यन्ना रास्कला (मायबोलीवर रजनी)

Submitted by मिल्या on 3 November, 2010 - 07:24

सध्या जिकडे तिकडे रजनी वन लाईनर्स धुमाकूळ घालत आहेत...

(मायबोलीसंदर्भातले) रजनी वन लाईनर्स एकत्र ठेवण्यासाठी हा धागा... या आणि ह्यात भर घाला Proud

जे स्वतःचे असटिल त्यामागे * लावायला विसरू नका

*रजनी अर्भाटापेक्षा बारीक आहे

*रजनी कडे चिनूक्साचे प्रताधिकार मुक्त छायाचित्र आहे

*रजनीचे बोलणे ऐकून पौर्णिमेला कानठळ्या बसतात

*रजनीने मीनू आज्जींचा पुलाव पचवला आहे

रजनी काय'बी' प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो.

रजनी 'बी' ला प्रश्न विचारू शकतो

*रजनीला नीरजाची पोस्टस 'उथळ व पांचट' वाटतात

*रजनीला झक्कींची सर्व पोस्ट्स समजतात

*रजनीला पेशव्याच्या कविता कळतात

रजनी केपी करंडकातून कॉफी पिऊ शकतो

*रजनीकडे अरुंधतीची टर उडवणारी 'पाटी' आहे

*रजनी काहीही न खाता पार्ल्यात पोस्टू शकतो

*रजनी रोज एक आख्खी कादंबरी टाईप करू शकतो

*रजनीला अ‍ॅडमिनचा आय पी अ‍ॅड्रेस माहीत आहे

*रजनी मायबोलीवर स्वतःचे पोस्ट डीलीट करू शकतो

आणि हा खास अर्भाट सरांचा

देव हा रजनीचा डुआय आहे.

रजनी आणि बाकीच्यांनी दिवे घ्यावेत ही विनंती Light 1 Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रजनीकांत मिस्ड कॉलला उत्तर देऊ शकतो.

देवाला आश्चर्य वाटलं कि देव म्हणतो, 'ओह माय रजनीकांत' .

रजनीकांतला भारत सरकार भारतात काम केल्याबद्दल टॅक्स पे करते.

सुर्याला स्वतःच्या डोळ्यांपासुन वाचवायला रजनीकांत गॉगल वापरतो.

स्पायडर मॅन, सुपर मॅन, बॅटमॅन, जेम्स बाँड, शक्तिमान, क्रिश हे सगळे रजनीकांतला 'गुरु पौर्णिमे'दिवशी भेटतात.

रजनीकांत 'बिग बॉस ४' मध्ये आला आणि दुसर्‍या दिवशी,
"रजनीकांत चाहते है कि बिग बॉस कन्फेशन रुम मे आयें"

ईमेल मधुन साभार.

रजनी आणि त्याच्या गाजलेल्या भुमिका !

* दुष्मन मधल्या मीनाकुमारीच्या नवर्‍याची भुमिका, रजनीने केली होती.

* शोलेमधल्या मौसीच्या नवर्‍याची भुमिका, रजनीने केली होती.

* सर्वच खिलाडी मधल्या अक्षयकुमारच्या बॉडी डुप्लिकेटची भुमिका रजनीने केली होती.

* जुन्या आणि नव्या नागिन मधल्या मुख्य नागाची भुमिका, रजनीने केली होती.

* धर्मेंद्र, हेमामालिनीच्या माँ मधल्या मुख्य वाघाची भुमिका, रजनीने केली होती.

* हाथी मेरे साथी मधल्या, रामू हत्तीची भुमिका, रजनीने केली होती.

* दो आँखे बारह हाथ मधल्या, झुंजणार्‍या बैलाची भुमिका, रजनीने केली होती.

आणि सर्वात कहर म्हणजे

* रोबो मधल्या ऐश्वर्याची भुमिका रजनीने केली आहे.

एकदा रजनीसमोर एका सिंहानी डरकाळी फोडली...
ती ऐकून रजनी नी एक सुस्कारा सोडला...
तो ऐकून तो सिंह उडून बंगालच्या उपसागरात पडला आणि घाबरून पोहत पोहत एका बेटावर पोचला...
पहातो तर काय.. एवढं पोहल्यामुळे त्याचा कमरेखालचा भाग माशासमान झाला होता...

आज त्या बेटाला सिंहपूर आणि सिंहाला मर्लायन म्हणतात...

सिंहपुरात त्या सिंहाने रजनी महिम्याचे वर्णन केल्याने लोकं रजनीभक्त झाले आहेत...

एका भांडखोर, तामसी आणि स्वार्थी मुलीला एकदा रजनीने उपदेश केला होता. आपण आता तिला मदर तेरेसा या नावाने ओळखतो..

*रजनीची बाहूली म्हणजे अमेरीकेची लिबर्टी.
*रजनीला नायगरा फॉल्सचा शॉवर लागतो.

हा आधी आला आहे की नाही माहित नाही -
एकदा रजनीने शाळेला सुट्टी घेतली.. तेव्हापासून त्या दिवसाला रविवार म्हणतात..

* एकदा रजनीची झेब्राशी अपघाताने टक्कर झाली आणि झेब्रा जागीच चिरडला गेला. तेव्हापासून अपघात टाळण्यासाठी zebraa crossing सुरू झाले.

SMS..

Rajnikant once went to Bhopal n ate too much spicy food, then he silently passed a fart. and then the tragic day hapened which is known as "Bhopal Gas Tragedy"..

अमित Rofl

एकदा रजनी किल्ला बांधत होता,
आई ओरडेल म्हणून त्याने फक्त कंपाऊंड वॉल बांधला...
ग्रेट वॉल ऑफ चायना!
(SMS)

* Microsoft चे सगळे सोफ्टवेअर्स Bill Gates रजनी कडुन debug करून घेतो.

* IBM आणि Dell ला कोणता ही नवीन Server Design करायचे असल्यास ते रजनी कडे मदत मागतात

* समीर (सबीर) भाटीया नी hotmail साठी रजनी कडे सल्ला मसलत केली होती.

* रजनी आपल्या टक्कलाइतकी तुळतुळीत दाढी करू शकतो.

* रजनी दाताने नारळ तोडू शकतो. (दिवाळीतला "लाडू"ही हातोडा न वापरता खावू शकतो.)

* रजनीने पीसीओ वरून कॉल केला तरी बॉक्समधून कॉईन पुन्हा खाली पडते.

* IMF आणि World Bank, RAJNI BANK मधे आपले Dollars गूणतवणूक करतात.

* रजनी च्या फोन वरून सगळे Calls लोकल असतात. (No Roaming No ISD).

* Rajni can even make local calls to Aliens in any corner of the Entire Galaxy.

* Rajni Treats Aliens As Normal Guest.

* Aliens have found a new solar system which they have named as Rajni, as their ancestors knew Rajni.

* Aliens are taking guidance from Rajni for building a Township on some unknown Planet.

* Rajni often travels in his spacecraft (which we term as UFO) on weekends for change.

* रजनीला दिवाळी अंकावरील बाईचं चित्र पाहायला खुप आवडतं.

* रजनीचा दिवाळीतला कुठलाच फटाका "फुसका" नसतो.

* रजनीचा फुलबाजा तासभर जळतो.

* दिवाळीत रजनीच्या खिशाचं दिवाळं निघत नाही.

* Rajni can walk faster than speed of light

SORRY

* Rajni can crawl faster than speed of light

रजनी इन लिटरेचर...

एकदा रजनीच्या डायरीवरुन इन्स्पायर होउन एका लेखकाने विडंबनामध्ये कादंबरी लिहिली
आणि आज ती कोसला या नावाने प्रसिद्ध आहे.

मराठीत म्हणावा तसा मान न मिळाल्यामुळे एका लेखकाला रजनीने इंग्रजीत लिहायला शिकवल
आणि आपण त्याला किरण नगरकर म्हणुन ओळखतो...

एकद रजनीने शुटींगला जाता जाता प्रवासात एका माणसाला गोष्ट सांगीतली
आणि त्याने विदेशात जाउन "वार अँड पिस" ह्या नावाने प्रकाशीत केली...

एकदा रजनीकांत ने फक्त त्याला कळाव्यात अश्या कविता लिहिण्यास एकाला सांगीतल
लोक आज त्या कविला ग्रेस म्हणतात..

१. रजनीला कविता म्हणजे काय ते माहीती आहे.. @प्रगो,बेफीकीर आणी इतर .. दिवे प्लीज
२. रजनी च्या कुठल्याही मित्रमैत्रीणीचे सुख दुखु शकत नाही.. @ दाद .. दिवा
३. मायबोलीकर भगिनीनी लिहलेल्या सर्व पाककृती खाउन सुद्धा रजनी आजारी पडत नाही @ दिवा
४. रजनी ने ,मॅडम क्रमशः चा ३० व्वा भाग वाचला आहे @ बेफॅक्ल.. दिवा
५. मायबोलीवरील कविता न झोपता वाचण्याचा विक्रम रजनीच्या नावावर आहे.. @ ???? दिवा
६. रजनी ने अकुंच्या पे़क्षा जास्त पाट्या टाकल्या आहेत... @ कुलकर्णी... दिवा
७. रजनी ने आयटीवाल्यांकडुन ऑफीसमध्ये काम करुन घेतले आहे.. @ अ.आ. ... दिवा
८. रजनीला मिनुआज्जीचे वय माहीती आहे तो सुद्धा तिला आज्जीच म्हणतो.. @ मिन्वा... दिवा
९. २१ व्या शतकातले आश्चर्य..रजनीला श्यामली ने एकदा सहकुटुंब घरी जेवायला बोलावले होते..@ श्यामली... दिवा
१०. रजनी सध्या बि़झी असल्यामुळे त्याने वेमा ना पुणेमुंबईच्या भेटीला पाठवले आहे...

Pages