परतोनि पाहे (परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव)

Submitted by रैना on 5 January, 2010 - 01:52

इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.

- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

malaa kharchachi faarch atishayoktee zalelee vaatate. maaze me,navara aani 4 varshacha mulaga ase kutumba aahe .amhi pimple saudagar , pune yethe rahato .navara ekatach kamavanara aahe. ghar aadhich gheuun thevale asale taree karj ajun chalu aahe.mulacha shalecha kharch etc dharun baherche khane molakarinee vagaire sambhalun amhala mahinyala 15000 kharch yeto. arthat needs aani wants yatala farak kalala kee aayushya sukar hote. he fakt mee maazyapurate lihile aahe malahi ameriketun yeun 25 tarakhela 1 varsh hoil. pratykacha jaganyaachaa marg nirala asato, kharchahi nirale astat tyamule pratyekane tharavave aapalyala kay pahije te:)

समजा आपल्याला कसल्याही मजबुरीशिवाय निर्णय घ्यायचा आहे. अशी स्थिती अपवादानेच असते, तरीही उदाहरण म्हणून.
१-१० या स्केलवर यातील प्रत्येक घटक (काही राहिलेत का ?), त्या घटकाचा आपल्या आयुष्यातील priority (प्राधान्यक्रम) आणि भारत/भारताबाहेर आपल्या मतीनुसार ranking यांची सरळ गोळाबेरिज तरी होऊ शकेल काय?
(माझा तक्ता तुमच्या तक्त्यापेक्षा वेगळा दिसेल का? तर हो. कारण माझ्या आयुष्यात आत्ता प्राधान्यक्रम वेगळा आहे) Happy

- मूलभूत सोयी/ सुविधा (वीज, पाणी, रस्ते, आरोग्य,कायदा आणि सुव्यवस्था)

- GDP /आयकर/ इतर macroeconomic घटक
- मुद्रास्फिती (Inflation)
- Cost of Living
- वार्षिक उत्पन्नातील सहज शक्य असलेली जीवनपद्धती
- मालमत्ता (property)
- निवृत्तीनंतरचे आयुष्य आणि तरतूद
- वार्षिक उत्पन्न (आवडीच्या क्षेत्रातले)
- Cost of Mobility

- करियरच्या समान संधी
- गुणवत्तेनुसार आपल्या आवडीच्या क्षेत्रात कामाच्या सहज उपलब्ध संधी

- निवृत्तीनंतरचे सामाजिक/सांस्कृतिक आयुष्य
- मृत्युविषयक धारणा
- भेदभाव (वांशिक/ लिंगभेद)
- कौंटुबिक जवाबदारी
- वाढत्या वयाची मुलें/ 'संस्कृती'/ 'स्वःत्व
- मुलांचे शिक्षण/ उच्च शिक्षण
- सामाजिक गुंतवणूक
- कौटुंबिक दबाव
- सांस्कृतिक गुंतवणूक (साहित्य/ नाट्य/ चित्रपट/ संगीत <गायन,वादन,नृत्य> इ.)

मला वाटतं, समाधान पोस्टीतून नव्हे तर दैनंदीन जीवनातून शोधायचा प्रयत्न आहे, त्या अर्थाने "निर्णय" महत्वाचा ! >> खरंय योग.

मला असे वाटले की आपला निर्णय (कल) आधीच झाला असतो. आपण सगळेच फक्त सहमतीदर्शक पोस्टी शोधतो आणि समाधान मानतो>> मला म्हणायचे होते ही एक आपोआप होणारी स्वाभाविक प्रक्रिया आहे. एखाद्या मुलाखतीत सुद्धा खरे म्हणजे पहिल्या काही मिनीटात तुमचा निर्णय झाला असतो, पुढिल सर्व काळ तुम्ही फक्त निर्णयाच्या समर्थानार्थ मुद्दे शोधत प्रश्न विचारत असता- असे म्हणतात. Happy

पूर्णपणे balanced असा कुठलाही निर्णय असतो का खरंच? अगदी company acquisition चा ही नसतो माझ्यामते. त्या घटकाचे, त्या त्या वेळी तुमच्या एकंदर विचारप्रक्रियेत स्थान. एवढेच. Happy

एखाद्या मुलाखतीत सुद्धा खरे म्हणजे पहिल्या काही मिनीटात तुमचा निर्णय झाला असतो, पुढिल सर्व काळ तुम्ही फक्त निर्णयाच्या समर्थानार्थ मुद्दे शोधत प्रश्न विचारत असता- असे म्हणतात. <<< रैना, खरेच की.

>>एखाद्या मुलाखतीत सुद्धा खरे म्हणजे पहिल्या काही मिनीटात तुमचा निर्णय झाला असतो, पुढिल सर्व काळ तुम्ही फक्त निर्णयाच्या समर्थानार्थ मुद्दे शोधत प्रश्न विचारत असता- असे म्हणतात.

रैना,
माझ्या बाबतीत अजून असे झालेले नाही. (मुलाखत घेतानाही नाही, देतानाही नाही) तेव्हा can't corelate.. may be its personality types.. Happy

>>पूर्णपणे balanced असा कुठलाही निर्णय असतो का खरंच? अगदी company acquisition चा ही नसतो माझ्यामते. त्या घटकाचे, त्या त्या वेळी तुमच्या एकंदर विचारप्रक्रियेत स्थान. एवढेच

थोडे धंदेवाईक्/प्रोफेशनल कडे झुकणारा प्रश्ण आहे.. माझे मत असे आहे की निर्णय balanced असतो का पेक्षा तो किती धोकादायक (आणि त्याची दुसरी बाजू म्हणजे संधी, यश!) आहे हे श्रेयस अन प्रेयस च्या मापाने मोजले तर ऊत्तर स्पष्ट असते!

देशात कायम जाणे वा देशातून पुन्हा बाहेर जाणे (कायमचे?) हे निर्णय संपूर्ण विचाराअंती घेतले असतील (ईमरजंसी सिचुएशन्स वगळता) तर त्या विचार प्रक्रीयेतील प्रत्त्येक घटकाचे स्थान तात्पुरते नसून (पुन्हा एकदा ईमरजंसी सिचुएशन वगळता) बरेचसे दूरगामी/कायमचे असेल तर घेतलेला निर्णय बराच काळ योग्य/संतुलीत असायची शक्यता अधिक आहे.

मामी,
मी समाजसेवा नव्हे, स्वताचा ऊद्योग धंदा जेणेकरून ईतर कुटूंबांनाही ऊत्पन्न/विकास ऊपलब्ध करून देणे या अर्थी म्हणतोय. समाजसेवा हाही कायमचा ऊद्योगधांदा असतो- ते वेगळेच Happy

बाकी मी आधीही म्हटले तसे देशात "स्थान महात्म्य" आहे. मासिक १५००० पासून ते मासिक ५०,०००/ ८०, ००० खर्चाही ऊ.दा. ईथे वर आली आहेत, यातच काय ते आलं.

रैना, योग.
छान लिहिताय.

मला तरी वाटते की परत येण्याबाबत तळ्यात्/मळ्यात असणारे बहुतेक जण साधारणपणे मध्यमवर्गीय बॅकग्राउंड मधुन आलेले असतात. त्याना एकदा तिथे असलेल्या सुविधांची सवय झाली (मी इथे चांगले रस्ते, वीज न जाणे, लोकांचा प्रोफेशनल अ‍ॅटिट्युड इ. बद्दल बोलतोय, चैनीच्या गोष्टींबद्दल नाही) की भारतात जाउन परत बेसिक गोष्टींबद्दल झगडावे लागणार हे चित्र डोळ्यासमोर उभे राहते आणि मग निर्णय घेणे कठीण असते. मग परत येउन चिडचिड होण्यापेक्षा न आलेलेच काय वाईट?

मी इथे मध्यमवर्गीय हा शब्द ठळक केलाय कारण मी उल्लेखलेले परदेशातील आयुष्य हे माझ्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांसाठी स्टेप अप असते. जे आयुष्य भारतात (काहीही कारणे असोत) सहजपणे मिळणार नाही ते त्याना तिथे सहजपणे मिळते मग ते सोडुन येण्यात चलबिचल झाली तर ते अगदी साहजिक आहे असे मला वाटते.

परत येउ का असे विचारणार्‍यांसाठी माझा एकच सल्ला असतो:
गरज/मजबुरी नसेल परत यायची तर परत येउ नका.

१.५ लाख लागतील.. लाईफस्टाईल मेन्टेन करायला.. ?

मी नोकरी सोडायचा विचार करत होते... कसे जमेल एका माणसाच्या पगारात? Uhoh

मध्यंतरी, मी भारतात परतायचा विचार करत होते तेव्हा बरीच आकडेमोड करून दोघेच असू तेव्हा ७५,००० आणि आणखी कुटुंबसंख्या वाढल्यास माणशी २५,००० असा अंदाज निघाला होता. हे बंगलोरात राहण्याचे आकडे. त्यात फार खर्चिक असेही काही धरलेले नाही. घरकर्जाचे, विम्याचे हप्ते, एक मध्यम आकाराची गाडी, वरकामाला आठवड्यातून १ दिवस एक माणूस असे गृहित धरून केलेले गणित. हे २००७/ ०८ साली केले होते. आता महागाई किती वाढली आहे कल्पना नाही.

काही अ‍ॅक्चुअल्सः

१. स्वताचा बंगला/मोठे घर- ५ लोकांना पुरेल असे (भाड्याचे असले तर २०-३० हजार प्र. महिना)
बंगला- २ ते ३ करोड
रोहाउस - ८० लाख ते १.२० करोड
३-४ बीएच्के फ्लॅट - ५०-७० लाख
(वरील किमान आकडे पुण्यातील आहेत, अपर लिमिट काहीही असु शकते. मुंबईतले जागांचे भाव पहायची हिंमत होत नाही).

२. दोन मुले- एक माँटेसरी (महिना २-३ हजार फी) एक प्राथमिक शाळेत. (महिना ६-८ हजार फी)
एका मुलास(आय सी एस ई शाळा)
फी - ३८,००० वर्षाला
गणवेश इ- ५०००
बस भाडे - ११०००
इतर खर्च - १००००
इतर काही शाळात ट्युशन फी ७५००० ते १००००० ऐकली आहे.

३. आई वडील बरोबर
त्यांचा इन्शुरन्स असेल तर जर आजारी असतील इन होम केअर असेल तर ६,००० ते १०००० महिना..

४. एक मोठे वाहन व एक छोटे वाहन
१०,००,००० + ५,००,०००.

५. साधारण महिन्याला २-३ वेळा बाहेर जेवण
४ जणाच्या फॅमिलीला किमान ३००० रु एका वेळेस.

६. महिन्यातून किमान एकदा सहकुटूंब बाहेर फेरी/सहल्/ट्रिप
कुठे आहे त्यावर..स्वदेशात किमान २०-२५००० माणशी
बाहेर:७०००० ते २००००० माणशी.

७. बाकी ईतर मासिक खर्च (बीले, कपडे, धान्य, भाजीपाला, ई..) अगदी अवाजवी नाही पण काटकसरही नाही..
१५-२०००० योग्य वाटते.

(माझी आधीची पोस्ट एकूणात फार नकारात्मक झाली आहे का?) <<
हो बर्‍यापैकी. पण असो..

बाकी रूळावर राहूदेत चर्चा.

मनस्मिंचे पोस्ट आवडले.

तीन माणसांचा खर्च (पुण्यात) एका महिन्याचा आरामात ६०-७०K होतो/असायचा.

स्वतःचा प्लॅट (दोन बेडरूमचा ) मेन्टेन्स खर्च ९००० जो सोसायटीला जातो
कामवाली दोन वेळच्या जेवणाला, साफसफाईला वेगळी बाया - ४५००
आजारी आई-वडीलांचा(दोन्ही डायबेटिक,हार्ट पेशंट) डॉक्टरचा खर्च व घरगुती नर्सचा मिळून खर्च (१५०००)
लाईट,फोन, ईटरनेट, एसी(उन्हाळ्यात) - ६०००
बाजारहाट(भाज्या, फळे, मासे-मटण(बहुधा रोजच खातो भाज्याबरोबर)) - ८०००
कार मेन्टेन्स,गॅस वगैरे- ४०००
ड्रायवर - ५०००
लग्नवारीच्या भेटी वगैरे(उन्हाळ्यात खूपच प्रमान असते) - ४०००
इतर शौक मॉलमध्ये खरेदी, बाहेरचे जेवण मागवणे, घरातील फुटकळ कामं, अचानक उपटलेले खर्च - ५०००

हे ३ वर्षामागचे आहेत. आता माहित नाही.

चर्चा मस्त चालू आहे, पण एक प्रश्न आहे...
हे मी ऐकलेलं आहे, आणि ते खरं की खोटं कळत नाहीय....

१. परदेशातून भारतात परत गेलेल्यांना CET ला बसायला देत नाहीत (OCI) असलं तरी. OCI मधे दोनच गोष्टी करता येत नसल्याचं नमुद आहे (निवडणूकीला मतदान करणे किंवा उभं रहाता येत नाही, आणि शेतजमीन विकत घेता येत नाही).
२. परदेशातून भारतात परत गेलेल्यांना Government College (Eng. , IIT, Med) ला प्रवेश नाही.
३. परदेशातून भारतात परत गेलेल्यांना Private college ला ५०/६० लाख Entry fee, अधिक १५/२० लाख वार्षिक फी लागते.

पुन्हा: (हे आकडे ऐकलेले आहेत). पटलेले नाहीत पण तिथे गेलेल्या एका माणसाचं असं म्हणणं आहे. वर्षाला ४० हजार $ फी मुंबई/पुण्याला भरावी लागत असल्यास, इथे (म्हणजे अमेरिकेत) येऊन शिकलेलं काय वाईट अशा विचाराने तो त्याचा मुलीसाठी कॉलेज शोधतो आहे.

आपल्यापैकी कुणाला अनुभव असेल तर ऐकायला आवडेल..

@परदेसाई , हे तुम्ही परदेशात जन्मलेल्या/ नागरीकससलेल्या मुलांसाठी म्हणताय का??>> हो मी पण असेच ऐकलेले आहे.

१. परदेशातून भारतात परत गेलेल्यांना CET ला बसायला देत नाहीत (OCI) असलं तरी. OCI मधे दोनच गोष्टी करता येत नसल्याचं नमुद आहे (निवडणूकीला मतदान करणे किंवा उभं रहाता येत नाही, आणि शेतजमीन विकत घेता येत नाही).
--->मुले परदेशी ओसीआय असतील तर त्याना सीईटी द्यायची गरज नाही. त्याना १२ वीच्या पीसी एम वर प्रवेश मिळतो. त्यांच्यासाठी राखीव जागा असतात. फी अर्थातच जास्त असते.
उदा. सीओईपी मधे ओसीआय साठी फी $५००० आहे. वर्षाची, $१५०० होस्टेल

२. परदेशातून भारतात परत गेलेल्यांना Government College (Eng. , IIT, Med) ला प्रवेश नाही.
---->परदेशातुन भारतात गेलेल्याना (ओसीआय धारकाना) महाराष्ट्रात शासकीय वैद्यकीय कॉलेजात सीट्स नाही पण इतर राज्यात बहुतेक आहेत.
आय आय टी आणि शासकीय अभियांत्रिकी कॉलेजात जागा आहेत. आणि ते परीक्षेला इलीजिबल आहेत.

३. परदेशातून भारतात परत गेलेल्यांना Private college ला ५०/६० लाख Entry fee, अधिक १५/२० लाख वार्षिक फी लागते.
------>एंट्री फी बाबत माहित नाही पण ओसीआय/पीआयओ धारकाना भारतीय नागरीकांच्या ५ पट फी आकारण्यात येते. साधारण प्रायवेट कॉलेजेस मर्जीचे मालक असतात.

एक उदाहरणः
काशीबाई नवले मेडीकल कॉलेज (पुणे) यांची भारतीय नागरीकांसाठी एका वर्षाची फी रु. ४,६०,०००/- आहे. ओसीआय साठी ही फी २३,००,००० रु. असेल. १५ वर्षानंतरची फी किमान दुप्पट होइल असे धरल्यास ती फी ४६,००,००० एका वर्षाला पडेल. म्हणजे १५ वर्षानी ओ सी आय विद्यार्थ्याना मेडीकलचा भारतातील खाजगी कॉलेजातला खर्च १ कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे.
थोडक्यात १५ वर्षानी भारतात आणि अमेरिकेत जवळपास सारखाच खर्च येणार आहे. काही कॉलेजेसची फी कमी आहे पण कमीत कमी खर्च धरला तरी ५०,००,००० येइलच.

येवढा खर्च येत नाही.. मला हे आकडे अती वाटताहेत..
किंवा मी फार गरीबीत जगतेय Light 1

मजेत राहून (काटकसर न करता - गाडी धरून) रु. २५००० महिना (सरासरी) रहाणारी कुटुंब मी पाहिली आहेत.
मुलांचा खर्च एक्स्ट्रा असेलही...पण इतका Uhoh

किंवा कदाचित आपण समाजातल्या दोन (बर्‍याच) वेगळ्या लेयर्स बद्दल बोलत असू..
तसं असेल तर पोस्ट अस्थानी म्हणून उडवू शकते.

मला २ मुद्दे मांडावेसे वाटतात.
१) भारतातून आलेल्या मध्यमवर्गातल्या माणसाला इथली जीवनशैली श्रीमंत वाटणे साहजिक आहे. १०-१२ खोल्यांच घर, दाराशी अद्ययावत गाडी इ. गोष्टी भारतात अजूनही श्रीमंतांकडेच असतात. पण त्याचबरोबर मोडकळीला आलेली कुटूंबव्यवस्था (आई-वडिल आणि मुलांमधे फारसा संवाद नसणे, हे मला तरी मोडकळीला आलेल्या कुटूंबव्यवस्थेचे लक्षण वाटते.), समाजातल्या इतर वर्गाविषयी बेफिकीरी इ. गुणही श्रीमंतांकडे असू शकतात.
तेव्हा मध्यमवर्गातून स्टेप्-अप होऊन श्रीमंत व्हायचं तर त्याबरोबर हे गुणही आपल्यात शिरकाव करू शकतात.
२) दुसरा मुद्दा, परत जाऊन मुलांना कोणत्या शाळेत घालावं ह्या संदर्भात आहे.
मी ज्या शाळेत गेले तिथे समाजातल्या गरीब वर्गातली मुलं मोठ्या संख्येने होती. (मी नगरपालिकेच्या शाळेत जात नव्हते.) ती शिव्या द्यायची. त्यांना काही वाईट सवयीसुद्धा होत्या. पण तरीही मला किंवा माझ्या भावाला त्यातली एकही वाईट सवय लागली नाही.
आमच्या शाळेत अनेक वर्ष (१ली- ७वी) बसायला बाकही नव्हते. शिक्षक बरे होते. पण सर-सकट सगळे शिक्षक काही आदर्श वगैरे अजिबातच नव्हते.
तर शालेय शिक्षण अश्या संस्थेत झालं म्हणून माझ जगात फारसं काही अडल नाही. अमेरिकेत नोकरीपण फारच विनासायास मिळाली.
त्यामुळे उद्या परत गेल्यावर माझ्या मुलीला अश्याच कोणत्या शाळेत घालावं लागलं तर मला काही फारसं वाईट वाटणार नाही.
आणि १०-१२ हजार महिन्याला फीसाठी घेणार्या शाळांमधे जाऊन तिला काही वाईट सवयी लागणारच नाहीत ह्याची काय हमी?

सॉरी सोहा , पण तुमचे मुद्दे ह्या बाफचा विषय नाहीत असं मला वाटतंय . ह्या मुद्द्यांवर चर्चा दुसर्‍या बाफवर करण्यास हरकत नाही .

manasmi, माहिती चांगली आहे. दोन गोष्टी पुन्हा...

१. काशीबाई नवले मेडीकल कॉलेज (पुणे) : २३ लाख म्हणजे ५० हजार डॉलर. ही फी अमेरिके एवढी (थोडीफार कमीजास्त) आजच आहे.
२. OCI च्या कार्डावर असलेले दोन नियम (ज्यात फी बद्दल काहीही माहीती दिलेली नाही) सोडून इतरत्र ही इतर नियम लावलेले आहेत. (म्हणजे पाचपट फी वगैरे). म्हणजे OCI हा फक्त भारतात केव्हाही जाण्यायेण्याची परवानगी यापलिकडे कोणतीही सवलत देत नाही..
(मी सवलत द्यावी असे म्हणत नाही, फक्त अर्थ लावतो आहे).
याचाच अर्थ असाही घेता येईल.. की तुमच्याकडे परदेशाचे नागरिकत्व असेल तर भारतात कायमचं परत जाण्यापूर्वी मुलांच्या पुढील शिक्षणाचा आणि त्यासाठी येणार्‍या खर्चाचाही विचार करून ठेवणं आवश्यक आहे. (भावना वगैरे अश्यावेळी कदाचित गुंडाळून ठेवाव्याच लागतील.)
याचा दुसरा अर्थ असा की ज्या वेगाने महागाई वाढत आहे, रिटायर मंडळींना लवकरच भीक मागत रस्त्यावर यावे लागणार आहे.

खूप उशीरा ह्या चर्चेत ऊडी घेतोय, पण सोहा, तुमचे मुद्दे पटले नाहीत. कृपया वैयक्तिक हल्ले म्हणून ह्याकडे पाहू नका.....

मी ज्या शाळेत गेले तिथे समाजातल्या गरीब वर्गातली मुलं मोठ्या संख्येने होती.ती शिव्या द्यायची. त्यांना काही वाईट सवयीसुद्धा होत्या.

आणि

तर शालेय शिक्षण अश्या संस्थेत झालं म्हणून माझ जगात फारसं काही अडल नाही. अमेरिकेत नोकरीपण फारच विनासायास मिळाली.

असं जर असेल तर तुम्ही तुमच्या लाडक्या मुलांना भारतातल्या किंवा अमेरिकेतल्या सोडून एखाद्या अफ्रिकेतल्या (उदा. सोमालिया, झैरे, रूवांडा वगैरे) देशांमधल्या शाळेत घालणार का? किंवा हा मुद्दा पटवण्यासाठी त्यामधल्या एखाद्या देशात स्थलांतर करणार का?

जर कुठल्याही ठिकाणी शिकून कुठेही जाता आलं असतं ( personally, I love dreaming about a world where your talent alone would land you wherever you wish...but these are real life scenarios and extreme ones...) , तर सगळेजण खेड्यांत राहून शिकले असते आणि IIT सारख्या शिक्षणसंस्थांची जगाला गरजच भासली नसती.

नोकरीचं म्हणाल तर तुम्ही खूप बुद्धीमान आणि भाग्यवान असाल( you happened to be there at the right time), पण सगळ्याच समाजातले बहुसंख्य लोक कष्ट करूनच मार्ग काढत असतात, विनासायास नोकरी लागणारे खूप कमी असतात.
विषयांतर नको म्हणून माझं म्हणणं इथेच थांबवतो.

चर्चेत जाणवलेले काही मुद्दे व त्यावर माझा उहापोह

१, समाजसेवा - फक्त समाजसेवा असे काही कारण असेल तर इतर व्यर्थ आहे, तेंव्हा जावे का नाही हा निर्णय नसावा, जावे असाच असावा, पण समाज सेवा करण्यासाठी जातो असे म्हणत असाल तर ती फसवणूक आहे असे वाटते.

२, बाहेर फिरायचा / हॉटेलींगचा खर्च - तो इथे होत नाही का? माझा साधारण बाहेर फिरायचा खर्च इथेही ३ ते ५००० डॉलर वार्षीक आहे, त्यामुळे तिथे जर तो होत असेल तर फरक पडू नये. तसेच इथेही हॉटेल मध्ये (निदान मी) आठवड्यातून १ दा किंवा २ दा जातोच. तेंव्हा खर्च साधारण ५० ते १०० $ येतो. तिथे गेल्यावर देखील एकावेळचे निदान २००० धरावेच कारण ५०० रू त काही मिळत नाही.

३. याचाच अर्थ असाही घेता येईल.. की तुमच्याकडे परदेशाचे नागरिकत्व असेल तर भारतात कायमचं परत जाण्यापूर्वी मुलांच्या पुढील शिक्षणाचा आणि त्यासाठी येणार्‍या खर्चाचाही विचार करून ठेवणं आवश्यक आहे >> हो ! पण परिस्थिती तुम्ही म्हणता तेवढी वाईट नाही कारण तेंव्हा रिटायर होणारी माणसे, आज आपण जेवढा खर्च करतो तेवढा आजही करत नाहीत. (भारतातील) त्यामुळे त्यांच्यासाठी हा प्रश्नच उदभवत नाही. शिवाय महागाई ही दरवर्षी ८ टक्यांनी नाही वाढणार.
४ OCI आणि POI मिळाले म्हणजे सर्वच सोयी कशा मिळतील? किंवा तशी अपेक्षा ही करावी असे मला वाटले त्यामुळे मी तरी हा विचार करत नाही. पैसे तर इथेही लागणार आहेतच. आणि आपली मुलं डॉक्टरच होतील (किंवा व्हायला पाहिजेत) असे आत्तापासून का ठरवायचे. ( हा प्रश्न जनरल आहे तुम्हाला उद्देशून नाही.)

५. येवढा खर्च येत नाही.. मला हे आकडे अती वाटताहेत..
किंवा मी फार गरीबीत जगतेय >>

नाही नानबा. तुम्ही अमेरिकेत १० वर्षे राहा आणि मग त्या ष्टाईल मध्ये भारतात राहायचा विचार करा, खर्च येईलच कारण राहणीमान.

बघा.
किराणा - १००००
पेट्रोल - ७०००
घरकामबाई - (दोन) ५०००
फोन (अमेरिकन व्होनेज, दोन सेल फोन, इंटरनेट) ५००० च्या आसपास
टिव्ही - ५००
शाळा (एकत्रीत फी दिली तरी ) ५००००/१२ = ४२००
दुसरे मुल (लहान असले तर महिना २०००, मोठे (पहिली नंतर) परत ४२००-४५००
हॉटेल - माझ्यासाठी निदान १०००० (पण मी हॉटेलींग कमी करेल असे दिसते) चला ५००० धरू
वीज बिल - १०००
सोसायटी मेंटेनंस - २०००
इतर अनप्रिडिक्टेड - ५०००

झालेच ... ५०००० च्या आसपास. ह्यात कुठलाही कर्जाचा हफ्ता नाही. शिवाय हे कॉमन लाईफ स्टाईल, कुठेही बडेजाव नाही! कपडे, कार्य हे इथे आणि तिथे सारखेच त्यामुळे ते धरले नाही. इथे ज्या कुटूंबाना खर्च (कुठल्याही कर्जाविना ) $३५०० च्या वर येतो त्यांना भारतात ३०००० रू महिना मध्ये राहणे अशक्य आहे. तिथे जाऊन जर राहणीमान तेच ठेवता आले नाही तर तिथे जाऊ नये.

जे खर्च इथे आणि तिथे सारखे आहेत ते घेऊ नयेत. मेडिकल इथे फार महाग आहे. अगदी इन्शुरंस देखील. माझी कंपनी महिन्याला ५५० डॉलर्स चार्ज करते. (आणि ती जगातील बेस्ट एम्पॉयर आहे!! ) त्यामुळे इथे मेडिक्ल प्रचंड महाग आहे. भारतात नाही हा फायदाच!

आता तिथे गेल्यावर मिळणारे फायदे

१. मुलं रोज उठून आज कोणाकडे जायच? कोण येणार हे प्रश्न कधीही विचारत नाही, त्यांचे एक वेगळे विश्व तयार होते ते इथे बर्‍याच जनांचे होत नाही कारण प्ले डेटस हा कन्स्पेट तिथे नाही, उठा शेजार्‍यासोबत खेळा.
२. हवामान (बर्फवाले लोक)
३. आई/वडिल, सासू सासरे ह्यांचासोबत जास्त वेळ घालता येतो. ते जरी नाही राहा तुम्ही तिकडे, काही प्रॉब्लेम नाही असे म्हणत असले तरी त्यांना प्रॉब्लेम असतात व ते आपण बर्‍याच अंशी दुर करू शकतो. भावनीक मुद्दा!
४. टेंप्लेट लाईफ जगायची गरज नाही, मुख्यतः इथे आलेली फर्स्ट जनरेशन टेंप्लेट लाईफ जगते, शनिवार / रविवार पॉटलक, बर्थडे पार्टी, अशात वेळ न घालता तिकडे वेळ जातो कसा हेच कळत नाही.

आणखी खूप मुद्दे आहेत. ते पुढे. पण एक महत्वाचा मुद्दा

भारतात खर्चाचा बाऊ करत आहे तो मला मान्य होत नाही कारण कमी खर्चात देखील राहता येते, जितका आपण खर्चाचा बाऊ करू तितका वाढतो. पण निदान ४०-५०००० महिन्याची तयारी ठेवावी. अहो पगारही प्रचंड मिळतो की? साधा कम्पुटर कन्सल्टंट ८ लाख कमवतो मग त्यातील ४ लाख खर्च होणारच की! शिवाय आपण म्हणजे जे ८-१० वर्ष इथे राहून परतू पाहात आहेत त्यांना स्किल प्रमाणे २० ते ३० लाख पगार आहे. काहिंना ३० पेक्षा कितीतरी जास्त. मग त्यात जर महिना ७०००० खर्च झाले तर % प्रमाणे काय बिघडते काहीही नाही.

उदाहरणासाठी असे गृहित धरू की मला अमेरिकेत साधारण १४०,००० पगार आहे. आणि टॅक्स, इन्शुरंस, ४०१के वगैरे कटून हातात ७७०० मिळतात. त्यातील मी साधारण ४००० खर्च करतो तर माझा खर्च ५० टक्यांपेक्षा जास्त आहे. आता मला भारतात पगार (अगदी ३० नाही, केस साठी ) २० लाख आहे. त्यातील माझा खर्च
टॅक्स ६ लाख - निव्वळ १४ लाख, त्यातील महिना ५०,००० प्रमाणे ६ लाख अजुन गेले. म्हणजे १४ लाखाच्या साधारण अगदी जास्त धरूनही ४५ टक्के! बिंगो!
अमेरिकेत १ लाख पगारावर जर महिना ३००० ते ३५०० खर्च धरला तर खर्चाचे प्रमाण अजुन जास्त! त्यामुळे मी असा गणित मांडतोय की भारतात जर एखाद्याला २० लाखाच्या वर पगार मिळत असेल तर पैसे आणि खर्च हे कारणच राहत नाही कारण तिथे तो इथल्या एवढेच खर्च करतो व वाचवतो.

हेच गणित तुम्ही तुमच्या पगारावर आणि भारतातील अपेक्षित खर्चावर करून पाहा! खर्चाचा बाऊ वाटणार नाही.

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

Pages