परतोनि पाहे (परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव)

Submitted by रैना on 5 January, 2010 - 01:52

इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.

- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

झक्की,

चिडू नका. मजा करत होतो. जशी तुम्ही इतर लोकांची करता.
तुम्हाला वाईट वाटले असेल तर क्षमा करा.

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

शाळेबाबत जरा जास्तच लिहिलं का मी? इथे भारतातल्या खर्चाविषयी चर्चा चालू होती. तेव्हा महागड्या International Schools मधे मुलाना घालायचा आग्रह लोक का धरतात असा मला प्रश्न पडला.
अमेरिकेत परत गेल्यावर मुलाच काही अडू नये म्हणून लोक असं करतात का?

शाळेबाबत जरा जास्तच लिहिलं का मी?>>>>>>>> मला तर तस वाटत नाही. माझ्या मुलाला मी नुकतच तिकडे गावाकडे शाळेत घातलं मराठी माध्यमात. मी पण आता वातेवर्च आहे परतायच्या... फी काहेच नाहीय , शाळा माझ्या घराजवळ आहे. मस्त चालु आहे, चांगला रुळलाय. आणि हो तुम्ही म्हणताय ते मला तरी पटतय.

पाटील........ फ्लाईट डिटेल कळवा. खिल्लारी जोडी अन गाडीबैल घिउन शान येतो इमानतळावर Happy

योग... दिल्या घरी तु सुखी रहा Happy

मला येउन १४ दिवसच झालेत म्हणा, त्यामुळे काही लिहित नाही. अन परत येणार हे ठरवुनच गेलो होतो त्यामुळे माझ्या अनुभवाचा इथे कुणाला फारसा फरक पडणार नाही Happy

चंपी ला तिथे रहावे असे वाटले होते, पण तिथेच रहायची वेळ आली (साहेबाने नोकरी दिली होती) तेंव्हा मग नको नको म्हणली Happy

असो. गड्या आपला गांव बरा......... कुणाला उस खायचा, रस प्यायचा, दुधानी आंघोळ करायची, गाडीबैल दामटायची, ई ई असेल तर कळवा...... अ‍ॅग्रो टुरिसम जोरात हे गावाकडं Happy

माझा एक मित्र पुण्यात चार वर्षे राहुण खानदेशला परत गेला, तर लोकांनी येड्यात काढले..... आज तो वर्षाला एक कोटी कमावतो....... लोक स्वतःला वेडे म्हणताहेत Happy

माझी एक मैत्रीण (तिचा बा खासदार), ती चार वर्षे अमेरिकेत राहुण आली, म्हणाली " ज्यांना भारतात काही दिवे लावता येत नाहीत, ते बाहेर पळतात. अन दिवाळी ला फोनेवर रडुन गागुन प्रेमाचे प्रदर्शन करतात....... (टोकाचे हे म्हणा!)

असो. कुठे थांबायचे हे ज्याला कळतं तो सुशिक्षित... बाकी मेंढ्या वळणे चालुच राहणार.

शाळेचा निर्णय मुलाचे वय-इयत्ता यावर अवलंबून आहे.

>>माझी एक मैत्रीण (तिचा बा खासदार)
Proud मग काय आम्हीही गेलो असतो! दरवर्षी इकडे व्हेकेशनला वगैरे येऊन इथेही दिवे लावले असते!

चंपक, गावी येणार सुट्टीत.

सर्वांना शुभेच्छा!

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

" ज्यांना भारतात काही दिवे लावता येत नाहीत, ते बाहेर पळतात. >>
भारतात अन काही च्या मधे 'बापाच्या जीवावर ' राहिलं का लिहायचं ?

स्वत:च्या एकट्याच्या अनुभवावरून वा निर्णयावरून सगळ्यांना मोजणारे किती शहाणे ?

पाटील........ फ्लाईट डिटेल कळवा. खिल्लारी जोडी अन गाडीबैल घिउन शान येतो इमानतळावर>>> लवकरच.....

कुठे थांबायचे हे ज्याला कळतं तो सुशिक्षित (शाना) , हे पटेश..... भेटु लवकरच

मंडळी,

भारत वि. अमेरिका हा नेहेमीचा फेमस वाद कृ. नको.. (झक्कींचा पायगुण) Happy

चंपक,
मग या वेळी येतोच भाकरी अन हुरडा खायला काय?

बाकी,
अमेरीकेतील डॉ चा पगार आणि भारतातील पगार यात तुलना होवू शकत नाही. तुलना टक्केवारीत आयबू ने करून दाखवली आहे तेही पगार/खर्च या बाबतीत. तेव्हा नुसतेच पगार बघून काही ऊपयोग नाही. शिवाय ज्यांना देशात जाऊन आधीच प्रस्थापित घरचा ऊद्योग वगैरे सांभाळायचा आहे त्यांच्याही अनुभव मला विशेष ऊपयोगी वाटत नाही.
असो. आता पुन्हा एकदा अनुभवांकडे वळूयात?

अदिती,
तुमच्या नवर्‍याचा काय अनुभव? तो तुमच्यापेक्षा वेगळा असू शकतो अशी शक्यता धरून विचारतो आहे..

म्हणजे तुम्हाला नक्की काय ऐकायचे आहे योग? ती तिच्यापुरते तिचे मत लिहीते आहेच ना? मग तुम्हीही तुमच्या बेटर हाफ यांचे मत लिहा पाहु. Happy
(मी माझी आणि नवर्‍याची अशी दोन स्वतंत्र मते आधीच लिहीलेली आहेत. ) Proud

अदिती. - येवढ्या वर्षांनंतर आलात आणि उत्तमरित्या निभावलेत. अभिनंदन. Happy

ओह.. चंपकही आलाय परत?

योग, मी अ‍ॅज फॅमिली म्हणून लिहीले होते. कारण एकाला त्रास होत असला की त्याचे पडसाद घरभर उमटतात.

नवर्‍याला ऑफिसमध्ये रुळायला त्रास झाला पण लोकांशी बोलून त्याने निस्तारले. आणि हा अमेरिकेतून येऊन काही आगाऊपणा करत नाही बघितल्यावर ठीक झाले. कामाविषयी अ‍ॅटीटुड्चा फरक असतोच पण भिंत नव्हती.
अस म्हणत नाही की सगळं परफेक्ट आहे, पण जगात काय परफेक्ट असते? अमेरिकेत पण काय कमी तडजोड असते?

आम्ही ऑफिस्,शाळेपासून घर जवळ घेतले, मध्यमवर्गीय अपार्टमेंट कॉम्प्लेक्स मध्ये घेतले. ह्याचा खुप फरक पडला कारण ऑफिसपासून घर १५ मिनिटांवर आहे. मुलांना सोबत व खेळायला जागा आहे.

रैना धन्यवाद ग.
आम्हा दोघांच्याही मनात परत यायचे हे नक्की होते. थोडी तडजोड इथे-तिथे करावी लागणार हे माहीती होते त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा त्रास करुन नाही घेतला. आजुबा़जूला आमच्या सारख्या बर्‍याच फॅमिली होत्या त्यामुळे काही वेगळे करतोय हे वाटलेच नाही.

अदिती,
धन्यवाद!

रैना,
>>(मी माझी आणि नवर्‍याची अशी दोन स्वतंत्र मते आधीच लिहीलेली आहेत. )

हे मिसलं होतं.. आत वाचतो. Happy

.

माझी एक मैत्रीण (तिचा बा खासदार), <<< बा खासदार, आमदार, मंत्री वगैरे असला की राज्याची , राष्ट्राची लूट आपोआप घरी येते. मग अमेरिकेत काय भारतात काय कष्ट करायला नको..
अशी उदाहरणं बरीच आहेत.. मत लिहायचे असेल तर सामान्य, मध्यमवर्गीय माणसाचे लिहा..

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

माझा एक मित्र पुण्यात चार वर्षे राहुण खानदेशला परत गेला, तर लोकांनी येड्यात काढले..... आज तो वर्षाला एक कोटी कमावतो....... लोक स्वतःला वेडे म्हणताहेत
>>> Rofl
माझ्या घरी पण हीच परिस्थीती आहे.. जेमतेम अमेरिकेत १ वर्षाला १० लाख रु. बचत होते.. आणी भारतात ज्या प्रमाने ईन्वेस्टमेंट वर रिटर्न मिळत आहेत त्यात १० लाख काहीच नाही आहेत Sad
ऊगीच एवढी मरमर करुन पैसे वाचवत बसलो असे वाटते..
असो.. भारतात(पुण्यात) परत येत आहे ३० जुन शेवटचा दिवस असेल..
असो पुण्यात(हडपसर) ला भाड्याने घर मिळेल का? (मगरपट्टा नको, आजुबाजुचा परिसर चालेल Happy )

आणी भारतात ज्या प्रमाने ईन्वेस्टमेंट वर रिटर्न मिळत आहेत त्यात १० लाख काहीच नाही आहेत>>> फक्त पैशाचा विचार केला तर कधिही / कोणालाही एकडेच रहाणे फायदेशीर दिसेल. जेंव्हा भारतात परतायचा विचार होतो आणि पुढे ढक्लला जातो, त्यावेळी पैसा हाच घटक कारणीभुत ठरतो असे वाटते. मी परत जायचा निर्णय घेतला तो मुलांसाठी. अर्थात सगळ्यांनी वेड्यात काढुन झाले आहे, किंबहुना अजुन चालुच आहे. पण सल्ला देणारे टेबलाच्या त्या बाजुला आहेत, मी जे बघतो कदाचित ते त्या बाजुन दिसत नसेल. Happy

सगळ काही लिहित बसत नाही, ते कोणाला उपयोगी पडेल असे वाटत नाही, पण शेवटी 'मुलं' हीच एक चांगली इन्व्हेस्ट्मेंट आहे हे लक्षात आलं आणि निर्णय घेतला. तिकडच्या शाळेबाबत एक गोष्ट लक्षात आली, जवळ्पास प्रत्येक 'विध्यार्थी' (शक्यतो महागड्या शाळेतला, सन्माननिय अपवाद असतील) क्लास / ट्युशन ला जातो. पण मला क्लासची फारच अ‍ॅलर्जी आहे. आणि मला वाटते कि मीच त्याचा चांगला ट्युटर होउ शकतो. (आणि त्यासाठी मी कितीही वेळ काढु शकतो, आणि काढेन. हे सगळ्यांनाच शक्य होइल असे मी म्हण्त नाही) तो वेळ म्हणजेच माझी गुंतवणुक आहे. त्यामुळे शाळेत त्याला योग्य मार्गदर्शन होइल कि नाही त्याची चिंता नाही.

बर्याच लोकांनी अगदी ज्या शाळेत त्याला घातले तेथिल मुख्याध्यापक मॅडम देखिल म्हणाल्या कि कोल्हापुर मध्ये D Y Patil, VIBGYOR असे बरेच चांगले पर्याय आहेत (रोज १५ ते २० किमी प्रवास). पण त्यांचे टाइमटेबल इतके व्यस्त आहे कि तो मला किंवा मी त्याला भेटायला वेळ मिळेल कि नाही याचीच मला काळजी वाटली.

क्रमशः

आणि मला वाटते कि मीच त्याचा चांगला ट्युटर होउ शकतो. (आणि त्यासाठी मी कितीही वेळ काढु शकतो, आणि काढेन. हे सगळ्यांनाच शक्य होइल असे मी म्हण्त नाही) तो वेळ म्हणजेच माझी गुंतवणुक आहे. त्यामुळे शाळेत त्याला योग्य मार्गदर्शन होइल कि नाही त्याची चिंता नाही. <<
हे आवडले.

बर्याच लोकांनी अगदी ज्या शाळेत त्याला घातले तेथिल मुख्याध्यापक मॅडम देखिल म्हणाल्या कि कोल्हापुर मध्ये D Y Patil, VIBGYOR असे बरेच चांगले पर्याय आहेत (रोज १५ ते २० किमी प्रवास). पण त्यांचे टाइमटेबल इतके व्यस्त आहे कि तो मला किंवा मी त्याला भेटायला वेळ मिळेल कि नाही याचीच मला काळजी वाटली. <<<

पाटील, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते हे समजून घेऊनही तुमच्या या निर्णयाचे खरेच कौतुक वाटले.

तिकडच्या शाळेबाबत एक गोष्ट लक्षात आली, जवळ्पास प्रत्येक 'विध्यार्थी' (शक्यतो महागड्या शाळेतला, सन्माननिय अपवाद असतील) क्लास / ट्युशन ला जातो. पण मला क्लासची फारच अ‍ॅलर्जी आहे. आणि मला वाटते कि मीच त्याचा चांगला ट्युटर होउ शकतो. (आणि त्यासाठी मी कितीही वेळ काढु शकतो, आणि काढेन. >>

अगदी पटले. तुम्हाला १०० बटाटे वडे !!
आजच इथून बंगलोरात परत गेलेल्या, तिथे महागड्या शाळेत जाणार्‍या ५वीतल्या मुलाला इंग्रजीची ट्युशन लावल्याचे ऐकले . त्याचे आई वडिल इंग्रजी माध्यमात शिकलेले आहेत, दोघांचेही इंग्रजीवर चांगले प्रभुत्व आहे, पण तरी लेकाला आठवड्यातून २ दिवस ट्युशन Sad

ट्युशनला भारतात पर्याय नाही. मग तुम्ही कितीही हुषार असा.

. सगळेच जातात, म्हणून तुम्ही पण जा.
. शाळेत शिकवत नाहीत म्हणून जा.
. आईबाबाना वेळ नाही म्हणून जा.

ट्युशनला भारतात पर्याय नाही. मग तुम्ही कितीही हुषार असा. >>> असंच काही नाही. माझ्या नातेवाईकांमधील बहुतेक मुलांना घरीच आई वडिल शिकवतात, ( १ ते ६ वी ) ९-१० वी असेल तर गोष्ट निराळी.

केदार... तुमच्या प्रश्नाचं तुम्हीच उत्तर दिलंय..

हे माझं मत नाही.. पण ज्या नातेवाईकांची मुलं मी बघतोय, त्यावरून काढलेलं अनुमान आहे.
१ ली, २ रीतल्या मुलांना देखील ट्युशन क्लासला जुंपणारे पालक मी पाहिलेत.
आई/बाप नोकरी करतात. आजी आजोबा असतीलच घरी असं नाही. आजी/आजोबा असले तरी आई/वडिलांचा त्यांच्यावर विश्वास नाही. (घरी आल्यावर एकाद्यादिवशी मुलाने नीट खाल्लं नाही, म्हणून आजीच्या अंगावर ओरडणारी आई माझ्या नात्यात आहे).

मग TV नाहीतर Video Games (हल्ली मुलाना बाहेर पाठवायची फॅशन नाही). मग त्यापेक्षा क्लास बरा. दुसरीतल्या मुलाला तो पहिला येत नाही म्हणून क्लास, भाभा/स्कॉलरशीप किंवा तत्सम कुठल्यातरी परिक्षेत मार्क मिळावेत म्हणून तो क्लास. (खरं तर स्कॉलरशीप (४/७) मधे मिळणारे पैसे आईवडिलाबरोबर एका हॉटेलिंगलाही पुरत नाहीत, पण मुलगा स्कॉलर ठरायला ही पट्टी पाहिजेच).
हे सगळे लोक माझ्या भारतातल्या नातेवाईकांमधे आहेत.

बरं बोलायला जावं तर झक्की (म्हणजे , तुम्हाला काय कळतं?)..
तुम्हाला सगळं सोप्पं मिळालंय, आता १०वी/१२वी करून दाखवा.

Pages