यन्ना रास्कला (मायबोलीवर रजनी)

Submitted by मिल्या on 3 November, 2010 - 07:24

सध्या जिकडे तिकडे रजनी वन लाईनर्स धुमाकूळ घालत आहेत...

(मायबोलीसंदर्भातले) रजनी वन लाईनर्स एकत्र ठेवण्यासाठी हा धागा... या आणि ह्यात भर घाला Proud

जे स्वतःचे असटिल त्यामागे * लावायला विसरू नका

*रजनी अर्भाटापेक्षा बारीक आहे

*रजनी कडे चिनूक्साचे प्रताधिकार मुक्त छायाचित्र आहे

*रजनीचे बोलणे ऐकून पौर्णिमेला कानठळ्या बसतात

*रजनीने मीनू आज्जींचा पुलाव पचवला आहे

रजनी काय'बी' प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो.

रजनी 'बी' ला प्रश्न विचारू शकतो

*रजनीला नीरजाची पोस्टस 'उथळ व पांचट' वाटतात

*रजनीला झक्कींची सर्व पोस्ट्स समजतात

*रजनीला पेशव्याच्या कविता कळतात

रजनी केपी करंडकातून कॉफी पिऊ शकतो

*रजनीकडे अरुंधतीची टर उडवणारी 'पाटी' आहे

*रजनी काहीही न खाता पार्ल्यात पोस्टू शकतो

*रजनी रोज एक आख्खी कादंबरी टाईप करू शकतो

*रजनीला अ‍ॅडमिनचा आय पी अ‍ॅड्रेस माहीत आहे

*रजनी मायबोलीवर स्वतःचे पोस्ट डीलीट करू शकतो

आणि हा खास अर्भाट सरांचा

देव हा रजनीचा डुआय आहे.

रजनी आणि बाकीच्यांनी दिवे घ्यावेत ही विनंती Light 1 Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

*रजनी बुप्रांचा पडदा टराटरा फाडू शकतो.
* रजनी बंद पडलेले बीबी पुन्हा चालवू शकतो.
*झुमू थिअरी ओरिजनली रजनीनेच लिहिली होती. (तिचा प्रसार येथे करणे हे त्यांच्या शिष्यांचे परम कर्तव्य आहे. )

रजनीच्या आईने अकबरी लिहिले आहे.
रजनीने श्र-अँकी-फारेंडाच्या टीमला चित्रपटांच्या भेंड्यांमध्ये हरवले आहे.
डीजेला रजनी जॉनपेक्षा जास्त आवडतो.
रजनीने आणलेला मासा जागूला माहिती नव्हता.
रजनीने आणलेले फूल दिनेशदांना माहिती नव्हते.
नंद्या व फारेंड सचिनला बॅटवाला रजनी म्हणतात.

रजनीचा पोस्ट्मधल्या चुका मु.सा.बा.ना सापडत नाहित.
रजनीची वि.पु. कोणी वाचत नाही.
रजनीने अमर पेक्षा जास्त दुर्मिळ पुस्तके वाचली आहेत.
रजनीला "site offline" हा मेसेज कधीच येत नाही

* रजनीने लिला चिटणीसला हसताना बघितले आहे.

* रजनीने जया भादुरीला (नैसर्गिक) हसताना बघितले आहे.

* रजनीने भाभू, प्रदीप कुमार, अनिल धवन यांच्या तोंडावरची माशी उडताना बघितली आहे.

* रजनीने मल्लिकाला (पडद्यावर ) अंगभर कपड्यात बघितले आहे.

* रजनी "डार्क अँड लव्हली" क्रीमसाठी मॉडेलिंग करतो.

* रजनीचा आवडता कोल्हापुरी पदार्थ - काळाभात

* रजनीचा आवडता मालवणी पदार्थ - काळ्या वाटाण्याची ऊसळ

* रजनीची आवडती बंगाली मिठाई - काला जामून

* गदिमाना रजनीकडे बघून सूचलेले गाणे - सावळाच रंग तूझा

* पद्मिनी कोल्हापूरेसाठी रजनीने हक्क सोडलेले गाणे - राधा क्यू गोरी, मै क्यू काला

* मेहमूदसाठी रजनीने हक्क सोडलेले गाणे - अम्मे काले है तो क्या हुआ, दिलवाले है

**** खर्‍या रजनीला कधी कोणी बघितलेच नाही.........
आपल्याला दिसते ती केवळ त्याची सावली..

बाप रे,आज दिनेशदा भन्नाट सुटले आहेत. Light 1

* रजनी "डार्क अँड लव्हली" क्रीमसाठी मॉडेलिंग करतो.... हा खासच Rofl

पुणेकरांचा स्लार्टी हा रजनीचा ड्यु आयडी आहे.
रजनी नी दक्षिणेत लिंब्याची स्वगतं पबलीश करुन खूप पैसा कमवला आहे.
रजनीला(च) उंब्रात इवलाली पाखरं दिसतात.
रजनीला आपल्या हिंदु संसकृतीचा उगम आणि आता पर्यंतचा इतिहास ह्या बद्दल संपुर्ण माहिती आहे, तो फक्त केदारला उचकवण्याकरता "मधुकर" हा ड्यु आयडी घेऊन मायबोली वर आला होता.
Light 1

रजनी "दिनेशदा" किन्वा कोणाच्याही नावाने पोस्ट्स टाकु शकतो.

कुठलाही "admin" वा "superadmin" रजनीचे पोस्ट्स edit करु शकत नाही.

रजनी गोष्ट लिहायच्या आधिच त्यावर प्रतिक्रिया लिहु शकतो.

Lol सही धागा काढलाय रे मिल्या. मजा आली वाचून.

आत्तापर्यंत सगळ्यात आवडलेली लाईन - अ‍ॅपलचा तो सफरचंद खरंतर रजनीने खाल्ला आहे.
एक नंबर..

निलीमा अगदी बरोबर...
मला पण तेच वाटतयं...रजनीच दिनेशदांच्या नावाने लिहीत असावा...
नाहीतर एवढ्या गोष्टी त्यांना कशा माहीती....
Happy

ठिकै, अब तो भांडा फूटही गया तो.
मी रजनी बोलतोय.
* मला झक्कीचे खरे वय (आणि पगार) माहीत आहे.

* मी ललितांना अनंताक्षरीत हरवू शकतो.

* मी स्वप्ना पेक्षा जास्त वेळ मालिका बघतो.

* स्वप्नाली, चंदन, योगेश२४ माझ्याकडुन फोटोग्राफी शिकले.

* पक्का भटक्या माझ्यापेक्षा भटकंतीत कच्चा आहे.

* भाईंपेक्षा मी जास्त पेग रिचवू शकतो.

* गझलेतील मतले अडले तर बेफिकिर माझा सल्ला घेतात.

* बेफिकीर यांच्या कादंबरीच्या भागांची संख्या मला माहीत असते.

हे पोस्ट स्वतः शिवाजीराव गायकवाड यांनी टाकलेले आहे. दिनेश शिंदे या व्यक्तीचा या पोस्टशी काहिही संबंध नाही.

सही! आधी दोन मिनीटं नाव वाचून कळलंच नाही हे काय आहे!

* रजनी ला HH पेक्षा जास्त सुबक असे उकडीचे मोदक करता येतात ..
* रजनी मायबोलीच्या Editor मध्ये तामिळ टाईप करतो पण वाचकांनां देवनागरी दिसते

ईतर
* रजनी च्या जगात त्याच्या इच्छेनुसार सूर्य कोणत्याही दिशेला, कधीही उगवतो आणि मावळतो ..

Thanks आशुचँप
अजुन एक
रजनीचा कॉम्पुटर कधी क्रॅश होत नाही.
रजनीचे मन आंतरजालाशी connected आहे, तो फक्त विचार कर्तो post आपोआप होतात.

अ‍ॅपलचा तो सफरचंद खरंतर रजनीने खाल्ला आहे.
..
बरोबर पहिला सफरचंद त्याने Eve ला दिला होता.

अशक्य हसलो, वेड लागायची वेळ आली Rofl
*रजनीचा अनुल्लेख होत नाही
*रजनी अँकीने संवाद लिहायच्या आधीच सिनेमा ओळखू शकतो.
*रजनीला माहिती असलेली भाजी दिनेशदांनी पाहिलेली नाही.
*वेंधळेपणाच्या बीबीवर रजनीची पोस्ट शक्य नाही

दिनेशदा | 3 November, 2010 - 10:10
ठिकै, अब तो भांडा फूटही गया तो.
>>>ऐसा कैसा रजनीभाई, फिल्म rewind करो, वो भांडा जुडके आपके हाथोंमे आ जाएगा.

*रजनीला "रेशीमगाठी" चा शेवटचा आणि "मी परत येइन-भाग ३" कधी येणार माहित आहे.
*रजनी आणि टण्या दर गुरुवारी सिद्धिविनायकाला "दर्शन" द्यायला जातात.
*रजनीला "संदीपसमीप" च्या कविता आणि "अस्चिग" च्या पोस्ट्स एकदा वाचुन कळतात.

अवांतरः
डायनॉसॉर एक्स्टींक्ट नाही झाले..त्यानी रजनीकडुन थोडे उधार घेतले होते.

Happy बुरा न मानो दिवाली है..सगळ्याना दिवाळीच्या शुभेच्छा!

सगळे महान आहेत Rofl

माझे काही:
* डीजेला मेंदी काढायला रजनीने शिकवले.
* नीधप रजनीशी लाडीक आवाजात गोड बोलते.
* रजनी मृण्मयीचे रारा****बारा अर्ध्या सेकंदात ओळखतो.
* रजनीनी आहारशास्त्र आणि पाककृती विभागात हवी ती रेसिपी १ नॅनोसेकंदात शोधून काढतो.
* रजनीनी आहारशास्त्र आणि पाककृती विभागातिल सगळे पदार्थ १ तासात बनवले आहेत.
* रजनी शब्दांकुरचे सगळे शब्द कवितेत चपखल बसवून दाखवू शकतो.

Light 1

*रजनी झक्कीचं तोंड आणि किबोर्ड बंद करू शकतो. आणि मग तिथे अ‍ॅडमिन/वेमा च्या वशिल्याचं पण काही चालत नाही.
*रजनी जामोप्याला बायकांचे पाय धरायला लावू शकतो
*रजनी माबोवरच्या सगळ्या कविता वाचूनही वेडा होत नाही
*रजनी माबोवर काहीही वाचताना शून्यावा असतो. त्याला नंबर लावावा लागत नाही.
*रजनी दिवाळी अंकासाठी संपादक मंडळाकडे साहित्य देत नाही. साहित्य मंडळ दिवाळीत रजनी अंकासाठी संपादक देते.

Pages