतील (केवळ शारिरीक संबध असलेल्या यातून वगळाव्यात) त्या स्त्रीयांना आणि विशेषतः तुमच्या पत्नीना हे सर्व मान्य असेल तर प्रश्न मिटला. फक्त हे करताना, 'मी हा असा' असा अविर्भाव नसावा. फारच बेगडी वाटते मग सगळे.

स्त्री-पुरूषांची नाती अनेकविध प्रकारची असू शकतात. अगदि दिनेशदांनी लिहिल्याप्रमाणे 'कोई नाम ना दो' सारखी सुंदर नातीही असतात. हे काही विवाहबाह्य संबंधात येत नाही. भावनिक आधारात मैत्री असते. किंबहुना, अशा प्रकारच्या निखळ नात्यात गुंतलेल्या व्यक्ती 'ती' आणि 'तो' आहेत का हा मुद्दाच गौण ठरतो. असो.

भावनिक आधारात मैत्री असते. किंबहुना, अशा प्रकारच्या निखळ नात्यात गुंतलेल्या व्यक्ती 'ती' आणि 'तो' आहेत का हा मुद्दाच गौण ठरतो.

अनुमोदन

भावनिक आधारात असणार्‍या मैत्रीला विवाहबाह्यसंबंधात गणणे चुकीचे वाटते.......

वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे ह्या इतक्या सगळ्या पोस्ट वाचून आधी "विवाहबाह्यसंबंधांची" अभिप्रेत व्याख्या काय हे जाणून घ्यायला आवडेल....... !!!! म्हणजे काही चुकीच्या कल्पना डोक्यात असतील तर त्या गळून पडतील.... Happy

लग्नाच्या जुन्याकाळच्या आमंत्रण पत्रिकांमध्ये 'आमचे येथे श्रीकृपेकरून क्ष आअणि य यांचा शरीरसंबंध करण्याचे योजले आहे' असे स्पष्ट लिहिले जाई. यात काय ते आले का भुंगाजी?

Pages