विवाह बाह्य संबंध

Submitted by Kiran.. on 28 November, 2010 - 14:50

लिव्ह इन वर एक लेख वाचला. तिथं छान चर्चा चालू आहे. ती वाचतांना विवाहबाह्य संबंध हा विषय वेगळा आहे असं मत झालं म्हणून हा प्रपंच. इथं लिव्ह इन बद्दल चर्चा अपेक्षित नाही.

मित्राची बायको एका खाजगी इंशुरन्स कंपनीत मोठ्या पदावर आहे. बॉस आणि दुस-या एका महिलेचे संबंध आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. दोघंही विवाहीत आहेत. बॉसची आर्थिक स्थिती चांगली आहे तरीही तिच्या नव-यापुढं काहीच नाही. भावनिक गुंतवणूक वगैरे काहीही प्रकार नाही. कामाच्या बहाण्याने त्यांना बाहेरगावी जाता येतं. ही दिसायला वगैरे आहे. बॉसच्या घरीही काहीच प्रॉब्लेम नाही तरीही दोघांमधे संबंध निर्माण झालेत...

एक प्रौढ कुमारिका ओळखीची आहे. तरूणपणी सौंदर्याचा अभिमान असल्यानं खूप जणांना नकार दिले. अपेक्षा खूप होत्या. तडजोड केली नाही. आता वय उलटलं...एका विवाहीत पुरूषाबरोबर संबंध जोडलेत. त्याला त्रास देते. घरी जाऊन बायकोला मारहाण वगैरे प्रकार झाले... त्या प्रौढ कुमारिकेला आपण माफ करू, पण ज्याने तिचा फायदा घेतलाय त्याचं काय ? सोन्यासारखा संसार आहे. काहीच गरज नव्हती.

एका मित्राला फिरतीवर रहावं लागतं. आताशा त्याला बायकोचे आणि सोसायटीतल्या एका इसमाचे संबंध असल्याचं कळालंय. त्यांना रेड हँड पकडलं. समज देऊन झालं. सुशिक्षित असल्यानं मारहाण वगैरे काही नाही. मुलांचा विचार करून खूप टेन्शन मधे असतो. मध्यंतरी बायकोलाही पश्चात्ताप झाला होता. पण आता पुन्हा पहिले प्रकार सुरू झालेत. आता कळालंच आहे तर... भीड चेपली गेलीय. सतत कुरबुरी आणि भांडणं चालू असतात. घटस्फोट कुणालाच नकोय हे ही विशेष.

वरील उदाहरणांमधे आपला जोडीदार कमी पडतोय असं काही नाही. लग्नाबाबत असमाधान असंही नाही. ती तक्रार नाही. विवाहाच्या बंधनात गरजा पूर्ण होत नाहीत हा प्रकारच नाही इथं... गरजा पूर्ण होत असूनही एक्स्ट्राची हाव.. या गोष्टींकडं कसं पाहणार ? परपुरूष किंवा परस्त्रीचं सुप्त आकर्षण कि ते शमवायला निर्माण झालेल्या संधी ? संयम सुटत चाललाय का ? सहज उपलब्ध होणारे एस्कॉर्टस, गिगोलो, पॉर्न मॉव्हीज, साहीत्य यामुळं संयम पाळणे फोल वगैरे आहे असं वाटतंय का ? पूर्वीसारखा अपराधीपणा, जोडीसाराला फसवत असल्याची बोच हे देखील दिसत नाही आता. माझ्या गरजा मी पूर्ण करतोय/ करतेय आणि जोडीदाराबरोबर सुखाने संसार देखील करतोय / करतेय असं काहीसं दिसून येतं..

समाजात झालेला बदल म्हणजे माहीत असूनही सहकारी त्याच्या / तिच्या घरी कळवत नाहीत. आपल्याला काय त्याचं हा उदारमतवादी दॄष्टीकोण तयार होतोय.

नैतिकतेच्या कल्पना सैलावल्यात वगैरे बोलण्यात अर्थ नाही. तर आपण करतो ते बरोबर असा एक अहंगंडं आढळतो. आपण केलेल्या प्रत्येक अनैतिक कृत्याला आता समर्थन देता येऊ शकतं. लांबचा विचार करण्याची क्षमता हरवत चाललीय. बुद्धीमान लोक वाढलेत , शहाणे कमी होत चाललेत.

उद्या दुस-याच्या पैशाचा मोह निर्माण होईल. मग ते मिळवणार का आपण ? कायद्याने ती चोरी ठरते म्हटल्यावर शिक्षेच्या भयानं आपण ते विचार दाबून टाकतो. पैशाची गरज तर असतेच.. अर्थात ज्यांना संधी मिळते ते भ्रष्टाचार वगैरे मार्गाने पैसे लुबाडतातच. त्यात अनैतिक काही आहे हेच आता लोकांना मान्य नाही..

कुणाला समाजवणार आणि कोण ? करिअर, पैसा, स्पर्धा या सगळ्यात संस्कारमूल्यं क्षीण होताहेत असं म्हटलं तर चालेल का ? काय वाटतं ?

गुलमोहर: 

>>नी, तुला काय वाटतं ह्या संबंधांना जोडीदाराची संमंती असेल?<<
प्रत्येकाच्या लग्न किंवा कपल यासंदर्भातल्या कल्पना वेगळ्या असतात ना. कोण एकमेकांना किती स्पेस देतो हा ज्या त्या कपलचा प्रश्न. आपल्याही समाजात वाइफ स्वॉपिंग किंवा तत्सम गोष्टी नाहीतच असं आपण म्हणू शकतच नाही ना? ते योग्य की अयोग्य याची उठाठेव आपण कोण करणार रे?

वैयक्तिक म्हणशील तर माझ्या स्वतःच्या संदर्भात विबासं मला चूकच वाटतील पण प्रत्येकाला ते तसेच वाटावेत हे कसं काय मी ठरवणार?

>>आणि तु म्हणतेयस त्याप्रमाणे चालत असेल तर बोलणंच खुंटलं.<<
एक्झॅक्टली. बोलणंच खुंटलं एवढच फक्त ते न्यूट्रली. उपरोधिक नव्हे. Happy

प्रसाद, बाजीरावासारख्या जबाबदार माणसाकडुन तो ज्या सनातनी समाजातला होता, त्या समाजाला असले अपेक्षित नव्हते. तो जर इतर धर्मातला राजा असता तर कदाचित प्रोब्लेम आला नसता.
बर एवढे असुनही (मी माझ्याच मागच्या पोस्टमधे लिहिल्याप्रमाणे), सर्वजण (घरातले, जनता) त्याच्या प्रकरणाला मान्यता देत असुनसुद्धा या माणसाचा हेका जास्तच होता. कर्तृत्ववान व्यक्तींनी खरे तर समाजात जास्त
जबाबदारीने वागायला पाहिजे.
नीधप यांच्या लिखाणास लाख लाख अनुमोदन, पुरूषाला स्वातंत्र्य आहे म्हणुन त्याने काहीही करावे असे नाही, जे आपण करत आहोत ते आपली बायको करू शकेल का आणि तिने तसे केलेले आपल्याला चालेल का हा विचार जर केला जात असेल तर विबासं चे प्रमाण कमी होईल. पुरूष प्रधान संस्कृती असल्याने असे लिहिले आहे, हाच विचार बायकांनी देखील करावा.

बाकी फसवणूक आणि जोडीदाराची फरफट केली जाणे याचे कधीच समर्थन नाही. पण असं न होताही जे विबासं असतील त्यात आपण बोलणारे कोण आणि का?
>>
नी, विबासं मध्ये फसवणुक आणि फरफट ह्या दोन्ही गोष्टी जवळ जवळ ९०% तरी अशक्यच आहेत. पण तरीही उरलेल्या १० % मध्ये येणारे संबंध हे किती काळ टिकत असतील? शेवटी समाजाने जी बंधनं केलीयत ती काहीतरी विचार करुनच. उद्या उठ सुठ कुणीही कुणाच्याही बायकोबरोबर फिरताना दिसेल मग.

शेवटी समाजाने जी बंधनं केलीयत ती काहीतरी विचार करुनच. >>>>>

कोण हा समाज?????? योडी, गेल्या काही पोस्टी वाच... आम्ही तेच म्हणतोय की समाजाच्याच व्याख्या बदलल्यात......... पुर्वापार चालत आलेल्या अटी रुढी ह्या त्या समाजाने निर्माण केल्या होत्या..... समाज यातील घटक जास्त असल्याने त्यांचे "प्रेशरही" जास्त असायचे...... आता समाज ही संकल्पनाच संकुचित किंवा आकुंचन पावलिये असे म्हणू हवं तर (समाजाचा परीघ रोडावलाय) . आता आपल्या मालकीच्या रुमबाहेरच्या समाजाला जो तो फाट्यावर मारतो...... (इथे दुसरा शब्द चपखल बसला नाही म्हणून हाच वापरला).

बाजीरावाचे उदाहरणच चुकीचे आहे, तो केवळ पुरुष नव्हता तर राजकारणी होता. अशा पोस्टवर असलेल्या व्यक्तींच्या खाजगी बाबींचा वापर सत्ताकारणात केला जातोच. त्यामुळे तत्कालिन सर्व समाजाचा मस्तानीला विरोध होता की अंतर्गत राजकारणामधली ती एक खेळी होती हे कळणे अवघड आहे.
क्लिंट्न-लेवेन्स्की प्रकरण या संदर्भात पटकन आठवते (चला आता झक्की इथे नक्की येतील!!)
नीधपला अनुमोदन.

बाकी फसवणूक आणि जोडीदाराची फरफट केली जाणे याचे कधीच समर्थन नाही. पण असं न होताही जे विबासं असतील त्यात आपण बोलणारे कोण आणि का? >> हे कसं ओळखावं ?
यावर मयेकरांचं
>>मग ओळखायची गरज काय, कुणाचे विबासं आहेत की नाहीत ते?<<
हे उत्तर पुरेसं आहे ना.

एक उदाहरण म्हणून सांगते.
माझा एक विद्यार्थी होता. वयानेही मोठा होता आणि आर्थिकदृष्ट्या उत्तम सेटल्ड इत्यादी पण किडा म्हणून नाटकात एम ए करायला आला होता. आणि वर्गात होता म्हणून विद्यार्थी. तर एक दिवस वर्गातल्या कुठल्या एका तासाला त्याने सहजपणे सांगितले की त्याला दोन बायका आहेत. पहिल्या बायकोपासून एक मुलगी आणि एक मुलगा आहे आणि दुसर्‍या बायकोला एक मुलगा आहे. पहिल्या बायकोचा मुलगा दुसरे लग्न झाल्यानंतरचा आहे. दुसरे लग्न ही मागणी घालून केलेले आहे. पहिल्या बायकोने संमती दिलेली आहे. ती नोकरी करते. उत्तम कमावते. दुसरी हाउसवाइफ आहे. मुंबईत दोघींना वेगळी घरं घेऊन दिलेली आहेत याने.
ऐकलं तेव्हा धक्का बसला. चीड तर आलीच.
मग एका प्रयोगाच्या तालमींना बघितलं एक दिवस पहिली डबा घेऊन यायची एक दिवस दुसरी. दोघींची आमच्या सगळ्यांशी ओळख करून दिली होती त्याने. पहिलीच्या चेहर्‍यावर शोधूनही कधी परिस्थितीबद्दलचा राग बिग दिसायचा नाही. दुसरी फणकारत असायची.
सगळंच अजब होतं.
पण तसं दिसताना आलबेलच होतं तर बोलणं खुंटलं म्हणायला हरकत नाही.
आता त्याने दोघींशी विधीवत लग्न केलं होतं पण कायदा पहिलीच केवळ बायको मानतो आणि दुसरी नाही त्यामुळे ती विबासं की दुसरी बायको की अजून काय ते मला माहित नाही.
संकल्पना नक्कीच आजही इरिटेटिंग वाटते. पण तरी आपण बोलणारे कोण हे येतंच.

नी, तु दिलेलं उदाहरण हे त्या १० % त येतंय. पण तरीही त्याने लग्न केलंच ना त्या दुसर्‍या बायकोसोबत?

भुंग्या, इथे हेच सांगायचं होतं मला. बंधनं आहेत म्हणुन का होईना नवरा बायको एकत्र रहातायत.

नी, पण सगळ्यांनीच हे केलं तर काय होईल , जस्ट ईमॅजिन.

विवाहबाह्य असो किंवा दुसरं लग्न करून आणलेली असो, पैश्यावाली असो किंवा देखणी असो .. एखाद्या स्त्रीला तीची सवत घरात आणलेली किंवा बाहेर ठेवलेली. आवडेल का?

शारिरीक संबंधाचा समतोल आलटून पालटून राखला जाईल दोघींमधे यात वादच नाही. पण एक कुटूंब पोसायला जड होतं तिथे दोन दोन कुटुंब पोसायची. ती हि दोन्ही राण्यांची मर्जी राखून कितपत शक्य आहे?

पण तरी आपण बोलणारे कोण हे येतंच.

>>> येकझॅकटली ...हेच म्हणायचे आहे मला ... ज्यांना असली प्रकरणे करुन निभावता येतात त्यांना ती करु द्यावीत .

ज्यांना येत नाहीत त्यांनी गप्प रहावे ....उगाचच समाजबाह्य ...अनैतीक . असले काही बोलुन ..किंवा चर्चा करुन त्या माणसाला त्रास देवु नये .

सुकी .

पण एक कुटूंब पोसायला जड होतं तिथे दोन दोन कुटुंब पोसायची. ती हि दोन्ही राण्यांची मर्जी राखून कितपत शक्य आहे >>>>

समज एखादा हे करायला समर्थ असेल तर त्याला तुझी / समाजाची हरकत का असावी?

अमेरिका, भारतीय, संबंध, विवाह, अक्कल, हटकेश्वर इत्यादी कीवर्ड्स वापरून वाक्ये, पोस्टी टाका. मगच झक्कींचे सर्च इंजिन ते स्कॅन करून त्यांचे रडार इकडे फिरेल.

(आणि मग त्या किरणला 'कुठून अवदसा आठवली हा बीबी चालू करण्याची!' असे होऊन जाईल. मग हा बीबी नेहेमीप्रमाणे चिरनिद्रा घेईल. Proud पण बीबीने चिरनिद्रा घेतली म्हणून विबासं थांबणार नाहीत. ते थांबत नाहीत. (आनंद मरा नही. आनंद मरते नही.. वगैरे :फिदी:))

पंत माझी हरकत नसेल. पण मी म्हणजे समाज नव्हे. Happy असोत. इथे लिहायला फार सोप्प आहे रे प्रसाद. एकदा ह्यावर भाष्य करून बघ सभा घेऊन म्हणजे समाज काय अन समाजाचे वाभाडे काय असतात ते कळेल तुला?

बंधनं आहेत म्हणुन का होईना नवरा बायको एकत्र रहातायत.

तशी तर अनेक विवाहित जोडपी दोघांची किंवा एकाची घुसमट होत असूनही समाज, मुलांचे भवितव्य इ. गोष्टींना घाबरून एकत्र राहतात. त्यांचे विबासं नसुनही.
माझी एक कलीग लग्नाच्या दुसर्‍या वर्षापासून त्रास(शारीरिक, शाब्दिक, मानसिक) सहन करत आलीय. आता २० वर्षे झाली तिच्या लग्नाला. आधी माझ्या धाकट्या भावंडांची लग्न कशी होणार, मग आता माझ्या मुलांचं कसं होणार, आणि आता शेवटी इतकी वर्षे झाली उरलेली पण जातील म्हणून. एका छपराखाली राहूनही ती नवराबायको म्हणुन राहात नाहीत. तिला तिच्या माहेरी जायला, त्यांनी यायला , अगदी फोनला ,आधी बंदी. आता कपाळावर आठी.
इथे काय करतो समाज? किंवा काही का करत नाही समाज? आणि हे उदाहरण अपवादात्मकच असेल का? या गोष्टीला समाजाची इनायरेक्ट मान्यता आहे असाच अर्थ होतो ना? बदलतेय हेही ,पण हळूहळू. बहुधा तिच्या मुलींना असे काही सहन करावे लागले तर त्य बाहेर पडतील.

किरण आणि सुर्यकिरण वेगळे आयडी आहेत होय, निट पाहिल तेव्हा कळाल.
सुकि, वरच्या अनेक पोस्टींमधे याबाबत लिहिल गेल आहे,
आजकाल समाजाची व्याख्या देखील बदलत चालली आहे.
कोणी कोणाला फारस विचारत नाही. व्यक्तीला जेवढ्या लोकांची गरज असते तेवढा त्या व्यक्तीचा समाज.

इथे लिहायला फार सोप्प आहे रे प्रसाद. एकदा ह्यावर भाष्य करून बघ सभा घेऊन म्हणजे समाज काय अन समाजाचे वाभाडे काय असतात ते कळेल तुला

>>>

येझअ‍ॅकट्ली सुकी ...हेच ते ...समाजाने नेहमीच ह्या दहशत वादाने कर्तृत्ववान लोकांना त्रास दिलाय ...

आज विबांस दिसत नाहीत ते ह्या दहशतीमुळे ...not by choice .

शारिरीक संबंधाचा समतोल आलटून पालटून राखला जाईल दोघींमधे यात वादच नाही. पण एक कुटूंब पोसायला जड होतं तिथे दोन दोन कुटुंब पोसायची. ती हि दोन्ही राण्यांची मर्जी राखून कितपत शक्य आहे?
>>>>>>>

सुकि, कुठल्या जगात आहेस भाऊ........ ज्याला हे झेपते तोच हे करतो........ आणि सहाजिक त्यासाठी लागणारी उठाठेव तो करतोच मग तो आर्थिक्दृष्ट्या सधन असेल किंवा नाही.
दारुच्या किंवा एखाद्या व्यसनाच्या आहारी गेलेला वेळेला पैसे उभे करतोच ना तलफ शमवायला..... नसले तरी...... हा पण एक "चसका"च आहे, जो यात ओढला गेला तो करतो सर्व मॅनेज....... Happy

तुझा मुद्दा खोडणे हे या प्रकाराला समर्थन करणे असे होत नाही, हे पण कृपया लक्षात घे बाबा.....!

पण आर्थिक निकष इथे लागूच नाही पडत रे.....

गोष्टीला समाजाची इनायरेक्ट मान्यता आहे असाच अर्थ होतो ना?
>>
मयेकर, जरी ती बाहेर पडली असती ह्या सर्वांतुन तरी समाजाने तिला सुखाने जगु दिलं असतं का?? ती तशीच राहीली ह्याचा अर्थ असा होत नाही की विबासंला समाजाची मान्यता आहे मग ती इनडायरेक्ट का असेना.

पंत, नक्कीच तुम्ही कर्तृत्वान होणार. Happy

असोत चर्चा पुरे, महेशजी. वेगळेच आयडी आहे. ड्यु आयडी नाही Wink

व्यक्तीला जेवढ्या लोकांची गरज असते तेवढा त्या व्यक्तीचा समाज. <<< कठीण आहे.

भुंग्या, सर्वांच्याच बाबतीत आर्थिक निकष इथे लागू पडत नाही हे मान्य. भेटल्यावर बोलूच आणखी.

योडी तुम्ही माझीपोस्ट पूर्ण वाचलेली नाही. त्या पोस्टच विबास शी काही संबंध नाही, तर विवहित स्त्राच्या तिच्या सासरी व विशेषतः पतीकडून होणार्‍या छळाबद्दल आहे.

विवहित स्त्राच्या तिच्या सासरी व विशेषतः पतीकडून होणार्‍या छळाबद्दल आहे.
>>
म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का कि जर विवाहाचं बंधन नसतं तर ती कधीच ह्यातुन बाहेर पडली असती?

पंत , क्षमस्व. पण कुठली गोष्ट पर्सनल घ्यावी अन कुणाची यावर आपण विचार करावा?

तुम्ही म्हणता तसे 'कर्तृत्ववान' होणार असे म्हणायचे नव्हतेच मला. Happy

शारिरीक संबंधाचा समतोल आलटून पालटून राखला जाईल दोघींमधे यात वादच नाही. पण एक कुटूंब पोसायला जड होतं तिथे दोन दोन कुटुंब पोसायची. ती हि दोन्ही राण्यांची मर्जी राखून कितपत शक्य आहे?

धर्मेंद्रचे उदाहरण आहे समोर. त्याचा प्रयत्न २ पेक्षा जास्तचा होता बहुधा. आनि या सग्ळ्याला लोकमान्यता, राजमान्यता(दोघेही खासदार) मिळाली. नाहीतर अमिताभच्या शहेनशाह किंवा शाहरुखच्या माय नेम इज खानच्या वेळी जसा गदारोळ झाला तसा का नाही झाला?
इतकी शतके पुरुषाचे एकापेक्षा जास्त संबंध असणे अगदी मान्यच होते. पण आता विवाहित स्त्रीचे जर संबंध असतील तर तो चर्चेचा विषय होतो.

पण मी कुठे म्हणतेय सगळ्यांनी असं करावं?

आणि जर जोडीदाराची संमती असेल तर मग आवडणे नावडणे उरतच नाही ना.

पण मुळात जोडीदाराची संमती हा मुद्दा खूप कमी ठिकाणी उद्भवतो त्यामुळे सगळेच हे करत नाहीत.

असं का वाटतंय सगळ्यांना की मी समर्थन करतेय म्हणून?

विबासं संदर्भात खालील गट असू शकतात.
१. जोडीदाराची संपूर्ण आणि खुशीने संमती किंवा दोघांनी एकमेकांना शरीराच्या पातळीवर दिलेली सूट.
२. जोडीदाराला माहित असणे पण संमत नसणे आणि तरी पर्याय नाही म्हणून अॅक्सेप्ट करणे.
३. जोडीदाराला माहित असणे आणि अमान्य असल्यामुळे नाते सडणे, चिघळणे इत्यादी.
४. जोडिदाराला अजिबात माहित नसणे. जाम हुशार...
५. जोडिदाराला मान्य होणार नाही आणि जोडीदाराने केल्यास आपल्याला मान्य होणार नाही म्हणून इच्छा असूनही दूर रहाणे
६. शक्यता व संधी दोन्हीही नसल्याने हे वाईटच आहे असं म्हणणारे.
७. इच्छा, शक्यता, संधी व मान्यता सगळ्या पातळीवर होकार असूनही दूर राहू शकणारे.

७ क्रमांकाचे लोक खूप थोडे. संतपदाला पोचलेले.
बाकी बरीचशी दुनिया ५ आणि ६ मधलीच.
२,३ आणि ४ हे कधीही चूकच. पण असे लोक भरपूर.
१ च्या ठिकाणी आपण कोण बोलणारे. पण हाही गट तसा दुर्मिळच.

पण आता विवाहित स्त्रीचे जर संबंध असतील तर तो चर्चेचा विषय होतो.
>>
you said it..

भुंग्या, आता मला सांग वरच्या वाक्याप्रमाणे जर खरंच होत असेल तर मग ही सगळी चर्चा करतं कोण?? ज्या समाजाला फाट्यावर मारायला सांगतोयस तो समाजच ना? बाबा रे, समाजात रहातो आपण. विबासंना नवरा/ बायको दोघांकडून संमती असेल तर वर म्हटल्याप्रमाणे बोलणंच खुंटतंय. पण समाजाचं काय करशील? कुणाकुणाला गप्प करशील?

Pages