विवाह बाह्य संबंध

Submitted by Kiran.. on 28 November, 2010 - 14:50

लिव्ह इन वर एक लेख वाचला. तिथं छान चर्चा चालू आहे. ती वाचतांना विवाहबाह्य संबंध हा विषय वेगळा आहे असं मत झालं म्हणून हा प्रपंच. इथं लिव्ह इन बद्दल चर्चा अपेक्षित नाही.

मित्राची बायको एका खाजगी इंशुरन्स कंपनीत मोठ्या पदावर आहे. बॉस आणि दुस-या एका महिलेचे संबंध आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. दोघंही विवाहीत आहेत. बॉसची आर्थिक स्थिती चांगली आहे तरीही तिच्या नव-यापुढं काहीच नाही. भावनिक गुंतवणूक वगैरे काहीही प्रकार नाही. कामाच्या बहाण्याने त्यांना बाहेरगावी जाता येतं. ही दिसायला वगैरे आहे. बॉसच्या घरीही काहीच प्रॉब्लेम नाही तरीही दोघांमधे संबंध निर्माण झालेत...

एक प्रौढ कुमारिका ओळखीची आहे. तरूणपणी सौंदर्याचा अभिमान असल्यानं खूप जणांना नकार दिले. अपेक्षा खूप होत्या. तडजोड केली नाही. आता वय उलटलं...एका विवाहीत पुरूषाबरोबर संबंध जोडलेत. त्याला त्रास देते. घरी जाऊन बायकोला मारहाण वगैरे प्रकार झाले... त्या प्रौढ कुमारिकेला आपण माफ करू, पण ज्याने तिचा फायदा घेतलाय त्याचं काय ? सोन्यासारखा संसार आहे. काहीच गरज नव्हती.

एका मित्राला फिरतीवर रहावं लागतं. आताशा त्याला बायकोचे आणि सोसायटीतल्या एका इसमाचे संबंध असल्याचं कळालंय. त्यांना रेड हँड पकडलं. समज देऊन झालं. सुशिक्षित असल्यानं मारहाण वगैरे काही नाही. मुलांचा विचार करून खूप टेन्शन मधे असतो. मध्यंतरी बायकोलाही पश्चात्ताप झाला होता. पण आता पुन्हा पहिले प्रकार सुरू झालेत. आता कळालंच आहे तर... भीड चेपली गेलीय. सतत कुरबुरी आणि भांडणं चालू असतात. घटस्फोट कुणालाच नकोय हे ही विशेष.

वरील उदाहरणांमधे आपला जोडीदार कमी पडतोय असं काही नाही. लग्नाबाबत असमाधान असंही नाही. ती तक्रार नाही. विवाहाच्या बंधनात गरजा पूर्ण होत नाहीत हा प्रकारच नाही इथं... गरजा पूर्ण होत असूनही एक्स्ट्राची हाव.. या गोष्टींकडं कसं पाहणार ? परपुरूष किंवा परस्त्रीचं सुप्त आकर्षण कि ते शमवायला निर्माण झालेल्या संधी ? संयम सुटत चाललाय का ? सहज उपलब्ध होणारे एस्कॉर्टस, गिगोलो, पॉर्न मॉव्हीज, साहीत्य यामुळं संयम पाळणे फोल वगैरे आहे असं वाटतंय का ? पूर्वीसारखा अपराधीपणा, जोडीसाराला फसवत असल्याची बोच हे देखील दिसत नाही आता. माझ्या गरजा मी पूर्ण करतोय/ करतेय आणि जोडीदाराबरोबर सुखाने संसार देखील करतोय / करतेय असं काहीसं दिसून येतं..

समाजात झालेला बदल म्हणजे माहीत असूनही सहकारी त्याच्या / तिच्या घरी कळवत नाहीत. आपल्याला काय त्याचं हा उदारमतवादी दॄष्टीकोण तयार होतोय.

नैतिकतेच्या कल्पना सैलावल्यात वगैरे बोलण्यात अर्थ नाही. तर आपण करतो ते बरोबर असा एक अहंगंडं आढळतो. आपण केलेल्या प्रत्येक अनैतिक कृत्याला आता समर्थन देता येऊ शकतं. लांबचा विचार करण्याची क्षमता हरवत चाललीय. बुद्धीमान लोक वाढलेत , शहाणे कमी होत चाललेत.

उद्या दुस-याच्या पैशाचा मोह निर्माण होईल. मग ते मिळवणार का आपण ? कायद्याने ती चोरी ठरते म्हटल्यावर शिक्षेच्या भयानं आपण ते विचार दाबून टाकतो. पैशाची गरज तर असतेच.. अर्थात ज्यांना संधी मिळते ते भ्रष्टाचार वगैरे मार्गाने पैसे लुबाडतातच. त्यात अनैतिक काही आहे हेच आता लोकांना मान्य नाही..

कुणाला समाजवणार आणि कोण ? करिअर, पैसा, स्पर्धा या सगळ्यात संस्कारमूल्यं क्षीण होताहेत असं म्हटलं तर चालेल का ? काय वाटतं ?

गुलमोहर: 

२० च्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात अश्या पत्रिका असत. तशी बघायला मिळणे सहजशक्य नाही आता. भाइसंमं, पुणे येथे किंवा जुन्या दस्तऐवजांमधे मिळू शकेल.

भरतजी, बरोबर...... पण वरच्या पोस्टवरून थोडे कनफ्युजन झाले होते म्हणून लिहिले......
अर्थात, पुर्वी समाज हा परीघ मोठा होता... त्यात घरचे, नातेवाईक, रहातो ते गाव असे बरेच काही समाविष्ट होते त्यामुळे विरोधाचे प्रमाण प्रचंड होते.....

आज समाज हा परीघच ज्याच्यात्याच्यापुरता मर्यादित होत चाललाय..... माझा समाज हा फक्त माझ्या उंबरठ्याच्या आतच आहे अशी वृत्ती दृढ होत चाललिये आणि ती एका अर्थाने बरोबरही वाटते. त्यामुळे पुर्वीइतके समाजाचा दबाव किंवा त्याची भिती राहिलेली नाही...... त्यामुळे मला जे योग्य वाटते ते मी करेन, मग कदाचित माझ्या पार्टनरला विश्वासात घेऊन राजरोसपणे असे संबंध ठेवेन किंवा लपवून ठेवेन, पण निदान घराबाहेरच्या समाजाला अश्या बाबतीत खिजगणतीतही न धरणे वाढत चाललय..... हरकत नाही.

भरतला अनुमोदन!! माझ्या आजोबांकडून एकदा असा उल्लेख मी ऐकला होता तसेच त्यांच्याजवळ असलेली अशी एक पत्रिका बघितली सुद्धा होती.

भुंगाजी, व्यक्तिस्वातंत्र्य म्हणतात ते हेच असावे बहुधा. आता जोडीने स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार हे विधान आलेच.

आज समाज हा परीघच ज्याच्यात्याच्यापुरता मर्यादित होत चाललाय..... माझा समाज हा फक्त माझ्या उंबरठ्याच्या आतच आहे अशी वृत्ती दृढ होत चाललिये आणि ती एका अर्थाने बरोबरही वाटते. त्यामुळे पुर्वीइतके समाजाचा दबाव किंवा त्याची भिती राहिलेली नाही...... त्यामुळे मला जे योग्य वाटते ते मी करेन, मग कदाचित माझ्या पार्टनरला विश्वासात घेऊन राजरोसपणे असे संबंध ठेवेन किंवा लपवून ठेवेन, पण निदान घराबाहेरच्या समाजाला अश्या बाबतीत खिजगणतीतही न धरणे वाढत चाललय..... हरकत नाही.

>>>> अगदि, अगदि. आणि कोणी हरकत घेऊन हे थांबणारे का?
'जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात!'

आज समाज हा परीघच ज्याच्यात्याच्यापुरता मर्यादित होत चाललाय

थोडेसे अवांतर - विषयाला सोडून. पूर्वी समाज म्हणजे आपले कुटुंबीय , नातेवाईक, जातीतले लोक, शेजारी इ.
आता यात काही गळले तर काहींची भर पडली. म्हणजे मुंबैकरांचे फ्रेंड्स किती असा एक जुना जोक आहे. शाळेतले, कॉलेजातले,ट्युशन क्लासमधले, कॉलनीतले, बसमधले, ट्रेनमधले, ऑफिसातले आणि आता नेटवरचे. संबंध असण्याची खूण म्हणजे तुम्ही बरेच दिवस गायब असलात तर तुमची चौकशी होणे. याचा अर्थ आपल्या खाजगी आयुष्यात यांची ढवळाढवळ केली खपवुन घेतली जाईल असे नाही.
माझी एक कलीग तिच्या सासूसासर्‍यांना ज्या चीजा खाल्लेल्या आवडत नाहीत त्या सरळ बाहेरून आणून आपल्या शयनकक्षात नवर्‍याच्या सोबतीने खायची.
(आता प्रत्येक खोलीत एक टीव्ही असतो, तसा फ्रीज पण येणार की काय?)

आधी आपला कुणी नातलग भेटला तर त्यांच्या घरच्यांची पण चौकशी व्हायची.
माझे कझिन्स फेबु वर भेटले तर त्यांना माझ्या आईअवडिलांची आठवण काही येत नाही, की हे आपले नातेवाईक आहेत. बहुतेक फेबु वर कोणीही फ्रेंड म्हणजे फक्त फ्रेंड.

विवाहबाह्य संबंध हे व्यक्ती आणि परिस्थितीसापेक्ष असतात असे मला वाटते.
पण या मध्ये जर फसवणूक आणि खोटेपणा असेल तर मात्र मला ते चूक वाटते. (मला वाटते म्हणजे मी फोडून काढणार :))
पण जर ह्यामध्ये फसवणूक नसेल ... तर प्रश्नच नाही ना .... ओपन मेरेज हा एक पर्याय आहेच ... नसेल जमणार तर घटस्फोट एक पर्याय आहेच ...
आणि तसेही लग्न करावेच असे काही कंपल्सरी नसतेच.

बेफिकीर यांच्या प्रतिसादातिल त्यांचे संबंध मला तरी अनैतिक किंवा विवाहबाह्य वाटत नाहीत ... माझ्या मताने विवाहसंस्था मित्र-मैत्रीण ह्या संबंधांना गैर मानत नाही.

विवाहबाह्य संबंध हे चुकीचेच व टाळलेच पाहिजेत अणि टाळता आलेच पाहिजेत अशी ठाम मते वाचायला मिळाली. काही स्टेप्स फॉलो केल्याने असे संबंध टाळता येत असतील, तर प्रत्येक लग्न यशस्वी आनि दोन्ही जोडीदार सारखेच सुखी व समाधानी होण्यासाठी पण आज्ञावली असायला हवी. इथे विवाहबाह्य संबंधांचे समर्थन अजिबात करत नाही. तर या गोष्टी ठरवूनच होत असतील असे नाही, एवढेच सांगायचे आहे.

भरतजी, ठरवून होत नाहीत हे बरोबर, पण आपण या प्रकारात ओढले किंवा गुंतत जातोय एवढे त्या व्यक्तींना नक्कीच कळत असतं...... इतके कुणी स्वतःच्या भावनांबाबत अनभिज्ञ नसतं..... !

अगदी ५ वर्षांपुर्वीपर्यंत आपण पाश्चात्यांना हसत होतो, काय हे लोक आपल्या लहान मुलांची काळजी नाही, अगदी ३ ४ वर्षाच्या मुलालाही स्वतंत्र बंक बेडवर झोपवतात आपल्याबरोबर नाही..... पण आता हे चित्र आपल्याकडेही दिसतच ना........

हळूहळू आपल्यापुरता "समाज" हा आपल्या "बेडरुमपुरताच" सिमित होणार आहे...... माझ्या घरातल्या मला "अ‍ॅलॉट" असलेल्या रुमबाहेर माझा समाज नाही त्यामुळे मला त्याची पर्वा करायची गरजच नाही...... हे होऊ लागलय....... नांदी सुरू झालिये......!!!

नमन नटवरा विस्मयकारा, आत्मविरोधे कुतुहलधरा !
या नांदीमधेच अशी पण काहीतरी ओळ आहे,
विवाह करूनी मदन जाळीला !!!

(विवाह करूनी मदन जाळीला>>> Rofl पाळला म्हणायचे असावे बहुतेक .

भूषण कटककर यांची अत्यंत विनोदी पोस्ट वाचून तुफान करमणूक झाली, धन्यवाद >>> व्यक्तीगत टीका नको . विषयावर बोलता येत नसल्यास मौन पाळा .)

बेफीकीरांच्या दोन्ही पोस्ट सेन्सीबल वाटल्या !

भु.क. यांनी जे लिहिले आहे ते नक्की विबासं आहेत की नाही हे त्यांनाच माहित. कारण नुसते मैत्रीच्या पातळीवर असतील तर चोवीसच काय शेकडो असले तरी काय फरक पडणार आहे. Uhoh

अगदी ५ वर्षांपुर्वीपर्यंत आपण पाश्चात्यांना हसत होतो, काय हे लोक आपल्या लहान मुलांची काळजी नाही, अगदी ३ ४ वर्षाच्या मुलालाही स्वतंत्र बंक बेडवर झोपवतात आपल्याबरोबर नाही..... पण आता हे चित्र आपल्याकडेही दिसतच ना........<<<
काय आहे की दोन्ही पद्धतींमधे फायदे आणि तोटे आहेत. पण तो हा विषय नाही.

समाज काय म्हणेल याला दुर्लक्षित करून आपल्याला जे पटेल तेच करणे/ करता येणे हे जर घडले नसते तर अनेक चांगले, महत्वाचे आणि गरजेचे बदल घडले नसते. उदा: विधवाविवाह, स्त्रीशिक्षण असे अनेक.
त्याबरोबर काही नकोसे बदल पण घडलेत ते स्वीकारावे लागणारच. कुठलाच समाज/ नितीनियम हे १००% उत्तम असू शकत नाहीत. ना जुना ना आत्ताचा.
पण तरी विबासं ही आत्ताची गोष्ट नव्हे हे परत एकदा. आत्ता फक्त ते उघडपणे होऊ शकतं इतकंच. चोरीछिपे काही करण्यापेक्षा समजून उमजून उघडपणे गोष्टी घडणं हे एकुणात समाजाच्या स्वास्थ्यासाठीही गरजेचंच आहे.

>>हळूहळू आपल्यापुरता "समाज" हा आपल्या "बेडरुमपुरताच" सिमित होणार आहे...... माझ्या घरातल्या मला "अ‍ॅलॉट" असलेल्या रुमबाहेर माझा समाज नाही त्यामुळे मला त्याची पर्वा करायची गरजच नाही...... <<
नव्हे. समाज हा माझ्या बेडरूमबाहेर आहे आणि माझ्या बेडरूममधल्या लोकांनाच (जोडीदार व इतर गुंतलेल्या व्यक्ती) बेडरूममधे काय चालतं याबद्दल मतप्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. समाजाची सत्ता बेडरूमच्या आत येऊ शकत नाही (व्हायोलन्स, फसवणूक, बेजबाबदारपणा हे यातही अपवाद कारण माणुसकीच्या नियमांवर ते कधीही गुन्हेच असतात). अशी धारणा होत चाललेली आहे. आणि ती बर्‍याच अंशी योग्यही आहे.

इथे जितक्यांना वाटतंय 'विवाहबाह्य संबंध असावेत', त्यांनी अशी वेळ आपल्यावर आली तर काय होईल हे फक्त इमॅजिन करुन पहा.

बाकी चालुद्यात.

व्यक्तीगत टीका नको . विषयावर बोलता येत नसल्यास मौन पाळा>>> मी फक्त त्या पोस्टला हसतो आहे, व्यक्तीवर नाही ( तशी इच्छाही नाही!)
आणि प्रसादपंतजी, इथे मी मौन पाळावे की अजून कुणाला त्याची उठाठेव करु नका.

इथे जितक्यांना वाटतंय 'विवाहबाह्य संबंध असावेत', त्यांनी अशी वेळ आपल्यावर आली तर काय होईल हे फक्त इमॅजिन करुन पहा.

ते इमॅजिन केल्यामुळेच बरेच जण वाटत असुनही अस काही करू शकत नाहीत.

>>>

योडी , महेश ....तुम्ही म्हणता तसे नाहीये ...श्रीमंत थोरल्या बाजीरावांसारख्या प्रचंड कर्तृत्ववान पुरुशालाही इतका शुल्लक विषय घेवुन समाजाने वेठीला धरले तिथे सर्वसामान्यांची काय कथा ? ह्या दहशतीने अस काही करू शकत नाहीत.

प्रसाद, आम्ही व्यक्तिगत टिका करत नाही. फक्त त्यांच्या पोस्टबद्दल बोलतोय. पण अन 'बेफिकीर' म्हणजे तू नव्हे. त्यांची बाजू मांडायला त्यांनी तूला अपॉईंट केले असेल तर खरोखर क्षमस्व. विषय गंभीर आहे. उगाच त्यावर आपसातले वाद नको. बाकी ज्याची त्याची मर्जी.

जण वाटत असुनही अस काही करू शकत नाहीत.
>>
महेश, यातच सर्व आलं ना मग.

समोरच्याची फसवणुक करुन जर तुम्ही आयुष्य मजेत घालवताय तर त्या आयुष्याला काही अर्थ नाही असं मला तरी वाटतं.

इथे जितक्यांना वाटतंय 'विवाहबाह्य संबंध असावेत', त्यांनी अशी वेळ आपल्यावर आली तर काय होईल हे फक्त इमॅजिन करुन पहा.<<<
असावेत की नसावेत हा मुद्दाच नाहीये माझ्यामते.
माझ्याच आधीच्या एका पोस्टमधलं हे परत.
आपल्या जोडीदाराने जे केलेलं आपल्याला चालणार नाही ते आपण करू नये इतका साधा न्याय पाळून, गुंतलेल्या कोणालाही(जोडीदार, दुसरी व्यक्ती इत्यादी) न फसवता/ विश्वासात घेऊन कोणी काय करत असेल तर बाकीच्यांनी त्यासंदर्भात मतप्रदर्शन करायची काय गरज?
माझ्यामते तरी हा मुद्दा आहे.

श्रीमंत थोरल्या बाजीरावांसारख्या प्रचंड कर्तृत्ववान पुरुशालाही इतका शुल्लक विषय घेवुन समाजाने वेठीला धरले तिथे सर्वसामान्यांची काय कथा
>>
पण ह्याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने ह्या गोष्टीचं समर्थन करावं.

नी, तुला काय वाटतं ह्या संबंधांना जोडीदाराची संमंती असेल?

आणि तु म्हणतेयस त्याप्रमाणे चालत असेल तर बोलणंच खुंटलं.

योडे, समर्थन नाहीये पण असे संबंध असणारे अमुक तमुक आणि ढमुक असतात. त्यांच्यावर एरवीही कसा विश्वास ठेवावा इत्यादी तिखट पोस्टस कमालीच्या हास्यास्पद होत्या.
कोणाचे विबासं आहेत आणि नाहीत हे खात्रीशीररित्या आपल्याला कसं काय समजू शकतं? कुणाच्या सांगण्यावरून हे गृहित धरायचं?
जोवर माहित नसतं तोवर तो माणूस चांगला आणि माहित झाल्यावर तो माणूस वाईट हे तर फारच विनोदी.
लपवू शकणारा माणूस चांगला आणि न लपवणारा विनोदी असं झालं.

बाकी फसवणूक आणि जोडीदाराची फरफट केली जाणे याचे कधीच समर्थन नाही. पण असं न होताही जे विबासं असतील त्यात आपण बोलणारे कोण आणि का?

प्रश्न इथे समर्थनाचा नाहिये... पण आली एखाद्या बाजीरावाच्या जीवनात मस्तानी.... तर काय करावं हा निर्णय सर्वस्वी आणि सर्वस्वी बाजीराव - मस्तानीचा आहे. (यात बाजीराव - मस्तानी हे उदाहरण आहे, प्रत्यक्षात कोणीही दोघे असतील). त्या त्या परिस्थितीनुसार ते दोघे निर्णय घेऊन पुढे जातील, परिणामांची कल्पना त्यांनाही असणारच आहे......

मग, उगाच जसे प्रत्येकाने समर्थन करू नये हे खरय... तसेच तिसर्‍या व्यक्तीने उगाच त्याचा विरोध तरी का करायचा????

कोणाचे विबासं आहेत आणि नाहीत हे खात्रीशीररित्या आपल्याला कसं काय समजू शकतं? <<कोणाचं ऐकून तर निश्चितच नाही.

बाकी फसवणूक आणि जोडीदाराची फरफट केली जाणे याचे कधीच समर्थन नाही. पण असं न होताही जे विबासं असतील त्यात आपण बोलणारे कोण आणि का? >> हे कसं ओळखावं ?

Pages