विवाह बाह्य संबंध

Submitted by Kiran.. on 28 November, 2010 - 14:50

लिव्ह इन वर एक लेख वाचला. तिथं छान चर्चा चालू आहे. ती वाचतांना विवाहबाह्य संबंध हा विषय वेगळा आहे असं मत झालं म्हणून हा प्रपंच. इथं लिव्ह इन बद्दल चर्चा अपेक्षित नाही.

मित्राची बायको एका खाजगी इंशुरन्स कंपनीत मोठ्या पदावर आहे. बॉस आणि दुस-या एका महिलेचे संबंध आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. दोघंही विवाहीत आहेत. बॉसची आर्थिक स्थिती चांगली आहे तरीही तिच्या नव-यापुढं काहीच नाही. भावनिक गुंतवणूक वगैरे काहीही प्रकार नाही. कामाच्या बहाण्याने त्यांना बाहेरगावी जाता येतं. ही दिसायला वगैरे आहे. बॉसच्या घरीही काहीच प्रॉब्लेम नाही तरीही दोघांमधे संबंध निर्माण झालेत...

एक प्रौढ कुमारिका ओळखीची आहे. तरूणपणी सौंदर्याचा अभिमान असल्यानं खूप जणांना नकार दिले. अपेक्षा खूप होत्या. तडजोड केली नाही. आता वय उलटलं...एका विवाहीत पुरूषाबरोबर संबंध जोडलेत. त्याला त्रास देते. घरी जाऊन बायकोला मारहाण वगैरे प्रकार झाले... त्या प्रौढ कुमारिकेला आपण माफ करू, पण ज्याने तिचा फायदा घेतलाय त्याचं काय ? सोन्यासारखा संसार आहे. काहीच गरज नव्हती.

एका मित्राला फिरतीवर रहावं लागतं. आताशा त्याला बायकोचे आणि सोसायटीतल्या एका इसमाचे संबंध असल्याचं कळालंय. त्यांना रेड हँड पकडलं. समज देऊन झालं. सुशिक्षित असल्यानं मारहाण वगैरे काही नाही. मुलांचा विचार करून खूप टेन्शन मधे असतो. मध्यंतरी बायकोलाही पश्चात्ताप झाला होता. पण आता पुन्हा पहिले प्रकार सुरू झालेत. आता कळालंच आहे तर... भीड चेपली गेलीय. सतत कुरबुरी आणि भांडणं चालू असतात. घटस्फोट कुणालाच नकोय हे ही विशेष.

वरील उदाहरणांमधे आपला जोडीदार कमी पडतोय असं काही नाही. लग्नाबाबत असमाधान असंही नाही. ती तक्रार नाही. विवाहाच्या बंधनात गरजा पूर्ण होत नाहीत हा प्रकारच नाही इथं... गरजा पूर्ण होत असूनही एक्स्ट्राची हाव.. या गोष्टींकडं कसं पाहणार ? परपुरूष किंवा परस्त्रीचं सुप्त आकर्षण कि ते शमवायला निर्माण झालेल्या संधी ? संयम सुटत चाललाय का ? सहज उपलब्ध होणारे एस्कॉर्टस, गिगोलो, पॉर्न मॉव्हीज, साहीत्य यामुळं संयम पाळणे फोल वगैरे आहे असं वाटतंय का ? पूर्वीसारखा अपराधीपणा, जोडीसाराला फसवत असल्याची बोच हे देखील दिसत नाही आता. माझ्या गरजा मी पूर्ण करतोय/ करतेय आणि जोडीदाराबरोबर सुखाने संसार देखील करतोय / करतेय असं काहीसं दिसून येतं..

समाजात झालेला बदल म्हणजे माहीत असूनही सहकारी त्याच्या / तिच्या घरी कळवत नाहीत. आपल्याला काय त्याचं हा उदारमतवादी दॄष्टीकोण तयार होतोय.

नैतिकतेच्या कल्पना सैलावल्यात वगैरे बोलण्यात अर्थ नाही. तर आपण करतो ते बरोबर असा एक अहंगंडं आढळतो. आपण केलेल्या प्रत्येक अनैतिक कृत्याला आता समर्थन देता येऊ शकतं. लांबचा विचार करण्याची क्षमता हरवत चाललीय. बुद्धीमान लोक वाढलेत , शहाणे कमी होत चाललेत.

उद्या दुस-याच्या पैशाचा मोह निर्माण होईल. मग ते मिळवणार का आपण ? कायद्याने ती चोरी ठरते म्हटल्यावर शिक्षेच्या भयानं आपण ते विचार दाबून टाकतो. पैशाची गरज तर असतेच.. अर्थात ज्यांना संधी मिळते ते भ्रष्टाचार वगैरे मार्गाने पैसे लुबाडतातच. त्यात अनैतिक काही आहे हेच आता लोकांना मान्य नाही..

कुणाला समाजवणार आणि कोण ? करिअर, पैसा, स्पर्धा या सगळ्यात संस्कारमूल्यं क्षीण होताहेत असं म्हटलं तर चालेल का ? काय वाटतं ?

गुलमोहर: 

पती आणी पत्नी या अनादीकालापसून चालत आलेल्या नात्याला

अनादीकालापासुन????? अहो तुम्ही तो भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास डाउनलोड करुन वाचा एकदा...... Proud

बर्‍याच प्रतिक्रिया वाचून करमणूक खूप झाली.

श्री, ते तीनदा एकच मेसेज लिहून तुमच्या भावना पटकन पोचतात असे आहे का? Wink

वपु काळाच्या पुढचा विचार करत असं वाटतं. आजच्या काळासाठी, आजच्या समस्यांसाठी त्यांनी त्याच वेळी मार्गदर्शन करून ठेवलंय....

हे विषय व. पुं. चे खापरपणजोबा अर्ध्या चड्डीत हिंडत असत तेंव्हापासून जगात चालत आलेले आहेत. त्यावर अनेक भाष्ये अनेकदा लिहून झाली आहेत.

शिवाय व. पुंची भाषा कसली जुनाट हो!! अशिक्षित माणसासारखी!! एकहि इंग्रजी, उर्दू, फारसी शब्द नाही! तुम्ही 'चांगले' साहित्य व 'चांगला' वाचक हे वाचले नाही का? त्यात लिहीणार्‍या हुषार लोकांसारखे कितीतरी इंग्रजी शब्द , वर्तुळ, त्रिज्या इ. गणित पण त्यांच्या लिखाणात दिसत नाही!!
पुढच्या काळाचा विचार करत असते तर असे सगळे मराठी लिहीले असते का?

इतक्या सहजतेने आपण एकमेकांसाठी काय टाकू शकतो, या ऐवजी इतक्या इझीली आपण एकमेकांसाठी काय गिव्ह अप करू शकतो, असे नसते का लिहीता आले, आजकालच्या मराठी सारखे? अशी अनेक उदाहरणे आहेत!!

तुम्ही निव्वळ 'फॉसिलायझेशन' तर करत नाही ना? Proud Proud Proud

(खरे म्हणजे पुरी झाली या विषयावर असे मला म्हणायचे होते, पण सरळ सांगून कोण ऐकतो?

म्हणून त्या ऐवजी हे सगळे लिहीले. म्हणजे काही लोक भडकतील, त्यांना चीड येईल, निरर्थक नि अपमानास्पद लिहीले, असे म्हणतील! मग अ‍ॅडमिनकडे, माझा आय डी रद्द का करत नाही अशी तक्रार करतील. मग हा बीबी बंद पडेल.)

Proud

म्हणून त्या ऐवजी हे सगळे लिहीले. म्हणजे काही लोक भडकतील, त्यांना चीड येईल, निरर्थक नि अपमानास्पद लिहीले, असे म्हणतील! मग अ‍ॅडमिनकडे, माझा आय डी रद्द का करत नाही अशी तक्रार करतील. मग हा बीबी बंद पडेल

पण विबासं चालुच राहतील Proud

हे विषय व. पुं. चे खापरपणजोबा अर्ध्या चड्डीत हिंडत असत तेंव्हापासून जगात चालत आलेले आहेत

कहीतरीच ! मग एकालाही 'वपुर्झा' सारखे पुस्तक किंवा 'वहिदा' सरखी कथा का सुचली नाही? झाडावरून सफरचंद हजारो वर्षांपासून पडतच आहेत. एखाद्यालाच गुरुत्वाकर्षणाचा शोध लागतो.

या सर्व काथ्याकूटी मधून सर्वांनी व्यक्तीचे चारित्र्य हा एकच मुद्दा या ना त्या प्रकारे चर्चेला घेतला आहे. चारित्र्य चारित्र्य म्हणजे तरी काय ? जो पर्यंत संधी मिळत नाही तो पर्यंतच माणूस चारित्र्यवान असतो. मिळालेली संधी कोण सोडेल ? विवाह बाह्य संबंधात दोघांपैकी कोणीही एक आपल्या जोडीदाराला समाधानी करु शकत नसेल तर दुसर्‍याला आपल्या किमान गरजा पूर्ण करण्याचा निसर्गदत्त अधिकार मिळू नये हीच एक शोकांतीका आहे. या युगात केवळ धर्माने किंवा समाजाने त्यांच्यावर आयुष्यभरासाठी बंधन लादणे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे असं माझं स्पष्ट मत आहे. " मिया बिवी राजी तो क्या करेगा ( पाजी )" ?

जे करतात ते बोलत नाहीत. जे करत नाहीत ते त्याबद्दल चर्चा करतात! तेंव्हा मी तर फुकटचा वादविवाद घालत आहे. कारण खरे तर हा बा. फ. बंद व्हायला हवा.

कहीतरीच ! मग एकालाही 'वपुर्झा' सारखे पुस्तक किंवा 'वहिदा' सरखी कथा का सुचली नाही? झाडावरून सफरचंद हजारो वर्षांपासून पडतच आहेत. एखाद्यालाच गुरुत्वाकर्षणाचा शोध लागतो.

काहीतरीच नाही, खरेच.

शिवाय गुरुत्वाकर्षणाचे परिणाम सगळ्यांनाच उघड दिसत होते. न्यूटनने फक्त त्याला गणितात मांडले, त्यामुळे त्याचे काम जगन्मान्य झाले.

साहित्याच्या बाबतीत तसे गणित नसते. पण दुसर्‍या एका 'चांगले साहित्य' या बा फ वर कुणितरी वर्तुळ त्रिज्या असले काहितरी भूमिती चे सिद्धांत साहित्याबाबत मांडले आहेत, त्या अन्वये, वपुंचे साहित्य मोजले आहे का कुणि? त्याशिवाय कसे सिद्ध करता येईल की व. पुंचेच साहित्य महान? इथे 'फॉसिलायझेशन' चा संबंध येतो.

थोडक्यात पूर्वी मी म्हंटले असते की व. पुं. चे साहित्य थोर, त्यांनी सोप्या शब्दात उच्च विचार चांगल्या रीतीने मांडले आहेत, असे. पण आता न्यूटनसारखे साहित्यालाहि गणिताचे नियम लावायचे तर त्याप्रमाणेच त्यांचे साहित्य तपासायला नको का? म्हणजे त्रिज्या वर्तुळाच्या मध्यापर्यंत पूर्ण पोचली आहे का हे कुणि नक्की सांगू शकेल का? गणिताच्या नियमांप्रमाणे सिद्ध करू शकतील का?

त्याशिवाय त्यांनी लिहीलेलेच चांगले नि इतरांनी लिहीलेल्याला नाकारायचे हे बरोबर नाही. Proud

शिवाय आजकालची नवीन प्रगल्भ व समृद्ध मराठी पहा. त्यात कित्येक शब्द इंग्रजीत, उर्दूत, वगैरे असतात. मायबोलीवरच बघा. शीर्षके उर्दू, कवितात उर्दू, इंग्रजी तर सगळीकडेच. तसे का बरे नाही व. पु. चे लिखाण? मग त्यांनी भविष्याचा विचार केला हे कसे? Proud

>>चारित्र्य चारित्र्य म्हणजे तरी काय ? जो पर्यंत संधी मिळत नाही तो पर्यंतच माणूस चारित्र्यवान असतो. मिळालेली संधी कोण सोडेल ?
@अजिबात मान्य नाही. कारण याआधी निधप ने दिलेल्या यादीमधे सातव्या क्रमांकाला असलेले माझ्यासारखे अनेक लोक आहेत. यासाठी कोणी संत म्हणाव अशी अपेक्षा नाहीये. सर्व काही शक्य असुनही जोडीदाराचा विचार करून विबासं मधे न पडणार्‍या लोकांना चारित्र्यवान म्हणायला काय हरकत आहे ?

>>दोघांपैकी कोणीही एक आपल्या जोडीदाराला समाधानी करु शकत नसेल तर दुसर्‍याला आपल्या किमान गरजा पूर्ण करण्याचा निसर्गदत्त अधिकार मिळू नये हीच एक शोकांतीका आहे. या युगात केवळ धर्माने किंवा समाजाने त्यांच्यावर आयुष्यभरासाठी बंधन लादणे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे
@हे म्हणणे मान्य केले तरी "समाधानी करू शकत नसेल" हे सापेक्ष आहे हे लक्षात घ्यावे. कायद्यामधे सुद्धा घटस्फोट घेण्यासाठी "कमी समाधान" हे कारण होऊ शकत नाही.

महेश, आपला समाज अत्यंत ढोंगी आहे. स्त्री किंवा पुरूष यांच्यातील संबंध व त्यातून त्यांना मिळ्णारे सुख हे व्यक्तिसापेक्षच असणार. त्यातून निर्माण होणारे प्रश्न हे माणसाला अनेक नको असलेल्या गोष्टी करायला लावतात.हे पुरातन काळापासून चालत आलेले आहे. या साठी गरज आहे लैंगिक शिक्षणाची. आणि या बाबतीत आपला द्रूष्टीकोन बदलण्याची. सकारात्मक विचारातूनच या समस्येवर तोडगा निघू शकतो.

दृष्टिकोन बदलला की विबासं ही समस्या रहाणार नाही, मग त्यावर तोडगा कसला?

थोडक्यात, हजारो वर्षे घालवून माणूस जंगलातून शहरात रहायला आला. धर्म, संस्कृति इ. संकल्पना तयार केल्या. काही कायदे पण केले, पण अजून मूलभूत प्रश्न तसेच. म्हणून मध्यंतरी ज्याला गैर समजत, त्याला आता 'दृष्टिकोन बदलून' गैर नाही असे समजायचे. ही प्रगति अपुरी आहे.

शारीरिक आजार व त्रुटी कमी करण्याच्या बाबतीत भरपूर प्रगति झाली, शारीरिक सुखसोयींची व्यवस्था केली (वातानुकुलीत हवा, हिंडायला मोटारी वगैरे), मेंदूच्या कामात मदत म्हणून संगणक पण आले. अजून मनाचे कामक्रोधादि विकार नष्ट करण्याचे तंत्र सापडले नाही. अतिलोभ, अहंकार, हेवा, क्रोध यातून लाच खाणे, चोरी करणे, गुन्हे करणे, खून करणे इ. वाईट गोष्टी घडण्याचे थांबत नाही!!

याचे एक कारण असे जसा ताप, जखम पटकन बरी करता येते, तसे मनाचे नाही. मन सुधारण्याचे माहित असलेले मार्ग लागू पडायला बराच मोठा कालावधी लागतो. बर्‍याच प्रमाणात शिस्त असावी लागते. 'श्रद्धा' नाही तरी 'विश्वास' असावा लागतो. तेव्हढा वेळ आजकाल कुणाला नाही. तेव्हढा विश्वास देखील आजकाल कुणि ठेवत नाहीत. नि शिस्त नावाचा प्रकार केंव्हाच कालबाह्य झाला आहे - व्यक्तिस्वातंत्र्य आले!

अतिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली कुणि शहाण्या माणसाचे ऐकावे असे उरले नाही. ज्याला त्याला स्वातंत्र्य, सगळ्या गोष्टींचे. त्याचा फायदा असा की स्वतंत्र चांगले विचार पुढे येतील, पण त्यापेक्षा जास्त प्रमाणावर, सर्व बाबतीत अनिर्बंध रहाणे हेच वाढले. स्वातंत्र्य म्हणजे, मी जे माझ्या डोक्यात येईल तेच खरे मानणार, अभ्यास करणार नाही, विचार करणार नाही. 'माझ्झे मत्त असे आहे'! ते मी बदलणार नाही!

धर्म, संस्कृति तर, अभ्यास न करता, केवळ 'जुनी' म्हणून त्यांचा विचारच करायचा नाही. त्यालाच बुद्धिप्रामाण्यवादी म्हणायचे!

मग प्रगति होते आहे कुठे? काय बदलायचे? की सतत दृष्टीकोन बदलायचे?

जसे साहित्यात ज्याला पूर्वी अश्लील म्हणून कमी प्रतीचे समजल्या जाई, तो दृष्टिकोन बदलून आता तेहि चांगले कसे यावर गणित वापरून सिद्ध करता येते, म्हणे! गणिताने सिद्ध केले म्हणजे प्रश्नच नाही!
कुणितरी लिहीले होते की तुमच्या कथेचा ओघ (फ्लो) छान आहे. म्हणजे त्यांनी काय त्याचा रेनॉल्ड्'स नंबर काढला की काय? २१०० च्या वर गेल्यास turbulant नाहीतर स्मूथ!!

जोपर्यंत मने सुधारत नाहीत तोपर्यंत नुसते दृष्टिकोन बदलणे एव्हढेच आपल्या हाती आहे!

जो पर्यंत संधी मिळत नाही तो पर्यंतच माणूस चारित्र्यवान असतो. मिळालेली संधी कोण सोडेल ?
---- खुपच उथळ विचार आहेत. मान्य नाही. सर्व चारित्र्यवान माणसे हे केवळ संधी मिळाली नाही म्हणुन चारित्र्यवान आहेत असा अर्थ होतो तो चुकीचा आहे. मी अनेक लोकं अशी पाहिली आहेत ज्यांनी आयुष्यभराच्या नोकरीत १ रुपयाही पगाराच्या व्यतिरीक्त घेतलेला नसेल... म्हणजे भ्रष्टाचार केलेला नाही. आता संधीच नव्हती म्हणुन त्यांनी तसे केले नाही असे म्हणणे मुर्खपणाचे ठरते.

सर्व प्रकारच्या संधी असुनही जो कुठल्याही लोभाला बळी पडत नाही त्याला चारित्र्यवान म्हणायला काही हरकत नसावी, अर्थात अशी लोकं दुर्मिळ होत आहे.

काय भंकस चर्चा चाललीय! चारशे प्रतिसाद झाले पण एकाच्या ह्याच्यात दम नाही सांगायचा काही केले असले तर! माझे तरी आहेत बुवा!

विवाहबाह्य संबंध, जर योग्य काळजी घेऊन केले तर स्वतःच्या भागीदाराचे आपल्यावरील व आपले त्याच्यावरील प्रेम अबाधित ठेवूनही ते मेन्टेन करता येतात आणि त्यामुळे आयुष्य अधिक मजेशीर होते.

कसल्या फुटकळ आणि बिनडोक चर्चा करताय! याद्या काय, उतारे काय, निबंध काय! इतिहासात हजार उदाहरणे आहेत या संबंधांची!

प्रतिसादांची संख्या आणि दर्जा पाहून मंडई बरी असा निष्कर्ष काढायला हरकत नाही.

तत्ववेत्याच्या आणि संस्कृतीरक्षकाच्या थाटात निबंध लिहिणार्‍यांना नीती, पावित्र्य, शील, प्रतारणा अशा मानवनिर्मीती व निसर्गाला अजिबात अभिप्रेत नसलेल्या फुटकळ संकल्पनांना शरण जाण्यात अभिमान वाटत असला तर वाटो! जास्त वेळ मायबोलीवर लिहीत बसलेल्यांना त्यावेळेस आपला जोडीदार काय करत असतो हे माहीत नसतेच! या अशा स्वयंघोषित डुढ्ढाचार्यांनी इथे भंकस करण्यापेक्षा तिकडे लक्ष ठेवणे त्यांच्या परिवारासाठी योग्य ठरेल असे खात्रीलायकरीत्या वाटते.

-'बेफिकीर'!

तुम्हाला काय करायचय ते तुम्ही करा इथे कोणालाही पडलेली नाहीये त्याची पण इथल्या कुणावरही या संदर्भाने टिका करू नका.
ज्यांना तुम्ही ओळखतही नाही अश्या लोकांच्या कश्यात किती दम आहे आणि कोणी किती संबंध ठेवलेत आणि कोण किती वेळ मायबोलीवर घालवतो आणि कोणाचे जोडीदार काय आहेत याच्या उठाठेवी तुम्ही करत बसू नका. तो तुमचा अधिकार नाही.

विवाहबाह्य संबंध, जर योग्य काळजी घेऊन केले तर स्वतःच्या भागीदाराचे आपल्यावरील व आपले त्याच्यावरील प्रेम अबाधित ठेवूनही ते मेन्टेन करता येतात आणि त्यामुळे आयुष्य अधिक मजेशीर होते.

>>>

वाह वाह !!!

जियो !!!

बेफीकीरजी क्लासेस घेणार का याचे ? एक एकलव्य आणि एक अर्जुन तयार आहे !!!...नाही तरी आम्हाला आजकाल " २ छोटे बेफीकीर " ...अन सामुहिक पणे बी कंपनी म्हणतात्च काही बावळत लोकं Proud

जरूर जरूर!

त्यात काय विशेष!

पण तुम्हाला मध्यरात्री यावे लागेल. कारण दिवसभर हेच बावळट लो'कं' फिया न भरता माझ्या ट्युशनला येऊन बसतात.

दोन छोटे बेफिकीर - ही संज्ञा मला माझ्या स्वतःपेक्षा आवडली, म्हणजे मला स्वतःला मी जितका आवडतो त्यापेक्षा!

विवाहबाह्य संबंध, जर योग्य काळजी घेऊन केले तर स्वतःच्या भागीदाराचे आपल्यावरील व आपले त्याच्यावरील प्रेम अबाधित ठेवूनही ते मेन्टेन करता येतात आणि त्यामुळे आयुष्य अधिक मजेशीर होते.
बेफिकीरजी,
पुर्ण अनुमोदन !
काय भंकस चर्चा चाललीय! चारशे प्रतिसाद झाले पण एकाच्या ह्याच्यात दम नाही सांगायचा काही केले असले तर! माझे तरी आहेत बुवा!
वाह ! याला म्हणायचं धाडसी माणुस !
Happy

अंगावरचे कपडे काढुन एक वेडा रस्त्यावर फिरत असतो.
कदाचित या मोहमयी जगात मला आता कसलाच मोह राहिला नाही अस सांगत असावा म्हणुन त्याच अनुकरण करायच की, स्वतःच्या भौतिक गरजा पुर्ण करण्याइतपत लक्ष देण्याचेही त्याला भान नाही अस समजुन केवळ दुर्लक्ष करायच हा प्रत्येकाचा प्रश्न आहे.
पण त्या वेड्याला मी कधीच 'मी उघडा फिरतो म्हणुन मी शहाणा' अस म्हणताना पाहिल नाही आणि त्याच अनुकरण करणारे तर आजतागायत मला दिसले नाहीत.

बाकी चालु दे जे चाललय ते Happy

अंगावरचे कपडे काढुन एक वेडा रस्त्यावर फिरत असतो.
कदाचित या मोहमयी जगात मला आता कसलाच मोह राहिला नाही अस सांगत असावा म्हणुन त्याच अनुकरण करायच की, स्वतःच्या भौतिक गरजा पुर्ण करण्याइतपत लक्ष देण्याचेही त्याला भान नाही अस समजुन केवळ दुर्लक्ष करायच हा प्रत्येकाचा प्रश्न आहे.
पण त्या वेड्याला मी कधीच 'मी उघडा फिरतो म्हणुन मी शहाणा' अस म्हणताना पाहिल नाही आणि त्याच अनुकरण करणारे तर आजतागायत मला दिसले नाहीत.

>>>>

कोणत्यातेरी उपनिषदात यावर एक जबरदस्त गोष्ट आहे ...अत्ता आठवत नाहीये शोधुन सांगतो

विवाह बाह्य संबंधांमुळं भांडणं सुरू होतात असं ऐकिवात आहे...

फेसबुकमुळं अमेरिकेत घटस्फोटांच प्रमाण वाढलंय असं नुकतंच सकाळमधे येऊन गेलं...मैत्रिणींशी चाट करणे हे कारण !!

फेसबुकमुळं अमेरिकेत घटस्फोटांच प्रमाण वाढलंय असं नुकतंच सकाळमधे येऊन गेलं...मैत्रिणींशी चाट करणे हे कारण

>>>>

यावर झक्कींचे मत काय आहे ?

झक्की अहो काही लोकांकडे दुर्लक्ष करा ...सगळ्यांना माहीत आहे की काही लोक तुमची " निष्कारण धर पकड " करतात ते Proud

नी ष्कारण कड

पंत, मला तुमच्या या प्रतिसादात एक अंतस्थ हेतू दिसतोय!

फेसबूक गेलं तेल लावत! एक जन्म मिळणार त्याच्यात ही बडबड कोण ऐकत बसणार आहे????

विवाहबाह्य संबंध याचा अर्थच मूळ 'विषय' बाजूला ठेवणे!

हा प्रतिसाद अत्यंत मार्मिक आहे.

मला या बीबी वर काही मत मांडायचे नाही कारण विवाहबाह्य संबंध मान्य नसल्याने मी इतरांच्या तुलनेत मागासलेला ठरु शकतो.आणि विवाहबाह्य संबंध म्हणजे ज्यात शरिरीक संबंधांचा अंतर्भाव असतो असे संबंध असा मी अर्थ घेतला आहे.

बाकी चर्चा अखंड चालू राहू द्या. आपण चर्चा करत राहू,विवाह बाह्य संबंध करणारे संबंध करत राहतील.

Pages