विवाह बाह्य संबंध

Submitted by Kiran.. on 28 November, 2010 - 14:50

लिव्ह इन वर एक लेख वाचला. तिथं छान चर्चा चालू आहे. ती वाचतांना विवाहबाह्य संबंध हा विषय वेगळा आहे असं मत झालं म्हणून हा प्रपंच. इथं लिव्ह इन बद्दल चर्चा अपेक्षित नाही.

मित्राची बायको एका खाजगी इंशुरन्स कंपनीत मोठ्या पदावर आहे. बॉस आणि दुस-या एका महिलेचे संबंध आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. दोघंही विवाहीत आहेत. बॉसची आर्थिक स्थिती चांगली आहे तरीही तिच्या नव-यापुढं काहीच नाही. भावनिक गुंतवणूक वगैरे काहीही प्रकार नाही. कामाच्या बहाण्याने त्यांना बाहेरगावी जाता येतं. ही दिसायला वगैरे आहे. बॉसच्या घरीही काहीच प्रॉब्लेम नाही तरीही दोघांमधे संबंध निर्माण झालेत...

एक प्रौढ कुमारिका ओळखीची आहे. तरूणपणी सौंदर्याचा अभिमान असल्यानं खूप जणांना नकार दिले. अपेक्षा खूप होत्या. तडजोड केली नाही. आता वय उलटलं...एका विवाहीत पुरूषाबरोबर संबंध जोडलेत. त्याला त्रास देते. घरी जाऊन बायकोला मारहाण वगैरे प्रकार झाले... त्या प्रौढ कुमारिकेला आपण माफ करू, पण ज्याने तिचा फायदा घेतलाय त्याचं काय ? सोन्यासारखा संसार आहे. काहीच गरज नव्हती.

एका मित्राला फिरतीवर रहावं लागतं. आताशा त्याला बायकोचे आणि सोसायटीतल्या एका इसमाचे संबंध असल्याचं कळालंय. त्यांना रेड हँड पकडलं. समज देऊन झालं. सुशिक्षित असल्यानं मारहाण वगैरे काही नाही. मुलांचा विचार करून खूप टेन्शन मधे असतो. मध्यंतरी बायकोलाही पश्चात्ताप झाला होता. पण आता पुन्हा पहिले प्रकार सुरू झालेत. आता कळालंच आहे तर... भीड चेपली गेलीय. सतत कुरबुरी आणि भांडणं चालू असतात. घटस्फोट कुणालाच नकोय हे ही विशेष.

वरील उदाहरणांमधे आपला जोडीदार कमी पडतोय असं काही नाही. लग्नाबाबत असमाधान असंही नाही. ती तक्रार नाही. विवाहाच्या बंधनात गरजा पूर्ण होत नाहीत हा प्रकारच नाही इथं... गरजा पूर्ण होत असूनही एक्स्ट्राची हाव.. या गोष्टींकडं कसं पाहणार ? परपुरूष किंवा परस्त्रीचं सुप्त आकर्षण कि ते शमवायला निर्माण झालेल्या संधी ? संयम सुटत चाललाय का ? सहज उपलब्ध होणारे एस्कॉर्टस, गिगोलो, पॉर्न मॉव्हीज, साहीत्य यामुळं संयम पाळणे फोल वगैरे आहे असं वाटतंय का ? पूर्वीसारखा अपराधीपणा, जोडीसाराला फसवत असल्याची बोच हे देखील दिसत नाही आता. माझ्या गरजा मी पूर्ण करतोय/ करतेय आणि जोडीदाराबरोबर सुखाने संसार देखील करतोय / करतेय असं काहीसं दिसून येतं..

समाजात झालेला बदल म्हणजे माहीत असूनही सहकारी त्याच्या / तिच्या घरी कळवत नाहीत. आपल्याला काय त्याचं हा उदारमतवादी दॄष्टीकोण तयार होतोय.

नैतिकतेच्या कल्पना सैलावल्यात वगैरे बोलण्यात अर्थ नाही. तर आपण करतो ते बरोबर असा एक अहंगंडं आढळतो. आपण केलेल्या प्रत्येक अनैतिक कृत्याला आता समर्थन देता येऊ शकतं. लांबचा विचार करण्याची क्षमता हरवत चाललीय. बुद्धीमान लोक वाढलेत , शहाणे कमी होत चाललेत.

उद्या दुस-याच्या पैशाचा मोह निर्माण होईल. मग ते मिळवणार का आपण ? कायद्याने ती चोरी ठरते म्हटल्यावर शिक्षेच्या भयानं आपण ते विचार दाबून टाकतो. पैशाची गरज तर असतेच.. अर्थात ज्यांना संधी मिळते ते भ्रष्टाचार वगैरे मार्गाने पैसे लुबाडतातच. त्यात अनैतिक काही आहे हेच आता लोकांना मान्य नाही..

कुणाला समाजवणार आणि कोण ? करिअर, पैसा, स्पर्धा या सगळ्यात संस्कारमूल्यं क्षीण होताहेत असं म्हटलं तर चालेल का ? काय वाटतं ?

गुलमोहर: 

फिनिक्स,
गलिच्छ वाक्य.

कोमल,
प्रत्येक प्रश्न किंवा मुद्दा केस बाय केस बदलतो. आपण त्याचे तक्ते मांडू शकणार नाही.

विषय गहन आहे आणि त्यामुळेच त्यावर इतका विचार करावा लागतोय, ही वस्तुस्थिती नाकारणं किंवा या विषयाची वरील गरजांबरोबर तुलना करणं योग्य वाटत नाही. >> तो सहजच आहे, त्याला समाजीक नियमानी गुंता करुन ठेवलाय.

आणि पाबा, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर विचारांकडेच आकर्षित व्हायचंय तर स्त्री-पुरुष हेच नातं कशाला हवंय? स्त्री-स्त्री किंवा पुरुष-पुरुष असंही चालेलच की.

आणि पाबा, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर विचारांकडेच आकर्षित व्हायचंय तर स्त्री-पुरुष हेच नातं कशाला हवंय? स्त्री-स्त्री किंवा पुरुष-पुरुष असंही चालेलच की.

>>>>

आता LBGT वरही चर्चा होणार तर ?

नीधप अनुमोदन... म्हणूनच मी म्हणते की नाती, मनुष्यस्वभाव हे सारं काही खूप विचित्र आणि गुंतागुंतीचं आहे... त्याला आपण कुठल्याही नियमांत बसवू शकणार नाही... बसवायला गेलो तर नियम मोडून पडतील. शेवटी ते प्रत्येकाची वैचारिक बैठक आणि कम्फर्ट लेव्हल यांच्यावर अवलंबून आहे...
भुंगा म्हणतो तसं कोणी काय करायचं तो ज्याचा त्याचा प्रश्न.... Happy

फिनिक्स .. तुम्ही तुमची ती पोस्ट बदललीत तर फार बरे होईल ...
वाचताना कसेतरीच वाटले ... प्लीज ..

उदा. जावेद व शबाना एकत्र आले पण त्यात जावेदच्या पहिल्या बायकोचे काय? का तिने फक्त मुले वाढवायची अन व्रत वैकल्ये करायची? धर्माने परवानगी असली तरी गुंतागुंत तशीच असते. इथे हैद्राबादेत रेशनकार्डासाठी इरिस स्कॅनिन्ग होते. एका फॅमिलीत एक बाप. पण काहींच्या दोन तीन फ्यामिल्या त्यामुळे
बायको पोरांना कार्ड मिळेना त्यामुळे सरकारने एका बापाचे दोनतीन दा स्कॅनिन्ग व्हावे अशी मंजुरी दिली. मग इरिस स्कॅनिन्ग चा काय मतलब?

सो फन्नी ना.

काही व्यक्ती एकच नाते पुढे नेतात अधिक सखोल व गहिरे बनवतात. ज्यात वेळ व मनाची गुंतवणूकही असते तर काही एकच लेवलचे नाते एका लेवलपरेन्तच असा फॉर्मॅट अनेकांबरोबर ट्राय करतात. पहिल्या प्रकारची व्यक्ति दुसर्‍या प्रकारच्या व्यक्तीबरोबर विवाह बंधनात अडकली तर ते फाटणारच.

जुन्याकाळच्या बालविधवांचे व्हायचे ते शोषण. ती पवित्र हवी म्हणून मुलगी असतानाच तिचे लग्न करून द्यायचे. मग वयाने थोराड नवरा मेला की तेव्हा ही शारिरीक द्रुष्ट्या भरात असणार तर तिला मन व शारीरिक भुका मारायला लावायचे. स्पर्शाने होणारे सूख ही जी साध्या कुत्रे मांजराची पण गरज अस्ते तीही तिची पुरी होउ द्यायची नाही. मग तिने मार्ग शोधला किंवा तिच्यावर अत्याचार झाला तर तीच जबाबदार.
हा घोर अन्याय नाही का.

आपल्याकडे तरुण मुले मुली मोकळे पणे भेटू पण शकत नाहीत. लग्नात अडकण्याआधीचे ट्रायल एरर फेज/ करेक्ट फिट सापड्णे हे आपल्यात होत नाही ३०- ३५ परेन्त आईवडिलांचे , संस्कारांचे दड्पण असतेच. मग थोडे वय वाढले, अधिकार आला की हा हक्क गाजवून बघावा वाट्तोच. कारण पुढे मध्यमवय व आजारपणे आहेत.

परदेशात मुले वयात आली की वेगळी होतात. आपल्याला कोण का आवड्ते ते तपासून बघतात व मग लग्न करतात ती कॉलेजातील एक वाइल्ड फेज येऊन गेली की मग जरा गरजा तपासून घ्यायची अक्कल येते.
तिथे ही विबासं मध्ये अड्कलेली जोड्पी विभक्त होतातच कि. राजकीय फायद्यासाठी एकत्र राहणारे वेगळे.

योडी, कोमल

तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण शेवटी निसर्ग आपलं काम करतो.
एखाद्याला/ एखादीला वाटतं की आपला जोडीदार आपल्या सारखा विचार करू शकत नाही. त्याला आवश्यक वाटणारे / आवडणारे विषय आपल्याला आवडणार्‍या/ आवश्यक वाटणार्‍या विषयांपेक्षा वेगळे आहेत. (उदा. साहित्यातली रुची.. वगैरे) दैनंदीन जीवनांत एखादी व्यक्ती अशी भेटते जिच्या आणि आपल्या आवडी निवडी सारख्या आहेत. तेंव्हा सहाजिकच मन तिकडे ओढ घेते. आणि अधिक सहवासाने शरिरीक आकर्षणही निर्माण होऊ शकतं. अशा जोड्या खूप काळ एकत्र राहू शकतात.

पाबा, पण खुप काळानंतर ह्या जोड्या विभक्त होतच असतील ना कधीतरी. त्यांना काहीच बंधन नाही म्हणुन हे विभक्त होणं सहज शक्य आहे. पण तेच जर काही बंधन असेल तर इतक्या सहज ते तोडुन विभक्त होणं नाही जमत.

योडे, अगदी बरोबर. बंधन तर हवच.
नाहीतर आमचा बाब्या शिक्षा केली तरी अजिबात ऐकत नाही. मग आम्ही त्याला शिक्षाच करायचं सोडलं.. असं होईल.
बंधन हवच. पण दुर्दैवाने हे बंधन तोडणार्‍यांचही प्रमाण कमी नाही. घटस्फोटाचं प्रमाण किती वाढलय हे आपण बघतोच.

योडीला अनुमोदन... एकदा शारिरीक आकर्षण सरलं की नातं काय वळण घेतं ते महत्त्वाचं... आणि अनेक नाती याच टप्प्यावर तुटतात... इथून सुरू होत नाहीत... आणि विबासंच्या बाबतीत तर हे महत्त्चाचं आहेच... कुणा एकाकडून अपेक्षा आल्या की नातं टिकत नाही...

मला वाटतं की निरपेक्ष नातं हा शब्द ऐकायला कितीही छान वाटला तरी अस्तित्वात असणं प्रचंड कठीण आहे.

विबासं जोपर्यंत थर्ड पार्टीचे आहेत तोपर्यंत ठीक. शेजा-यापर्यंत लोण आलं तरी ठीक. आपण स्वतः गुंतलो तरी ठीक..

पण आपल्या जोडीदाराचे वि.बा.सं. आहेत असं समजल्यावर ( आहेत असं समजा ) यावर आपली काय प्रतिक्रिया असेल तीच खरी समजूयात का ?

मला सहन नाही होणार..कदाचित विचार करण्याची शक्तीच संपून जाईल अशा वेळी

मला सहन नाही होणार..कदाचित विचार करण्याची शक्तीच संपून जाईल अशा वेळी >>>>>

शक्ती संपून जाईल ती काही वेळापुरती... काही दिवस...... पण आपण कुठे चुकलो का कमी पडलो का हा आत्मशोध घ्यावा लागेलच ना नंतर...... !!!

प्रेमाचा पाया ''त्याग'' असतो...... आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे त्याला सुख मिळावे,त्याचा/तीचा उत्कर्ष व्हावा म्हणून कोणत्याही त्यागास तयार असले पाहिजे....... आपला प्रेमी चुकत असेल तर तो न दुखेल या पद्धतीने त्याला/तीला समजावले पाहिजे...... इतके उदात्त प्रेम हा कल्पना विलासच होईल.... कारण जो प्रेम करतो तो तेवढ्याच प्रेमाचि अपेक्षा करतो/करते व अपेक्षाभंगाचे दु:ख पदरी पाडून घेतो/घेते.

आपल्या जोडिदारास दुसर्‍यासोबत कंफर्टेबल वाटत असेल तर त्या वागण्याचा ''विबासं'' असा सोयीस्कर अन्वयार्थ लावणे ह्यातुनही विवाहसंबंध विकोपास जातात व विबासं वाढीस लागतात.

व्यक्तीशः विबासं हे एकदम चूक आहे असे माझे स्पष्ट मत आहे........ बाकी बरेच मुद्दे मांडले गेले आहेत.

किरण you hit the nail.

आपल्या जोडीदाराबद्दल विचार केला की जे आपल्याला वाटेल तेच खरं.

निव्वळ जोडीदाराच्या प्रेमापोटी त्या/तिचे विबासं आहेत हे माहीत झाल्यावरही त्यांच्याच सोबत राहणारे लोक अस्तित्वात आहेत, यात स्त्रियांचं प्रमाण जास्ती असावं असं वाटतंय आहे. कारण सामाजिक सुरक्षितता, मुलांचं संगोपन... हे नवर्‍याशिवाय अशक्य आहे असं आपल्या समाजाने पहिल्यापासून डोक्यात भरवून दिलं आहे.

एखादा मुद्दा पटवून देण्यासाठी तिकडे असे चालवून घेता तर मग इथे का नाही हे तर्कशास्त्र मलाही मान्य आहे

नाही, मी चालवुन घ्या म्हणत नाहीये, तर अशा माणसाची एकदम विश्वासार्हता कशी काय कमी होते ते मला कळत नाही असे मला म्हणायचेय. आपण डोळ्यासमोर धडधडीत भ्रष्टाचार होताना दिसत असतानाही सिस्टिमवर विश्वास ठेवतोयच ना, मग केवळ विबासं, तेही कानोकानी, मग लगेच त्या माणसावर विश्वास ठेवणार नाही, तो बेक्कार वगैरे वगैरे कसे काय?? विबासं असलेला माणुस म्हणजे काय मोकाट सुटलेला बलात्कारी पुरूष नाही. आपल्या आजुबाजुलाही ढिगभर असतील, आपल्यालाच माहित नसेल.

कारण सामाजिक सुरक्षितता, मुलांचं संगोपन... हे नवर्‍याशिवाय अशक्य आहे असं आपल्या समाजाने पहिल्यापासून डोक्यात भरवून दिलं आहे.

>>>
आणि पुरुषांच्या डोक्यात भरवुन दिलं जातं की लग्न करणं गरजेचे आहे !

कारण सामाजिक सुरक्षितता, मुलांचं संगोपन... हे नवर्‍याशिवाय अशक्य आहे असं आपल्या समाजाने पहिल्यापासून डोक्यात भरवून दिलं आहे. >>>

आणि पुरुषांच्या डोक्यात भरवुन दिलं जातं की लग्न करणं गरजेचे आहे ! >>>>>

चला.... कुणीकडून काय तर दोघांच्याही डोक्यात कोणीतरी भरवते आणि दोघेही आपापली डोकी गहाण ठेवतात......... आणि मग दोघेही डोक्यात भरवून देणार्‍याला "समाज" असं म्हणत त्याच्या नावाने बोटं मोडत राहतात........ !!! Angry

किरण,
आपला जोडीदार जे वागलेलं आपल्याला झेपणार नाही ते आपणही वागू नये हा साधा नियम पाळण्याबद्दल मी आधीच वरती बोललेय.

विवाह बाह्य संबंध याची व्याख्या नक्की काय?
माझ्या मते जिथे एक स्री-एक पुरूष दोघांना कमिट होऊन लग्न करतात त्यानंतर त्या दोघांनी मनाने, शरिराने म्हणजेच सर्वतोपरी एकमेकांचेच रहाणे अपेक्षित आहे.

पण दुर्दैवाने ज्या दोघांचे (नवरा बायको नसलेल्यांचे) शरिर संबंध पण आहेत त्यांनाच अनैतिक्/विवाहबाह्य मानले जाते. शरिराने शेअर झालं तरंच नित्तिमत्तेला तडा जातो का? Uhoh उलट आपला नवरा/बायको तिसर्‍या माणसाशी मनाने शेअर झाला/ली तर त्याला अनैतिक न म्हणता फक्त मैत्री हे गोंडस नाव? ते कसं काय?

नीधपला अनुमोदन आहे माझं...
आणि बाकी ज्याला जे झेपेल ते त्याने करावं.. आपण बोलणारे कोण?

किरण, भारी विषय भारी संयत शब्दात मान्डलाहेस Happy

बाकी हा विषय बराच "पॉप्युलर अन जिव्हाळ्याचा" दिस्तोय.... दिवसात शम्भरच्या वर पोस्ट्स पडल्यात म्हण्जे काय हो...... Proud

नी वर्गीकरण पटलं...
आपला जोडीदार जे वागलेलं आपल्याला झेपणार नाही ते आपणही वागू नये हा साधा नियम पाळण्याबद्दल मी आधीच वरती बोललेय. >> अगदी बरोबर..

Infidelity (colloquially known as cheating) is a violation of the mutually agreed-upon rules or boundaries of an intimate relationship.
दक्षिणा, इनफिडीलीटी ही इमोशनल पण असु शकते. Emotional infidelity is emotional involvement with another person.

लग्न मानव निर्मीत आहे हे जेंव्हा मान्य केले तेंव्हा त्याचे नियमही मानवनिर्मीतच आहेत हे मान्य असेलच. मग हे नियम काळाप्रमाणे, परिस्थीती प्रमाणे बदलत जाणारच .. काय चुक काय बरोबर हे ठरवणारे आपण कोण?

Pages