विवाह बाह्य संबंध

Submitted by Kiran.. on 28 November, 2010 - 14:50

लिव्ह इन वर एक लेख वाचला. तिथं छान चर्चा चालू आहे. ती वाचतांना विवाहबाह्य संबंध हा विषय वेगळा आहे असं मत झालं म्हणून हा प्रपंच. इथं लिव्ह इन बद्दल चर्चा अपेक्षित नाही.

मित्राची बायको एका खाजगी इंशुरन्स कंपनीत मोठ्या पदावर आहे. बॉस आणि दुस-या एका महिलेचे संबंध आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. दोघंही विवाहीत आहेत. बॉसची आर्थिक स्थिती चांगली आहे तरीही तिच्या नव-यापुढं काहीच नाही. भावनिक गुंतवणूक वगैरे काहीही प्रकार नाही. कामाच्या बहाण्याने त्यांना बाहेरगावी जाता येतं. ही दिसायला वगैरे आहे. बॉसच्या घरीही काहीच प्रॉब्लेम नाही तरीही दोघांमधे संबंध निर्माण झालेत...

एक प्रौढ कुमारिका ओळखीची आहे. तरूणपणी सौंदर्याचा अभिमान असल्यानं खूप जणांना नकार दिले. अपेक्षा खूप होत्या. तडजोड केली नाही. आता वय उलटलं...एका विवाहीत पुरूषाबरोबर संबंध जोडलेत. त्याला त्रास देते. घरी जाऊन बायकोला मारहाण वगैरे प्रकार झाले... त्या प्रौढ कुमारिकेला आपण माफ करू, पण ज्याने तिचा फायदा घेतलाय त्याचं काय ? सोन्यासारखा संसार आहे. काहीच गरज नव्हती.

एका मित्राला फिरतीवर रहावं लागतं. आताशा त्याला बायकोचे आणि सोसायटीतल्या एका इसमाचे संबंध असल्याचं कळालंय. त्यांना रेड हँड पकडलं. समज देऊन झालं. सुशिक्षित असल्यानं मारहाण वगैरे काही नाही. मुलांचा विचार करून खूप टेन्शन मधे असतो. मध्यंतरी बायकोलाही पश्चात्ताप झाला होता. पण आता पुन्हा पहिले प्रकार सुरू झालेत. आता कळालंच आहे तर... भीड चेपली गेलीय. सतत कुरबुरी आणि भांडणं चालू असतात. घटस्फोट कुणालाच नकोय हे ही विशेष.

वरील उदाहरणांमधे आपला जोडीदार कमी पडतोय असं काही नाही. लग्नाबाबत असमाधान असंही नाही. ती तक्रार नाही. विवाहाच्या बंधनात गरजा पूर्ण होत नाहीत हा प्रकारच नाही इथं... गरजा पूर्ण होत असूनही एक्स्ट्राची हाव.. या गोष्टींकडं कसं पाहणार ? परपुरूष किंवा परस्त्रीचं सुप्त आकर्षण कि ते शमवायला निर्माण झालेल्या संधी ? संयम सुटत चाललाय का ? सहज उपलब्ध होणारे एस्कॉर्टस, गिगोलो, पॉर्न मॉव्हीज, साहीत्य यामुळं संयम पाळणे फोल वगैरे आहे असं वाटतंय का ? पूर्वीसारखा अपराधीपणा, जोडीसाराला फसवत असल्याची बोच हे देखील दिसत नाही आता. माझ्या गरजा मी पूर्ण करतोय/ करतेय आणि जोडीदाराबरोबर सुखाने संसार देखील करतोय / करतेय असं काहीसं दिसून येतं..

समाजात झालेला बदल म्हणजे माहीत असूनही सहकारी त्याच्या / तिच्या घरी कळवत नाहीत. आपल्याला काय त्याचं हा उदारमतवादी दॄष्टीकोण तयार होतोय.

नैतिकतेच्या कल्पना सैलावल्यात वगैरे बोलण्यात अर्थ नाही. तर आपण करतो ते बरोबर असा एक अहंगंडं आढळतो. आपण केलेल्या प्रत्येक अनैतिक कृत्याला आता समर्थन देता येऊ शकतं. लांबचा विचार करण्याची क्षमता हरवत चाललीय. बुद्धीमान लोक वाढलेत , शहाणे कमी होत चाललेत.

उद्या दुस-याच्या पैशाचा मोह निर्माण होईल. मग ते मिळवणार का आपण ? कायद्याने ती चोरी ठरते म्हटल्यावर शिक्षेच्या भयानं आपण ते विचार दाबून टाकतो. पैशाची गरज तर असतेच.. अर्थात ज्यांना संधी मिळते ते भ्रष्टाचार वगैरे मार्गाने पैसे लुबाडतातच. त्यात अनैतिक काही आहे हेच आता लोकांना मान्य नाही..

कुणाला समाजवणार आणि कोण ? करिअर, पैसा, स्पर्धा या सगळ्यात संस्कारमूल्यं क्षीण होताहेत असं म्हटलं तर चालेल का ? काय वाटतं ?

गुलमोहर: 

मित्रांनो
हा तसं पहायला गेलं तर संवेदनशील आणि नाजूक विषय आहे. पण सर्वांनी किती छान लिहीलं. नाजूक असला तरी बीपी वाढवणारा विषय नक्कीच नाही. डोक्याला शीण न देता छानपैकी लिहीता येण्यासारखा आहे. आता मला वाटतं नवे मुद्दे येण्याची शक्यता नसल्याने समारोप केला तरी चालण्यासारखं आहे.

समारोप करण्यापूर्वी मला ज्यांचे मुद्दे / लिखाण आवडले, मुद्दे मांडण्याची पद्धत आवडली त्यांचा थोडक्यात परामर्श घेणं हे माझं कर्तव्य समजतो.... तोपर्यंत कुणाकडे काही नवा मुद्दा असल्यास येऊद्या

दुसर्‍या एका धाग्यावरील मुद्द्यांसदर्भात माहिती शोधताना ही माहिते मिळाली.

http://www.indidivorce.com/adultery/adultery-indian-penal-code.html
The word `adultery’ has been derived from the Latin term `adulterium’ and is defined as consensual sexual relationship between a married woman and an individual other than her spouse. Almost all religions throughout the world condemn it and treat it as an unforgivable offense. However, this may not be reflected in the legal jurisdictions of the countries but adultery is recognized as a solid ground for divorce in all penal laws.

The Indian penal code also recognizes adultery as a crime & a punishable offence. This law comes under the criminal law of India and has been placed under chapter XX that deals with crimes related to marriage. The laws as stated in the Indian penal code are:-

Section-497- Adultery “Whoever has sexual intercourse with a person who is and whom he knows or has reason to believe to be the wife of another man, without the consent or connivance of that man, such sexual intercourse not amounting to the offence of rape, is guilty of the offence of adultery, and shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to five years, or with fine, or with both. In such case, the wife shall not be punishable as an abettor.”
म्हणजे विवाहित पुरुषाने अविवाहित/विधवा,इ. स्त्रीशी विबासं ठेवणे हा आयपीसीखाली गुन्हा नाही???
Angry

Section-498- Enticing or taking away or detaining with criminal intent a married woman “Whoever takes or entices any woman who is and whom he knows or has reasons to believe to be the wife of any other man, from that man, or from any person having the care of her on behalf of that man, with intent that she may have illicit intercourse with any person or conceals or detains with that intent any such woman, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to two years, or with fine, or with both”.

These laws were drafted in 1860 when India was under British rule and the condition of Indian woman was pathetic. During those times, a man could’ve several wives and women were socially & economically dependent on men. Women were treated as an object and considered the property of men. Thus, while drafting the laws it was presumed that women are hapless victims, not capable of committing such an offence, instead, it must be a man who will entice her and involve her in an adulterous relationship. But these laws definitely treat a man and a woman unequally in the institution of marriage. According to these laws:-

1. Man is always a seducer and the married woman just an innocent & a submissive victim.
2. Wife is no more than a chattel to her husband & a third person had committed the crime of intruding upon his marital possession by establishing a physical relationship with his wife.
3. Only the husband of the treacherous woman (or a person who had care of the married woman) is a distressed party and he is liable to file a complaint against the third party.
4. There is no provision in the law for a woman to file a complaint against her adulterous husband. If a married man commits adultery with an unmarried woman or a widow or with a married woman with the consent of her husband, his wife is not regarded as an aggrieved party and she is not permitted to make any official grievance against her husband.

Considering the changes our society has witnessed in recent times, the Indian penal code must revise these laws and upgrade them keeping in mind the equality of men & women and enabling women to have more freedom and liberty in making their choices.

अर्थात विबासं हे घटस्फोटासाठी कारण म्हणून दोघांना (नवरा बायको) सारखेच लागू आहे.

हातात हात घेणे, नुसतेच बघणे, डोळा मारणे, फक्त बोलणे, बोलण्यासाठी 'खास' प्रयत्न करणे अथवा परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, जे काय होत आहे त्यात आपल्या (ज्याच्या त्याच्या) लाईफ पार्टनरला प्रॉब्लेम असणे, मिठीत घेणे, चुंबन घेणे, चोरून भेटण्यासाठी 'बेताब' वगैरे होणे, 'तिला' 'त्याच्या'पासून मूल होणे, ब्लॅकमेलिंग होणे, फक्त एसेमेस येणे, फक्त एखादा कॉल आलेला 'दिसणे', मोबाईल नंबर मागणे, मोबाईल नंबर देणे, इमेल्स येणे, घरी सोडणे, घरून ऑफीसला नेणे, एकमेकांच्या आवडीनिवडींचे 'विशेष' भान राखणे व ते जोडीदाराला समजणे', एकमेकांना वैयक्तीक दु:खात मानसिक आधार देणे व अशा गोष्टी जोडीदाराला समजल्यास त्या त्याला मान्य होणार नाहीत याचे ज्ञान असणे अशा व इतर अनेक गोष्टींव्यतिरिक्त....

आबा पाटलांनी डान्स बार बंद करण्यापुर्वी लेडिज बार्समध्ये जाणे, पुण्यातील अथवा औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, हैदराबाद, नागपूर वगैरे ठिकाणच्या (इतर ठिकाणे ऐच्छिक व अनुभवानुसार) मसाज पार्लर्सना जाणे, खिशात पैसे आहेत म्हणून 'बुधवार पेठेसारख्या' ठिकाणी जाणे किंवा अगदी फारच पैसे आहेत म्हणून बॅगकॉकला जाणे या व इतर अनेक गोष्टींव्यतिरिक्त...

ती किती छान दिसते, ती मनाने किती चांगली आहे, ती आपला किती 'खयाल' ठेवते, ती (फारच लांबून का होईना) कशी 'छान व मादकपणे' बघते, वगैरे मानसिक पातळीवरच्या (ज्यात अ‍ॅक्च्युअली काहीही झालेले नसते व जोडीदाराला समजणे शक्यच नसते') प्रतारणा व गैरसमज...

हे माझ्यामते तोपर्यंत विवाहबाह्य संबंधांमध्ये मोडतील जोपर्यंत त्या त्या व्यक्तीच्या जोडीदाराला ते कळले तर भावनिक / सांसारिक / व मुलांचे प्रॉब्लेम्स होऊ शकतील.

-'बेफिकीर'!

(टीप - ती जी काय २४ प्रकरणे आहेत त्यात फक्त शारिरीक संबंध येणे हिच ऑब्जेक्शनेबल गोष्ट असेल असे नाही, मिठी मारणे, बघणे, बोलल्याचे कळणे, वगैरेही असू शकते. )

'हाय'बोली झाली आहे आता बहुतेक!

(इंग्लीश हाय, हिंदी किंवा मराठी हाय नव्हे)

डोक्याला शीण न देता छानपैकी लिहीता येण्यासारखा आहे.

मायबोलीवरील कुठल्याहि विषयावर, डोक्याला शीण देवून लिहीण्याला बंदी आहे!! Proud

प्रेमात पड्ण्याचि phase भयंकर Addictive आणि मोहात पाडणारी असते. ती कितिहि लहान किवा मोठी असते हे व्यक्ति सपेक्श आहे. आणि ति किती प्रमणात शाररीक होते , हे समाज (आजुबाजुचि समाजिक परिस्थिति) सपेक्श आहे. परंतु या प्रवासातले आपण आपल्याला खुप अवडतो. आपण आवड्ण्या सारखे आहोत याचा जबर्दस्त मोठा positive feedback मिळतो. आणि तो positive feedback continue करण्या साठि ति व्यक्ति आजुन तशि वागत जाते.
आनेक वरषां च्या लग्ना नन्तर जेव्हा extra marital affairs होतात तेव्हा त्याच कारण बरेच वेळा शाररिक नसते देखिल. Lack of positive feedback. Assuming other person too much could be reasons too. When you thank your partner for small small things you not only give positive feedback but also realize your self that you are special enough to that other person.
फार ग्रुहित धरल गेल तरि संसारच well oiled machine अतिशय बोअरिन्ग होउ शकत. निदान काहि लोकांसाठी तरि. आणि मग आशि लोक बाहेर च्या प्रेमाच्या आत बाहेर पडत राहतात. बाकिचि मुलांकडे बघुन किंवा इतर कहि गोश्टीं मधे मन रमवत पुढे जात रहतात.
म्हणुनच भारताच कितिहि family culture साठी कौतुक झाल तरि भारतात खरच सुखि आणि relationship मधे इन्वेस्ट करणारी जोडपि खुपच कमि दिसतात. There is a saying " I don't love you because of what you feel about me but because of what I feel about myself when I am with you"
Extra marital affair is nothing but the failuer of the Marriage.
-Shireen

Well, according to me, it may not be exactly a failure of the existing relationship, but just a way to be able to express oneself better OR consider oneself having a choice OR consider oneself being supported by external factors , on emotional front, too.

(The above things happen with women more than men. Whereas, men might consider it as a thing of pride to be associated with OR being liked by another female that is OR is not married)

What say man????

--Whereas, men might consider it as a thing of pride to be associated with OR being liked by another female that is OR is not married
What say man????---

अरे वा!! अगदी बेफिकीर टच !! विवाहबाह्य संबंधांचा पुरुषांना अभिमान वाटतो, बरोबर हा मुद्दा कोणी आणलाच नाही अजुन चर्चेत. (विवाहित असुनही बायका माझ्या मागे लागतायेत काय मी ग्रेट !! ) Proud
विवाहीत असुनही २४ बायका मागे, काय म्हणायचे बाई याला राहुल महाजन का सलमान खान Proud

विवाहीत असुनही २४ बायका मागे, काय म्हणायचे बाई याला राहुल महाजन का सलमान खान
---- सल्मानचे चित्रपटात अनेकवेळा विवाह झालेले असतील, पण व्यावहारात त्याचा कुठे विवाह झालेला आहे? त्यामुळे त्याच्याशी तुलना करणे अयोग्य ठरेल.

'हाय'बोली झाली आहे आता बहुतेक!

मायबोलीच आहे. परकीय भाषेतील शब्द घेऊन भाषा जास्त समृद्ध होते, प्रगल्भ होते.

पहा ना पूर्वी भावना व्यक्त करायला मराठी शब्द होते. पण आता emotions express करायला english words च जास्त convenient नाही का?

किंवा भारतीय भाषेत - english words only convenient, no?

शिवाय कोणत्याहि विषयाबद्दल इंग्रजीतून लिहीले की लोकांना वाटते वा, वा, नक्कीच खरे असणार. आपल्या भाषेत काय लिहायचे? श्शी:! अडाणी. ते कशाला वाचायचे?

विबासं बद्दल अमेरिकन, फ्रेन्च इ. लोक जास्त माहितगार, अनुभवी.
फक्त अमेरिकेतला मराठी माणूस असेल तर 'त्याला काय कळते? तो मराठीत लिहीतो!'

(आता मी इथे लिहायला लागलो म्हणजे हा धागा बंद करायची वेळ आली आहे हे नक्की समजा!!!)

अंहं, पुरुषांना अभिमान वाटतो हे बरोबर आहे असे नव्हते म्हणायचे. असा अभिमान वाटणे चूकच आहे किंवा सापेक्ष आहे. मात्र वाटतो किंवा वाटू शकतो इतकेच म्हणायचे होते.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

धागा चालू करणार्‍या किरणचा झंडु कसा काय झाला ? >>>महेश असे विषय चालु केले की झंडुच होतो Proud
किरण सुध्दा असचं झालं असावं का ? Light 1

महेश असे विषय चालु केले की झंडुच होतो
>>
तो झंडुच आता डोक्याला चोळावा लागणारे त्याला..

Lack of positive feedback. Assuming other person too much could be reasons too. When you thank your partner for small small things you not only give positive feedback but also realize your self that you are special enough to that other person. >>
शिरिन वेल सेड! फार छान पोस्ट आहे तुझी, मला आवडली..
पार्टनर ला गृहित धरणे थांबत नाही तोपर्यंत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स पण थांबतील असं वाटत नाही.. अर्थात हे एकंच कारण आहे असं नाही.. काही लोकं तर दोन्हीकडे बाजी मारून जातात.. (ग्रेटच बै असे लोक Proud )

अत्यंत जवळच्या नात्यात विवाह बाह्य संबधामुळे येणारा मानसिक ताण्,होणारा त्रास,नैराश्य्,यातुन प्रत्यक्ष जे लोक गेलेत त्या पैकि कोणी इथ येवुन पोस्ट टाकल्यात कि नाहे ते माहित नाही.त्यांचे अनुभव समजायला हवेत जर त्यान्चि इच्छा असेल तर...

सुचा आणि सुकि.. कोण करेल असे?? या भानगडीत दोघांनाही अवघड आहे ना असे सांगणे? ज्याचे संबंध आहेत आणि सगळ्यांना माहित आहे तेही मुद्दाम कुठे सांगत फिरत नाहीत संबंध आहेत म्हणुन. आणि ज्याच्या पार्टनरचे आहेत त्याला मुळातच आपल्यात काही कमी आहे म्हणुन ते आहेत असे वाटणे स्वाभाविक आहे असे वर आलेच आहे. मग तो ते सांगेल काय????

मला वाटले, एव्हाना किरणला पश्चात्ताप किंवा नैराश्य आले असेल. पण नाही. आताशी फक्त झंडूच झाला आहे त्याचा. ओके ओके. वाट बघू अजून थोडा वेळ. Proud

यासाठी राखी का इन्साफ, सच का सामना, किरण बेदींचा आपकी कचहरी सारखे कार्यक्रम पहावे लागतील.

भरतजी, त्यापेल्षा इथेच कोणीतरी "राखी सावंत" असा आय्डी घ्या....... इथेच काय तो इन्साफ होऊन जाऊ देत..... Proud

भरत, भारीच व्यक्ती निवडलीत........ Proud
पंत आनंदाने स्विकारतील हे पद........ पंत का सामना असे काहीतरी नामकरण करावे लागेल..... Proud

Pages