विवाह बाह्य संबंध

Submitted by Kiran.. on 28 November, 2010 - 14:50

लिव्ह इन वर एक लेख वाचला. तिथं छान चर्चा चालू आहे. ती वाचतांना विवाहबाह्य संबंध हा विषय वेगळा आहे असं मत झालं म्हणून हा प्रपंच. इथं लिव्ह इन बद्दल चर्चा अपेक्षित नाही.

मित्राची बायको एका खाजगी इंशुरन्स कंपनीत मोठ्या पदावर आहे. बॉस आणि दुस-या एका महिलेचे संबंध आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. दोघंही विवाहीत आहेत. बॉसची आर्थिक स्थिती चांगली आहे तरीही तिच्या नव-यापुढं काहीच नाही. भावनिक गुंतवणूक वगैरे काहीही प्रकार नाही. कामाच्या बहाण्याने त्यांना बाहेरगावी जाता येतं. ही दिसायला वगैरे आहे. बॉसच्या घरीही काहीच प्रॉब्लेम नाही तरीही दोघांमधे संबंध निर्माण झालेत...

एक प्रौढ कुमारिका ओळखीची आहे. तरूणपणी सौंदर्याचा अभिमान असल्यानं खूप जणांना नकार दिले. अपेक्षा खूप होत्या. तडजोड केली नाही. आता वय उलटलं...एका विवाहीत पुरूषाबरोबर संबंध जोडलेत. त्याला त्रास देते. घरी जाऊन बायकोला मारहाण वगैरे प्रकार झाले... त्या प्रौढ कुमारिकेला आपण माफ करू, पण ज्याने तिचा फायदा घेतलाय त्याचं काय ? सोन्यासारखा संसार आहे. काहीच गरज नव्हती.

एका मित्राला फिरतीवर रहावं लागतं. आताशा त्याला बायकोचे आणि सोसायटीतल्या एका इसमाचे संबंध असल्याचं कळालंय. त्यांना रेड हँड पकडलं. समज देऊन झालं. सुशिक्षित असल्यानं मारहाण वगैरे काही नाही. मुलांचा विचार करून खूप टेन्शन मधे असतो. मध्यंतरी बायकोलाही पश्चात्ताप झाला होता. पण आता पुन्हा पहिले प्रकार सुरू झालेत. आता कळालंच आहे तर... भीड चेपली गेलीय. सतत कुरबुरी आणि भांडणं चालू असतात. घटस्फोट कुणालाच नकोय हे ही विशेष.

वरील उदाहरणांमधे आपला जोडीदार कमी पडतोय असं काही नाही. लग्नाबाबत असमाधान असंही नाही. ती तक्रार नाही. विवाहाच्या बंधनात गरजा पूर्ण होत नाहीत हा प्रकारच नाही इथं... गरजा पूर्ण होत असूनही एक्स्ट्राची हाव.. या गोष्टींकडं कसं पाहणार ? परपुरूष किंवा परस्त्रीचं सुप्त आकर्षण कि ते शमवायला निर्माण झालेल्या संधी ? संयम सुटत चाललाय का ? सहज उपलब्ध होणारे एस्कॉर्टस, गिगोलो, पॉर्न मॉव्हीज, साहीत्य यामुळं संयम पाळणे फोल वगैरे आहे असं वाटतंय का ? पूर्वीसारखा अपराधीपणा, जोडीसाराला फसवत असल्याची बोच हे देखील दिसत नाही आता. माझ्या गरजा मी पूर्ण करतोय/ करतेय आणि जोडीदाराबरोबर सुखाने संसार देखील करतोय / करतेय असं काहीसं दिसून येतं..

समाजात झालेला बदल म्हणजे माहीत असूनही सहकारी त्याच्या / तिच्या घरी कळवत नाहीत. आपल्याला काय त्याचं हा उदारमतवादी दॄष्टीकोण तयार होतोय.

नैतिकतेच्या कल्पना सैलावल्यात वगैरे बोलण्यात अर्थ नाही. तर आपण करतो ते बरोबर असा एक अहंगंडं आढळतो. आपण केलेल्या प्रत्येक अनैतिक कृत्याला आता समर्थन देता येऊ शकतं. लांबचा विचार करण्याची क्षमता हरवत चाललीय. बुद्धीमान लोक वाढलेत , शहाणे कमी होत चाललेत.

उद्या दुस-याच्या पैशाचा मोह निर्माण होईल. मग ते मिळवणार का आपण ? कायद्याने ती चोरी ठरते म्हटल्यावर शिक्षेच्या भयानं आपण ते विचार दाबून टाकतो. पैशाची गरज तर असतेच.. अर्थात ज्यांना संधी मिळते ते भ्रष्टाचार वगैरे मार्गाने पैसे लुबाडतातच. त्यात अनैतिक काही आहे हेच आता लोकांना मान्य नाही..

कुणाला समाजवणार आणि कोण ? करिअर, पैसा, स्पर्धा या सगळ्यात संस्कारमूल्यं क्षीण होताहेत असं म्हटलं तर चालेल का ? काय वाटतं ?

गुलमोहर: 

भोग ले भोग ले ...हर्षा, भोग ले>>>>

पंत मी ते असे वाचले...

भोग जे भोगले...., हर्षे भोगले ! (हर्षे: आनंदाने) Proud

भट साहेबांची एक गझल : भोगले जे दु:ख्ख त्याला ...ह्यावरुन हे घ्या

भोगले जे हर्श त्याला *क्स म्हणावे लागले |
भोगले मी इतके सारे की टॅक्स भरावे लागले ||

भोगले मी इतके सारे की टॅक्स भरावे लागले || >>>>>

पंत, अहो काय टॅक्सी घेऊन गेला होतात की काय????? Rofl

<<<अग्निकुंड समो नारी | घृतकुंभसमो नरः |>>>
नारी घृतकुंभासम आणि नर अग्निकुंडासम झाला तर जगाचा अंत अणखी जवळ येईल का? रामायणात शूर्पणखेने रामावर भाळण्याचे अणि महाभारतात द्रौपदीचे मन कर्णासाठी पाघळण्याचे दाखले आहेत.

आपल्या वेगवेगळ्या गरजा वेगवेगळ्या ठिकाणाहून पूर्णं करून घेण्यासाठीही विवाहबाह्य संबंध जुळत असतील का? म्हणजे संसार नातीगोती सांभाळण्यासाठी लग्नाचा जोडीदार. भावनिक /बौद्धिक/लैंगिक गरजांसाठी आणखी कुणी.

कार्यालयांत जुळणार्‍या लग्नबाह्य संबंधांचे प्रमाण जास्त असेल, पण ग्रामीण भागात (शहरातही) नात्यातच असे संबंध जुळण्याचे प्रकार होतातच. मुंबईत अशाच एका नात्यातल्या विवाहबाह्य संबंधाची परिणती पतीने पत्नीचा सुपारी देऊन खून करण्यात झाली होती.

लग्नाबाबत असमाधान असंही नाही. ती तक्रार नाही. विवाहाच्या बंधनात गरजा पूर्ण होत नाहीत हा प्रकारच नाही इथं... गरजा पूर्ण होत असूनही एक्स्ट्राची हाव.. या गोष्टींकडं कसं पाहणार ? परपुरूष किंवा परस्त्रीचं सुप्त आकर्षण कि ते शमवायला निर्माण झालेल्या संधी ? संयम सुटत चाललाय का ? सहज उपलब्ध होणारे एस्कॉर्टस, गिगोलो, पॉर्न मॉव्हीज, साहीत्य यामुळं संयम पाळणे फोल वगैरे आहे असं वाटतंय का ? पूर्वीसारखा अपराधीपणा, जोडीसाराला फसवत असल्याची बोच हे देखील दिसत नाही आता. माझ्या गरजा मी पूर्ण करतोय/ करतेय आणि जोडीदाराबरोबर सुखाने संसार देखील करतोय / करतेय असं काहीसं दिसून येतं..

हि विवाहबाह्य संबंधाची कारणं आहेत हे लक्षात येतय, पण अशा परिस्थितीत दुसरया जोडीदाराने काय करावे ? कसे वागावे ?
आपल्या जोडीदाराचे प्रेम मिळवण्याचे प्रयत्न ? की 'टेम्पररी फेज' आहे असं समजुन त्याकडे दुर्लक्ष करुन, जोडीदार परत येईल याची वाट पहाणं? की दोघांनी मिळुन उभारलेल्या संसार मोडुन सरळ घटस्फोट ?
की अजुन काही...?

कोमल अन साधना तुमच्या पोस्टीला १००% अनुमोदन. अश्या बर्‍याच विवाहबाह्य संबंध ठेवणार्‍या लोकांना मी जवळून पाहीलं आहे. Uhoh दुर्दैव एवढच कि क्षणिक सुखाच्या मृगजळामागे धावताना , हातचं सुख गमावून बसतात.

म्हणजे संसार नातीगोती सांभाळण्यासाठी लग्नाचा जोडीदार. भावनिक /बौद्धिक/लैंगिक गरजांसाठी आणखी कुणी. >>> हे असं मी जवळुन बघितलयं. तिचा नवरा क्लर्क आहे, हा उच्चशिक्षित. तिला बौद्धिक आकर्षण, जे नवरा नाही पूर्ण करु शकत. म्हणुन ती त्याच्यात गुंतली. याची बायको त्याला नाही समजुन घेत, म्हणुन तो हिच्यात भावनिकदृष्ट्या गुंतलाय. किती दिवस चालेल, नाही माहित. पण त्यात त्यांना आनंद मिळतोय.
>>>>माझ्या गरजा मी पूर्ण करतोय/ करतेय आणि जोडीदाराबरोबर सुखाने संसार देखील करतोय />> अशीच भावना दोघांची आहे.

अश्या बर्‍याच विवाहबाह्य संबंध ठेवणार्‍या लोकांना मी जवळून पाहीलं आहे. >>>>>

सुकि, पुर्वी असे प्राणी दुर्मिळ होते. आता जिकडेतिकडे दिसू लागलेत.

भावनिक /बौद्धिक/लैंगिक गरजांसाठी आणखी कुणी असताना, जोडीदाराबरोबर केलेला संसार सुखाचा कसा असु शकतो ?

हे असे संबंध आपण हल्ली आजुबाजुला अगदी ओळखितही बघतो.....

इथे हल्ली या प्रकाराचे प्रमाण वाढले आहे आणि ते का यावर कारणमिमांसा आणि मतप्रदर्शन व्हावे ही विनंती. ज्याने चर्चा घडून येईल. माहितीतल्या कथा शेअर करून काही विशेष होणार नाही. त्या कमी अधिक प्रमाणात सारख्याच असणार.......

प्रश्न असा आहे की, पुर्वीपासून असे संबंध आहेतच..... पण आता प्रमाण प्रचंड वाढलय..... आणि ते का???

हे असे का घडत असावे??????

तज्ज्ञ? कोणत्या निकषावर?
लग्न जुळवतानाही दोघेजण समाजाच्या/नातलगांच्या मतांपेक्षा स्वतःच्या मताला जास्त महत्त्व देऊ लागलेत, त्याचेच हे पुढचे पाऊल. असे सगळ्याच क्षेत्रत होतेय की. करिअर, मुले होऊ देणे , त्यांची संख्या, घर घेणे, इ.इ. (आता आम्हाला नातू हवा असा हट्ट कुणी पुरवते का?) हे निरीक्षणाधारित.

संसार सुखाचा कसा असु शकतो
संसाराची व्याख्या त्यांच्यासाठी आपण आपल्या मुलांना व सर्व नातेसंबंधांना पुरेसा न्याय देणे असा असेल.

म्हणजे संसार नातीगोती सांभाळण्यासाठी लग्नाचा जोडीदार. भावनिक /बौद्धिक/लैंगिक गरजांसाठी आणखी कुणी.

कधी वाटते यात कितपत आणि काय चुकीचे आहे? इथे लग्न हे शेवटी स्टेटस मॅरेज असते, जातपात/ घराण्याचे नाव, मुलाचे/मुलीचे शिक्षण, कुटूंबाचा आर्थिक्/सामाजिक स्तर इ.इ. बाहेरुन दिसणा-या गोष्टी पाहिल्या जातात, फक्त शारिरीक आणि बौद्धिक compatibility सोडुन. मुलामुलीच्या मोठाल्या डिग्र्या हे बौद्धिक स्तराचे निदर्शक समजले जाते आणि शारिरीक जे काही आहे ते सगळे लग्नानंतर आपोआप जमते असा सगळ्यांचा समज असतो. लग्न झाल्यानंतर नव्याची नवलाई संपली की माणुस त्याला मुळात ज्याची ओढ आहे ते मिळालेय का हे बघायला लागतो (हे ब-याचदा नकळतच घडत असते). आता ज्याची ओढ आहे ते मिळत नसले तरी जे मिळालेय ते संस्कार, कुटूंब, समाज, जबाबदारी या ओझ्याखाली धकवत जन्म काढावा काय? उत्तर बहुतेक जण तसाच काढतात हे आहे. आपल्यासारखीच आवड असलेली भिन्नलिंगी व्यक्ती जरी भेटली तरी स्वत:चा आहे तो सेटप मोडुन त्या व्यक्तीबरोबर राहायचे धाडस कोणी करत नाही. (त्याला कारण परत हेच - संस्कार, कुटूंब, समाज, जबाबदारी) असे धाडस तेव्हाच केले जाते जेव्हा आहे त्या सेटपमध्ये घुसमट अगदी सहनशक्तीपलिकडे जाते. आणि हे सहनशक्तीपलिकडे जाणे केवळ ती व्यक्तीच जाणु शकते. बाकीचे फक्त तो नीटनेटका सेटप पाहतात आणि सगळे काही चांगले असताना ह्या बाईला/बुवाला ही अवदसा का आठवली म्हणुन आश्चर्य व्यक्त करत राहतात.

प्रश्न असा आहे की, पुर्वीपासून असे संबंध आहेतच..... पण आता प्रमाण प्रचंड वाढलय..... आणि ते का???

याचे एक कारण म्हणजे समाजाची बंधने आता पहिल्याइतकी जाचत नाहीत. पुर्वीसारखे घराबाहेर पडल्यावर शेणगोळे आणि दगड कोणी मारले तर पोलिस तक्रार करता येते Happy पुर्वीसारखे आपण आजुबाजुच्या लोकांवर जास्त अवलंबुन राहात नाहीत. स्त्रिच्या आर्थिक स्वयंपुर्णतेमुळे पुरूषाला पहिल्यासारखी घराची पुर्ण जबाबदारी आपल्यावरच आहे असे वाटत नाही. त्याच्या अनुपस्थितीतही घर व्यवस्थित चालते. आपण आता आजुबाजुच्या लोकांवर अवलंबुन राहिलो नाही तरी पहिल्यासारखे स्त्रीपुरूष एकत्र येण्यावर निर्बंध राहिले नाहीत. ऑफिसात ग्रृपमध्ये स्त्रीपुरूष दोघेही असतात आणि त्यात काही वावगे घडते असेही नाही. अशा गृप्समुळे विचारांची देवाणघेवाण वाढते, आपल्यासारखे दुसरे कोणी आहेत याचा शोध लागतो. यात स्त्रीपुरूष दोघेही येतात. अजुनही बरीच कारणे असतील.

साधना अनुमोदन....... योग्य निरिक्षण...... अश्या संबंधात किंवा अगदी घटस्फोटाच्या केसेसमधेही वरवर दिसणारी कारणे आणि प्रत्यक्ष कारणे ही नक्कीच वेगळी असतात...... प्रत्यक्ष कारणे त्या दोन व्यक्तीच अनुभवू आणि जाणू शकतात.... Sad

चला चर्चेला सीरीयस वळण लागले अन गंभीर चर्चा होत आहे बघुन चांगले वाटले !

नारी घृतकुंभासम आणि नर अग्निकुंडासम झाला तर जगाचा अंत अणखी जवळ येईल का?

>>> हो . नक्कीच भरत जी !

बाकी भुंग्याच्या वरील सर्व पोष्टींना अनुमोदन .

पण मागे एका दारु विरोधी धाग्यावर मी एक प्रश्न विचारला तोच इथे ही लागु पडतो ...

" ह्याला ( विवाहबाह्यसंबंधाला) हरकत का ? "

वर कोणी तरी आधीच हे मत मांडलय की विवाह ही मुळातच प्रचंड कृत्रीम संस्था आहे ....मग जे ..( कदाचित ) नैसर्गिक आहे ...त्याला विरोध का ? Uhoh

आहे त्या सेटपमध्ये घुसमट अगदी सहनशक्तीपलिकडे जाते. आणि हे सहनशक्तीपलिकडे जाणे केवळ ती व्यक्तीच जाणु शकते. >> सुवर्णमोलाचे वाक्य.
असे संबंध ठेवताना पहिले जरी थ्रिल वाट्ले तरीही त्या समीकरणातून बाजूला फेकल्या गेलेल्या जोडीदारास
डिप्रेशन, आत्मविश्वास गमावून बसणे असे त्रास होतात. नात्यात बांधलेले असूनही एका विचित्र एकटेपणाचा अनुभव येतो. संसाराचा सुखी आनंदी सेटप नष्ट होतो. मुलांना अतिशय त्रास होतो. शिवाय असल्या प्रकारात गुंतणे म्हणजे जोडीदाराशी असलेल्या कमिट्मेंट्बरोबरच नव्हे तर स्वत:च्या बेसिक कोअर व्हॅल्यूज जसे
स्वाभिमान, सेल्फ रिस्पेक्ट, स्वतःची अस्मिता अगदी बेसिक वैयक्तिक नैतिकता याबरोबर तडजोड करणे होय. ही स्वतःची फसवणूक त्या क्षणिक सुखाच्या आनंदासाठी करायची म्हणजे अगदी हाइट ऑफ डेस्परेशन आहे. त्यापेक्षा सरळ सांगून वेगळे होणे परवड्ले. थोडासा मनोनिग्रह दाखिवला तर हे नैतिक अधःपतन थांबविता येते. नाहीतर काय एक शॉवर घेतला कि सारे स्वच्छ! जास्त विचार करायचा नाही.
पर्याय निवडायचा क्षण आधी आहे. नंतर फक्त जस्टिफाय करणे.

लग्न झाल्यानंतर नव्याची नवलाई संपली की माणुस त्याला मुळात ज्याची ओढ आहे ते मिळालेय का हे बघायला लागतो (हे ब-याचदा नकळतच घडत असते). आता ज्याची ओढ आहे ते मिळत नसले तरी जे मिळालेय ते संस्कार, कुटूंब, समाज, जबाबदारी या ओझ्याखाली धकवत जन्म काढावा काय?

>>> दोन भिन्न लोकं एकत्र येणार तेव्हा दोघांच्या गरजा वेगवेगळ्या असणार, त्या काही वर्षांनी बदलणार्...त्याचा शोध ही नकळत्...समविचारी भेटल्यावर लागणार हे खरंय...पण त्या बदलेल्या गरजांसाठी, 'दुसरा' पर्याय मिळवण्याआधी, जोडीदाराबरोबर आपल्या बदलेल्या गरजांविषयी बोलुन, त्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करुन बघायला हवं...अगदी पुर्णपणे नाही तरी काही अंशी तरी घुसमट कमी व्हायला मदत होईल.....तरीही ओझ्याखाली जन्म काढतोय असं वाटत असेल तर जोडीदाराशी बोलुन, समजावुन... त्याच्या मनाची पुर्ण तयारी व्हायला, पुरेसा वेळ देऊन्...मग दोघांच्या संमतीने 'दुसरा' पर्याय मान्य करावा.

असे संबंध ठेवताना पहिले जरी थ्रिल वाट्ले तरीही त्या समीकरणातून बाजूला फेकल्या गेलेल्या जोडीदारास डिप्रेशन, आत्मविश्वास गमावून बसणे असे त्रास होतात.

खरेय... जोडीदारापैकी एक चोरीछुपे किंवा उघडपणे जसे जमेल तसे स्वतःला पाहिजे ते मिळवतो, तेवढ्यापुरता आनंद भोगतो आणि त्याचा त्रास मात्र दुस-याला सोसावा लागतो. त्याला स्वतःला त्रास तर होतोच होतो पण इतरांकडुनही त्रास सहन करावा लागतो.

मी सध्या बाजीराव मस्तानी मालिका बघते आहे ना, त्यातील काशीबाईंची धडपड बघवत नाही. तिची सासू व दीर तिला आधार देतात पण नणंद मस्तानीला आपलेसे म्हणते. अश्या परिस्थितीतील स्त्रीयांना कोठेही मन मोकळे करता येत नाही. तूच त्याला सुखी करत नसशील, तुझ्यातच कमी असेल तर तो बाहेरच जाणार, शिवाय असे पुरुष भयंकर कर्तृत्वान वगैरे असतील तर त्यांनी कमाविलेल्या पैशाकडे, मानमरातबाकडे बघून सासरचे पण त्याच्या मैत्रीणीलाच आपलेसे करू पाहतात. त्या बायकोची कुचंबणा त्यांना समजत तर नाहीच पण तिला अनुल्लेखाने मारले जाते.

बाजीरावास आपले काही चुकते आहे हेच पटत नाही. उच्च कोटीच्या विवाहबाह्य संबंधांच्या पायतळी असे कितीतरी उपेक्षितांचे नि:श्वास असतात. जर लफड्यात गुंतलेली बाई किंवा पुरुषास रूप व अ‍ॅबिलिटीच्या/ उपलब्ध असण्याच्या जोरावर आपल्याकडे खेचू पाहणारी बाई त्याच्या संसाराचा, वाट पाहणार्‍या पत्नि- मुलांचा विचार करेल तर तिचे पाय मागे वळतील पण असे होत नाही. लोकांचे शॉर्ट टर्म गोल्स असतात
त्यासाठी दुसर्‍याचे लाँग टर्म नुकसान झाले तरी त्यांना फिकीर नसते.

घरातील बायको साध्या मागण्या, नको असलेली रिमाइंडर्स करते म्हणून ती नवर्‍याला नकोशी होते तर कमी वेळ भेटणारी मैत्रीण कायम गोड लाडिक वाट्ते. अवघड तिढा आहे.

माझ्या बिल्डिंग मध्ये एक राजकीय गुंड राहतो त्याने पहिल्या मजल्यावरील एका विवाहितेस असेच गुंतविले तिचा नवरा छोटे बाळ वार्‍यावर पडले. ती अगदी राणी सारखी त्याने उघडून दिलेल्या दुकानात
बसत असे. शेवटी दुकान बंद पडले. ती व नवरा जागा विकून गेले बिल्डिंग मधील बागेत ते बाळ मोलकरणी बरोबर कितीतरी वेळ खेळत असे. त्याला साफ करायला आई नाही. असे होत असे.

घरातील बायको साध्या मागण्या, नको असलेली रिमाइंडर्स करते म्हणून ती नवर्‍याला नकोशी होते तर कमी वेळ भेटणारी मैत्रीण कायम गोड लाडिक वाट्ते. अवघड तिढा आहे.

अश्विनी मामी... सौ टके की बात कही. सुंदर पोस्ट
( सर्वात शेवटी असल्याने आधी वाचली. इतरांच्या सावकाश पाहीन..छान लिहीताय सगळे)

सांज , एवढेच कारण असू शकते असे मला तरी वाटत नाही. लग्नाआधी प्रेमविवाहाला विरोध झाल्यावर मग घरच्यांच्या सांगण्यावरून कुण्या एका मुलीशी लग्न करायचं अन मग माझं प्रेम अमर आहे , मी तीच्यावरच प्रेम करेल. असं सांगून विवाहबाह्य संबंध ठेवायचे कधी कधी बायकोपासून लपवून तर कधी तीला खूले आम सांगून. Uhoh

एकाच घरात विवाहातून संबंध अन विवाहबाह्य संबंध ठेवणारे त्रिकूट पाहीले आहे मी. अजूनही ते संबंध तसेच आहेत. पुर्वी विरोध झाला पण आता तो निवळला.

मामी ,

बाजीरावास आपले काही चुकते आहे हेच पटत नाही.
>>>

मी ती सीरीयल बघत नाही..पण राउ जेव्हा वाचली होती तेव्हा त्यात बाजीरावांचे काही चुकत आहे असे मलाही वाटले नव्हते !

कर्तृत्ववान व्यक्तींना समाजाचे नियम बंधन कारक नसावेत ...
( नोट : इथे व्यक्ती म्हणले आहे फक्त पुरुश असे नाही )

Pages