विवाह बाह्य संबंध

Submitted by Kiran.. on 28 November, 2010 - 14:50

लिव्ह इन वर एक लेख वाचला. तिथं छान चर्चा चालू आहे. ती वाचतांना विवाहबाह्य संबंध हा विषय वेगळा आहे असं मत झालं म्हणून हा प्रपंच. इथं लिव्ह इन बद्दल चर्चा अपेक्षित नाही.

मित्राची बायको एका खाजगी इंशुरन्स कंपनीत मोठ्या पदावर आहे. बॉस आणि दुस-या एका महिलेचे संबंध आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. दोघंही विवाहीत आहेत. बॉसची आर्थिक स्थिती चांगली आहे तरीही तिच्या नव-यापुढं काहीच नाही. भावनिक गुंतवणूक वगैरे काहीही प्रकार नाही. कामाच्या बहाण्याने त्यांना बाहेरगावी जाता येतं. ही दिसायला वगैरे आहे. बॉसच्या घरीही काहीच प्रॉब्लेम नाही तरीही दोघांमधे संबंध निर्माण झालेत...

एक प्रौढ कुमारिका ओळखीची आहे. तरूणपणी सौंदर्याचा अभिमान असल्यानं खूप जणांना नकार दिले. अपेक्षा खूप होत्या. तडजोड केली नाही. आता वय उलटलं...एका विवाहीत पुरूषाबरोबर संबंध जोडलेत. त्याला त्रास देते. घरी जाऊन बायकोला मारहाण वगैरे प्रकार झाले... त्या प्रौढ कुमारिकेला आपण माफ करू, पण ज्याने तिचा फायदा घेतलाय त्याचं काय ? सोन्यासारखा संसार आहे. काहीच गरज नव्हती.

एका मित्राला फिरतीवर रहावं लागतं. आताशा त्याला बायकोचे आणि सोसायटीतल्या एका इसमाचे संबंध असल्याचं कळालंय. त्यांना रेड हँड पकडलं. समज देऊन झालं. सुशिक्षित असल्यानं मारहाण वगैरे काही नाही. मुलांचा विचार करून खूप टेन्शन मधे असतो. मध्यंतरी बायकोलाही पश्चात्ताप झाला होता. पण आता पुन्हा पहिले प्रकार सुरू झालेत. आता कळालंच आहे तर... भीड चेपली गेलीय. सतत कुरबुरी आणि भांडणं चालू असतात. घटस्फोट कुणालाच नकोय हे ही विशेष.

वरील उदाहरणांमधे आपला जोडीदार कमी पडतोय असं काही नाही. लग्नाबाबत असमाधान असंही नाही. ती तक्रार नाही. विवाहाच्या बंधनात गरजा पूर्ण होत नाहीत हा प्रकारच नाही इथं... गरजा पूर्ण होत असूनही एक्स्ट्राची हाव.. या गोष्टींकडं कसं पाहणार ? परपुरूष किंवा परस्त्रीचं सुप्त आकर्षण कि ते शमवायला निर्माण झालेल्या संधी ? संयम सुटत चाललाय का ? सहज उपलब्ध होणारे एस्कॉर्टस, गिगोलो, पॉर्न मॉव्हीज, साहीत्य यामुळं संयम पाळणे फोल वगैरे आहे असं वाटतंय का ? पूर्वीसारखा अपराधीपणा, जोडीसाराला फसवत असल्याची बोच हे देखील दिसत नाही आता. माझ्या गरजा मी पूर्ण करतोय/ करतेय आणि जोडीदाराबरोबर सुखाने संसार देखील करतोय / करतेय असं काहीसं दिसून येतं..

समाजात झालेला बदल म्हणजे माहीत असूनही सहकारी त्याच्या / तिच्या घरी कळवत नाहीत. आपल्याला काय त्याचं हा उदारमतवादी दॄष्टीकोण तयार होतोय.

नैतिकतेच्या कल्पना सैलावल्यात वगैरे बोलण्यात अर्थ नाही. तर आपण करतो ते बरोबर असा एक अहंगंडं आढळतो. आपण केलेल्या प्रत्येक अनैतिक कृत्याला आता समर्थन देता येऊ शकतं. लांबचा विचार करण्याची क्षमता हरवत चाललीय. बुद्धीमान लोक वाढलेत , शहाणे कमी होत चाललेत.

उद्या दुस-याच्या पैशाचा मोह निर्माण होईल. मग ते मिळवणार का आपण ? कायद्याने ती चोरी ठरते म्हटल्यावर शिक्षेच्या भयानं आपण ते विचार दाबून टाकतो. पैशाची गरज तर असतेच.. अर्थात ज्यांना संधी मिळते ते भ्रष्टाचार वगैरे मार्गाने पैसे लुबाडतातच. त्यात अनैतिक काही आहे हेच आता लोकांना मान्य नाही..

कुणाला समाजवणार आणि कोण ? करिअर, पैसा, स्पर्धा या सगळ्यात संस्कारमूल्यं क्षीण होताहेत असं म्हटलं तर चालेल का ? काय वाटतं ?

गुलमोहर: 

कर्तृत्ववान व्यक्तींना समाजाचे नियम बंधन कारक नसावेत ...

>>>

असा एकतर्फी नियम का पंत???? कमी कर्तुत्ववान स्त्री/पुरुषांनी काय घोडे मारलय मग?????

कर्तुत्ववान स्त्री किंवा पुरुषाकडे इतर जण आकृष्ट होणे स्वाभाविक असते आणि त्यातून अश्या व्यक्तींच्या बाबतीत हे प्रकार जास्त घडू शकतात असे म्हणत असाल तर ठीक आहे.....

पण सरसकट कर्तुत्व आहे म्हणून मग विवाहबाह्य संबंध ठेवायला हरकत नाही हे म्हणणे योग्य नाही..!

असा एकतर्फी नियम का पंत???? कमी कर्तुत्ववान स्त्री/पुरुषांनी काय घोडे मारलय मग?????

>>> कारण समाज ही कल्पनाच दुबळ्यांना जगवता यावं या विचाराने झाली आहे .

आणि कमी कर्तुत्ववान स्त्री/पुरुषांनी काय घोडे मारलय ..असं म्हणण्यात दुबळ्यांचच जास्त नुकसान आहे ,,...जंगल रुल मध्ये SURVIVAL OF THE FITTEST !!

पण विवाह केला म्हणून बाह्य संबंध ठेवू नये असे काही आहे का? घरवाली बाहरवाली टाईप Happy
काहिंना ही दोन तारेवरची कसरत जमते... ऊगाच आपण कशाला चिंता करावी? शिवाय आता यात पुरुषांची मक्तेदारी देखिल राहिलेली नाही... तेव्हा "ज्याचा त्याचा दृष्टीकोन" या लॉजिक नुसार आजकाल सगळं माफ आहे. यात सर्वच आलं: लिव्ह ईन, आऊट, समलिंगी, वगैरे वगैरे...

>>आणि कमी कर्तुत्ववान स्त्री/पुरुषांनी काय घोडे मारलय ..असं म्हणण्यात दुबळ्यांचच जास्त नुकसान आहे ,,...जंगल रुल मध्ये SURVIVAL OF THE FITTEST !!

पंत, नाही कळाल नक्की काय म्हणायच आहे ते ? उलट समाजव्यवस्था दुर्बलांना सुद्धा लाभ मिळावेत म्हणुन अस्तित्वात आली ना त्याचा आणि जंगल रूल चा काय संबंध ?

एका कुणा संसारी नवरा/ बायकोला तिसरी (दुष्ट) व्यक्ती पळवते असंच का फक्त विवाहबाह्य संबंधाच स्वरूप असतं?
माझ्या पाहण्यात असे तो आणि ते आहेत, त्यांचे त्यांचे जोडीदार त्यांना अगदी अनुरूप, संसार पण अगदी दृष्ट लागण्यासारखा म्हणतात तसा. तरी दोघे एकमेकांत गुंतले.
आणखी एका ठिकाणी जिने आंतरप्रांतीय प्रेमविवाह केला अशा मुलीलाही लग्नानंतर काही वर्षांनी आणखी कुणात तरी रस वाटू लागला.

भरत, आधी लिहिले आहे त्याप्रमाणे लग्न ही एक व्यवस्था आहे. माणसाच्या चंचल मनाच्या सर्व अपेक्षा पुर्ण करण्याची ताकद त्यात (काय कशातच) नाही असे म्हणावे लागेल.
प्रेमविवाह असला तरी विवाहानंतर कायमचे बरोबर रहावे लागते तेव्हा स्वभावातले गुणदोष अधिक ठळकपणे जाणवतात आणि मग आधीच्या कल्पना आणि वास्तव यात तफावत येऊ लागली की त्याचे किंवा तीचे मन त्या अपेक्षा पुर्ण करणारा स्त्रोत बाहेर शोधू लागते. प्रत्येकवेळेस शारिरिकच कारण असेल असे नाही, अनेकांना त्यांच्या मानसिक बौद्धिक पातळीला नसलेला जोडीदार मिळाला असेल तरी असे होऊ शकते.
कोण कसे किती तडजोड करू शकतो यावर लग्नसंस्थेचे यश अवलंबून आहे.

बाजीरावच्या बाबतीत मला पण पटले नाही. त्याचे मस्तानी बरोबरचे संबंध सर्वांनी मान्य करण्याची तयारी दाखवून सुद्धा त्याचा नक्की काय हेका होता आणि का होता ते कळाले नाही. चांगली कोथरूडला जागा दिलेली असुनसुद्धा शनिवारवाड्यात महाल बनवून घ्यायची काय गरज होती ? एवढा चांगला माणुस हेकेखोरपणामुळे लवकर गेला, राहिला असता अजुन काही वर्षे तर इतिहास फार वेगळा घडता.

विवाहबाह्य संबंध कशाला हवेत, मानसिक कमजोरी॑च लक्षण आहे हे.
कर्तृत्ववान व्यक्तींना समाजाचे नियम बंधन कारक नसावेत >>>> हे म्हणजे, कर्तृत्ववान व्यक्तींनी नागडं होऊन नाचलं तरी आक्षेप घेऊ नये , अशा टाईपच वाक्य वाटलं.

विवाहबाह्य संबंध कशाला हवेत, मानसिक कमजोरी॑च लक्षण आहे हे.
कर्तृत्ववान व्यक्तींना समाजाचे नियम बंधन कारक नसावेत >>>> हे म्हणजे, कर्तृत्ववान व्यक्तींनी नागडं होऊन नाचलं तरी आक्षेप घेऊ नये , अशा टाईपच वाक्य वाटलं.

विवाहबाह्य संबंध कशाला हवेत, मानसिक कमजोरी॑च लक्षण आहे हे.
कर्तृत्ववान व्यक्तींना समाजाचे नियम बंधन कारक नसावेत >>>> हे म्हणजे, कर्तृत्ववान व्यक्तींनी नागडं होऊन नाचलं तरी आक्षेप घेऊ नये , अशा टाईपच वाक्य वाटलं.

श्री अगदी बरोबर, कर्तृत्ववान व्यक्तींना नियमांचे बंधन नसावे या म्हणण्याला अर्थ नाही. आणि मुळात कर्तृत्व हे कोण कोणाचे आणि कसे ठरवणार ?
(अगदी तळमळीने लिहिलेत म्हणुन तिन वेळा आलेला दिसतोय मेसेज Happy )

१. विवाहबाह्य संबंध ही आजच्या समाजातील कित्येकांची खरीखुरी गरज आहे असे माझे मत आहे. तसेच, असे संबंध जमू शकत असल्यास व जमावेत असे वाटतही असल्यास, जरूर जमवावेत. 'प्रामाणिकपणे आपल्या बायकोला किंवा नवर्‍याला त्याबाबत काही सांगायला हवे' असे मला वाटत नाही.

२. बायको (/ नवरा) सोडून एकच काय, दोनहून अधिक स्त्रियांबाबत ( / पुरुषांबाबत) आकर्षण असले आणि सर्व जणींकडून ( / जणांकडून ) विवाहबाह्य संबंध स्वीकारार्ह मानले जात असले तरीही मला त्यात वावगे वाटत नाही कारण निसर्ग हा सर्व मानवी कायद्यांहून आणि संस्कृतींहून श्रेष्ठ आहे.

३. मूळ लेखामध्ये 'अलीकडे ही परिस्थिती वेगात बदललेली आहे व बदलत आहे' असा जो सूर आहे त्याच्याशी मात्र मी असहमत आहे. क्षमस्व! 'पकडा गया वो चोर है' या उक्तीप्रमाणे सध्या ते अधिक जाणवत आहे असे मला वाटत आहे. पुर्वी विधवा झालेल्या, घरातील, नात्यातील स्त्रियांना शोषणाचे बळी व्हावे लागायचे. ते जरी निरिच्छेने असले तरीही ते एक प्रकारचे विवाहबाह्य संबंधच होते. तसेच, स्वेच्छेने स्वीकारलेले विवाहबाह्य संबंध पुर्वीच्या काळातही भरपूर होते मात्र लाईफ पार्टनरला तसे एसेमेस दिसणे, कॉल्सची डिटेल्स दिसणे, इमेल्स दिसणे, सेलफोनवर फोटो काढू शकणे, ते एमेमेस करू शकणे, या बाबी नव्हत्या.

४. मी इथे देत असलेली मते मी सेव्ह करून ठेवत आहे. याचे कारण य मतप्रदर्शनाचा नंतर वेगळा वापर कुणाकडून केला जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. कृपया यास 'कडवटपणायुक्त विधान' मानले जाऊ नये.

५. विवाहबाह्य संबंधांमुळे उद्भवू शकणारे जितके धोके एखाद्या व्यक्तीला जाणवत आहेत तितके धोके खरोखरच त्या व्यक्तीच्या आयुष्यात उद्भवणार नाहीत याची जर त्या व्यक्तीने काळजी घेतली तर असे संबंध अत्यंत सहाय्यकारक ठरू शकतात.

या धोक्यांमध्ये....

* - विवाह मोडणे व मनोविश्व उद्ध्वस्त होणे तसेच समाजात त्यामुळे असह्य नाचक्की होणे!

* - मुलांचे अनेक प्रकारचे नुकसान होणे! (मानसिकही समाविष्टच!)

* - जि / ज्याच्याशी आपले संबंध आहेत ति / त्याच्या घरी ते कळले तर काय हे टेन्शन व ते खरेच समजले तर होणारा प्रॉब्लेम!

* - अनसेफ सेक्समुळे होऊ शकणारे प्रॉब्लेम्स!

* - स्वत:च्या संसारातील लक्ष कमी होणे व पैसा इतरत्र अधिक खर्च होण्याची शक्यता निर्माण होणे!

* - क्वचित केसेसमध्ये उघड अथवा छुपे ब्लॅकमेलींग!

हे धोके असू शकतात.

हे मॅनेज करूनही संसार सुरळीत चालवणे शक्य असेल तर बेगडी संस्कृती व दुटप्पी नीतीसाठी स्वतःला तश्या रिलेशनपासून वंचीत ठेवणे आवश्यक आहे असे मला वाटत नाही.

धन्यवाद!

टीप - लेखाचा विषय व त्याबाबत चाललेली चर्चा अत्यंत सुंदर व महत्वाची आहे यासाठी मूळ लेख लिहिणार्‍या किरण यांचे अभिनंदन!

-'बेफिकीर'!

मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला, फिरी येतं पीकावर

मन मोकाट मोकाट, याच्या ठायी ठायी वाटा
जशा वार्‍यानं चालल्या, पाण्यावरच्या रे लाटा

मन लहरी लहरी, त्याले हाती धरी कोण?
उडारलं उडारलं, जसा वारा वहादान

मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?
आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात

मन जहरी जहरी, याचं न्यारं रे तंतर
अरे इचू, साप बरा, त्याले उतारे मंतर

मन चप्पय चप्पय, त्याले नाही जरा धीर
त्याते वाहीसनी यीज, आलं आलं धरतीवर

मन येवढं येवढं, जसा खाकसंचा दाना
मन केवढं केवढं, आभायात बी मायेना

देवा कसं दिलं मन, असं नाही दुनियेत
असं कसं रे तु योगी, काय तुझी करामत

देवा असं कसं मन, असं कसं रे घडलं?
कुठे जागेपणी तुले, असं सपान पडलं

१. पुर्वी विधवा झालेल्या, घरातील, नात्यातील स्त्रियांना शोषणाचे बळी व्हावे लागायचे. ते जरी निरिच्छेने असले तरीही ते एक प्रकारचे विवाहबाह्य संबंधच होते. >>>>>

>>>>>> नाही हो, बेफिकीरजी, तो बलात्कार ठरतो. शिवाय येथे योग्य शब्द, मला वाटते, इच्छेविरूध्द हा असला पाहिजे. निरीच्छ म्हणजे इच्छाविरहीत.

विवाह्बाह्य संबंध म्हणजे दोघेही विवाहबंधनात असताना, एकाने किंवा दोघांनेही इतर कोणाशी शारीरीक संबंध ठेवणे. पण ज्या दोघांचे संबंध असतात ते एकमेकांना मंजूर असतात.

२. विवाहबाह्य संबंध ही आजच्या समाजातील कित्येकांची खरीखुरी गरज आहे असे माझे मत आहे. तसेच, असे संबंध जमू शकत असल्यास व जमावेत असे वाटतही असल्यास, जरूर जमवावेत. 'प्रामाणिकपणे आपल्या बायकोला किंवा नवर्‍याला त्याबाबत काही सांगायला हवे' असे मला वाटत नाही.

>>>>>>> हीच मानसिकता असेल तर मुळात विवाह करण्याचे कष्ट का घ्यावे बुवा?

>>विवाह्बाह्य संबंध म्हणजे .. एकाने किंवा दोघांनेही इतर कोणाशी शारीरीक संबंध ठेवणे
>>>>विवाहबाह्य संबंध ही आजच्या समाजातील कित्येकांची खरीखुरी गरज
>>मुळात विवाह करण्याचे कष्ट का घ्यावे बुवा

लग्न काय केवळ शारिरिक संबंधांसाठी करतात काय लोक?

भावनिक गुंतवणूक, गाढ मैत्री हे 'विवाह बाह्य' संबधात येतात की नाहीत? जर येत नसतील तर मग स्पर्श, मिठी वगैरे? नक्की रेघ कुठे ओढायची?

काय योगायोग आहे पहा, हा बाफ वाचत असताना गाणे ऐकत आहे
तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके , अरमाँ हुए पुरे दिलके... Happy

वर बेफिकीर यांनी लिहिल्याप्रमाणे सगळे धोके टाळून जर संबंध ठेवता येत असतील तर ठीक आहे असे म्हणावेसे वाटत आहे, पण खरोखर सुसंस्कारित आणि पापभिरू मनाच्या व्यक्तींना हे जमणे कर्मकठीण आहे.

*

माणुस आणि जनावर यातला महत्वाचा फरक म्हणजे इम्पल्स कंट्रोल (आवेग आवरता येणे). जनावराना तो ठेवता येत नाही माणसाला येतो. विवाहबाह्य संबंध हा एक चॉइस आहे. तो ठेवायचा की नाही हे सर्वस्वी तो ठेवणार्‍या लोकांची जबाबदारी असते. उगाच त्याला समाजाची गरज वगैरे म्हणण्यात अर्थ नाही. (असे आपले मला वाटते)

अश्विनीमामी, मामी, manasmi18,
छान पोस्ट टाकल्यात. एकदम पटल्या. विवाह बाह्य संबधाच जस्टिफिकेशन पटवण (माझ्या मनाला तरी) जाम अवघड आहे. असे संबध ठेवणार्‍या व्यक्तिंवर कुठ्ल्याच क्षेत्रात वा प्रसंगात विश्वास टाकता येइल का?

Basic Instinct Happy
आता तुम्हाला मानुस व्हायचे का जनावर ? Choice is yours....
You want to follow your Basic Instinct or Spiritual Instinct is a question and there lies the answer.
There is nothing right or wrong. One binds you and one liberates you. Again, choice is yours ....

विवाहबाह्यसंबंध ठेवणारे खालील गटात मोडतात:

१. स्वतःपुरतं पहाणारे
२. दोन ( किंवा जास्त) दगडांवर पाय ठेवणारे
३. नेभळट - डिव्होर्स घ्यायला घाबरणारे
४. थ्रील म्हणून करणारे
५. बायको/नवर्‍याला मुद्दाम त्रास देण्यासाठी करणारे
६. I want my cake and eat it too वाले
७. अस्थीर मनाचे
६. दुटप्पी
७. इनडिसायसिव्ह
८. स्वार्थी
९. कमीट्मेंटला घाबरणारे
१०. कमकुवत मनाचे - सहज भुरळ पडणारे

हे फार एकांगी चाललयं असे वाटते...
विवाहबाह्य संबंध ठेवणे हा ज्याचा त्याचा प्रश्न या एका वाक्यात हे संपते...
पण इथे विवाहबाह्य संबंध ठेवणारे कसे वाईट हे सांगण्याची चढाओढ सुरू असल्यासारखे वाटते...
प्रत्येक व्यक्तीला एकाच साच्यात बसवून कसे चालेल.
कल्पूची पोस्ट तर अगदीच हास्यास्पद...
असे संबध ठेवणार्‍या व्यक्तिंवर कुठ्ल्याच क्षेत्रात वा प्रसंगात विश्वास टाकता येइल का?

कैच्याकै...एखादी व्यक्ती तसा संबंध ठेवते आहे हे कळल्यावर हा प्रश्न उद्भवेल ना..म्हणजे जोपर्यंत आपल्याला माहीती नाही तोपर्यंत तो अथवा ती विश्वासू...आणि प्रकरण उघड झाले की विश्वास टाकण्यायोग्य नाही...असे समजायचे का?
आणि आता हिंदू कायद्यानुसार दोन लग्न करणे हा गुन्हा आहे...त्यामुळे त्याला चोरट्या संबंधाचे स्वरूप प्राप्त झाले असेल..एखाद्यात असेल धमक दोन बायका नांदवायची तर तो त्याचा प्रश्न आहे ना...उगाच समाज आणि नाही त्या नैतिक गोष्टींचा फुगा फुगवणे बंद करा....
आता इथे पुन्हा पोस्ट येतील फक्त पुरूष दोन बायका करू शकतो का, बायका नाहीत का..या पुरुषप्रधान संस्कृतीच्या...
तर आवरा...जिला दोन नवरे नांदवायची धमक असेल तर तो तिचा प्रश्न आहे....

Pages