न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २४ जुलै २०१०

Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42

ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा

पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.

gtg_list२.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पग्या, शिल्पाला त्या तुळशीबागेजवळच्या चितळ्यांकडून आणायला सांग बर्का बा.व. मलई पेढे पण चालतील.

बाई, Uhoh राहुद्यात हो आपण पोळ्या खाऊ.

सायो, चालेल. सांग मग मला त्यांचं जमतंय का. त्याप्रमाणे मग मी काय आणायचं ते ठरवेन.
ते सुमा नाही का करत भाकर्‍या?

मी हेच लिहायला आले. सुमाच्या वेब साइटवर भाकरी आहे. ते डिलिव्हरी पण देतात म्हणे. त्यांना ऑर्डर दिली तर तूप लावू नका असे सांगायला विसरु नका, वास येतो. तूप आपण घरचे आणु Happy

सिंडे, डिलिव्हरी कशाला? मैत्रेयीला जवळ आहे असं म्हणालेली मागे. कुणालाच आणणं शक्य नसेल तर मग नक्कीच विचार करु यात डिलिव्हरीचा. अहाहा, मस्त भाकरी पेशल मेन्यु आणू.

चिकन बरोबर पण भाकरी मस्त लागते एकदम! मी पोळ्याही आणेनच. त्यावेळेस जास्त हव्या असल्यास कळवा.

Lol
काय पटापट पोष्टी पडतायत! Happy
अगं अंबाडी मिळण्यावर आहे ना. नाही मिळाली तर मेथीची गोळाभाजी चालेल का? आणि लसणीचं तिखट?

वा वा वा मला आत्ताच तरंगत असल्याचा फिल आलायं. (ते घरचं जेवन किती महत्वाचं आहे हे बायको देशात गेल्यावर कळते म्हणे ! )

शेपू आणा असं मी म्हणणार होते पण मंडळी मला येऊ देणार नाहीत ह्या भितीने नाही बोलले Happy

सायो, बाई, काय आणाल ते "गोड" मानुन खाऊ Proud (फारच पटापट पोस्ट येताएत)

लसणीचं तिखट तर दिपचं मिळतं ते छान असतं. ते एक पॅकेट बहुतेक पुरेल आपल्याला.
स्वाती, मला काहीही चालेल. कोणतीही पालेभाजी, भरली वांगी ही चालतील.

काय पण मेन्यू.. कुठून विषय काढला मी सकाळी... Uhoh

बाईंच्या मेन्यूचा प्रवास ह्यावर एक फ्लोचार्ट काढावा म्हणतो.. पण सध्या नुसतं हेच घ्या..

बटाटेबडे -> लाडू -> भाकर्‍या -> पोळ्या -> अंबाडीची भाजी -> भरली वांगी -> and the journey continues.. Proud

सायो- मेथी/पालक/ शेपू(?), अंबाडी, किंवा भरली वांगी आणि कांद्याची चटणी. (भेळ ही असणारे का?)

लालू : बिर्याणी (आँ? या मेनूबरोबर? मग तिला मसालेभात वगैरे सांगू. किंवा तिचे स्पेशल बटाटेवडेच सांगू. साधा भात झक्की ठेवतील.)
वैद्य : चिकन, पोळ्या
विनय : काहीतरी
मैत्रेयी : भाकर्‍या
सायो : भरली वांगी, कांद्याची चटणी
स्वाती : पालेभाजी
सिंडी : रावणपिठलं आणि ठेचा
केदार : अती अती गोड मैसूरपाक
पग्या : बाकरवडी
झक्की : चिप्स वगैरे
मृण : चहा कॉफी

देसाई, रावण पिठलं आहे ना. आणखी पिठल्याचाच प्रकार आणणार का?
(त्यापेक्षा फिश आणा म्हटलं तर.... :P)

Pages