न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २४ जुलै २०१०

Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42

ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा

पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.

gtg_list२.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झक्की (२)
अनिलभाई
परदेसाई
वैद्यबुवा
स्वाती
सिंड्रेला
सायो
फचिन
लालू
रुनि
मैत्रेयि
वॄंदा + प्राची

अजून 'न येण्याची कारणे' देणार कुणी नाहीत Sad

बरं काही मेन्यू ठरला आहे का? का काय वाट्टेल ते आणावे? Happy

झक्की (२)
केदार
अनिलभाई
परदेसाई
वैद्यबुवा
स्वाती
सिंड्रेला
सायो
फचिन
लालू
रुनि
मैत्रेयि
वॄंदा + प्राची (यांना स्वतंत्र ओळीत का लिहीले नाही?)
वृंदा
प्राची

अजून १५ तरी पाहिजेत.
सिम?
आणखी मा बो कर पण आहेत बा रा त. पण त्यांनी काही लिहिले नाही.
कुणाला मायबोलीच्या डेटाबेसचे प्रोग्रॅमिंग येत असेल नि अ‍ॅक्सेस असेल तर शोधून काढा बा रा त किती माबो कर आहेत.

झक्की (२)
केदार
विकु
अनिलभाई
परदेसाई
वैद्यबुवा
स्वाती
सिंड्रेला
सायो
फचिन
लालू
रुनि
मैत्रेयि
वॄंदा + प्राची (यांना स्वतंत्र ओळीत का लिहीले नाही?)
वृंदा
प्राची

बापू मला आग्रह करकरून "जा" म्हणताहेत. म्हणुन मी येऊ शकत नाही.>>> तुझा निर्णय योग्य आहे मृ. काहीतरी काळंबेरं असू शकतं. Proud

<बापू मला आग्रह करकरून "जा" म्हणताहेत. म्हणुन मी येऊ शकत नाही.>
बापू कोण? तुम्हाला यायचे आहे ना? मग या की. बापू काही का म्हणेतात! काय काळंबेरं असणार त्यात? अश्या उगीच घाबरू नका. इथे आलात की सर्व ठीक होईल!

बारात आलं की सगळं ठीकच होतं. Happy अगदी खरंय! आत्तापासून सांगता येणार नाही. येण्याचा प्रयत्न करेन.

बापू कोण ते भेटल्यावर सांगेन. Proud (ललकारीसगट!)

>>येण्याचा प्रयत्न करेन.
अनेक वाळवणातून तुझ्यात भिनलेलं तत्वज्ञान कधी कधी असं सहजपणे बाफवर झिरपतं !!! व्वा मॄण्दी !
आपल्या हातात प्रयत्नच असतात. अगदी बरोब्बर Proud

३ जुलैपर्यंत तिकिटांचं बघता येणार नाही. (घरात चार कमानी असल्यामुळे त्या आधीचा तिकिटं शोधण्याचा मुहूर्त लाभी नाही. ४ जुलैपासून अलबेल.) बापूंची काळजी नाही. आरत्या, प्रसादाचं त्यांचं ते आणि परम शिष्यगण बघून घेतील. पण जे (नवर्‍यानं) म्हंटलं त्याच्या बरोबर विरुध्द वागावं असं संयुक्तासोल्जर्सचं ब्रीद आहे!

नंद्या, तू वाळवणाची रखवाली करायला बसत असल्यामुळे तुला किती पटकन समजतं आजकाल! Proud

यांना स्वतंत्र ओळीत का लिहीले नाही? <<< कारण त्या मायलेकी असून एकाच घरातून येतात..
झक्की(२) सारखंच आहे ते.. Happy

बापू कोण <<< ती भजनी लागलीय.. माहीत नाही का? Lol

<ती भजनी लागलीय.. माहीत नाही का?>
नाही बुवा! (नाही बापू!)
बाकी इतर काही करण्यापेक्षा भजन करणे चांगले! शिवाय हे बापू जा म्हणताहेत, तर त्यांची इच्छा म्हणजे आज्ञा मानून येणे हेच बरोबर नाही का?

तर एकंदर किती लोक झाले? ३० मायबोलीकर नि अधिक कुणि (जसे केदार यांच्या मैत्रिणी, खास फचिनसाठी!) व्हायला पाहिजेत, नाहीतर बारा ची लाज जाईल!

नाही, वैयक्तिक नव्हे, पण 'बा रा चे ए वे ए ठि' याला स्वतःची प्रतिष्ठा असते, तिला धक्का लागेल असे काही होऊ देऊ नका! बा रा तील माबो करांचा शोध घ्या, रोमातून बाहेर पडा म्हणावे, नि या.

जसे केदार यांच्या मैत्रिणी, खास फचिनसाठी...फचिनसाठी केदार मैत्रिणी पुरवणार की काय? Happy
ही दिवाळी बंपर योजना फचिनला माहीत नसावी..

मृ, आता बापू आर्गेव करत आहेत तर येच... Happy

असला बंपर जाहिर केल्यावर सगळ्यांचेच बाप्पु ए वे ए ठि ला यायला निघतील. घरी एकटं सोडायची भिती सोडून आता ए वे ए ठि ला यायचीच भिती वाटायला लागेल काकवांना.

बSSर, तर सद्ध्याचा काऊंट १८ - तोही होस्ट धरून. Proud
झारा आणि अ‍ॅडमिनचं काय झालं?
झक्कींनी ३० चं टार्गेट असंच रॅन्डमली काढलंय का?
मृण, बापूंना घेऊनच ये. Happy

बुवा, काकवांना आणि भीती??? Proud

तुम्ही आणा तर मैत्रिणी, भितीचं नंतर बघून घेऊ Wink

झक्कींनी ३० चं टार्गेट असंच रॅन्डमली काढलंय का >>> असं कसं रॅन्डमली ? (१८ * २) - ६ किती होतात सांग बघू ? Proud

<झक्कींनी ३० चं टार्गेट असंच रॅन्डमली काढलंय का?>

लालूंकडे किती लोक होते? मागल्या वर्षी इथे किती लोक होते? (पण ते तुम्हाला कसे कळणार? तुम्ही आलाच नव्हता!)
<झारा आणि अ‍ॅडमिनचं काय झालं?> त्यांच्याहि घराला चार कमानी असतील!

<घरी एकटं सोडायची भिती सोडून आता ए वे ए ठि ला यायचीच भिती वाटायला लागेल काकवांना.>
स्वतःपुरते बोलावे हो! तुम्ही त्यांना कारण दिले असेल तसे वागण्याकरता!! किंवा असे समजा की तुम्हाला पाहून त्या मैत्रिणी तुमच्या मागे लागतील, नि तुम्हाला विश्वामित्र करतील!!! Light 1

बाकी केदार, मित्र आणले तरी चालेल. मग बघू किती नवरे येतात.

Pages