न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २४ जुलै २०१०

Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42

ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा

पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.

gtg_list२.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<तिथे नसावं काही फुकट>

व्वा! असे कसे? पुणेकरांनी मला फुकट बटाटेवडा नि चहा दिला, ठाणेकरांनी पण!
मला वाटते माणूस पाहून वागतात ते लोक. भलत्यासलत्याला उगीच फुकट देणार्‍यातले ते नव्हेत. त्यांच्याकडून काही शिकावे.

केदार तुम्ही नक्की या हो. बरोबर सौ. असतील तर त्यांनाहि घेऊन या. त्या येणार नसतील मित्रांना घेऊन या. (मैत्रिणी आणल्यासहि चालेल. मी तरी तुमच्या सौ. ना सांगणार नाही.) (लगेच फचिन दिवास्वप्ने पाहू लागला!) Light 1

<नसलेले अवगुण सांगण्यापेक्षा. > असलेले अवगुण चारचौघात सांगण्याजोगे नसतील.
बुवांना एक छोटा मुलगा आहे. त्याला सांभाळणे म्हणजे घरातील सर्व कामे एकट्याने करण्याएव्हढेच, किंबहुना त्याहून जास्त, कठीण आहे. हो ना वैद्यबुवा?

सिंडरेला | 9 June, 2010 - 10:07
मी पण एकटीच.
>>
आज्जे, एकटी येणार आहेस? इशानला घेऊन ये. तो नितेश बिचारा एकटा काय करणार घरी बसून.. त्यालाही घेऊन ये गप.

फचिन केदारच्या मैत्रिणींची दिवास्वप्नं बघतो?
>>
केदारच्या मैत्रीणी म्हणजे माझ्यासाठी सगळ्या काकवा असतील त्या.. Proud Light 1

<उलट मज्जाच येते त्यांना घरी.>
पण अनादि काळापासून बायकांचे हे कर्तव्यच नाही का, की नवरा मजा करायला लागला की लगेच त्यात मोडता घालून त्याला नको ते करायला लावणे! उदा. खरेदीला जाणे, आपल्या मैत्रिणीच्या घरी घेऊन जाणे, मुलाला सांभाळायला देणे, आंघोळ करा म्हणणे (पु.ल.)?

इतर काही नाही तरी, अहल्या, द्रौपदी इ. पतिव्रतांपेक्षा जास्त उत्साहाने, हे कर्तव्य पार पाडण्यात येते.

मी एकटी येणार आहे. इतर फ्यामिली मेंब्रांना आणायचा आग्रह करु नये. ~हुक्मावर्नं

इशानला घेऊन ये. तो नितेश बिचारा एकटा काय करणार घरी बसून.. त्यालाही घेऊन ये गप.>>>>>> सापडले!!!! सिंड्रेला, लालू हे बघा सापडले ते खांद्यावर बंदुक ठेवणारे!!

अरे बापरे, सिंडरेला रागावल्या वाटते! परम कर्तव्य काय ते डावलून हुकूम सोडायला लागल्या आहेत! फचिन सांभाळून!! वैद्यबुवा, तुम्ही पण. तुमच्या सौ. ची नि सिंडरेला ची ओळख असेल, तर तुम्हालाहि धोका आहे, अगदी घरातूनच.
Light 1

निषेध ! निषेध !! निषेध !!!
बरोब्बर ज्या वीकांतला मी कँपिंगला जाणार असतो तो वीकांत एवेएठिसाठी निवडल्याचा निषेध !
एवेएठिचा दिनांक बदलण्याची शक्यता किती ?

आमच्याकडे नवरा नी लेक चाललेत २३ ते २५ कँपिंगला. मी इथे कबूल केलं नी तिथेही कबूल केलं. त्यामुळे आता नवरा नी लेक कँपिंगला नी मी आणि मुलगा झक्कींकडे अशी सोयीस्कर विभागणी केली आहे.

लागोपाठच्या तीन ए. वे. ए. ठि. ला गैरहजर राहिल्यास तुमचे 'बा रा कर' असण्याचे अधिकार आपोआप रद्द होतील...
त्यानंतर पुन्हा बाराकर म्हणवून घ्यायचे असल्यास, तसा लेखी अर्ज करून, बाफवर येऊन, संदर्भहिन गोष्टी लिहून पुन्हा 'याच गावच्या बोरी..' हे सिध्द करावे लागेल...... हुकूमावरून... Happy

Pages