परतोनि पाहे (परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव)

Submitted by रैना on 5 January, 2010 - 01:52

इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.

- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणाला US मधे १० ग्रेड करुन भारतात Jr college च्या admission बद्दल महिती आहे का? arts/commerce मधे. आणी arts केले तर नन्तर पुढे arts school मधे जायची इछा आहे.

मंडळी कसे आहात?
रैनाच्या अभिनव पण सर्वांच्या मनात असलेल्या या बीबी ला एक वर्ष झाले.

परतणार्‍यांचे निर्णय कुठवर आले?
परतणे झाले का? तर का?
परतले असाल तर आता कसे वाटते आहे?

घर, आवश्यक ती आर्थिक व्यवस्था आणि मुलांची शिक्षणे या वर काय समस्या आल्या, येत आहेत?

एकुण अनुभावांविषयी एक वर्षाने मागे वळून पाहायला कसे वाटते आहे?

१. पुण्यात शाळांमध्ये भंयकर फिया आहेत. प्रत्येक मुलासाठी साधारण ५० ते ७० हजार वार्षीक तयारी हवी. (ते ही मर्सेडिज सारख्या शाळेत नाही, तर अगदी साधारण, पण चांगल्या सोयी असलेल्या शाळामंधून, जिथे एका वर्गात ३० च्या वर मुलं नसतील अश्या शाळा).
२. अमेरिकेतून वा कुठूनही भारतात काहीही आणायची गरज नाही. अगदी रोजच्या सिरल बार पासून ते ३डी टिव्ही पर्यंत सगळं हवे तेवढे पैसे मोजले की मिळेल.
३ घराबद्दल (किमती बद्दल) बोलने नकोच.

खूप सार्‍या विचारा नंतर असे "कळाले" की भारतात परत यायचे असेल तर बौद्धिक निर्णय कधीच घेता येणार नाही, तो "भावनिक" असायला पाहिजे. विचार करून नुसता भुगाच निर्माण होतो. मी पूर्णपणे अजुन गेलो नाही, पण ऑलमोस्ट तिथे पोचलो असे म्हणावे लागेल. उतरल्या दिवशीच का आलो इथे असे वाटले, दोन दिवस ती फिलिंग होती, नंतर गेली, मग हेच आपलं घर ही फिलिंग आले, हा काळ फार महत्त्वाचा आहे, बहुदा इथेच परत बौद्धिक निर्णय भावनिक निर्णयावर मात करतो आणि पब्लीक परत येतं. पहिली फिलिंग येण्यापाठीमागे मुख्यतः इन्फ्रा आणि काही लोकांची उद्दाम वागणूक कारणीभूत होती, आता तयारी झाली!

वेळोवेळी अपडेट देत राहिन. Happy

ब्लॉगच लिहावा म्हणतोय.

मी कामाला बाहेर असलो तरी महिन्याभराने मुंबई मध्ये येतोच.. बरेचदा बाहेर जाऊन रहावेसे वाटते.. पण अजूनही निर्णय होत नाही... निर्णय बौद्धिक असेल तर नक्कीच बाहेर जाईन असे वाटते पण निर्णय भावनिक असल्याने अजूनही बाहेर जावेसे वाटत नाही... परत येण्याची गोष्ट दूरच... Happy

तळ्यात मळ्यात अजून चालू आहे... देशात येण्या आधीच स्वताचा उद्योग धंदा बसवायच्या दृष्टीने काम चालू आहे. थोडक्यात व्यावसायिक धोके टाळणे/कमी करणे या दृष्टीने.
यातून गेलेल्या अन ऊस्गावातून देशात येवून आताशा गेले ३ वर्षे देशात स्थायिक झालेल्या एका मित्राशी फोन वर बोललो.. अर्थात वर अनेकांनी लिहीले तसेच शेवटी निर्णय ५०-५० आहे असे त्याचेही मत पण एक त्याचा सल्ला मोलाचा वाटला:
if you can earn very well, say very well above the average, then most likely your network (social, commercial, personal) will mirror NRI lifestyle which to certain extent feels like staying in home country but getting amenities same as US/UK. Of course you have to deal with pollution, corruption, etc etc.... etc... key is define and manage your own expectations!
थोडक्यात देशात पैशाने बरेच काही विकत घेता येतं- सॉ कॉल्ड सुख सोयी.. पण नागरी सुविधा, सामाजिक सभ्यता व कॉमन सेंस या बाबतीत एकंदरीत अजूनही अंधार आहे असे त्याचे मत. सुधारणा होत आहेत पण जी पिढी आत्ता या पर्देशातून देशात या संक्रमणातून जात आहे त्यांना बराच काळ सबूरीने रहावे लागेल.. पुढील पिढीसाठी मात्र अनेक गोष्टी आधीच सुधारलेल्या असतील अशी लक्षणे आहेत.

आतापर्यंत जितक्या देश वार्‍या केल्या आहेत, एक गोष्ट नक्की, "मानसिक तयारी असेल" तर अनेक गोष्टींना part of the deal म्हणून सामोरे जाता येईल आणि एक फायदा नक्की आहे की not lot has changed since last time.. so you kind of know what to expect, if that helps.

तूर्तास विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर या न्यायाने दुबईत आहे.. सॅन डीयेगो मधिल कायमचे वास्तव्य सोडून ३ वर्षापूर्वी सहकुटूंब ईथे आलो त्या एका मोठ्या धाडसी निर्णय, कृतीपेक्षा, देशात जाणे, रहाणे नक्कीच जास्त सोपे असेल. Happy फक्त वेगळ्या कटकटी आणि वेगळे प्रश्ण.. Happy
एक मात्र नक्की आहे जगात कुठेही जा- कष्ट करायची तयारी, आत्मविश्वास, चौकटीच्या बाहेरचा थोडा विचार, परिस्थितीशी जुळवून घ्यायची कुवत आणि आपले समाधान्/आनंद कशात आणि किती आहे याची जाण, हे असेल तर कुठेही रुजणे आणि नव्याने रुजून पुन्हा फुलणे शक्य आहे (अनुभव आणि मत!).

आम्हाला या जुनमधे परतुन १ वर्ष होइल. परतल्यावर कसे वाटतय याचे मला स्वतःला अजुनही उत्तर मिळालेले नाही. आयबुने लिहिलेले अनुभव आम्हालाही आले आहेत. काही दिवसानंतर सगळ्याची सवय होतेच.

परत येणार्‍यांसाठी/येण्याचा विचार करणार्‍यांसाठी काही (फुकटचे) सल्ले:
१. परतायचा विचार असेल आणि मुलांच्या शाळेचा प्रश्न असेल तर त्याचे प्लॅनिंग करायला हवे. साधारण डिसेंबर्/जानेवारीत अर्ज इ. उपलब्ध होतात तेव्हा तिथुनच हालचाली सुरु कराव्यात.
२. स्वतःचे घर आधीच असेल तर प्रॉब्लेम नाही पण नसेल तर जरा आधीपासुन हालचाली करायला हव्यात(भाड्याचे/खरेदी करण्यासाठी).
३. तिकडे घर्/नोकरी/सिटिझन्शिप/ग्रीनकार्ड वगैरे वगैरे झाले असेल तर ते सोडुन भावनेच्या आहारी जाउन परत येण्यात काहीच पॉइंट नाही. समजा सिटिझन्शिप होउन आलात तरी एक वेळ ठीक आहे पण ग्रीन कार्ड अबँडन करुन येण्यात काहीच अर्थ नाही. (अपवाद: जवळचे नातेवाईक आजारी आहेत्/एकटे आहेत आणि त्यांची जबाबदारी असेल आणि दुसरा काही पर्याय नाही..अमिताभच्या भाषेत - कुछ चीजे फायदे और नुकसानसे उपर होती हैं)
४.परतण्याच्या निर्णयात पत्नी, मुले (मोठी असतील तर) यांचा विचार अवश्य घ्यावा/करावा. एकतर्फी निर्णयाने त्याना त्रास होउ शकतो.

एक मात्र नक्की आहे जगात कुठेही जा- कष्ट करायची तयारी, आत्मविश्वास, चौकटीच्या बाहेरचा थोडा विचार, परिस्थितीशी जुळवून घ्यायची कुवत आणि आपले समाधान्/आनंद कशात आणि किती आहे याची जाण, हे असेल तर कुठेही रुजणे आणि नव्याने रुजून पुन्हा फुलणे शक्य आहे (अनुभव आणि मत!).
---- अनुमोदन.

if you can earn very well, say very well above the average,>What is avarage? हे ठरवणे खुप कठीण. NRI lifestyle साठी कमीत कमी ८०,०००/- प्रति महिना टेक होम लागेल. परदेशात बसुन अंदाज बांधलेत तर जबरदस्त धक्का बसायची शक्यता आहे. ज्या गतीने इथे महागाई वाढते आहे त्यानुसार वार्षीक २० ते २५% पगारवाढ देणारी नोकरी पाहिजे.

>>NRI lifestyle साठी कमीत कमी ८०,०००/- प्रति महिना टेक होम लागेल.

ओह! मी जितक्या nri ना विचारले त्यांच्यानुसार २ लाख प्र महिना "नेट" किमान. अर्थात एकंदर कुटूंबाचा आकार, शाळा, वहाने, ईतर जबाब्दार्‍या हे सर्व लक्षात घेतले तर हा आकडा योग्य वाटतो.
ज्यांना विचारले त्यांचे:
१. स्वताचा बंगला/मोठे घर- ५ लोकांना पुरेल असे (भाड्याचे असले तर २०-३० हजार प्र. महिना)
२. दोन मुले- एक माँटेसरी (महिना २-३ हजार फी) एक प्राथमिक शाळेत. (महिना ६-८ हजार फी)
३. आई वडील बरोबर
४. एक मोठे वाहन व एक छोटे वाहन
५. साधारण महिन्याला २-३ वेळा बाहेर जेवण
६. महिन्यातून किमान एकदा सहकुटूंब बाहेर फेरी/सहल्/ट्रिप
७. बाकी ईतर मासिक खर्च (बीले, कपडे, धान्य, भाजीपाला, ई..) अगदी अवाजवी नाही पण काटकसरही नाही.. (साधारण २० हजार प्र. महिना)

असो. प्रत्यक्षात ईथे कुणी खर्चाचे आकडे आणि रहाणीमान दिले तर अधिक ऊपयुक्त माहिती असेल..

खर्च एक अंदाज
ग्रोसरी १५००० ( धान्य, क्लीनिन्ग सप्लाइज, कॉस्मेटिक्स )
भाजी व फळे धरल्यास ८०० -१०००
नॉनव्हेज खात असल्यास मासे मट्न अंडी चिकन यावर २००० कमित कमी
पेट्स असल्यास ३००० रु महिना पेट्स वर खर्च आहे.
शॉपिन्ग व करमणूक( सिनेमा वगैरे) महिना ५०००.०० सहज एका चार मेंबर फॅमिली साठी. ह्यात स्पेशल शॉपिन्ग नाही जसे दिवाळीची साडी / पुरुषांचे सूट वगैरे. पोरांना मॉल मध्ये फिरवून आणणे/ खायला घालून आणणे फक्त.
हाय एंड ब्रँड्स सर्व मिळतात पण महाग उदा बॉडिशॉप कॉस्मेटिक्सच्या दुकानात १००० च्या खाली काहीच नाही.
इलेक्ट्रिक बिल१५०० - २००० कमीत कमी. ( २ एसी, २ एल सीडी टीवी. लॅपटॉप कायम चालू, फोन चार्जिन्ग,
वॉशिन्ग मशीन, गीजर वगैरे धरून) उन्हाळ्यात ६००० परेन्त टॉप्स.
फोन बिल्स. मुले मोठी असल्यास त्यांचेही बिल. आई, मुले, मेड, ड्रायवर यांची मोबाइल बिले. ३००० - ४००० बाबाच्या फोनचे बिल हपीस भरणार असल्यास.
नेट कनेक्षन १००० रु.
पाणी खर्च १००० रु.
पेट्रोल बिल( किलर आहे) कार १०००० ( जर मोठी पेट्रोल कार असेल तर) स्कूटर/ बाइक मुलांची तरी ५००- १०००
ड्रायवर पगार ७००० रु. मेड/ मेडस ५००० कपडे इस्त्री ७०० - ८०० रु.
औषधे वगैरे १००० रु.
क्रेडिट कार्ड इंटरेस्ट हे येतेच ५०० - १००० अगदी काटेकोर राहुनही. वायफळ खर्च आहे.
धड्की भरते ना.

योग, अरे मी २+१ साठी लिहिले होते.
साधारण भाडे - १७०००/-
मुलाची फि - ४०००/-
ग्रोसरी - ५०००/-
भाज्या फळे - ३०००/-
पेट्रोल + मेन्टेनन्स- ६०००/- (कंपनीत जायचे धरले नाही)
बाहेर जेवणे खरेदी - ५०००/-
बाहेर फिरणे - ३०००/-(on & avarage. Weekend trip to Jim Corbett from my home last week cost me Rs. 12000/- this too we shared car(petrol) and Jungle ride with one family. )
विज बिल - २०००/- (avarge in winter bills around 1000/- in summer around 3000/- there is no rainly season in Delhi NCR :-))
बाकी किरकोळ - ५०००/- (laundry, medicine phone, maid etc)

एकुण - ५००००/-
बाकी जर घर / गाडी हप्ते - ३००००/-
एकुण - ८००००/-
हे माझे खर्च आहेत. मी दुबईत होतो पण परत आल्यावर lifestyle मधे फार बदल केले नाहीत. बध पटतात का. हे खर्च दिल्ली नोएडा मधले आहेत. पुण्या मुंबईत थोडे जास्त असतील. दर वर्षी ह्यात किमान १० ते १५% वाढ अपेक्षित आहे.

मंदार

हो साती, तरी माझी दीड माणूस व दोन कुत्रे एवढीच फ्यामिली आहे. ह्यात शिक्षण खर्च नाही लिहीला मी.
शाळेचे प्रॉजेक्ट्स, शूज, ड्रेसेस स्टेशनरी, सीडीज बुक्स १५००- २००० फी वेगळी, बस खर्च वेगळा. इन्वेस्ट्मेंट, विम्याचे हप्ते वेगळे.

ममी, मंदार..
धन्यवाद! "मेहेंगाई डायन.. " Happy

मंदार २+१ साठी ८० तर २+४ साठी १६० Happy शिवाय यात ईमर्जंसी हॉस्पिटल खर्च, मामी म्हणतात तसे सणावाराचे खर्च, ई. सर्व येत नाही.. तेव्हा मला सांगितला गेलेला २ लाख आकडा अगदी "रियल" आहे म्हणायचे.
असो. एव्हडे खर्च करूनही तुमची सर्व कामे वेळेत होतीलच असे नाही, शिवाय ईतर सामाजिक प्रश्ण, स्वच्छता, नागरी सुविधांच्या गैरसोयी वगैरे असतातच. ईतकेच कशाला अगदी घरची कामवाली देखिल मुंबईत डोकेदुखी ठरते (माज करते). शिवाय दर वर्षी भेट देणारे अनेकविध आजार, संसर्गजन्य रोग (हे मुख्यतः घाण, कचरा ई. मूळे). तेव्हा वर काहिंनी म्हटले तसे निव्वळ वस्तूनिष्ट तत्वावर बघायचे तर एव्हडा खर्च करून देखिल घराबाहेर पडले की अनेक गैरसोयी- तेव्हा कोण परत येईल? महिना २ लाख म्हणजे साधारण ४५०० डॉलर कींवा १७,००० दिर्‍हाम यात अनुक्रमे ऊसगाव वा अमिराती दोन्हीकडे अगदी ऐश मध्ये रहाता येईल सर्व नागरी सोयी सुविधांसकट!
मध्यंतरी कुठेतरी वाचले होते की मुंबई सारख्या शहरात cost of living (nri) is higher than the likes of us, uk, uae..आता वरील हिशेब बघितल्यावर ते खरे वाटू लागते.
खरं तर स्वताच्या देशात रहायला कितीतरी जणांना नक्कीच आवडेल.. आणि वरील सर्व गोष्टी लिहीणे ते देखिल आपल्याच देशाबद्दल हेही जास्त क्लेशकारक असते हे नमूद करतो. असो.

यापलिकडे मी जे सामाजिक जीवन म्हणतोय त्याबद्दल मला देशात आता पुन्हा स्थायिक झालेल्या बर्‍याच जणांकडून संमिश्र प्रतिक्रीया मिळाल्या जसे की:
१. नाटके सिनेमे कुटूंबाबरोबर पहायची सोय आहे.. पण "तिथे" जायलाच नको असे वाटते ईतकी घाण व सामाजिक दुरावस्था आहे
२. बाहेर मुलांना खेळायला बागा/ऊद्याने मात्र फारशी उपलब्ध नाहीत (हे ऊसगावच्या तुलनेत).. असतील तिथे २ घसरगुंड्या आणि २०० मुले अशी परिस्थिती असते.. अस्वच्छता व घाण तिथेही पाठ सोडत नाहीत.
३. तुमच्या मुलाच्या शाळेत कुठला सामाजिक वर्ग आहे/असेल ही एक फार मोठी डोकेदुखी ठरू शकते. "तसल्या" कटकटी नको असतील तर थोडक्यात महाप्रचंड फिया घेणार्‍या शाळातून मुलांना घालायचे पण तिथे जागा कमी अन मुले जास्त..
४. नशीबवान असाल तर शहरात चांगले स्वच्छ, न लुबाडणारे, अगदी भरपूर पैसे देवून तरी चांगली सेवा देणारे हॉस्पिट्ल असेल..
५. देशात बाळंतपणे आणि नंतरचा त्रास यावर ईतके अध्याय ऐकलेले आहेत की बस्स!
"पैशासाठी सिझेरीयन पासून ते नंतर ईस्पितळात दिली जाणारी ट्रीटमेंट..
६. पर्यटन्-विकास ई. च्या नावाने भयानक राजकीय ऊदासिनता असल्याने ढीगभर पैसे मोजून देखिल बिना कटकटीच्या सहली सहकुटूंब होत नाहीत.. lack of infra and logistics is major issue..हा आता दोघेच जोडीने निव्वळ बाईक वर फिरायला गेले तर भाग वेगळा.. पण मोठ्या एकत्र कुटूंबात तसे होत नाही.
७. आणि सर्वात वैतावगाडी प्रकार ज्यावर बर्‍याच जणांचे एकमत दिसते ते म्हणजे नातेवाईक व शेजार पाजार्‍यांची तुमच्या कुटूंबात नको ईतकी लुडबूड.. शिवाय यांना टाळणे तितके शक्य नसते (पानी मे रेहके मगररमछ से बैर वगैरे...). तेव्ह "पर्सनल स्पेस" कितीही पैशात विकत घेता येत नाही..
८. खेरीज एकंदरीत मिडीयाचा प्रभाव हा तर एक प्रचंड डोकीदुखीचा विषय ठरला आहे- विशेषतः पालकांसाठी.
९. सर्वात शेवटी जर तुम्ही परतून एखाद्या खाजगी कंपनीत ऊच्च पदावर असाल तर हाताखालील स्टाफ च्या प्रोफेशनलिझम बद्दल अन एकंदरीत कामाची गुणवत्ता, सहकार्य याबद्दल न बोललेलेच बरे.. mnc मध्ये अनुभव जरा बरे आहेत पण ईतरत्र मात्र प्रत्त्येक काम जवळ जवळ स्वतःच करायची तयारी ठेवावी लागते.
IT मध्ये नेमके याच्या उलटे ऐकले आहे जसे की वाट्टेल तेव्हा वाट्टेल तसे कामाचे तास.. now wonder, lot of my friends who were in IT, preferred onsite assigments in US, UK, etc.. where work hours are decent and much more time is available for personal and family life. तेव्हा IT मध्ये असाल तर ईतका पैसा कमवून्/खर्च करून कौटूंबीक आयुष्या साठी देखिल वेळ मिळणार नाही.. पण एव्हडे पैसे मिळवायचे तर IT मध्येच नोकरी हवी (अन्यथा स्वताचा धंदा) हे असले दुष्टचक्र आहे.. असे एकंदरीत ऐकून आहे..

तेव्हा, ईतक्या सर्व गोष्टींना सामोरे जावून रहायचे हे तितके सोपे नाही- विशेषतः जेव्हा तुम्ही या सर्वापासून गेली अनेक वर्षे दूर राहिलेले असता... (किमान ७-८ वर्षे परदेशातील वास्तव्य तेही कुटूंबासकट ईथे गृहीत धरतोय. त्यातही ऊच्च शिक्षणासाठी जावून मग मागाहून कुटूंब वाढणे वगैरे हे तर अजूनच वेगळे) आणि आयुष्याचा एक मोठा भाग तुम्ही परदेशातील तुमच्या वैयक्तीक वा सामाजिक सुधारणे साठी दिलेला असता तेव्हा.

एकंदरीत काय तर, भावनिक अंगाने तुम्ही आधीच्या पिढीत/भूतकाळात अडकलेले असता, वैयक्तीक दृष्ट्या तुम्ही वर्तमानाने ग्रस्त असता तर तुमची पुढील पिढी (मुले वगैरे) अधिक सुखावह वातावरणात वाढावी, रहावी ,या इच्छेपोटी तुम्ही भविष्याच्या चिंतेत असता.. :). भूतकाळ हातून गेलेला असतो, वर्तमान मनासारखा बदलण्याची शक्यता कमी असते तेव्हा दूरगामी भविष्यकाळाला समोर ठेवून निदान त्या दृष्टीने तजवीज करायची तर त्या अनुशंगाने वर्तमान व नजिकच्या भविष्यकाळात बरेच निर्णय घ्यायला सोपे जाईल असे वाटते.
Grass is green on other side.. should you choose to be on any side! don't look how far you have come but look how far you have to go...? असे काहीतरी... Happy

अश्विनी तुझ्याकडुन वाचायला पण आवडेल.
वरचे खर्च खरच फार वाटताहेत. शिवाय त्यात इन्श्युरन्स , प्रॉपर्टी टॅक्स , बिल्डींग मेंटेनन्स नाही लिहिलेत. ते पण लागतीलच

निनाद,
धन्यवाद. बरे झाले हे प्रश्न विचारलेत. मी विचारच करत होते की इकडे एकदा विचारावे. Happy

आयबुंना अनुमोदन.
योग/मानस्मी- वाचते आहे.

-आमचे म्हणाल तर.. सध्या मुंबईला अतिशय वैतागलो आहोत. मागील पावसाळ्यात कम्युटटाईम दिवसाचे ५ तास एवढा झाला होता तेव्हा वेड लागायची पाळी आली होती. अतिशय आवडीच्या अशा सांस्कृतिक (मैफिली, नाटक इ.) कार्यक्रमांना पूर्ण फाटा द्यावा लागतो. (वेळ नाही, कम्युट टाईम वगैरे.)
-इथे आल्यापासून वर्कलाईफबॅलन्सची (हे काय असते?) बर्यापैकी वाट लागली आहे.
- इथे 'स्वतःसाठी वेळ' काढणे अशक्य असते. विशेषत: स्त्रियांना. परदेशात मदत करणारे नवरे इकडे आल्यावर सामाजिक आणि आईवडलांच्या दबावामुळे पुन्हा 'नवर्यांसारखे' वागायला लागतात, बायकांना अचानक पुन्हा डोईवर पदर वगैरे घ्यावा लागतो म्हणे.. वगैरे.. मी बर्याच परत आलेल्या बायकांकडुन हे ऐकलेले आहे.
रुढींचे काच पुनःश्च आवळल्या जातात असा खूप लोकांचा अनुभव आहे. कारण वैयक्तिक निर्णयांसाठी / तत्वांसाठी वाईटपणा घेण्यातकी वैचारिक स्पष्टता बर्याच लोकांकडे नसते, त्यामुळे 'करावे लागते... लोकं काय म्हणतील..' वगैरेंचा शिरकाव इथे आल्याबरोबर आयुष्य व्यापुन टाकतो.
व्यक्तिश: आमच्या बाबतीत आम्ही दोघं जगाच्या पाठीवर कुठेही राहिलो तरी तसेच वागू त्यामुळे आम्हाला फरक पडत नाही.
- महागाई आणि बडेजाव. इथेही लोकं हळुहळु अट्टल आणि serial consumers बनत चालले आहेत. भपकेबाजपणा असह्य होतो कधीकधी.
- सामाजिक चालीरीती/ समस्या. उदा- जातीवाद, निरक्षरता, सार्वजनिक अस्वच्छता वगैरे. परदेशात एकप्रकारच्या कोसल्यात राहतो आपण, ना इथले ना तिथले. सोयीस्कररित्या दोन्हीकडील चांगले पारखून आत्मसात करता येते. इथे समाजातील अनेक स्तरांतील लोकं अजूनही आपसूक भेटतात, आणि आपण काहीतरी यथाशक्ती/यथामती केलेच पाहीजे, करु शकतो (आणि बरेच काही करु शकत नाही) याच्याशी पुन्हा एकदा परिचय होतो. 'ये जो देस है तेरा' हे आपल्यापुरते खरे ठरते. याबाबतीत मी समाधानी आहे.
- बाकी मुलीसोबत वाढताना फार सुरेख असे काही हाती लागते मधून मधून. इतर सर्व आमच्यासाठी गौण आहे.
- ऋतूनुसार आहार, साधेपणा, संगीतशिक्षण, मराठी पुस्तकं या बाबत अतिशय आनंद वाटतो.
- लिंगभेदाशिवाय उत्तम करियर opportunities मिळू शकतात. (स्त्रियांसाठी फार महत्त्वाचे).
- घरातील जेष्ठ नागरिकांप्रती असलेली कर्तव्ये योग्य प्रकारे निभावता येतात. मनाला रुखरुख लागून रहात नाही.

रैना,
थोडक्यात "भावनिक" अनुशंगाने (पोस्ट मधिल शेवटचे काही मुद्दे) समाधान आहे पण बाकी मात्र असह्य असे..?

बाकी मात्र असह्य असे<<<
??
वाद नाही योग पण इथे रहाणारे सगळे नाईलाजानेच इथे रहातात का? परदेशात जायला मिळत नाही म्हणून वगैरे? वरती मांडलेले अनेक प्रॉब्लेम्स इथे आहेत याबद्दल दुमत नाही पण ते प्रॉब्लेम्स अनेकांना भावनिकच नव्हे तर व्यावहारिक पातळीवरही 'कमी महत्वाचे' वाटत असतीलच की.
या वळणाला या बाफवर न्यायची माझी इच्छा नाही पण तसंच चित्र दिसायला लागलं म्हणून विचारलं.

अंऽहं. इतका सोपा निष्कर्ष निघेल का योग?
शेवटी हे आमचे <आणि आपल्या सगळ्यांचेच> (एकमेव) आयुष्य आहे. Happy

असह्य असे नाही. अवघड मात्र आहे.
तसे ते तिथेही होतेच. तिथल्याही शेकडो गोष्टी मला आवडल्या नव्हत्या किंवा अवघड वाटल्या होत्याच.

या विषयाबाबतीत..मला असे वाटले की आपला निर्णय (कल) आधीच झाला असतो. आपण सगळेच फक्त सहमतीदर्शक पोस्टी शोधतो आणि समाधान मानतो. Happy

>>मला असे वाटले की आपला निर्णय (कल) आधीच झाला असतो. आपण सगळेच फक्त सहमतीदर्शक पोस्टी शोधतो आणि समाधान मानतो.
अगदी अगदी.

सगळे नाईलाजानेच इथे रहातात का?>>> हे आणि,
ते प्रॉब्लेम्स अनेकांना भावनिकच नव्हे तर व्यावहारिक पातळीवरही 'कमी महत्वाचे' वाटत असतीलच >>>> नीधप ला १००% अनुमोदन.
इथे इतकीही काही वाईट परिस्थिती नाहीये लोकहो. माझ्या पाहण्यात असे असंख्य लोक आहेत जे इथे परत येऊनही सुखा-समाधानाने आयुष्य जगत आहेत. जे गेलेच नाहीत तेही अर्थातच सगळे दु:खी आहेत असे नाहीच. प्रत्येकाच्या गरजा, परिस्थिती, प्रायोरीटिज वेगळ्या.

मला वैयक्तिक परत आल्याचा खुप फायदा झाला. एकतर आम्ही दुबईतुन आलो होतो. त्यामुळे सामाजिक संक्रमण वगैरे काही नव्हते. दुबईत शारजा दुबई अप डाउन, प्रचंड काम आणि descrimination यांनी खुप वैतागलो होतो. दिल्लीत मस्त आहे. in fact I enjoyed/enjoying WLB in India. योग ने लिहिलेले सर्व problems आहेत. पण भारत एवढापण खराब नाही. दुबईपेक्षा येथे मला सुरक्षीत (नोकरीसाठी) वाटते. असो परत येणे/ फायदे तोटे हे सगळे खुप वैयक्तिक आहे. मुलाची शाळा येथे चांगली आहे. तो येथे चांगला टफ झाला आहे. येथे नोकरीचे भरपुर options आहेत. असो...

नी,

>>सगळे नाईलाजानेच इथे रहातात का?>>>
अगदी योग्य मुद्दा आहे तुझा.. पण तसे नाही/नसावे असे माझे एकंदरीत मत आहे. निदान माझ्या पोस्ट मधून मला तसे सुचवायचे नाही.

शिवाय,
>>परदेशात जायला मिळत नाही म्हणून वगैरे? वरती मांडलेले अनेक प्रॉब्लेम्स इथे आहेत याबद्दल दुमत नाही पण ते प्रॉब्लेम्स अनेकांना भावनिकच नव्हे तर व्यावहारिक पातळीवरही 'कमी महत्वाचे' वाटत असतीलच की.

(माझी आधीची पोस्ट एकूणात फार नकारात्मक झाली आहे का?) Sad

यावर खर तर मलाही तुझ्याच सारखे वाटते म्हणजे तसे नसावे वगैरे.. पण १०० पैकी ९० जण "बाहेर" जायच्या संधी शोधत आहेत असे माझ्या लक्षात्/पाहण्यात आले.. प्रत्त्येकाची कारणे वेगळी असूही शकतील तेव्हा सरसकट निश्कर्ष नाही काढता येणार.. पण माझ्या पोस्ट मधिल बरेचसे नमूद केलेले प्रॉब्लेम्स हे "कमी मह्त्वाचे" असतील असे मला वाटत नाही, विशेषतः शाळा, सामाजिक गैरसोयी, ईस्पितळांच्या बाबतीतले वगैरे.. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांना निदान "पर्याय" तरी उपलब्ध आहेत एव्हडेच मला म्हणायचे होते.. पण निव्वळ पैसा असू देखिल काही प्रॉब्लेम सुटत नाहीत हेही खरेच आहे ना?
असे आहे की अगदी छोट्या छोट्या गोष्टीत जेव्हा तुमचा वेळ, पैसा, शक्ती खर्च पडू लागते तेव्हा अर्थातच एकंदरीत कार्यबल अन तुमची ऊद्दिष्टे यांवर व्यावहारीक मर्यादा येतात- नेमकी तिथेच आपण देशात मार खातो. सामान्यांचे आयुष्य देशात कठीणच आहे, आणि वरच्या आधीच्या पोस्टी अगदी nri liefstyle वगैरे शी संबंधीत धरल्या तरी देखिल भोवतालची परिस्थिती फार वेगळी नाही. शिवाय nri lifestyle मध्ये मला तरी सो कॉल्ड ग्लॅमर अभिप्रेत नाही. शिवाय देशात विषमता ईतकी आहे की एकाच शहरातील रहाणीमान दुसरीकडे तसेच लागू होईल असेही नाही त्यामूळे एकंदरीत तुमच्या निर्णय प्रक्रीयेत "स्थान महात्म्य" मह्त्वाचे ठरते Happy

एकंदरीत बाहेर अनेक काळ घालवल्यावर तेच "जुनेच" प्रश्ण (?) आता नव्याने तुमच्या परतीच्या मार्गावरील निर्णय प्रक्रीयेत जरा जास्त क्लिष्ट वाटू शकतात का असे मला सुचवायचे होते.. किंबहुना मह्त्वाचे निर्णय घेताना या अशा बोचणार्‍या वा न पटणार्‍या, नकारात्मक बाबीच जास्ती लक्षात येतात बहुदा आणि मग ईतर सकारात्मक गोष्टी लक्षात घेवून साधारण दोन्हीचा एक सुवर्णमध्य नाही पण meeting point असा काढता यायला हवा..

देशात परत जायचे तर पुन्हा त्याच पाटया टाकायला नव्हे तर किमान स्वताबरोबर ईतर अनेकांचा विकास करता येईल का या मुलभूत प्रश्ण/मुद्द्यावर विचारमंथन चालू आहे... तेव्हा त्या अनुशंगाने अनेक बर्‍या वाईट पोस्टी पडतील.. समजून व सामावून घेणे Happy

शिवाय या अनुभवातून गेलेल्यांच्या विचारांतून बरेच काही घेण्यासारखे आहेच.. तेव्हा कुठलेही भलते वळण न लागता ही देवाण घेवाण चालू रहावी असे वाटते.

>>मला असे वाटले की आपला निर्णय (कल) आधीच झाला असतो. आपण सगळेच फक्त सहमतीदर्शक पोस्टी शोधतो आणि समाधान मानतो
रैना,
तसे असते तर फारच सोपे होते.. Happy मला वाटतं, समाधान पोस्टीतून नव्हे तर दैनंदीन जीवनातून शोधायचा प्रयत्न आहे, त्या अर्थाने "निर्णय" महत्वाचा !

गजानन,
हाडाच्या मुंबईकराला रुळ बदलण्याची आणि खडखडाट दोन्हीची सवय असते Happy किंबहुना मुळातच अस्सल मुंबईकर हा स्वताच एक पुल आणि पुश ईंजीन आहे, कुठलाही घाट चढा ऊतरायला सक्षम!
(पुल ईंजीन जन्मजात, पुश ईंजीन बायको आल्यावर) Happy

स्वताबरोबर ईतर अनेकांचा विकास करता येईल का या मुलभूत प्रश्ण/मुद्द्यावर विचारमंथन चालू आहे..>> हे अवघड वाट्ते मला तरी. फार मदत करायला गेले तर लोक तुम्हाला एक सोर्स म्हणून बघतात. प्रत्येकजण आपापला विकास करायच्याच मागे आहे इथे. समाज सेवा हा उद्देश असेल तर वेगळे मग वरील लाइफस्टाइल सोडून द्यावी सरळ. तेच पैसे समाज सेवेत कारणी लावता येतील.

Pages