'कुलंग' ला येणार का ??

Submitted by Yo.Rocks on 23 September, 2010 - 06:44
ठिकाण/पत्ता: 
कुलंग (आंबेवाडी जि. नाशिक)

कुलंग ट्रेक :

ट्रेक चे नाव काढाल तर.. कोणी हौशीपोटी ट्रेक करतो..कोणी निसर्गवेडा बनून ट्रेक करतो.. तर कोणी ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्यासाठी ट्रेक करतो.. तर कोणी निसर्गाची सुंदरता आपल्या कॅमेर्‍यात बंदीस्त करण्यासाठी ट्रेक करतो.. प्रत्येकाची कारणे वेगळी असू शकतात.. पण आवड एकच भटकंतीची... नि अश्या भटक्या जमातीमधील मंडळींचा मायबोलीवर वावर वाढला आहे.. तर दुसरीकडे आपणही एकदातरी असा अनुभव घ्यावा अशी काही मंडळींमध्ये उत्सुकता आहे..

सांगायचा उद्देश असा की आम्ही काही हौशी मायबोलीकर्स येत्या २-३ ऑक्टो. रोजी 'कुलंग' ट्रेक करणार आहोत... तेव्हा ज्यांना ट्रेक करण्याची इच्छा आहे त्यांनी जरुर सहभागी व्हावे..

स्थळ : कुलंग (आंबेवाडी गाव)
डोंगररांग : कळसुबाई
उंची : अंदाजे ४८२२ फूट
प्रदेश : नाशिक

श्रेणी : मध्यम.. (म्हणावे तसे रॉक पॅचेस नाहीत.. पण पायथ्यापासून वरती पोहोचेस्तोवर ४-५ तास लागतात.. बर्‍यापैंकी मोठा क्लाईंब आहे.. त्यामुळे "किसमे कितना है दम" ची कसोटी मात्र लागेल.. Happy
======
आमचा कार्यक्रम खालीलप्रमाणे -:

१ ऑक्टोबर रोजी दादरहून कसार्‍याला जाणारी शेवटची लोकल (सिएसटीकडून शेवटचा डबा - लेडीज डब्याच्या पुढचा) पकडणार आहोत..
वेळ ठिक रात्री १२.३० वाजता..

कुर्ला १२.४४
विक्रोळी १२.५५
ठाणे ०१.१०
डोंबिवली ०१.३२
कल्याण ०१.४० (पुण्यातून येणार्‍यांना इकडून गाडी पकडावी लागेल)
टिटवाळा ०१.५५
आसनगाव ०२.१७
कसारा २.५६

कसार्‍याहून आंबेवाडी (पायथ्यालगतचे गाव) गावात जीप मार्गे जाणार.(अंदाजे पहाटे ४.३० वा ५.०० वाजता)
तिकडूनच मग थोडे उजाडले की ट्रेक सुरु करणार..
गडावरती पोचण्यास साधारणतः ४-५ तास लागतात..(हे सर्व अधुनमधून घेतल्या जाणार्‍या "क्षणभर विश्रांती" च्या कार्यक्रमावर अवलंबून असेल.. ) पण कसेही करुन दुपारी साडेअकरा- बारा च्या आत वरती पोहोचणे आवश्यक !

एकदा वरती पोहोचलो की हवी तेवढी विश्रांती घेउ शकता..
गडावरतीच दुपारचे नि रात्रीचे जेवण.. (आम्हीच एकत्रपणे जेवण बनवणार असल्याने ह्या जेवणास हॉटेल वा घरच्या जेवणाची चव असेलच असे नाही..)

वरती पोहोचल्यावर झोप घेणे, फ्रेश होणे, जेवण करणे नि आजुबाजूचा परिसर न्याहाळणे इति नियमीत कार्यक्रम पार पाडले जातील.. मग चहापानाचा (जेवण आहे तर चहापाणी पण असेलच.. ) कार्यक्रम आटपून सुर्यास्ताचा सोहळा !

मग काळोखातच चांदण्यात टॉर्चच्या प्रकाशात जेवण बनवण्याचा कार्यक्रम.. शेकोटी.. नि मग डाराडुर (झोपण्याची सोय गुहेतच होईल.. )

३ ऑक्टो. रोजी सुर्योदय बघून नाश्तापाणी आटपून गड उतरायला सुरवात..

गावातच दुपारचे जेवण करुन परतीचा प्रवास. Happy

=========
प्रत्येकी अंदाजे ५५०- ६०० रुपये खर्च येईल.. ( ट्रेनची तिकीट आपापली काढावी.. )

कोणी मिस करु नये म्हणून इथे ह्या ट्रेकची माहिती दिली आहे.. इच्छुकांनी सोमवार दि.२७ सप्टें. पर्यंत जरुर संपर्क साधावा..

फक्त 'हा ट्रेक आहे पिकनीक नाही' हे लक्षात घ्यावे ! Happy तंगडतोड होणारच आहे.. पण ऐनवेळी इतर काही बदल झाल्यास वा गैरसोय झाल्यास नाक मुरडू नये.. Proud ट्रेकमे सब चलाना पडता है ! वो मजा कुछ और है Happy

आतापर्यंत खालील मायबोलीकर येत आहेत..
१. सुन्या
२. विनय भीडे
३. इंद्रा
४. गिरीविहार
५. सुर्यकिरण
६. किश्या
७. रोहीत.. एक मावळा
८. यो रॉक्स
९. प्रसाद गोडबोले
१०.ह बा
११. प्रणव कवळे (अनिश्चित)
१२. सम्या (अनिश्चित)

# कृपया येण्याचे कंफर्म करताना दोनदा विचार करा.. ऐनवेळी कॅन्सलेशन वा टांगारु नकोत..

आपल्यासोबत खालील आवश्यक वस्तू घेउन येणे
१. चादर/चटई/कॅरीमॅट (रात्री कडाक्याची थंडी असेल तेव्हा तशी सोय करा)
२. टॉर्च
३. एक प्लेट, चमचा, नि स्टिलचा छोटा ग्लास (काचेचा नको Proud )
४. अंदाजे दोन लिटर पाणी
५. टाईमपास खाणे (फळे,बिस्कीट्,केक इ.)
६. पावसाळी वातावरण असल्यास विंडचिटर असलेले बरे..

अधिक माहितीसाठी :
सुन्या ९७६४००६२८२ (पुण्याहून ज्यांना यायचे असेल त्यांनी सुन्याला संपर्क करावा)
यो रॉक्स ९८३३२१२५३०
विन्या ९८२०२८४९६६
इंद्रा ९८३३९५३८८७

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यो, पुढच्या वेळी वरपर्यंत कार जाईल, तंबू-बिंबू ठोकून कोणी चांगला खानसामा तयार असेल, वरती भांडी स्वच्छ घासणारा माणूस असेल, एखादे हॉस्पिटल किमानपक्षी क्लिनिक असेल आणि गडाच्या पायथ्याशी मसाजकेंद्र असेल असा गड शोध ..... आम्ही पण येऊ.>>>
आणि असा कोणताही गड नाही सापडला तर, नविन बांध आणि मग बोलवर.>>>

मल्ल्या...खरंच बांधा रे...नक्की येईन मी पण Proud

तापल्या तव्यावरच पोळी भाजावी. ट्रेक नुकताच झालेला असतानाच वृत्तांत टाकावा. हुक्मावरून....

तुम्ही लोक्स बरोबर फोडणीवर (तेल, मोहरी, हिंग, उडीद डाळ, कढीपत्ता, मिरच्या) रवा परतून का नेत नाही? गडावर गेल्यावर नुस्तं आधणात शिजवून मीठ, किंचीत साखर घातली की मस्त नाश्ता तयार. सारख्या मॅग्या खाण्यापेक्षा चांगलं पोटभरीचं होईल. की असंच करुन नेता नेहमी?

अश्वे, एवढं सर्व नेन्या पेक्षा मग रेडी टु ईट बरं ना... Happy राईसचे वेग वेगळे फ्लेवर खाता येतात... Happy

एवढं सगळं नाही रे. असा भाजलेला रवा प्लॅस्टीकच्या पिशवीत बांधून न्यायचा आणि आयत्यावेळी शिजवायचा. मस्त रेडीटूशिजव उपमा होईल ना?

रेडी टू पोस्ट असा वृतांत तयार करु या का ?
म्हणजे जोडून सुट्टी, अमक्या तमक्याला फोन, अमके तमके टांगारु,
अमूक एक गाडी, अमूक एक स्टेशन, अमूक ठिकाणी चहा भजी,
अमूक रस्ता, अमूक गाव, अमूक गाईड,
अमूक वेळा रस्ता चुकलो, अमूक वेळा पडलो,
हिरवागार निसर्ग, थंडगार पाणी,
रॉक पॅच, गुहा, गोम, साप, विंचु, मॅगी, खिचडी, पाणी, रातकिडे, चांदणे, सुर्योदय, आल्यावर मावशीकडे जेवण,
यँव नि त्यँव, अलाणे फलाणे

असे सगळे लिहूनच ठेवायचे, फक्त जे जाऊन (सुखरुप) परत आले, त्यांनी गाळलेल्या जागा भरायच्या,
योगेशकडून प्रचि घ्यायची (वॉटर मार्क नसलेली.) .. नि पोष्टायचे. अरे हाकानाका !

माझ्या विपूत घुसून आणि मला फोन करून मी जर प्रामाणिक पणे जसा घडला तसा वृत्तांत टाकला तर कुणीतरी असंबंध लोकही नाराज होतील अशी भिती घालू लागलेत त्यामुळे मी माझा वृत्तांत एडीट करायला घेतलाय आता मी फक्त ठळक ठळक घटना आणि एका माबोकराने सांगितलेली गणपत गोगालेच्या बॉसची कथा थोडक्यात सांगणार आहे. ट्रेलर बघून पिक्चर बंद पाडणारी माणसे मला आजिबात आवडत नाहित. फोटो पाठवा रे कुणीतरी गरीबाला...!!! Uhoh

दिनेशदा, चिडलात का?
चिडला असलात तरी चिडू नका. अशा ट्रेकचे योग्य वर्णन अशा रेडी टू पोस्ट ने नाही करता येणार आणि ते योग्यही होणार नाही.

सुपु खरच एव्हढी इच्छा असेल तर करु पुढच्या वेळेस एकदिवसाचा ट्रेक , माझा मुलगा पण मागे लागलाय ... गिरी गोरखगड करु रे .. वन डे .. काय म्हणतोस ..?
पण दिवाळी नंतर्...धमाल येइल..

विन्या, गोरखगड रात्रीचा ट्रेक करु... शक्यतो पोर्णिमा... धमाल करु...

ह बा फोटोंची साईज मोठी आहे, मेल करता येणार नाहीत, ९८२०३०६०१३ ला पत्ता समस कर, मी सीडी कट करुन पाठवतो....

अरे अंत बघताय रे (चिडलो नाही )
पण आमच्या ट्रेकच्या वेळी, घडले काय आणि लिहायचे काय, याची चर्चा, गडावरच होत असे !!

विन्या, आपण आडवागड सर करुया का? म्हणजे मी कितीही चालून तो सर करीन(आडवागड = उभ्याच्या विरुद्ध आडवा असा गड = सपाटीला चालत सर करायचा गड. दुर्ग किंवा साधा किल्ला नाही चालणार, गडच हवा Biggrin )

सिरियसली, मला पण बघायचंय मला जमतं का अजून ट्रेकिंग. एकदा १५ फूट घसरुन पडल्यावर मी नाव काढलं नाहिये ट्रेकिंगचं.

मित्रहो.. उद्या संध्याकाळी पोस्टेन संपुर्ण वृत्तांत..
झक्या.. भाव कसला रे खायचा.. वेळ मिळेल तसे लिहीतोय रे.. खरे तर कुलंगविषयी आधी लिहीले असल्याने यावेळी लिहीणारपण नव्हतो.. म्हटले बाकीचे लिहीतील.. पण ह बा ऐकेल तेव्हा ना..

विन्या, अके.. नक्की करुया.. Happy

मी पन..... मी पन..... मी पन..... मी पन..... मी पन..... मी पन..... मी पन..... मी पन..... मी पन..... मी पन..... मी पन..... मी पन..... मी पन..... मी पन..... मी पन..... मी पन..... मी पन..... मी पन..... मी पन..... मी पन..... मी पन..... मी पन..... मी पन..... मी पन..... मी पन..... मी पन..... मी पन..... मी पन..... ... आडवागड सॉरी आपल गोरखगड Happy

आशु येडी झाली का बे..... आवडा गड Rofl

एकदा १५ फूट घसरुन पडल्यावर मी नाव काढलं नाहिये ट्रेकिंगचं. << घसरगुंडीचं बोलते आहेस का गं अके Proud कुलंग वर सुद्धा घसरगुंडी होती.. ४२०० फुटाची, पण मोठं झाल्याचा फिल होता म्हणून घसरलो नाही आम्ही Proud

गोरखगड रात्रीचा ट्रेक करु... शक्यतो पोर्णिमा... धमाल करु...>>. मला लेकाला घेउन यायचय , त्याप्रमाणे प्लानिंग करा म्हणजे झाल...
अश्वे आडवागड >> Lol

कोजागिरी आहे ,पण शुक्रवारी .त्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे शनिवारी करुया!!!! कस ????

Pages