यन्ना रास्कला (मायबोलीवर रजनी)

Submitted by मिल्या on 3 November, 2010 - 07:24

सध्या जिकडे तिकडे रजनी वन लाईनर्स धुमाकूळ घालत आहेत...

(मायबोलीसंदर्भातले) रजनी वन लाईनर्स एकत्र ठेवण्यासाठी हा धागा... या आणि ह्यात भर घाला Proud

जे स्वतःचे असटिल त्यामागे * लावायला विसरू नका

*रजनी अर्भाटापेक्षा बारीक आहे

*रजनी कडे चिनूक्साचे प्रताधिकार मुक्त छायाचित्र आहे

*रजनीचे बोलणे ऐकून पौर्णिमेला कानठळ्या बसतात

*रजनीने मीनू आज्जींचा पुलाव पचवला आहे

रजनी काय'बी' प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो.

रजनी 'बी' ला प्रश्न विचारू शकतो

*रजनीला नीरजाची पोस्टस 'उथळ व पांचट' वाटतात

*रजनीला झक्कींची सर्व पोस्ट्स समजतात

*रजनीला पेशव्याच्या कविता कळतात

रजनी केपी करंडकातून कॉफी पिऊ शकतो

*रजनीकडे अरुंधतीची टर उडवणारी 'पाटी' आहे

*रजनी काहीही न खाता पार्ल्यात पोस्टू शकतो

*रजनी रोज एक आख्खी कादंबरी टाईप करू शकतो

*रजनीला अ‍ॅडमिनचा आय पी अ‍ॅड्रेस माहीत आहे

*रजनी मायबोलीवर स्वतःचे पोस्ट डीलीट करू शकतो

आणि हा खास अर्भाट सरांचा

देव हा रजनीचा डुआय आहे.

रजनी आणि बाकीच्यांनी दिवे घ्यावेत ही विनंती Light 1 Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या माबोवरील वर्षभराच्या वावरातून सुचलेली ही 'रजनी' वाक्ये:

रजनी लिंबूंच्या ऑफिसातुन पण माबोवर पिकासात अपलोड केलेली प्रचि पाहू शकतो.
नवीन मासा दिसला, की जागूताई रजनीला पाकृ विचारते.
रजनी भाऊंचे पण व्यंगचित्र काढू शकतो.

Light 1 घ्यालच!!

रजनी वविची तारीख आणि वविचं ठिकाण वविचा बाफ उघडल्या उघडल्याच ठरवतो आणि त्या ठिकाणाला जायला मुंबई, नाशिक, पुणे या तीनही ठिकाणांहून गुळगुळीत रस्ते असतात आणि तिनही शहरांपासून बरोब्बर सारखाच वेळ लागतो. ठरवलेल्या ठिकाणी, ठरवलेल्या दिवशी तिथे पुरेसा पाऊसही पडतो. रजनीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना कोणीही नावं ठेवत नाही.

Pages