न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २४ जुलै २०१०

Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42

ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा

पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.

gtg_list२.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमृता, ववि नी बारा एवेएठि या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. परत आल्यावर बाराचंच गटग कसं छान असतं हे कबूल करा मात्र Proud

मी एकटा नाही हं! आपण खात पीत बसायचे नि सौ. ला उपाशी ठेवायचे अशी जाचक व खटकणारी प्रथा आमच्या घरी तरी नाही!!

आपण खात पीत बसायचे नि सौ. ला उपाशी ठेवायचे अशी जाचक व खटकणारी प्रथा आमच्या घरी तरी नाही!!>>>> झक्की, मागच्या वर्षी तुम्ही त्यांना जेवायचं विचारयला विसरलात का?

झक्की, मागच्या वर्षी तुम्ही त्यांना जेवायचं विचारयला विसरलात का? << कित्येक वेळा त्या घरात का आहेत हे ही विसरतात.. Happy

मी पण येणार. बाकी मंडळी येतील की नाही ते आत्ता माहित नाही!
लालू, रुनि, येताय का माझ्याकडे ? गेल्यावेळेसारखं एक प्रि गटग करून मगच जाऊ झक्कींकडे Happy

झक्की (२)
अनिलभाई
परदेसाई
वैद्यबुवा
स्वाती
सिंड्रेला
सायो
फचिन
लालू
रुनि
मैत्रेयि
अजून २० तरी लोक हवेत. चमन?

LOL

अजून २० लोक कशाला? काही काम वगैरे करायचे आहे का? आधीच सांगून ठेवा.
मै, येऊ की. पण हे गटग शनिवारी आहे. वेळ काय? सकाळ की संध्याकाळ? त्यानुसार प्रि की पोस्ट ( की दोन्ही Proud ) ते ठरवूया.

शनिवार आहे. पोस्ट माझ्याकडे या. माझं (सद्ध्याचं) घर झक्कींच्या जवळ आहे. बहुधा तोवर मूव्ह झाले नसेन.

अमृता, ठेव तो दिवा तुलाच.

वैद्य, कधी तरी बायकोचे असलेले गुण पण सांगत चला, नसलेले अवगुण सांगण्यापेक्षा.

पोस्ट गटगला मी पण येणार.

एक्झॅक्टली...तुम्ही घरातली चार कामं कराल, मेनुतले २-३ प्रकार कराल तर तुम्हाला विभागुन सत्ता मिळेल Proud

झक्की (२)
अनिलभाई
परदेसाई
वैद्यबुवा
स्वाती
सिंड्रेला
सायो
फचिन
लालू
रुनि
मैत्रेयि
अजून २० तरी लोक हवेत. चमन?

अरेच्चा माझा मुद्दाम अनुल्लेख. मी मुग गिळून गप्प बसावे असे म्हणता का? कि बिरडं कराव. जेष्ठ लोक आताश्या फार जास्त रागात येतात बॉ.

ओ नारी फळी! कोणी तरी दुसर्‍याला धरा, मी कामचुकार नाही, बायको सुद्धा कबुल करेल.

Pages