यन्ना रास्कला (मायबोलीवर रजनी)

Submitted by मिल्या on 3 November, 2010 - 07:24

सध्या जिकडे तिकडे रजनी वन लाईनर्स धुमाकूळ घालत आहेत...

(मायबोलीसंदर्भातले) रजनी वन लाईनर्स एकत्र ठेवण्यासाठी हा धागा... या आणि ह्यात भर घाला Proud

जे स्वतःचे असटिल त्यामागे * लावायला विसरू नका

*रजनी अर्भाटापेक्षा बारीक आहे

*रजनी कडे चिनूक्साचे प्रताधिकार मुक्त छायाचित्र आहे

*रजनीचे बोलणे ऐकून पौर्णिमेला कानठळ्या बसतात

*रजनीने मीनू आज्जींचा पुलाव पचवला आहे

रजनी काय'बी' प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो.

रजनी 'बी' ला प्रश्न विचारू शकतो

*रजनीला नीरजाची पोस्टस 'उथळ व पांचट' वाटतात

*रजनीला झक्कींची सर्व पोस्ट्स समजतात

*रजनीला पेशव्याच्या कविता कळतात

रजनी केपी करंडकातून कॉफी पिऊ शकतो

*रजनीकडे अरुंधतीची टर उडवणारी 'पाटी' आहे

*रजनी काहीही न खाता पार्ल्यात पोस्टू शकतो

*रजनी रोज एक आख्खी कादंबरी टाईप करू शकतो

*रजनीला अ‍ॅडमिनचा आय पी अ‍ॅड्रेस माहीत आहे

*रजनी मायबोलीवर स्वतःचे पोस्ट डीलीट करू शकतो

आणि हा खास अर्भाट सरांचा

देव हा रजनीचा डुआय आहे.

रजनी आणि बाकीच्यांनी दिवे घ्यावेत ही विनंती Light 1 Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पॉल ऑक्टोपस अचुक भविष्यकथन करण्यापुर्वी त्याला रजनी स्वप्नात जाउन दॄष्टांत देतो.
>>
अहो तो ऑक्टोपस मेला. आता रजनीच्या दृष्टांतासाठी सगळ्या प्राण्यांमध्ये भांडणं लागलीयेत.

* अमेरिकेतील सिक्रेट जागा 'एरिआ ५१' हे रजनीची आहे. तिथे त्याचे हॉलिडे होम आहे.

रजनीकांत इंजीनीयरींग ची वाय वा द्यायला जातो आणि प्रिपेअर अँड कम नेक्स्ट ईयर अस एक्झामीनरला
सांगुन परत पाठवुन देतो...

+रजनीला क्रिकेट खेळताना बॅटींग करायची गरज लागत नाही, कारण बॉलर सगळे नो-बॉल टाकतो आणि टिम मॅच जिंकते.

+'यन्ना रास्कला' हा रजनीच्या यशाचा मुलमत्रं आहे.

+रजनीला मच्छर चावला तर मच्छराची सोंड मोडते आणि मच्छराला मलेरीया होतो.

+रजनीला कधी जेवण करायची गरज लागत नाही, तो स्वतःचे अन्न प्रकाश संश्लेषण द्वारे स्वतः बनवतो

+रजनीच्या घरचे अनारस्याच पिठ कधीच खराब होत नाही.

+रजनीच्या किचन मधे मिक्सर, ग्राईडंर सारख्या कोणत्याही फुडप्रोसेसरची गरज लागत नाही, कारण रजनीचा हात जगन्नाथ

+रजनीने पुस्तक चाळणे म्हणजे पुस्तक वाचणे आहे

+रजनी झुरळानां घाबरत नाही, झुरळे रजनीला घाबरतात.

+रजनीच्या पायाला लाल मुंग्या येतात.

+रजनीच्या केसात कधीच ऊवा होत नाहीत

0704cartoon.jpg

* रजनीने ए. के. हंगल आणि चंद्रकांत गोखले यांना तरुणपणी चित्रपटांत काम करताना पाहीलंय.

एकदा रोनाल्डोने रजनीला बोटावर फूटबॉल फिरवून दाखवला. उत्साहाने तो म्हणाला मी कितीही वेळ हा बॉल असा फिरवू शकतो. आपण ट्राय करणार का ?

रजनीने हसून म्हटलं..." येन्ना रास्कल, माईंड इट.. ही पृथ्वी कशी फिरतिये ? "

* एका व्रात्य आणि खोडकर मुलाला रजनीने समज देऊन चांगले काम कर अशी शिकवण दिली. आज आपण त्या मुलाला महात्मा गांधी या नावाने ओळखतो.

* ज्या दिवशी अशोक चव्हाणांनी रजनीऐवजी सत्यसाईबाबांना देव मानले तेव्हाच त्यांच्याबाबतीत समाजासमोर "आदर्श" उदाहरण येईल असे तज्ञांना वाटत होते..

* एका नवशिक्याने रजनीला योगा कसा करायचा हे सांगायचा उद्दामपणा केला, रजनीने त्याचा एक डोळा आणि मान पिरगाळली. दया आल्यावर आपल्या योगसामर्थ्याने त्याची मान पूर्ववत करून दिली. जग त्या नवशिक्याला बाबा रामदेव या नावाने ओळखते.

-सुपरमॅनने रजनीला माझ्याशी शर्यत लावतो का असं विचारलं. रजनी एका अटीवर तयार झाला आणि ती अट म्हणजे हारेल त्याने पँटच्यावरून अंडरवेअर घालायची... कोण जिंकलं हे सांगायला का पाहीजे ?

धमाल आहेत एकेक Lol

रजनीने एका लोहचुंबकाचे दोन तुकडे करून दोन मॅग्नेटिक मोनोपोल तयार केले आहेत.

रजनी फाईट हवेत फिरवतो तेव्हा तेथे मॅग्नेटिक फिल्ड तयार होते.

माबो: रजनीच्या मुक्तछंदातील गजलेवर बेफिकीर "मी पहिला" म्हणून प्रतिसाद देतात.

जर,
१+०=१
१*०=०
१-०=१
तर १/०=?
हा प्रश्ण रजनीकान्त ला विचारले असता रजनीकान्त म्हणाला, " I don't know."
तेव्हापासुन declare केले की, १/०="Not Defined"..!

पाककलेत रजनी

* रजनीला हव्या तितक्या तारांचा पाक हमखास करता येतो.

* रजनीला कुठल्याही दूधाचे, दही लावता येते.

* रजनीला कणीदार तूप कढवता येते.

* रजनीला जवस म्हणजेच अळशी म्हणजेच फ़्लॅक्स सीड्स हे माहीत आहे.

* रजनीला केक नेहमीच फ़ूगतो

* रजनीच्या शंकरपाळ्या आतून कच्च्या रहात नाहीत.

* रजनीला कणीक भिजवताना, पाणी किती टाकायचे ते माहीत आहे.

* रजनीला गोल भाकर्‍या थापता येतात आणि त्या भाकर्‍यांना कधी विरी जात नाही.

* रजनीला इडली डोश्याचे पिठ, अवनमधे आंबवावे लागत नाही.

* रजनीला सुशी, फ़ोर्शमाक, वासिबी, उगाली, खबूस इत्यादी इत्यादी शब्दांचे अर्थ माहीत आहेत.

* रजनीला पंजाबी कढी, सिंधी कढी, गुजराथी कढी, मराठी कढी, केरळी कढी, कर्नाटकी कढी शिवाय सोलकढी माहीत आहे.

* रजनीला बोलाचा भात, बोलाचीच कढी करता येते.

* रजनीला मांडे, गाकर, हातशेवया, सुतरफ़ेणी, गुळवणी, घावन घाटले, माडगं, महाद्या, मासवडी करता येते.

----------आणि म्हणून रजनी, पाककलेच्या बीबीवर कधी दिसत नाही.

संगीत रजनी

* ओ पी नय्यर च्या संगीतात लताने गायलेले गाणे, रजनीने ऐकलेय.
* सुमन कल्याणपूर आणि लताने एकत्र गायलेले गाणे, रजनीने ऐकलेय.
* लताने गायलेले कॅबरेचे दुसरे गाणे, रजनीने ऐकलेय.
* हृदयनाथच्या संगीतात आशाने गायलेले सोप्पे गाणे, रजनीने ऐकलेय.
* पंकज मलिकच्या संगीतात लताने गायलेले गाणे, रजनीने ऐकलेय.
* दिलीपकुमारसाठी लताने गायलेले गाणे, रजनीने ऐकलेय.
* मेरा नाम जोकर साठी लताने गायलेले गाणे, रजनीने ऐकलेय.
* गाईड साठी आशाने गायलेले गाणे, रजनीने ऐकलेय.
* लताच्या आवाजातील नाट्यगीते, रजनीने ऐकलीत.
* गाण्याच्या दरम्यान लताने सोडलेले उच्छवास, रजनीने ऐकलेत.
* लता आणि अनुराधा पौडवाल यांनी एकत्र गायलेले गाणे, रजनीने ऐकलेय.

- रजनीला श्याम मनोहर, किरण नगरकर आणि मेघना पेठे यांच्या कादंबर्‍या समजतात.

- रजनीला मुकुंद टांकसाळे व शिरिष कणेकरांचे विनोद समजतात आणि ते समजल्यावर तो हास्य क्लबमधल्या सदस्यांच्या एकत्रित विकट हास्यापेक्षा जास्त मोठ्याने हसू शकतो.

- रजनीने "या गोजिरवाण्या घरात"चे आतापर्यंतचे सर्व भाग पाहिलेत.

- रजनी मंगळाच्या पत्रिकेत वक्री असतो.

- शनीच्या राशीत रजनीमुळे रजनीसर्प योग होतो.

- रजनी यम आणि चित्रगुप्ताच्या पापपुण्याचा हिशोब ठेवतो.

* जेवढे म्हणून दिवाळी अंक प्रसिद्ध होतात, त्या सर्वांचे सगळे काही काम रजनीनेच एकहाती केलेले असते

रजनीने इन्फिनिटीपर्यंतचे अंक दोन दा मोजलेत.

न्यूटनने रजनीचे सिनेमे पाहून आपंण चुकलो अशी जाहीर कबुली दिलीय..

काही नमुने

रजनीला मारायला तीन गुंड येतात. रजनीकडे फक्त एक रामपुरी चाकू आणि रिव्हॉल्वर आणि त्यात एकच गोळी असते. न्यूटन विचार करतच होता कि आता हा मरणार..र्तितक्यात रजनीने समोरच्या गुंडाच्या दिशेनं चाकू फेकला आणि ति विशिष्ट अंतरावर असतांना त्या चाकूच्या पात्यावर गोळी अशी काही झाड्ली कि गोळी मधोमध चिरत गेली आणि एक भाग डावीकडे आणि एक उजवीकडे वळाला...

अशा रितीने त्याने तिघांनाही मारलं.

आणखी एका सीनमधे रजनी आणि खलनायक यांच्यामधे एक भिंत होती. ती इतकी उंच होती कि खूद्द रजनीदेखील उडी मारू शकत नव्हता. खलनायकाला मारणं अत्यावश्यक होतं पण हे अशक्य आहे असं न्यूटनला वाटत होतं. इतक्यात रजनीने आपलं पिस्तुल हवेत फेकलं आणि ते भिंतीच्या वर गेल्यावर आणि त्याची नळी योग्य दिशेला असतांना त्याने दुस-या बंदुकीतून त्याच्या ट्रिगर वर गोळी झाडली. व्हिलन खल्लास

न्यूटनने रजनीचा शेवटचा सिनेमा पाहीला त्यात त्याला ब्रेन ट्यूमर असतो. तो बरा होणार नाही असं डोक्टरने सांगितलेलं असतं. या सिनेमात सगळं न्यूटनला माहीत असलेलं शास्त्र होतं क्लायमॅक्सला मात्र व्हिलनची गोळी रजनीच्या डोक्यात शिरते आणि कानावाटे ब्रेन ट्यूमर घेऊन बाहेर पडते असा सीन होता. यानंतर न्यूटनने निराशेच्या भरात आत्महत्या केली.

Kiran
न्यूटनने रजनीचे सिनेमे पाहून आपंण चुकलो अशी जाहीर कबुली दिलीय..
>>
आरेरे रजनीने त्याला actually मदत केलेली. न्यूटन एक्दम यन्न रास्कला निघाला.

रजनीला आवडलेली सफरचंदे
१ ले सफरचंद त्याने ईवला दिले.
२ रे सफरचंद हिमगौरीने खाल्ले पण तिचे चुम्बन घेउन रजनीने तिला जिवंत केले.
३ रे सफरचंद रजनी झाडावर बसुन खात होता ते खाली पड्ले, ते न्युटन ला मिळाले.
४ थे सफरचंद त्याने लिबर्टीला स्टॅच्यु म्हट्ले तेंव्हा तिच्या हातातुन पडले आता त्या शहराला बिग अ‍ॅपल
म्हणतात आणि सणवारी रजनीला आवडते म्हणुन चॉकलेट लाउन काळी सफरचंद खातात.
५ वे सफरचंद त्याने अर्धे खाउन steve jobs ला दिले.

Pages