इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.
- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?
'बाळ्या गणितात हुषार आहे,
'बाळ्या गणितात हुषार आहे, दिसायला असेना का वेडाबिद्रा!' अशी वृत्ति!
>> " बाळ्या दिसायला भलताच वेडाविद्रा. गणितात असूदेत हुशार. ते काय पुजायचेय ?" असल्या कुजकट वृत्तिपेक्षा ते बरे, नाही का ?
हे म्हनजे , घरातून पळून गेलेल्या नतद्रष्ट कारट्याने चोरुन पुन्हा पुन्हा घरासमोरून फेर्या माराव्या, असे झाले.
झक्की, तुम्ही आधी एक सान्गा,
झक्की, तुम्ही आधी एक सान्गा, सान्गा म्हणण्यापेक्षा स्वतःशीच नक्की करा की, तुम्ही परतु इच्छिणारान्च्या पक्षात की विरोधी पक्षात???
महेश, अक्षरनंदन या पुण्यातील
महेश, अक्षरनंदन या पुण्यातील मराठी माध्यमाच्या शाळेबद्दल बरंच ऐकुन आहे. त्याबद्दल चौकशी करुन बघा.
अरे टोणग्या उसनी वाक्ये
अरे टोणग्या उसनी वाक्ये वापरून धूळ्फेक करतो काय ?
आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल
आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.
आता बहुधा कुणि येणार नाहीत!
आता बहुधा कुणि येणार नाहीत! >> हे आता कशावरून? परतोनि यायचे नक्की ठरवा, आणि या तर खरं. मिल बैठेंगे तीन यार! आप, मै और वो!!
नात्या (यापेक्षा तात्या म्हणू
नात्या (यापेक्षा तात्या म्हणू का
),
अक्षरनंदन बद्दल आधी विचार होता, पण फार लांब आहे घरापासुन, त्यामुळे तो विचार सोडला.
आप, मै और वो!! ---- वो म्हणजे
आप, मै और वो!!
---- वो म्हणजे नक्की काय ?
महेश कालच एका मित्राशी बोलत
महेश कालच एका मित्राशी बोलत होते आणि त्याने पण हेच सांगितले मराठी शाळांबद्दल.. कि तुला खरच टाकायचे असेलत तर कॉन्व्हेंट मध्ये नको टाकुस पण मराठी शालाबद्दल परत विचार कर.. कारण तिथे येणारी मुले वेगळी असतात. आता मी हे विचारले नाही का .. पण तुमच्या उत्तरामुळे प्रकाश पडला. . त्यामुळे आता तिथे येऊनच शोध घाय्वा असा विचार आहे ..
आम्ही आलो तर बाणेर मध्ये येवू ..तुम्हाला अजून माहिती असेल तर नक्की सांगाल..
झक्की.. तुमच्या सारखे
झक्की.. तुमच्या सारखे ग्रहास्त भेटले अगदी इतक्यातच.. लग्न, समारंभ आणि गावत जाऊन राहणे , फिरणे या शिवाय दुसरा काही करणार नाही भारतात गेल्यावर.. तुमची आठवण झाली..
प्रित, नक्की विचार करा. आधी
प्रित, नक्की विचार करा. आधी शाळेबद्दलची माहिती निट मिळवा.
अक्षरनंदन हा पर्याय चांगला आहे, पण तुम्हाला बाणेर वरून फार लांब पडेल.
माझ्या आधीच्या लिखाणात एक मुद्दा मी लिहिला नव्हता.
अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधे बराच फरक असतो.
काय फरक असतो हे तुम्ही शोधून काढा, अथवा मला ई-मेल करा.
आम्ही आता जी शाळा शोधली आहे, ती मराठी माध्यमाची विनाअनुदानित शाळा आहे.
महेश बर्याच दिवसांनी या बीबी
महेश बर्याच दिवसांनी या बीबी वर डोकावले. आणि तुमची मराठी शाळेबद्दल ची पोस्ट वाचली. आज मराठी शाळांचा हाच प्रॉब्लेम झालाय की तिथे आपल्या सारखे सुशिक्षित पालक आपली मुले पाठवत नाहीत. त्यामुळे इच्छा असुनही मराठी शाळेचा ऑपशन बरेच लोक स्विकारत नाहीत. कोणे एके काळच्या बालमोहन, पार्ले टिळक शाळांची पण आता वाट लागली आहे.
आजकाल नवी मोनॉपली गेम आली आहे
आजकाल नवी मोनॉपली गेम आली आहे ज्यात क्रेडीट कार्डे आहेत व ग्लोबल रोमिन्ग आहे. पोरे ह्या देशातून त्या देशात जातात इनवेस्ट करतात वगैरे. काल ती गेम खेळून मुली कंटाळल्या व माळ्यावरून जुनी गेम काढली. ज्यात देशीच सर्व आहे. तेव्हा तुमची सर्वांची आठ्वण झाली.
ह्म्म्म ही चर्चा आज वाचली.
ह्म्म्म ही चर्चा आज वाचली. आता इतकी चर्चा झालेल्या या धाग्यावर लिहीण्यात तसा काही अर्थ नाही, ते सुद्धा 'परतोनी पाहे' शी काही संबंध नसलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीने.
पण एकूणच भारताबाबतची / इथल्या शिक्षण / शाळांबाबातची / सोशल लाईफ बाबतची / तसेच बंगलोर्-हैदराबाद मध्ये राहण्याबाबतची लोकांची मते वाचून कमालीचे आश्चर्य वाटले.
कदाचित जे लोक जेव्हा गेले तेव्हाची भारतातली (त्यांच्या मनातली) परीस्थिती + थोड्या दिवसांपुरते येऊन झालेली सध्याच्या भारताविषयीची कल्पना + अजाणता स्वतःच्या मनात घेतलेल्या निर्णयाचे अजाणता समर्थन अश्या गोश्टींमधून ही मते आलेली असावी.
असो. माझे मत काही वैश्विक सत्य वगैरे नाहीच. परंतू 'भारतात परतण्याची इच्छा असलेल्यांना या माहीतीचा काही उपयोग होऊ शकेल' या एकाच हेतूने ही पोस्ट लिहीत आहे.
भारतात राहताना भेडसावणारे प्रदूषण-भ्रष्टाचार वगैरे मुद्दे सर्वांनाच मान्य आहेत. त्याउपर ज्या गोष्टींबाबत मतांतरे आहेत त्याविषयी मला आलेले अनुभव, असे हे मुद्दे आहेत.
१. भारतात सर्वच शाळांमध्ये केवळ रॅट रेस आहे हा मोठाच गैरसमज आहे. पुण्या-मुंबईची सद्यस्थिती माहीत नाही, पण बंगलोर मध्ये तरी बर्याच शाळांनी नवीन पद्धतींचा अवलंब केलेला दिसतोय. चौथी पर्यंत परीक्षा नसतात. असल्या तरी त्याला फारसे महत्व नसते. मुलांवर अभ्यासाचे प्रेशर लहान इयत्तांमध्ये तरी मुळीच नाही. मोठ्या इयत्तांमध्ये थोडेफार आहे, पण ते ज्या त्या पालकांवर अवलंबून आहे, फक्त शाळेला जबाबदार धरता येणार नाही. शिवाय सर्वांगिण विकास किंवा प्रत्येक मुलाचा कल बघून शिक्षण हे इथल्या शाळांकडून अमेरीकेइतके नसले तरी ते प्रत्येक पालक आपल्या मुलासाठी करु शकतो, अर्थात भारतात राहण्याची ती किंमत आहे असे मनात ठेवून आपण आपल्या पाल्यासाठी त्याचा कल / आवड हे बघून जर त्याची अभ्यासपद्धत / दिशा ठरवू शकतो, शाळा त्याच्या आड येत नाहीत.
बंगलोर मध्ये आयआयटी / आयआयएम पासाअऊट लोकांनी अमेरीकन धर्तीवर चांगल्या शाळा सुरु केल्या आहेत. तिथे तर अभ्यासाचा मुळीच बोजा नसतो.
२. 'पुण्या-मुंबईत राहता येणार नसेल तर भारतात जाण्याचा काय उपयोग ?' अश्या अर्थाचे काही विचार वाचले, त्यात मला भारतातच बंगलोर सारख्या ठीकाणी राहण्याचे वाटणारे काही फायदे असे -
- कधीही अगदी सहजपणे आई-वडीलांना भेटायला जाता येते. किंवा ते येऊ शकतात. वर्षातून दोनदा माझ्या साबा २-२.५ महीन्यांसाठी येतात. त्यांना करमेल तोवर राहणे, काम आले की परत जाणे हे सहज करु शकतात. तिथे काही काम्/समारंभ असले की जाणे , इथे यावेसे वाटले की / आजारी पडले की येणे हे सहज शक्य आहे. आम्हालाही त्यांच्या तब्येतीची काळजी नाही, कारण कधीही येऊ शकतात.
- मुलांना आजी-आजोबांचा व आजी-आजोबांना मुलांचा बराच सहवास मिळतो, जो दोघांनाही हवा असतो. शिवाय वर्षानुवर्षे भेट नाही किंवा अतिपरीचयात अवज्ञा हे दोन्ही टाळले जाते.
- मराठी लोक अक्षरशः शेकडो असल्याने म्.म. कार्यक्रम, ग्रूप जमवला तर हळदीकुंकू, भोंडले, दिवाळी-दसरा आणि सर्वच कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतो. शिवाय नातेवाइकांसारखे गेलेच पाहीजे अशी सक्ती नसल्याने आवड असेल तरच जाणे हा पर्याय आहे, शिवाय भारतीय वातावरणात हे समारंभ अनुभवता येतात.
- मुलांना अस्खलित मराठी तसेच इंग्रजी / हिंदी बोलता येते. विविध प्रकारच्या मित्र्-मैत्रिणींबरोबर सतत खेळल्याने खूपच exposure मिळते. ओणम ला फुलांच्या रांगोळ्या करण्यापासून करवा-चौथ ची कथा ऐकण्यापर्यंत सगळे इच्छा असेल तर सहज करायला मिळते. मुलांना आपोआप भारतातल्या इतर रहीवाश्यांच्या संस्क्रूती / प्रथा पहायला मिळतात. प्लेडेट घेऊन खेळण्याची गरज नसल्याने खाली उतरले की कितीही वेळ खेळत बसता येते अन सगळ्या भाषिक मैत्रिणींचे अड्डे जमवून खिदळत बसता येते.
- पुण्यापेक्षा काही अंशी जास्त पगार मिळतात हे माझ्या ओळखीतल्या सर्वांचेच मत आहे.
- बंगलोरचे हवामान आणि पायाभूत सुविधा पुण्यापेक्षा चांगले आहे, त्यामुळे इथे राहणे नक्कीच जास्त सुसह्य आहे. तसेच proffessionalism मला तरी खूपच जास्त प्रमाणात आढळते. रोजच्या कटकटी इथे त्यामानाने खूपच कमी आहेत असे वाटते, निदान IT hubs मध्ये तरी नक्कीच.
- इथे नातेवाईकांचे प्रमाण कमी असल्याने ज्यांना ते बंधन्कारक वाटते ते या इतर शहरांमध्ये सोपे आहे. हव्या त्या कार्यक्रमांना जाणे - न जाणे आपल्या हातात असते. तसेच मला तरी आत्तापर्यंत कोणी उगाच जास्त वेळ घेत आहे/ केव्हाही विनाकारण येऊन त्रास देत आहे वगैरे असा एकही अनुभव नाही. उलट सगळे एकमेकांशी हवे तेवढे संबंध ठेवून असतात, तसेच अडी-अडचणीला धावून येतात.
- सतत पुण्यात जाणे-येणे असते त्यामूळे सकस्-पौष्टीक ची पीठे / अडूळसा/ तत्सम वस्तू सहज आणता-मागवता येतात. शिवाय बर्याच जणांचे नोकरीनिमित्त परदेशी जाणे-येणे चालू असते त्यामुळे Aveeno आणि तत्सम गोष्टी पण सहज मिळतात.
आणखी इतर मुद्द्यांवर बरेच लिहीण्यासारखे आहे, पण उशीर झाल्याने आता इथेच थांबते. आता जमेल तेव्हा पुढचे लिहीन.
मवा, मुद्दा क्र. २ कधीही अगदी
मवा,
मुद्दा क्र. २ कधीही अगदी सहजपणे आई-वडीलांना भेटायला जाता येते. किंवा ते येऊ शकतात. - हे १००% पटलं. इथे अमेरिकेत आई-वडिलांना बोलवायचे तर सलग ६ महिने बोलावायला लागते. फक्त २/३ महिन्यासाठी बोलावून नातवंडांना आजी-आजोबांचा पुरेसा सहवास मिळत नाही, लळा लागत नाही.
पण ह्याची दुसरी बाजू अशी आहे की, सलग ६ महीने इथे रहायचे तर त्यांना त्यांचे तिथले रहाते घर बर्याच मोठ्या कालावधीसाठी बंद ठेवावे लागते. तिथल्या social लाईफ (सण, लग्नसमारंभ इ.) वर पाणी सोडायला लागते.
भारतातच दुसर्या शहरात रहात असतो, तर आई-वडिल वर्षातून २-३ वेळा येऊ शकले असते. आणि त्यांना "Best of Both Worlds" मिळाले असते.
ह्याच संदर्भात माझ्या एका मैत्रिणीच्या आयुष्यात नुकतीच घडलेली घटना विचाप्रवर्तक ठरू शकेल. तिच्या २र्या बाळंतपणासाठी तिच्या सासूबाई अमेरिकेत ६ महीने राहून परत गेल्या. त्यानंतर ती सुध्दा ३ महिने भारतात राहून आली. इथे परत येऊन १५ दिवस झाले नाहीत तोच जिन्यावरून पाय घसरून पडली आणि multiple fractures झाली.
तिच्या आईला काही कारणाने येणे शक्य नव्हते, सासुबाईंना ताबडतोब इकडे यावे लागले. तिच्या नवर्याला कामानिमित्त अमेरिकेत फिरावे लागते. २ मुलांची काळजी घेण्यासाठी, सासुबाईंना परत बोलावण्यावाचून पर्याय नव्हता. आता इतक्या सगळ्यांच्या भारत्-अमेरिका वार्या आणि वैद्यकिय खर्च ह्यांनी ते कुटुंब पुरतं जेरीस आलयं.
माझा तरी भारतात परत येण्याचा
माझा तरी भारतात परत येण्याचा आणि घर पुण्यातच असल्याने पुण्यातच येण्याचा निर्णय अगदी योग्य ठरलाय असे मला पदोपदी जाणवतय..विशेषतः माझ्या आईवडिलांना आणि सा. बा. सा.बुंना जेव्हा माझ्या मुलाशी खेळताना त्यांना त्यांच्या असाध्य व्याधींचा विसर पडलेला पाहून अगदी कृतकृतार्थ झाल्या सारखं वाटतं.
माझी रिक्वायरमेंट
माझी रिक्वायरमेंट कॉम्प्लीकेटेड आहे... कूणी मार्गदर्शन करु शकेल का?
वैयक्तीक कारनांमुळे सध्या भारतात परतायची ईछा आहे...
एच १ व्हिसा आजुन ३.५ वर्ष व्हॅलीड आहे..
सध्याच्या देशी कंपनी मधुन भारतात परतलो तर खुप म्हणजे खुपच कमी पगार मिळेल..
त्यामुळे ह्या कंपनीतुन तरी भारतात परतायची ईछा नाही..
ह्याशीवाय अमेरिके मधे पुन्हा परत यायचा मार्ग पन ओपन ठेवायची ईछा आहे.. त्यासाठी ईकडे(अमेरिकेत) कोणती
चांगली अमेरीकन्/देशी कंपनी एच १ ट्रांस्फर करुन घेईल का? आणी केल्यानंतर ६-७ महिन्यानी भारतात १ ते १.५ वर्ष परत जायला मिळेल का??
जर असेही वर्काअऊट होत नसेल तर ईकडुनच कंपनी बदलायचा विचार आहे.. त्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतील..
जॉब बदलण्याची पहीलीच वेळ आहे त्यामुळे नक्की काय करावे हे समजत नाहीये ...
आवळा, भारतात ऑफिस असलेल्या
आवळा, भारतात ऑफिस असलेल्या अमेरिकन कंपन्या ज्या आहेत तेथे प्रयत्न केले (म्हणजे येथील एच आर शी बोलायचे पण त्यांच्या भारतातील ओपन पोझिशन बद्दल) तर त्यांच्या भारतातील ऑफिस मधे आत्ता नोकरी व पुढे येथे येण्याची संधी दोन्ही गोष्टी बोलता येतील. बहुतेक कंपन्या पुढच्या अमेरिकन संधीबद्दल ठाम सांगणार नाहीत पण येथे मोठे ऑफिस असेल तर तशी संधी मिळू शकेल. भविष्यात येथे असलेल्या नोकरीसाठी आत्ता व्हिसा कोणी करणे अवघड वाटते.
फारएण्ड प्रतिसाद बद्दल
फारएण्ड प्रतिसाद बद्दल आभारी..
सध्याचा एच १ म्हणजे वाया जाणार.. असेच चित्र दिसत आहे मग
पुन्हा ह्या एच १ चा वापर करता येईल का हे ऑप्शन बघत होतो..
आवळा, तुम्हाला आवळाही खायचाय
आवळा,
तुम्हाला आवळाही खायचाय आणि कोहळाही अशी एकंदर परिस्थिती दिसते.. एकावर पाणी सोडा नाहितर कायम मध्येच लटकत रहायची शक्यता आहे
एक सिटिझनशिप सोडली तर अमेरिकेत "कायम परतीचा" ऑप्शन कुठलाही नसतो... IT मध्ये नंतर onsite जायच्या शक्यता खूप असतात. माझ्या ओळखितले बरेच जण याच मार्गाने "दुतर्फी" प्रवास चालू ठेवतात. तेव्हा अमेरीकेतून मुक्काम पोस्ट पूर्ण हलवून भारतात परता आणि मग पुढील पर्याय ऊपलब्ध होतील.
शुभेच्छा!
सध्या H1 visa साठी फारसे अर्ज
सध्या H1 visa साठी फारसे अर्ज येत नाहीत. भविष्यात नोकरी (project) मिळाली तर, तो मिळायला फारसा त्रास होऊ नये. त्यामुळे हातात असलेल H1 visa गमावण्याचा फारसा बाऊ करू नये.
ह्याउलट ग्रीनकार्ड्-सिटीझनशिपसाठी थांबायचे ठरवलेत, तर अनिश्चित काळापर्यंत वाट बघावी लागू शकते.
योग आणी soha आपल्या
योग आणी soha आपल्या प्रतिसादा बद्दल खुप आभारी आहे..
आता परत भारतातच यायचा निर्णय घेतला आहे..
झेपत नाही ब्वॉ अमेरिका .. ३.५ वर्ष काढले त्यातले फक्त ०.५ महिने काय ते एंजॉय बाकीचे लाईफ तर रटाळवानेच आहे.. फक्त $ साठी ईकडे थांबावे लागले.. शेवटि लक्षात आले .. पैसा किती पण कमावला तरी कमीच पडणार आहे..
त्या पेक्षा आहे तेवढा नीट वापरुन भारतात आपल्या लोकांबरोबर राहिलेले काय वाईट..
ईन फॅक्ट "पळसाला पाने तीनच असतात" अमेरिकेत सुध्दा भारतासारखे चोरटे/ फसवणारे लोक आहेतच.. अतिशय वाईट असा अनुभव आहे.. त्याबद्दल नंतर कधीतरी .
परत एकदा धन्यवाद..
रच्याकने.. कोणी नौकरी मिळवण्यासाठी रेफरंस देऊ शकेल का?
सध्या ५.३ वर्ष आय.टी. मधे पुर्ण झाली आहेत java/j2EE मधे अनुभव आहे.. java टीम लीड च्या पोझिसन्स साठी प्रयत्न करतोय..
लोकेशन प्रेफरंस - > पूणे, मुंबई, हैद्राबाद, बेंगलोर.आहे
कुणी रेफ्रन्स देऊ शकत असेल तर व्य.नी. मधुन कळवा..
आवळा तुम्हाला बडोदा चालेल का?
आवळा तुम्हाला बडोदा चालेल का? माझ्या नवर्याच्या मित्राच्या कंपनीत जावासाठी पोस्ट आहे पगारही चांगला आहे. संपर्कातून मला मेल टाका.
माझ्या कंपनी मधे पण आहे वाटत
माझ्या कंपनी मधे पण आहे वाटत vacancy . माझ्या वि पु मधे तुमचा ईमेल ईद दिलात तर बाकीचे details देता येतील. आमची कंपनी हैदराबाद ला आहे
आवळा.. मला पाठवा तुमचा
आवळा.. मला पाठवा तुमचा प्रोफाईल..
मी करू शकेन काही तरी..
मी सध्या कंपनी मधे java/j2EE Resource Manager म्हणुन काम करते आहे..
संपर्कातून मला मेल टाका.
~ योगिता
आवळा कॅपगेमिनीमध्ये देखिल
आवळा कॅपगेमिनीमध्ये देखिल ओपनिंग आहे असे कळते.
maazyaa maitrinisaathee
maazyaa maitrinisaathee mumbaitalyaa hr-consultants chee naave aani no pahije hotee.te sadhyaa usa t aahe aani pudhachya weekmadhye indiat kayamachee parat yenar aahe. plz help kara
स्वप्ना.. मॉन्स्टर आणि
स्वप्ना.. मॉन्स्टर आणि नौकरीवर सिवी टाकायला सांग कन्सल्टंट स्वतः संपर्क करतात.
मंडळी... या धाग्यावर परत
मंडळी... या धाग्यावर परत येतानाचे आणि आल्यानंतरचे अनुभव लिहिणं अपेक्षित आहे.
नोकरीच्या संधींसाठी वेगळा धागा आहे.. नोकरीच्या शोधात
धन्यवाद मनीष
धन्यवाद मनीष
Pages