विवाह बाह्य संबंध

Submitted by Kiran.. on 28 November, 2010 - 14:50

लिव्ह इन वर एक लेख वाचला. तिथं छान चर्चा चालू आहे. ती वाचतांना विवाहबाह्य संबंध हा विषय वेगळा आहे असं मत झालं म्हणून हा प्रपंच. इथं लिव्ह इन बद्दल चर्चा अपेक्षित नाही.

मित्राची बायको एका खाजगी इंशुरन्स कंपनीत मोठ्या पदावर आहे. बॉस आणि दुस-या एका महिलेचे संबंध आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. दोघंही विवाहीत आहेत. बॉसची आर्थिक स्थिती चांगली आहे तरीही तिच्या नव-यापुढं काहीच नाही. भावनिक गुंतवणूक वगैरे काहीही प्रकार नाही. कामाच्या बहाण्याने त्यांना बाहेरगावी जाता येतं. ही दिसायला वगैरे आहे. बॉसच्या घरीही काहीच प्रॉब्लेम नाही तरीही दोघांमधे संबंध निर्माण झालेत...

एक प्रौढ कुमारिका ओळखीची आहे. तरूणपणी सौंदर्याचा अभिमान असल्यानं खूप जणांना नकार दिले. अपेक्षा खूप होत्या. तडजोड केली नाही. आता वय उलटलं...एका विवाहीत पुरूषाबरोबर संबंध जोडलेत. त्याला त्रास देते. घरी जाऊन बायकोला मारहाण वगैरे प्रकार झाले... त्या प्रौढ कुमारिकेला आपण माफ करू, पण ज्याने तिचा फायदा घेतलाय त्याचं काय ? सोन्यासारखा संसार आहे. काहीच गरज नव्हती.

एका मित्राला फिरतीवर रहावं लागतं. आताशा त्याला बायकोचे आणि सोसायटीतल्या एका इसमाचे संबंध असल्याचं कळालंय. त्यांना रेड हँड पकडलं. समज देऊन झालं. सुशिक्षित असल्यानं मारहाण वगैरे काही नाही. मुलांचा विचार करून खूप टेन्शन मधे असतो. मध्यंतरी बायकोलाही पश्चात्ताप झाला होता. पण आता पुन्हा पहिले प्रकार सुरू झालेत. आता कळालंच आहे तर... भीड चेपली गेलीय. सतत कुरबुरी आणि भांडणं चालू असतात. घटस्फोट कुणालाच नकोय हे ही विशेष.

वरील उदाहरणांमधे आपला जोडीदार कमी पडतोय असं काही नाही. लग्नाबाबत असमाधान असंही नाही. ती तक्रार नाही. विवाहाच्या बंधनात गरजा पूर्ण होत नाहीत हा प्रकारच नाही इथं... गरजा पूर्ण होत असूनही एक्स्ट्राची हाव.. या गोष्टींकडं कसं पाहणार ? परपुरूष किंवा परस्त्रीचं सुप्त आकर्षण कि ते शमवायला निर्माण झालेल्या संधी ? संयम सुटत चाललाय का ? सहज उपलब्ध होणारे एस्कॉर्टस, गिगोलो, पॉर्न मॉव्हीज, साहीत्य यामुळं संयम पाळणे फोल वगैरे आहे असं वाटतंय का ? पूर्वीसारखा अपराधीपणा, जोडीसाराला फसवत असल्याची बोच हे देखील दिसत नाही आता. माझ्या गरजा मी पूर्ण करतोय/ करतेय आणि जोडीदाराबरोबर सुखाने संसार देखील करतोय / करतेय असं काहीसं दिसून येतं..

समाजात झालेला बदल म्हणजे माहीत असूनही सहकारी त्याच्या / तिच्या घरी कळवत नाहीत. आपल्याला काय त्याचं हा उदारमतवादी दॄष्टीकोण तयार होतोय.

नैतिकतेच्या कल्पना सैलावल्यात वगैरे बोलण्यात अर्थ नाही. तर आपण करतो ते बरोबर असा एक अहंगंडं आढळतो. आपण केलेल्या प्रत्येक अनैतिक कृत्याला आता समर्थन देता येऊ शकतं. लांबचा विचार करण्याची क्षमता हरवत चाललीय. बुद्धीमान लोक वाढलेत , शहाणे कमी होत चाललेत.

उद्या दुस-याच्या पैशाचा मोह निर्माण होईल. मग ते मिळवणार का आपण ? कायद्याने ती चोरी ठरते म्हटल्यावर शिक्षेच्या भयानं आपण ते विचार दाबून टाकतो. पैशाची गरज तर असतेच.. अर्थात ज्यांना संधी मिळते ते भ्रष्टाचार वगैरे मार्गाने पैसे लुबाडतातच. त्यात अनैतिक काही आहे हेच आता लोकांना मान्य नाही..

कुणाला समाजवणार आणि कोण ? करिअर, पैसा, स्पर्धा या सगळ्यात संस्कारमूल्यं क्षीण होताहेत असं म्हटलं तर चालेल का ? काय वाटतं ?

गुलमोहर: 

>>माहीत असूनही सहकारी त्याच्या / तिच्या घरी कळवत नाहीत.
हे योग्य आहे असे मला वाटते. काही सांगणे म्हणजे चहाडी करणे होईल. दुसरे म्हणजे 'माहित आहे' म्हणजे काय सहकार्‍यांनी काही बघितले असेल असे मला वाटत नाही. नुसतेच अंदाज असताना, असे काही सांगणे म्हणजे चांगल्या संसारात मिठाचा खडा घातल्यासारखे होईल.

>>उद्या दुस-याच्या पैशाचा मोह निर्माण होईल. मग ते मिळवणार का आपण ?
नवरा किंवा बायकोवर मालकीहक्क दाखवणेही योग्य वाटले नाही. मालकीचा पैसा ठीक आहे. मालकीचा माणूस ही कल्पनाच चुकीची आहे.

जवळपास सर्व पशुपक्षी/प्राण्यांचा एक विशिष्ट प्रणयाराधनेचा काळ असतो. त्याप्रमाणं त्यांचं चालु असतं. बायका माणसांत असं काही असल्याचं ऐकून नाही. पण त्यांना संस्कृती, नैतिकता असंही काहीतरी असंत, म्हणे! पण ते फारसं प्रभावी नसावं.
बस. खल्लास.

तुमच्या बॉसचं उदाहरण ऐकून वपुंचं पुढील अर्थाचं एक वाक्य आठवलं......एखाद्याजवळ अगदी कळसूबाईचं शिखर असेल, ..पण प्रतिध्वनी येण्यासाठी ५५ फूटांची टेकडीच लागते !
वरील संसारामध्ये दोघांकडे सग्गळं असूनही ही प्रतिध्वनीची गरज भागत नसेल कदाचित...
अर्थात ह्या संबंधांमध्ये फक्त शारिरीक गरज असेल तर मात्र भाग वेगळा.

यशवंत.. लैच भारी.
रुणूझुणू..मस्त लिहीलंस.. आवडलं
मृदुला..
>>काही सांगणे म्हणजे चहाडी करणे होईल.<<
पटतंय. माझा मुद्दा समाजाचा बदलत चाललेला दृष्टीकोण हा होता. पूर्वीचं आठवत असेल तर मुलं मुली एकमेकांशी बोलले तरी घरी व्यवस्थित बातमी पोचवली जायची. घरचे लांबच राहीले पण गावचे कुणीही वडीलधारे खरडपट्टी काढत. समाज किती बदलला हे जाणवतं.

>>मालकीचा माणूस ही कल्पनाच चुकीची आहे.<<
मान्यच आहे. पैशाचं उदाहरण कदाचित चपखल नाही बसलं.. लग्न केल्यानंतर विश्वास या आधारावर जे नातं तयार होतं त्याला तडा जातो. शारीरीक संबंधांबाबत आपल्याकडं उदार दॄष्टीकोण असणं शक्यच नाही ( परदेशात तरी आहे का ? नसावा. ख्रिस्तोफर रीव्ह ..सुपरमॅनवाला.. एका सिनेमात अपंग असतो. त्याला बायकोचं स्वैर वागणं कळाल्यानंतर तो तिचा काटा काढतो असा एक सिनेमा पाहीला होता ). अफेअर असणं म्हणजेच विश्वासघात हे माहीत असतांना असं का वागतात हे म्हणायचं होतं. जिथं शिक्षेची भीती आहे तिथं माणूस आपली वासना, हाव नियंत्रणात ठेवतो, जिथं मोकळं रान मिळालंय असं वाटतं तिथं तो बेभान होत असावा.. सगळेच नाही. बाकि..आपले मुद्दे छानच

या सर्व प्रकारापासून ९० % लोक दूर आहेत असं ढोबळ विधान मी करतो. या लोकांमधे हिंमत नाही किंवा त्यांना शक्य नाही असं नसून आयुष्यात कशाला प्राथमिकता द्यायची हे त्यांना नीट कळालेलं आहे आणि आयुष्याकडं पाहण्याचा दृष्टीकोण पूर्ण विकसित झालेला असल्यानं प्रलोभनाला बळी न पडण्याचं त्यांच शिक्षण त्यांना उपयोगी पडतंय असं वाटतं..

निसरड्या वाटेवर चालणा-यांना भान राहत नाही हेच खरं..

सर्वप्रथम, हा एक वेगळा विषय आहे, या विधानाबद्दल अभिनंदन !!

हे योग्य आहे का अयोग्य आहे ते लिहित नाही, पण अशा संबंधाबाबत कुणीही कुणावर लेखी आरोप करणे आणि गरज पडल्यास ते सिद्ध करणे, (जर अशा संबंधातून अपत्य वगैरे झाले नसेल तर ) जवळ जवळ अशक्य आहे.

मुळात लग्नसंस्था ही मानवनिर्मित आहे आणि अनैसर्गिक आहे. (या विधानाचा अर्थ माझा लग्नसंस्थेवर विश्वास नाही असा नाही).
लग्नाची निर्मिती ही मानवाच्या इतिहासातली मनोविकासाची एक अत्युच्च पायरी आहे. कारण यामधे समाजातील सर्वांना न्याय मिळावा हा विचार आहे. अशी संस्था जर निर्माण झाली नसती तर केवळ सबळ लोकच उपभोग घेत राहिले असते, तसेच समाजव्यवस्था अस्तित्वात न येता मोठे अराजक माजले असते.
पुर्वी अतिशय चांगल्या विचाराने सुरू केलेली चांगली व्यवस्था असली तरी आधी म्हणल्याप्रमाणे ती नैसर्गिक नसल्याने १००% यशस्वी नाही.
आहार, निद्रा, भय, मैथुन या गोष्टी माणसात आणि प्राण्यात समान आहेत. त्यामुळे प्राण्यांप्रमाणे या बाबतीतली असलेली मनाची चंचलता माणसामधे पण आहे, ती लग्न या संस्थेमुळे बांधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कितीही प्रयत्न केला तरी सर्वांच्या बाबतीत हा संयम यशस्वी होतोच असे नाही, मग अशातुन लग्नबाह्य संबंध निर्माण होतात.
एकमेकांवरील विश्वास आणि निष्ठा हा लग्नाचा पाया आहे. त्याला धक्का न लागता जर काही घडत असेल (म्हणजे दोघांनाही काही आपत्ती नसेल तर) असे संबंध योग्य असावेत का हा चर्चेचा मुद्दा आहे.

या लोकांमधे हिंमत नाही किंवा त्यांना शक्य नाही असं नसून आयुष्यात कशाला प्राथमिकता द्यायची हे त्यांना नीट कळालेलं आहे आणि आयुष्याकडं पाहण्याचा दृष्टीकोण पूर्ण विकसित झालेला असल्यानं प्रलोभनाला बळी न पडण्याचं त्यांच शिक्षण त्यांना उपयोगी पडतंय असं वाटतं..

निसरड्या वाटेवर चालणा-यांना भान राहत नाही हेच खरं..>>> १००१% पटलं

निसरड्या वाटेवर चालणा-यांना भान राहत नाही हेच खरं..
या सर्व प्रकारापासून ९० % लोक दूर आहेत असं ढोबळ विधान मी करतो.
अनुमोदन !

सर्वसाधारणपणे, लग्नाला काही वर्षं उलटली की बायका मुलांमध्ये गुंतून राहतात आणि त्यांचं नवर्‍यांकडचं लक्ष कमी होतं, अशी तक्रार होते. शिवाय बाळंतपणानंतर शरीर सुटलेलं असतं आणि त्यांचा प्राधान्यक्रमही बदलतो... नंतर प्रकृतीच्याही काहीबाही तक्रारी सुरू होतात आणि शारीरिक संबंधांमधला रसही कमी होतो. पुरुषांचा शारीरिक संबंधांमधला रस साधारणपणे वयाच्या पन्नाशीपर्यंत असतो आणि स्त्रियांचा पस्तीशीनंतर कमी होतो... या कारणांमुळे या वयोगटातले पुरुष विवाहबाह्य संबंधांकडे वळतात, असं जागतिक आरोग्य संघटनेचा एक अहवाल सांगतो...

अशा संबंधांमध्ये केवळ आजमावून पाहणं एवढंच असतं. त्यात कमिटमेंट खूप क्वचितवेळा दिसते. सर्व काही स्थिरस्थावर असताना केवळ सेक्समधलं कमी झालेलं थ्रिल आजमावून पाहावं, असा हेतू दिसतो.. थोडा आनंद लुटणं असंच ठरवून करतात लोक... शिवाय इतर स्त्रियांबाबतचं आकर्ष्ण हेही असतंच. त्याचवेळी स्त्रिया मुलं, घरची जबाबदारी अशा जबाबदार्‍यांमध्ये अडकून पडतात त्यामुळे त्यांच्या मनात असं काही येण्याची संधीच नसते...

माझ्या ओळखीत अशी काही विवाहबाह्य संबंधांची उदाहरणं आहेत... पण ती दीर्घकाळ टिकत नाहीत... कारण त्यातल्या एकाच्या अपेक्षा वाढतात आणि दुसरा आपल्यावर बेतेल या भीतीने मागे हटतो... अनेकदा नातं शारिरीक संबंधांवरून स्पिरिच्युअल होतं आणि खूप वेगळ्या स्तरावर जातं... पण हे फार कमी. नातं तुटण्याची शक्यताच अधिक...

त्याला धक्का न लागता जर काही घडत असेल (म्हणजे दोघांनाही काही आपत्ती नसेल तर) असे संबंध योग्य असावेत का हा चर्चेचा मुद्दा आहे.>> ह्म्म हे लिव्ह इन रिलेशन नाही, विवाह्बाह्य आहे म्हणजे हा मुद्दा फक्त दोघांच्या आपत्तीपुरता मर्यादित राहत नाही. मुलं, दोघांचेही आईवडील, भावंडे यांचाही यात समावेश होतो (जोपर्यंत छुपे संबंध आहेत तोपर्यंत दोघांनाही किंवा इतर कोणालाही आपत्ती नसेल, निदान "त्या दोघांना" तसं वाटत असेल...) पण अर्थात कामातुराणं न भय न लज्जा हे विधान प्रमाण मानलं तर मग कोणालाही काहीही आपत्ती होवो, यांना फरक पडत नाही.

काही दिवसांपूर्वी शिरीष कणेकरांची एक कथा वाचली होती. त्यामधे नवरा, स्वतःमधल्या उणीवेमुळे बायकोला असे संबंध ठेवायला होकार देत असतो, निव्वळ होकारच नाही, तर रोज तिला न्यायला-आणायला स्टेशनवरही जात असतो. कारण 'शरीरसंबंध' ही एक बाब सोडली तर ते दोघे अगदी आदर्श संसार करत असतात! लेखक एकदा त्या बायकोला दुसर्‍या पुरुषाबरोबर बघतो; त्यानंतर तो नवरा स्वतः ही गोष्ट त्याला सांगतो.

असेही काही असू शकते......

जे हवे ते मिळत नसले आणि दुसरीकडे आपल्या आवाक्याच्या आत उपलब्ध असले तर माणुस तिथे खेचला जाणार. मग ती स्त्री असो वा पुरूष. कित्येक वेळा दुसरीकडे अकस्मात मिळाले की जाणीव होते त्याच्या आपल्या आयुष्यातील अभावाची. त्यामुळे जोडीदार कमी पडत नाहीये तरी बाहेर लफडी चालु आहेत हे काही खरे नाही. अर्थात सगळे व्यवस्थित असुनही लफडी करत राहणारे पिसाटही आहेत समाजात.

अनुभवेविण बोलणे | ते अवघेचि कंटा़ळवाणे ||
तोंडपसरुनिया जैसे सुणे | भुंकुन गेले ||

अर्थात ...अनुभवाशिवाय बोलु नये ...तस्मात ...सध्यातरी ह्याविशयावर मौन पाळत आहे Proud

अनुभवी लोकांनी आधी आपले अनुभव मांडावेत Proud

महेश.. + १ घ्या.

प्रसादपंत...... +१०००००००००००००००००००००००००००००० Proud Proud

अरे हो हे विसरलोच ....
<रिक्षा मोड ऑन >
अरे हो हे एक विसरलोच .....विवाहबाह्य संबंध ...पण प्रेमाच्या अत्युच्च पातळीवरचे ...अशी एक थीम घेवुन येक कथा ( http://www.maayboli.com/node/16803 )रचली होती ... शेवटी त्यावर लै राडा झाला ...:फिदी: <रिक्षा मोड ऑफ >

प्रसादपंत, आपण या प्रांतातले "हर्ष भोगले" आहात........ हातात बॅट पकडून कधी आंतरराष्ट्रीय मॅच खेळला नसला तरी खेळावर तो अधिकारवाणीने बोलतो..... आपण बोलावे .... आम्ही ऐकावे...!!!! Happy

प्रसादपंत, आपण या प्रांतातले "हर्ष भोगले" आहात.

>>> आहाहा ...काय मस्त उपमा दिलीत भुंगाराव !!

" हर्ष भोगले"...नावातच आहे ...भोग ले भोग ले ...हर्षा, भोग ले Rofl

Biggrin

पंत Rofl

Lol

< ज्ञान पाजळणे मोड ऑन >

अग्निकुंड समो नारी | घृतकुंभसमो नरः |

...........................|..........................||

अर्थात ...स्त्री ही अग्निकुंडा प्रमाणे आहे तर पुरुष तुप भरुन ठेवलेल्या कुंभा प्रमाणे ...म्हणुनच नजदीकीयां वाढल्यावर ...पाघळणे स्वाभाविकच आहे Proud

त्यात अग्नीकुंडाचा दोष नाही अन घृतकुंभाचाही नाही ...its natural !!

< ज्ञान पाजळणे मोड ऑफ >

पण

< उपदेश मोड ऑन >

मनो धावति सर्वत्र मदोन्मत्तगजेन्द्रवत्‌ ।
ज्ञानाङ्कुशसमा बुद्धिस्तस्य निश्चलते मनः ॥

< उपदेश मोड ऑफ >

पंत...... अश्याच काही महत्वाच्या इतर सुभाषितांवर प्रकाश टाकावात........ Proud

फक्त आता अग्नीकुंड आले, तूपही आले...... जरा समिधांचे तेवढे बघता का पंत???? Happy

पंत...... अश्याच काही महत्वाच्या इतर सुभाषितांवर प्रकाश टाकावात.
>>>

आंबट शौकिन कार्ट्यांनो ...माझ्यासारख्या विरक्त माणसाला ह्या मोहजालात पाडता ...हा घ्या मी तुम्हाला शाप देतो ...

http://sanskritdocuments.org/all_pdf/shringar.pdf

विरक्त???????????????????? Lol

अच्छा, काल दुपारी ११.०० ते २.३० आपण विरक्तीत होतात तर.... चूक झाली पंत.... क्षमा..!!!!

पंत, काहीतरी गफलत होतेय आपली........ की काल रात्रीपासून मराठी शब्दांचे अर्थच बदललेत????? Proud

Pages