विवाह बाह्य संबंध

Submitted by Kiran.. on 28 November, 2010 - 14:50

लिव्ह इन वर एक लेख वाचला. तिथं छान चर्चा चालू आहे. ती वाचतांना विवाहबाह्य संबंध हा विषय वेगळा आहे असं मत झालं म्हणून हा प्रपंच. इथं लिव्ह इन बद्दल चर्चा अपेक्षित नाही.

मित्राची बायको एका खाजगी इंशुरन्स कंपनीत मोठ्या पदावर आहे. बॉस आणि दुस-या एका महिलेचे संबंध आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. दोघंही विवाहीत आहेत. बॉसची आर्थिक स्थिती चांगली आहे तरीही तिच्या नव-यापुढं काहीच नाही. भावनिक गुंतवणूक वगैरे काहीही प्रकार नाही. कामाच्या बहाण्याने त्यांना बाहेरगावी जाता येतं. ही दिसायला वगैरे आहे. बॉसच्या घरीही काहीच प्रॉब्लेम नाही तरीही दोघांमधे संबंध निर्माण झालेत...

एक प्रौढ कुमारिका ओळखीची आहे. तरूणपणी सौंदर्याचा अभिमान असल्यानं खूप जणांना नकार दिले. अपेक्षा खूप होत्या. तडजोड केली नाही. आता वय उलटलं...एका विवाहीत पुरूषाबरोबर संबंध जोडलेत. त्याला त्रास देते. घरी जाऊन बायकोला मारहाण वगैरे प्रकार झाले... त्या प्रौढ कुमारिकेला आपण माफ करू, पण ज्याने तिचा फायदा घेतलाय त्याचं काय ? सोन्यासारखा संसार आहे. काहीच गरज नव्हती.

एका मित्राला फिरतीवर रहावं लागतं. आताशा त्याला बायकोचे आणि सोसायटीतल्या एका इसमाचे संबंध असल्याचं कळालंय. त्यांना रेड हँड पकडलं. समज देऊन झालं. सुशिक्षित असल्यानं मारहाण वगैरे काही नाही. मुलांचा विचार करून खूप टेन्शन मधे असतो. मध्यंतरी बायकोलाही पश्चात्ताप झाला होता. पण आता पुन्हा पहिले प्रकार सुरू झालेत. आता कळालंच आहे तर... भीड चेपली गेलीय. सतत कुरबुरी आणि भांडणं चालू असतात. घटस्फोट कुणालाच नकोय हे ही विशेष.

वरील उदाहरणांमधे आपला जोडीदार कमी पडतोय असं काही नाही. लग्नाबाबत असमाधान असंही नाही. ती तक्रार नाही. विवाहाच्या बंधनात गरजा पूर्ण होत नाहीत हा प्रकारच नाही इथं... गरजा पूर्ण होत असूनही एक्स्ट्राची हाव.. या गोष्टींकडं कसं पाहणार ? परपुरूष किंवा परस्त्रीचं सुप्त आकर्षण कि ते शमवायला निर्माण झालेल्या संधी ? संयम सुटत चाललाय का ? सहज उपलब्ध होणारे एस्कॉर्टस, गिगोलो, पॉर्न मॉव्हीज, साहीत्य यामुळं संयम पाळणे फोल वगैरे आहे असं वाटतंय का ? पूर्वीसारखा अपराधीपणा, जोडीसाराला फसवत असल्याची बोच हे देखील दिसत नाही आता. माझ्या गरजा मी पूर्ण करतोय/ करतेय आणि जोडीदाराबरोबर सुखाने संसार देखील करतोय / करतेय असं काहीसं दिसून येतं..

समाजात झालेला बदल म्हणजे माहीत असूनही सहकारी त्याच्या / तिच्या घरी कळवत नाहीत. आपल्याला काय त्याचं हा उदारमतवादी दॄष्टीकोण तयार होतोय.

नैतिकतेच्या कल्पना सैलावल्यात वगैरे बोलण्यात अर्थ नाही. तर आपण करतो ते बरोबर असा एक अहंगंडं आढळतो. आपण केलेल्या प्रत्येक अनैतिक कृत्याला आता समर्थन देता येऊ शकतं. लांबचा विचार करण्याची क्षमता हरवत चाललीय. बुद्धीमान लोक वाढलेत , शहाणे कमी होत चाललेत.

उद्या दुस-याच्या पैशाचा मोह निर्माण होईल. मग ते मिळवणार का आपण ? कायद्याने ती चोरी ठरते म्हटल्यावर शिक्षेच्या भयानं आपण ते विचार दाबून टाकतो. पैशाची गरज तर असतेच.. अर्थात ज्यांना संधी मिळते ते भ्रष्टाचार वगैरे मार्गाने पैसे लुबाडतातच. त्यात अनैतिक काही आहे हेच आता लोकांना मान्य नाही..

कुणाला समाजवणार आणि कोण ? करिअर, पैसा, स्पर्धा या सगळ्यात संस्कारमूल्यं क्षीण होताहेत असं म्हटलं तर चालेल का ? काय वाटतं ?

गुलमोहर: 

भुंग्या Lol
अवांतर - राखी.. चा एखादा एपिसोड बघा,, ते ही ठाण्यात नायतर पुण्यात कुठेतरी एकिकडे आधी बुकिंग केल्यावर मगंच... जाम इमॅच्यूअर बोलते आणि कपडे तर असे घालते.. इन्साफ काय डोंबलाचा करणार असली अर्धवट बाई? Angry लोक निव्वळ ती जवळून पहायला मिळावी म्हणून नको नको ते इश्श्यू घेऊन येत असतील तिच्याकडे..

दक्षे ते पब्लिक पण दिन का दौसौ रुपया लंच के साथ मे... असं सांगून शूटिंगला आणलेले असेच असते गं...... Lol

पंतांच्या शोला निदान आणावे तरी नाही लागणार..... सगळे माबोकरच येतील.....
इन्साफ नाही मिळाला तरी चालेल, पण त्यानिमित्ताने आणखी एक गटग होईल... Proud Biggrin

मला वाटले, एव्हाना किरणला पश्चात्ताप किंवा नैराश्य आले असेल. पण नाही. आताशी फक्त झंडूच झाला आहे त्याचा. ओके ओके. वाट बघू अजून थोडा वेळ

येतील येतील.. मलाइकाने दाखवलाय तसा बाम लावायचा म्हणजे वेळ लागायचाच...

साधना Lol

अरे मला वाटलं होतं ही चर्चा संपलीये ...पण ...

असो
धन्यवाद भरत जी !
साधना ,भरत सिक्सर मारलात अगदी.. पोट धरुन हसले.>>>> पोट पडत होतं का ???..
पंतांच्या शोला निदान आणावे तरी नाही लागणार..... सगळे माबोकरच येतील >>>:हहगलो:

मला वाटले, एव्हाना किरणला पश्चात्ताप किंवा नैराश्य आले असेल. पण नाही. आताशी फक्त झंडूच झाला आहे त्याचा. ओके ओके. वाट बघू अजून थोडा वेळ

काही नाही रे दोस्तांनो.. नवा आयडी लक्षात राहीला नाही आणि लॉगिन व्हायची झटापट करत होतो... टीव्हीवर मुन्नी दिसली आणि आयडी आठवला

येतील येतील.. मलाइकाने दाखवलाय तसा बाम लावायचा म्हणजे वेळ लागायचाच...

इश्श..! लाजलो ना मी हातभर

येतील येतील.. मलाइकाने दाखवलाय तसा बाम लावायचा म्हणजे वेळ लागायचाच...

इश्श..! लाजलो ना मी हातभर
>>>>>>>>>>

Biggrin

मला वाटते या बाफ ला टाळे ठोकायची वेळ झाली आहे.
विबासं असले तरी चालतात यावर जवळपास सगळ्यांचे एकमत झाले आहे मग आता पुढे चर्चेची काय गरज Wink

mansmi18 Wink
अहो अजून ३०० पण प्रतिसाद झाले नाहीत हो. जाच वाल्या बीबीने तर ५०० पार केले होते. तेवढी तरी संधी द्या Proud

अत्यंत जवळच्या नात्यात विवाह बाह्य संबधामुळे येणारा मानसिक ताण्,होणारा त्रास,नैराश्य्,यातुन प्रत्यक्ष जे लोक गेलेत त्या पैकि कोणी इथ येवुन पोस्ट टाकल्यात कि नाहे ते माहित नाही.त्यांचे अनुभव समजायला हवेत जर त्यान्चि इच्छा असेल तर...
समजा अशी पोस्ट आली तर काय होइल? पहिल्या जोडिदारात कमतरता आहे म्हणुन दुसरा जोडिदार भावनिक आधार शोधत आहे असे अनुमान काढायचे? कि हल्ली सर्विकडे असच चाललय अश्या पोस्ट टाकायच्या एक भा. प्र.

मला वाटलं होतं की, सुचा आणि सुकिच्या पोस्टी वाचून कोणीतरी "शेरदिल माबोकर" Proud पुढे येईल आणि आपले विबासं चे अनुभव शेअर करेल...... पण कसलं काय..... जळ्ळ्ं मेलं नशीबच फुटकं.. Proud

अरे व्वा.... श्रींनीच श्रीगणेशा केला....... Proud
वाचायची राहून गेलीच कशी???? Lol

आपले विबासं चे अनुभव शेअर करेल

मला विबासं शब्द वाचला की सतत विपश्यना संधाची आठवण येते... Happy

<<मला विबासं शब्द वाचला की सतत विपश्यना संधाची आठवण येते... >>

मला बिपाशा बसु ची आठवण येते Wink

अरे वा !!!
किरण कि 'झंडु' हुवी ....किसके लिये ?
किरण ,
तुमचं पान मात्र सुपर डुपर हिट्ट ..बरं का !
Lol

अत्यंत जवळच्या नात्यात विवाह बाह्य संबधामुळे येणारा मानसिक ताण्,होणारा त्रास,नैराश्य्,यातुन प्रत्यक्ष जे लोक गेलेत त्या पैकि कोणी इथ येवुन पोस्ट टाकल्यात कि नाहे ते माहित नाही.त्यांचे अनुभव समजायला हवेत जर त्यान्चि इच्छा असेल तर...
समजा अशी पोस्ट आली तर काय होइल? पहिल्या जोडिदारात कमतरता आहे म्हणुन दुसरा जोडिदार भावनिक आधार शोधत आहे असे अनुमान काढायचे? कि हल्ली सर्विकडे असच चाललय अश्या पोस्ट टाकायच्या एक भा. प्र.

अनु
दर वेळेस विबासं च्या बाबतित जोडीदारच हवा का??इतर जवळचे नातेवाइकही असु शकतात न??

दर वेळेस विबासं च्या बाबतित जोडीदारच हवा का??इतर जवळचे नातेवाइकही असु शकतात न??
प्रश्न तो नाहि आहे ? आपण काय बोलनार आहोत त्यावर हा आहे . काय चर्चा होनार त्यावर? कुनाला दोष देणार
ते विचारतेय

भानगड तर भानगड!!! तीही खुलेपणाने मांडली कि समाज भानगडीसकट पुरूषाला आणि बाईला स्वीकारतो - एवढं नक्की! समाज का स्वीकारतो? समाजाचे कोणतेही संबंध व्यक्तीत गुंतलेले नसतात म्हणुन! ज्याचा परिचय नाही तो तिर्‍हाईत. अशी तिर्‍हाईत मंडळी हि खरी जनता. उरललेले परिचयाचे. ते काही न काही कामापायी, स्वार्थापायी तुमच्याशी जखडलेले असतात. तुम्हाला दुखवण, हे त्यांना न झेपणारं असतं. त्यामुळे ते तुम्हाला भानगडीसकट स्वीकारतात. मग राहिली रक्ताची माणसं. ती नाईलाजाने गप्प बसतात. जवळचं पण चमत्कारिक नातं असतं ते बायकोच! तिची जडणघडण, नातं भावनेच्या पलीकडच्या विश्वातलं. नवर्‍याने मैत्रीण किंवा प्रेयसी करण, हा तिच्या भावनेवर, प्रेमावर, भक्तीवर आघात नसतो, तर तितकाच तिच्या तो अस्मितेवर असतो. ते सहन करणं, तिच्या शक्तीबाहेर असतं.
– वपुर्झा - व. पु. काळे

अक्षता ह्या शब्दातलं प्रत्येक अक्षर महत्त्वाचं आहे.
अ = अर्पणभाव
क्ष = क्षमाशीलता
ता = तारतम्य
हे तीन गुण दोघांजवळ हवेत.
प्रेमातील नवी नवलाई आता काहीशी कमी झाली असेल तर दोघांनी आपापल्या डोळ्यांवरच्या पट्ट्या उतराव्यात. एकमेकांच्या वृत्तीचा खरा मागोवा घ्या. सप्तकातले किती सूर जुळतात ते भाबडेपणा टाकून तपासावं. मुख्य म्हणजे एकमेकांसाठी आपण कोणत्या गोष्टींना, किती प्रमाणात मुरड घालु शकणार आहोत त्याचा ह्याच कालावधीत शोध घ्यावा. संघर्षाच्या जागा हेरून ठेवाव्यात. मुरड घालणं हा सहजधर्म व्हायला हवा. कात टाकली कि साप तिकडे वळुनही बघत नाही, इतक्या सहजतेने आपण एकमेकांसाठी काय टाकू शकतो, त्याच संशोधनच करायला हवं. एकमेकांना टाकण्यापेक्षा, एकमेकांसाठी काही ना काही टाकणं यालाच "अर्पणभाव" म्हणतात.
स्वतःतल्या उणिवांची खरी जाणीव झाली आहे. दोष समजले आहेत. कमकुवतपणाच्या जागा समजल्या आहेत. पण प्रामाणिक प्रयत्न करूनही आपल्या जोडीदारचे वृत्तीदोष जात नाहीत समजल्यावर तिकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती म्हणजे "क्षमाशीलता".
तरतमभाव न बाळगता घ्यायचं कसं आणि लडिवाळ हट्ट करून वसूल कधी करायचं, वाकायचं कधी आणि कधी वाकवाय्ला लावायचं, स्थळ, काळ, स्थिती ह्याचं भान म्हणजे "तारतम्य".
– वपुर्झा - व. पु. काळे

जिप्सी..

वपु काळाच्या पुढचा विचार करत असं वाटतं. आजच्या काळासाठी, आजच्या समस्यांसाठी त्यांनी त्याच वेळी मार्गदर्शन करून ठेवलंय.... प्रश्नांची उत्तरं अशी सहज मिळू लागतात. कदाचित आपल्याला हे इतकं सुसंगत रितीनं कधीच मांडता आलं नसतं.

धन्यवाद.

खरय व.पुं.नी अनेकदा जिवनाचे गहन तत्वज्ञान अगदी साध्या सोप्या भाषेत लिहून ठेवले आहे.
मीच तुमची वहिदा सारख्या कथांमधे हसता हसता अंतर्मुख होऊन विचार करायला लावण्याची ताकद होती.

योगेश, तुझी पहिली पोस्ट वाचत असताना मी विचार करत होते की सोल्लीड लिहिलंय यार ह्याने.. तर शेवटी वपुंचे नाव... Happy

दोन्ही पोस्टी एकदम सुरेख. सुखाचा संसार करायचा असेल तर कायम अक्षता होऊनच राहिले पाहिजे. असे केले तरच आपण दुस-यांदा आपल्या जोडीदाराच्या प्रेमात पडु आणि यावेळचे प्रेम हे कायम टिकणारे असेल. पहिल्यांदा जोडीदाराच्या प्रेमात पडतो ते केवळ त्याचे बाह्यस्वरुप पाहुन.. ते ओसरायला वेळ लागत नाही. Happy

वपु....ऑल टाईम हिट ! वरवर साध्या वाटणार्‍या, पण मुळात गुंतागुंतीच्या प्रश्नांवर किती सहज उत्तरं देतात वपु. Happy

पती आणी पत्नी या अनादीकालापसून चालत आलेल्या नात्याला असलेले भावनिक पदर तरलतेने आणी हळूवारपणे उलगडून दाखवावेत तर वपुंनीच. प्रत्येक नवविवाहीत जोडप्याला 'वपुर्झा' भेट मिळाले तर विबासं बरेच कमी होतील.

Pages