परतोनि पाहे (परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव)

Submitted by रैना on 5 January, 2010 - 01:52

इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.

- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनस्मि , योग , आयबु अतिशय चांगल्या आणि माहितीपुर्ण पोस्ट्स.
सोहा , तुमचा मुद्दा (इथे रिलेटेड नाही आहे म्हणुन लिहित नाही.) अजिबातच पटला नाही. तुम्ही कोणत्या शाळेमधून ,कॉलेजमधुन शिक्षण घेता हे मला तरी खुप महत्वाच वाटत.

अरेच्चा !
इकडे अजून खर्चावरच पिन का अडकली आहे? दोन वेगळ्या देशांबाबत आपण बोलतोय ना?
तिकडची भौतिक जीवनपद्धती इकडे graft होईल. ? Happy

भारतात राहून समजा प्रत्येक खोलीत AC लावायचे ठरले (कारण इथे अजून सेंट्रल AC नाही), तर विजेचे बिल किती येईल? किती टक्के मध्यमवर्गीय भारतीयांकडे १ तरी किंवा त्याहून जास्त AC असतील?
अगदी जरी मर्सीडीज घेतली, तरी चालवावी रस्त्यांवरच लागते. ते रस्ते कुठुन आणणार?

आयबु- पोस्टी मस्त आहेत तुमच्या
मानस्मी/योग- वाचते आहे.

असं जर असेल तर तुम्ही तुमच्या लाडक्या मुलांना भारतातल्या किंवा अमेरिकेतल्या सोडून एखाद्या अफ्रिकेतल्या (उदा. सोमालिया, झैरे, रूवांडा वगैरे) देशांमधल्या शाळेत घालणार का? किंवा हा मुद्दा पटवण्यासाठी त्यामधल्या एखाद्या देशात स्थलांतर करणार का? >>> दैत्य येडा झाला का रे भो , मुद्दा काय लिहितोस काय?
आयुब पोस्ट आवड्या.

या बाफशी रिलेटेड नाही पण, तरि oci देणे आता बंद केलेय हे खरे आहे का? कि मिळतय अजुन?
-----------------------------------------------------------------------------------------------------
ओसीआयचा नियम बदलल्याने ते आता किमान एक पॅरंट अमेरिकन असेल तरच देतात. ग्रीन कार्ड असेल तरीही पीआयओच मिळते.ओसीआय नाही.

मला वाटतंय इथे खर्चाचा उगाच बाऊ होतोय... हा आता भविष्यात मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे पण एकंदरीत. वर जे पगाराचे आकडे आले आहेत त्या मनाने इथे भारतात राहणे सहज शक्य आहे.
बाकी आपल्या इथे पैसे देऊनही मनस्ताप सहन करावा लागतो. एक काम हवे तसे वेळेत होत नही...

मला वाटतंय इथे खर्चाचा उगाच बाऊ होतोय...>> नाही. जो actual आहे एक specific lifestyle साठी तो फक्त लिहिला जात आहे.
वर जे पगाराचे आकडे आले आहेत त्या मनाने इथे भारतात राहणे सहज शक्य आहे.>> हो ना नाही कोण म्हणतय. आयबु तर समर्थन करतोय.

>>म्हणजे १४ लाखाच्या साधारण अगदी जास्त धरूनही ४५ टक्के! बिंगो!

आयबु,
अख्खी पोस्ट आवडली व्यवस्थित गणीत उलगडून दाखवलेत. पण गम्मत पहा ना थोडक्यात "रिलेटिवली" दोन्हीकडे खरचाचे प्रमाण पगाराच्या सारखेच असेल तर मी आधी लिहीले तसे मोठ्ठा फरक हा ऊपलब्ध नागरी, सामाजिक सुविधा, सुरक्षा, ई. मध्ये रहातो. थोडक्यात अमेरीकेत दिलेला कर अनेक सुविधा सोयी ई च्या स्वरूपाने सामान्य माणसाच्या पदरात पुन्हा येतो " ROI" म्हणा हवे तर. भारतात या बाबतीत ठार अंधार. त्यातूनही ज्या वेगाने 2g, 3g, आदर्श ईत्यादी करदात्याचे पैशाचे करोडोंचे घोटाळे चालले आहेत ते पहाता ही विषमता अधिक बोचणारी आहे.

तेव्हा नोटांच्या बाबतीत बिंगो आहे खरे Happy पण दैनंदीन आयुष्य जगायच्या बाबतीत मात्र अजून सापशिडी चा खेळच आहे.

बाकी देशात गेल्यावर मिळाणारे जे फायदे (भावनिक) तुम्ही लिहीले आहेत ते पटले. मी तर म्हणेन ते मुद्दे भावनिक असले तरी त्यातून ईतर अनेक व्यावहारीक फायदे आहेत जसे:

१. आजी आजोबांबरोबर खेळताना किंवा ईतर शेजार पाजार दोस्त मंडळीं बरोबर खेळताना मुलाला अपोआप चार चौघात वागणे, वावर, संकेत यांचेही शिक्षण मिळत असते. ज्याचा पुढे खूप फायदा होतो.
२. हवे तेव्हा हवे त्या वेळी कुणाही कडे वा कुठेही जायची सोय असल्याने कायम एक "आधार" असल्या सारखे वाटते. अडी अडचणीला माणासांची शोधाशोध करावी लागत नाही- हा एक फार मोठ्ठा फायदा आहे.
३. बरेच वेळा वेग वेगळे सामाजिक आर्थिक स्तर यातील लोकांबरोबर भेटिगाठी, व्यवहार होत असल्याने पालक व शिवाय मुलांच्या व्यक्ती विकासात एक मोठी भर पडते.
४. मला तर ऊलट असे वाटते की देशात दोघाही नवरा बायकोला आपापले करीयर करणे सोपे जाते कारण मुला बाळांना बघायला चांगली सपोर्ट सिस्टिम (आई, वडील, आजी आजोबा, मित्र, शेजारी, बालवाड्या वगैरे) असते.
५. आपले सण, वार ईत्यादी घरातील व ईतर मित्रांबरोबर करताना सो कॉल्ड थोडी फार संस्कृती आणि जमलच तर त्यातून थोड शिक्षण हेही होतच- अगदीच टँजीयेबल/सकृत दर्शनी (?) फायदे दिसत नसले तरी काहितरी चांगले हाती लागतेच.

तेव्हा मुलांच्या जडण घडणीतील हे टप्पेही मह्त्वाचे आहेत- आता ते सर्वांसाठी महत्वाचे असावेच का किंवा बाहेर देशात (विशेषतः ऊसगाव, अमिराती) मध्ये ते टप्पे ऊपलब्ध नाहीत का वगैरे हा प्रत्त्येकाचा वैयक्तीक प्रश्ण असू शकतो.

मी एव्हडेच म्हणेन देशात परत जायचे असेल तर खुशाल जा फक्त "परतीचे दोर" (म्हणजे पुन्हा परदेशात जाणारे) कापू नका. आणि हाच सल्ला आजवर जितके देशात पुन्हा परत गेले आहेत त्यांनी दिला आहे यातच सर्व काही आले.
परतीचा दोर वापरावाच लागणार नाही अशी आशा बाळगायला हरकत नाही- हा झाला भावनिक मुद्दा, अगदी तसेच जसे देशात जायलाच हवे हा बराचसा भावनिक मुद्दा असू शकतो.

विनय,
oci बद्दल अजून एकंदरीत बर्‍याच गोष्टी धुरकट आहेत. मतदान करता येत नाही, शासकीय पद, कार्यालयात नोकरी नाही या दोनच अटी आहेत. बाकी सर्व हे तुमच्याकडून "तुम्ही ओसिआय ना" म्हणून पैसे ऊकळण्याचे धंदे आहेत. पण आता बर्‍याचश्या अमेरिकन व ईतर आंतरराष्ट्रीय संस्था, युनिव्ह. यांचे थेट कॅंपस देशात मोठ्या शहरातून ऊघडत आहेत. शिवाय distant learning वगैरे आहेच तेव्हा तो प्रश्ण येत्या किमान ५ वर्षात नक्की निकालात निघण्याची चिन्हे आहेत. त्यावेळी दोन्ही कडचा शैक्षणिक खर्च जवळपास सारखाच असेल असे वाटते. ज्या काही गोष्टींचा आपण बाऊ करत आहोत त्या येत्या ५-१० वर्षात प्रचंड बदललेल्या असणार आहेत. ऊ.दा. मुंबई- दिल्ली या व्यापार मार्गावर जवळ जवळ ६ मोठ्या प्लॅंड टाऊनशिप वसवल्या जाणार आहेत- अर्थातच सर्व आराखडे हे आंत्रर राष्ट्रीय सोयी, सुविधा, दर्जा याला डोळ्यासमोर ठेवून केले जात आहेत (मी त्या कामात सरकारला मदत करत असल्याने मला ठावूक आहे). ईंफ्रास्ट्रक्चर चे बरेचसे प्रॉजेक्ट्स येत्या ५-१० वर्षात पूर्णत्वाला जात असल्याने आज असलेल्या अनेक संबंधीत अडी अडचणी किमान शहरांतून तरी निकालात निघणार आहेत, अर्थात लोकसंख्या दुपटीने वाढली नाही तर Happy

तेव्हा थोडक्यात येत्या ५-१० वर्षात बरेचसे चित्र पालटलेले असेल अशी शक्यता आहे. e-governance अगदी थेट नगरपालिकांमध्येही दाखल होण्याची लक्षणे आहेत.. तेव्हा देशाची वाटचाल त्या मार्गाने चालूच आहे.

एक आहे ज्यांना आता देशात जायचे आहे त्यांच्यासाठी हा पुढील ५-१० वर्षाचा काळ निश्चीतच थोडा अवघड व संक्रमणाचा असणार आहे. Lets admit, most folks want the ready made version of this developed country as it is available to them today in the outside countries. But we have to be a part of this transition and friction to quote"eligible" to reap the benefits. प्रश्ण एव्हडाच आहे की देशात जावून स्वताबरोबरच देशासाठी अशी चांगली कामे करू इच्छीणार्‍या अनेकांना तशी संधी, सुरक्षा, विश्वास ऊपलब्ध करून द्यायला आजचे सरकार कटीबध्द आहे का? स्वताची उन्नती होते तेव्हा समाजाची उन्नतिही होतच असते- they are not mutually exclusive I believe.
आज या प्रशाण्चे स्पष्ट ठोस ऊत्तर दिसत नाहीये कारण देशात जावून अजून एक "पिढी" चा अनुभव आपल्या गाठीशी नाही, हे संक्रमण कोवळेच आहे. तेव्हा एकतर तळ्यातील पाणी शांत शुध्द होईपर्यंत थोडे थांबावे किंवा आत्ताच उडी घ्यावी- दोन्ही परिस्थितीत पोहावे लागणारच आहे Happy

अहो ह्यात मनोरंजन ते काय? जेंव्हा ह्यातून जावे लागते तेंव्हा खरच भुगा होत असतो. मलाही आधी असेच वाटायचे की आख्खा जन्म भारतात गेला, कधीही वापस जाऊ. पण जसे जसे वर्ष गेले तसे तसे हे चक्र अधिक जोरात फिरते. कारण माणूस ह्या सुख सोयींना सोडू इच्छित नाही. वर बघा एक नाव पण त्रिशंकू आहे!

ऑनसाईट वर येणार्‍यांना हा प्रॉब्लेम जास्त नसतो कारण मांईड सेट वेगळे असते, पण नंतर जे इथेच नौकरी करतात त्यांना हा किडा जास्त डसतो. जावे त्यांच्या वंशा!

पण एकदा पब्लिकला (मित्रलोक जे माझ्या जाण्यावर चर्चा करत आहेत त्यांना) अन असिनला (जिला आमच्या पिल्लांची व संसाराची काळजी) पटवून दिले कि बाबांनो खर्च खर्च तो म्हणता तो इथे तिथे % मध्ये सारखा येतोय तर मग असिन म्हणाली हां ये जमेगा हमको! म्हणून नौकरी चांगली मिळाली अन कुठल्याही अपेक्षा न घेता गेले की राहने जमेल. अपेक्षा घेऊन गेले की अपेक्षाभंग तिथे हमखास होणार. तो रिक्षावाला पचकन थुंकणार, पोलीस अरेरावी करणार आणि तुमची कार १० च्या स्पिडने पुढे जाणर, जिथे १० मिनिटे लागतात तिथे ३० लागणार .. .. ..

पण भारतात जायचे असे वाटत असेल तर चान्स घेऊन पाहा, अन्यथा अरे आपण चान्सही घेतला नाही असे कधी वाटायला नको म्हणून आम्ही घेतला. चुक असो की बरोबर आपला निर्णय आहे त्यामुळे अपुनच जबाबदार, भारताला नावे ठेवून जबाबदारी टळणार नाही. अन्यथा इथे मजेत राहावे आणि उगीच जायचे आहे असे बोलून स्वतःला फसवू नये. इथे राहणे काही वाईट नाही.

आयबु,
वरील पोस्ट साठी २०० मोदक Happy

असो. मला वाटते ते "मनोरंजन" प्रतिक्रीया रहाणीमान/जमा खर्च ई. बाबत म्हणत असावेत.

योग आपले म्हणने बरोबर आहे. संक्रमन होत आहे. शिवाय मी आणखी एका गोष्टीवर प्रकाश टाकू इच्छितो.

भारतात करियरची ग्रोथ खूप आहे. ती इथे नाही. (आयटी कंपन्यात) इथे पैसा भरपुर मिळेल पण तुम्हाला आख्खे डिव्हिजन रिपोर्ट करेन किंवा तुम्ही मोठे व्हाल असे नक्की नसते, पण भारतात इथून कामे जातात, तिथे हायरारकी आणि माणसे दोन्ही जास्त आहेत, डेलॉईट, अ‍ॅक्सेंचर च्या मॅनेजर लोक (भारतातील) इथल्यापेक्षा कमी अनुभवाचे असतात आणि त्यांचावर जास्त जबाबदारी (पिपल मॅनेजमेंट) असते. ३० च्या आतबाहेरचे लोक मोठ्या पदावर आहेत व त्यांचा साधारण पगार १५ लाखाच्या वर आहे. जर ८-१० वर्षाचा अमेरिकन अनुभव असेल तर काही वर्षात तुम्ही भारतात मोठी लेवल गाठू शकता, इथे मात्र टफ आहे.

अर्थात हे माझे मत आहे व जे मी १३०/१३५,००० + च्या कॅटेगिरी लोकांना पाहून बनवत आहे. (अमेरिकन कंपन्या, देशी नाही) ती ब्रॅकेट इथे सिनियर म्हणून मोडते पण जबाबदारी खूप नाही. आणि मला लवकर सी लेवल गाठायचे आहे. जे इथे अजुन शक्य दिसत नाही. तिथे कदाचित थोडी तरी आशा आहे. आणि ती ड्राईव्हिंग फॅक्टर आहे!! युसए टुडे मधेय दोन आठवड्यापूर्वी बिझनेश सेक्शनला रिव्हर्स ब्रेन ड्रेन चा लेख आहे तो वाचा. Happy

अन्यथा इथे मजेत राहावे आणि उगीच जायचे आहे असे बोलून स्वतःला फसवू नये. इथे राहणे काही वाईट नाही. >> इथे म्हणजे परदेशात का? मग you said it..
भारतात जायचे आहे 'एकदा' खरे म्हणजे- या एकदाला काहीतरी टाईमलिमीट घालावी, नाहीतर जायचेच नाही असे accept करुन टाकावे की. With each passing year, अजून जास्त अडकत जाणार. Happy

तेव्हा थोडक्यात येत्या ५-१० वर्षात बरेचसे चित्र पालटलेले असेल अशी शक्यता आहे.>> योग पोस्ट छानच.
पण भारतातील परिस्थिती बदलेल अथवा नाही. परतण्याचा निर्णय त्यावर आधारित असू नये असे वाटते हो. तो फक्त एकच निकष झाला ना Happy

>>पण भारतातील परिस्थिती बदलेल अथवा नाही. परतण्याचा निर्णय त्यावर आधारित असू नये असे वाटते हो. तो फक्त एकच निकष झाला ना
रैना,
आशेवर जग कायम आहे.. Happy विनोदाचा भाग वगळता खरच तसे झाले तर तय अनुशंगाने मला ते मुद्दे आजही निर्णय प्रक्रीयेतील मोठा व महत्वाचा घटक वाटतात. याचे कारण सांगतो देशात "हे सारे कधीही बदलणार नाही" या मानसिकतेमूळे अनेक चांगले लोक, चांगल्या संध्या सोडून देतात. परिणामी हे दुष्ट्चक्र कधीच संपत नाही. कुणितरी बदलले नाही तर कधीच बदलणार नाही Happy अगदी घरात शिवाजी, भगतसिंग नको पण किमान बिंद्रा, बेदी (किरण) तरी घडवता येतीलच ना?
तेव्हा या मुद्द्यांवर आज निर्णय घेता येवू शकतो. ५ वर्षांनी परिस्थितीत सुधारणा होत नाहीये असे वाटले तर परतीचे दोर वापरावेत. च्यामारी अशा वेळी phone a friend, ask expert, double dip, वगैरे पर्याय ऊपलब्ध असावेत असे वाटते :).
असो. एकंदरीत चर्चा बघता या बा.फ. च्या नावापूढे परतोनि पाहे- आमंत्रणापेक्षा, भिती, चिंता, धमकी(?), व्यथित, हतबल, बघा सांगितले होते ना, ई. बाहुल्या टाकाव्यात, नंतर ऊगाच कुणी तक्रार करू नये, काय? Happy

>>मला वाटतंय इथे खर्चाचा उगाच बाऊ होतोय...>> नाही. जो actual आहे एक specific lifestyle साठी तो फक्त लिहिला जात आहे.>>
मंदारला अनुमोदन.

मला येऊन ३ वर्षं झाली. खरच काही कठीण वाटले नाही.
थोडे फार कुठे काही कमी जास्त झाले असेल पण कधी वाटले नाही की का परत आलो.
अगदी व्हिसा-ड्रायवर लायसन्स ची कामं पण काहीही पैसे न देता झाली. तेही कर्नाटकात.

आज मुलांची आजी-आजोबांशी , इतर नातेवाईंकांशी असलेली जवळीक-संवाद बघितला की खुप बरे वाटते. ह्याच साठी केला होता इतका अट्टहास.

मॉल असतात आणि मॉलच्या बाजूच्या गल्लीत आपले नेहमीचे किराणासामानाचे दुकानही असते. दोन्हीही कडे भरपूर गिर्‍हाईक असते.
आणि काय सांगू, अहो इतके लोक कुठुन कुठुन परत आलेले असतात पण एक दोन उदाहरणे सोडली तर सर्व आपल्या परत येण्याच्या निर्णयाबद्द्ल समाधानी असतात.

.

मी वरची पोस्ट टाकेपर्यन्त बर्‍याच पडल्या.
रैनाला अनुमोदन. "एकदा" ला टाईमलिमीट ठेवा नाहीतर आहे तिथे सुखी रहा.

हो इथे म्हणजे परदेशात. Happy अजुन सवय जात नाही.
हो परिस्थिती बदलेल हा निकष मात्र असू नये. कारण ती अजुन ५० वर्षे बददेल की नाही हे सांगता येत नाही. शिवाय जग जग म्हणजे काय? तर आपले सर्कल, ते बरेच बदलेले आहे. (विचार मागासलेले असू नयेत, इन्फ्रा असेल तर चालेल) असो मला दोन्ही निर्णय (इथेच टाका तंबू किंवा तिथे जा) हे सारखे वाटतात, आपल्याला झेपेल ते कराव पण मनात असेल तर चान्स घेऊन पाहावा.

आणि एक महत्वाची बाब निर्णय प्रक्रियेत अमेरिकेत १५-१७ वर्षे राहिलेल्या लोकांचा सहभाग अजिबात घेऊ नये कारण ते फक्त एक बाजू मांडतात. जी पण बरोबर आहेच पण मुळात तुम्हाला भारतात का जावे वाटते (१० वर्षे राहिल्यावरही) ते कारण कळले की इतर सर्व कारण शुल्लक आहेत.

.

>>अगदी व्हिसा-ड्रायवर लायसन्स ची कामं पण काहीही पैसे न देता झाली. तेही कर्नाटकात.

आदिती,

तुम्ही अमेरिकन सिटीझन होतात का (oci वर आहात का?) का green card सोडून आलात.. का निव्वळ onsite सोडून आलात? मुद्दामून एव्हड्या साठी विचारले कारण प्रत्त्येक बाबतीतले परत जाणे वेगळा प्रकार आहे.

माझा नवरा व मुलं अमेरिकन सिटीझन (OCI) आहेत. मी १० वर्ष तिथे होते व नवरा १६.
मी GC सोडून आले. खरं म्हणजे मी माझा आता पर्यन्तचा सर्वात चांगला जॉब सोडून आले.
माझी ही एकच रुखरुख आहे. पण थांबले असते तर मुलांना कठीण पडले असते.

आमचे दोन चांगले फॅमिली फ्रेंड कायमचे भारतात गेले. एकाचे कधी जायचे हे जवळजवळ पक्के होते. घरचा उद्योग चालवायचा होता. उद्योग चांगला जोमाने वाढतोय. लग्नाआधी पत्नीला परत जायचेय हे माहित होते त्यामुळे ग्रीनकार्ड वगैरे न करता ठरल्याप्रमाणे परत गेले.
दुसर्‍या मित्रांचे पण जायचे पक्के होते पण कधी ते ठरवले नव्हते. ग्रीन कार्ड घेतले होते. पुण्यात घर घेतले होते. भारतात कौटुंबीक अडचण आल्यावर एक-दोन महिन्यात नोकरी शोधून परत गेले. मुलीला सुरुवातीला शालेय वर्षात मधेच गेल्याने थोडा त्रास झाला पण भारतातल्या शाळेने अ‍ॅडजस्ट व्हायला मदत केली. आता सगळे रुळलेत. हे दोन्ही मित्र मॅनुफॅक्चरिंग मधे आहेत.

.

मला वाटतेय अमेरीकेत २७५ K उत्पन्न असेल तर भारतात नक्कीच ५० L पेक्षा जास्त असेल. (भारतातही दोघे कमावणार असे गृहीत धरुन). त्यामुळे गणितात फरक पडेल.
असो.
मला तरी या कॅल्क्युलेशन्स चा उपयोग होतोय ठरवायला. त्यामुळे धन्यवाद लोकहो. Happy

Pages