न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २४ जुलै २०१०

Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42

ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा

पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.

gtg_list२.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जसे केदार यांच्या मैत्रिणी, खास फचिनसाठी >> अरे बापरे !

मी तिकिट बुक केलय.

आता गटगला मैत्रिनी कुठून पुरवायच्या त्याचा शोध घ्यावा लागेल. Proud

केदार, बाराबंदी, जिरेटोप इ. घालून येऊ नकोस. काक्वा घाबरतील. Proud

मेनू काय? विनय फिश करी, बुवा चिकन, लालू बिर्याणी आणणार म्हणाली होती.
मी बटाटेवडे आणू शकेन.
झक्की चिप्स वगैरे ठेवतीलच.

आता चाट टाईप एखादा आयटम, पोळ्या, रायता/कोशिंबीर आणि गोड - असे प्रकार राहिले.
लावा बोली. Happy

मी फिशकरी बद्दल काहीही बोललेलो नाही (या पोष्टी व्यतिरिक्त...)
आता गटगला मैत्रिनी कुठून पुरवायच्या <<< शिनेमाला Extra पुरवणार्‍यांकडे चौकशी कर.. Happy

त्यावरून तू यायचं की नाही ते ठरवणार आहेस का? >>> बाई.. म्हणजे काय ? कोणत्याही गटगला कोण येणार पेक्षा काय आणणार हे महत्त्वाचं असतं. Happy

पराग, या वेळी तुम्हाला कामाला लावणार नाही, मागच्या वेळी लावले होते तसे. तेंव्हा तुमच्या दक्षिणवासी माबोकरांना घेऊन (वाटेतून सुमॉ इ. ना घेऊन) जरूर या.

सकाळी खुप लवकर जमणार असाल तर चिकन करुन आणायला जरा अवघड आहे. वेळ ठरवाल त्या हिशोबानी सांगेन काय आणणार ते.

परदेसाई, ते अध्याहृत असतं हो. Proud
जोक्स अपार्ट, मग तुम्ही काय आणता?

सिंडे, मग तू समोसे आणणार असलीस तर मी लाडू आणेन. Happy
सायो, भेळ फिक्स करू.

लोल विनय.
मी काय आणू ते ही सांगा.
पग्या तू येणार असशिल तर मी आमच्या स्वामीनारायण मधून लै लै गोड असलेला मैसूर पाक आणेन. अन त्याबदल्यात शिल्पाला निदान १ किलो बाकरवडी गटगसाठी आणावी अशी लापि लावण्याचे काम आत्तापासून सुरु कर. किती लापि हव्यात ते सांग.

लाडवांचं तुम्ही चमन बरोबर ठरवा Happy तो येइल १० जुलैला. त्यानंतर मायबोलीवर कधी येइल, येणार की नाही ठाऊक नाही Proud

सायो, तुला काय वाटले मी घरी समोसे करुन आणणार ? Biggrin

असो, हा अगदीच 'गेला बाजार' आयटम वाटत असेल तर मी चटणी किंवा कोशिंबीर आणते. म्हणजे अगदीच फ्रोझन फूड आणण्याचे पाप नको Proud

बाराबंदी, जिरेटोप घातलेले केदारकाका पग्याला, "सांग ना रे तुझ्या बायकोला किलोभर बाकरवड्या आणायला" अशी लापी वाजवताना डोळ्यांपुढे आले. Proud

येण्याबद्दल नक्की झालं तर ५-६ जुलैपर्यंत कळवते.

आले(च) तर सनड्राइड टमाट्यांचं ताजं लोणचं (फ्लोरिडातून) आणीन. बाहेरून अ‍ॅपेटायझरमधलं काही आणि चहा कॉफी विकत घेईन.

केदार....माझ्या साठी पुण्याहून मैसूर येणार आहे बहूतेक अधिकाचा.. पण तू आणलास तरी चालेल..
रच्याकने.. गटगसाठी पुण्याहून काही मागवायचं असेल तर सांगा.. मी तुमच्यापर्यंत पोचत करायची व्यवस्था करेन.. Happy

चमनचं धरु नका हो. गटगचं त्याच्या गावीही नसेल. भरवशाच्या म्हशीला टोणगा म्हणतात तसं होईल. Biggrin

बहूतेक नाही येणार.. कारण ते मोडतात प्रवासात.. मागे मी एकदा आणालेले तर नंतर त्यांचा भुगा खावा लागला.. Happy

आधल्या रात्री करून ठेवा बुवा चिकनाचा रस्सा. मुरलेला चांगला लागतो म्हणतात. Proud झणझणीत रस्सा आणि वडे. जन्ता तुमच्यासाठी चीकेफॅचा गोडायवा चीके आणेल. चांगलं डील आहे की नाही? Proud

पोळ्यांची व्यवस्था होणार असेल तर मी व्हेजी लोकांसाठी झणझणीत रावण पिठलं आणि मिरचीचा ठेचा आणेन. पोळ्यांसाठी तिथे आसपास असलेल्या दुकानाचा पत्ता दिलात तर मी घेऊन येइन.

मी जर चिकन बनवलं तर पोळ्या मी घेऊन येइन राजभोग वाल्या कडून. नाही जरी बनवलं तरी घेऊन येइन. पण लंच टाइम म्हणजे बनवायला हरकत नाही खरं तर.

अमृताला सांगितलं असतं. Proud

मी आणेन भाकर्‍या. वीसेक पुरेत? शिवाय थोड्या पोळ्या आणू.
(वि. सू. : भाकर्‍या आणल्या तर लाडू आणणेत येणार नाहीत. :P)

बाकरवड्या शिकागोतही आहेत, पण शिल्पायेतेय ना पुण्याहून म्हणून एकदम ताज्या ताज्या. त्यांची चव इथे नाही मिळत.

ए नको ग स्वाती. तो काही आटापिटा करत बसू नकोस. आमच्या इथे एक मराठी बाई पूर्वी केटरिंग करायच्या. त्यांच्याकडून मिक्स पिठाच्या भाकरी मी घेतल्या होत्या. चांगल्या वाटल्या. भाज्या मात्र अजिबातच नाही आवडल्या. त्यांना हवं तर फोन करुन विचारेन.

Pages