कुलंग ट्रेक :
ट्रेक चे नाव काढाल तर.. कोणी हौशीपोटी ट्रेक करतो..कोणी निसर्गवेडा बनून ट्रेक करतो.. तर कोणी ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्यासाठी ट्रेक करतो.. तर कोणी निसर्गाची सुंदरता आपल्या कॅमेर्यात बंदीस्त करण्यासाठी ट्रेक करतो.. प्रत्येकाची कारणे वेगळी असू शकतात.. पण आवड एकच भटकंतीची... नि अश्या भटक्या जमातीमधील मंडळींचा मायबोलीवर वावर वाढला आहे.. तर दुसरीकडे आपणही एकदातरी असा अनुभव घ्यावा अशी काही मंडळींमध्ये उत्सुकता आहे..
सांगायचा उद्देश असा की आम्ही काही हौशी मायबोलीकर्स येत्या २-३ ऑक्टो. रोजी 'कुलंग' ट्रेक करणार आहोत... तेव्हा ज्यांना ट्रेक करण्याची इच्छा आहे त्यांनी जरुर सहभागी व्हावे..
स्थळ : कुलंग (आंबेवाडी गाव)
डोंगररांग : कळसुबाई
उंची : अंदाजे ४८२२ फूट
प्रदेश : नाशिक
श्रेणी : मध्यम.. (म्हणावे तसे रॉक पॅचेस नाहीत.. पण पायथ्यापासून वरती पोहोचेस्तोवर ४-५ तास लागतात.. बर्यापैंकी मोठा क्लाईंब आहे.. त्यामुळे "किसमे कितना है दम" ची कसोटी मात्र लागेल..
======
आमचा कार्यक्रम खालीलप्रमाणे -:
१ ऑक्टोबर रोजी दादरहून कसार्याला जाणारी शेवटची लोकल (सिएसटीकडून शेवटचा डबा - लेडीज डब्याच्या पुढचा) पकडणार आहोत..
वेळ ठिक रात्री १२.३० वाजता..
कुर्ला १२.४४
विक्रोळी १२.५५
ठाणे ०१.१०
डोंबिवली ०१.३२
कल्याण ०१.४० (पुण्यातून येणार्यांना इकडून गाडी पकडावी लागेल)
टिटवाळा ०१.५५
आसनगाव ०२.१७
कसारा २.५६
कसार्याहून आंबेवाडी (पायथ्यालगतचे गाव) गावात जीप मार्गे जाणार.(अंदाजे पहाटे ४.३० वा ५.०० वाजता)
तिकडूनच मग थोडे उजाडले की ट्रेक सुरु करणार..
गडावरती पोचण्यास साधारणतः ४-५ तास लागतात..(हे सर्व अधुनमधून घेतल्या जाणार्या "क्षणभर विश्रांती" च्या कार्यक्रमावर अवलंबून असेल.. ) पण कसेही करुन दुपारी साडेअकरा- बारा च्या आत वरती पोहोचणे आवश्यक !
एकदा वरती पोहोचलो की हवी तेवढी विश्रांती घेउ शकता..
गडावरतीच दुपारचे नि रात्रीचे जेवण.. (आम्हीच एकत्रपणे जेवण बनवणार असल्याने ह्या जेवणास हॉटेल वा घरच्या जेवणाची चव असेलच असे नाही..)
वरती पोहोचल्यावर झोप घेणे, फ्रेश होणे, जेवण करणे नि आजुबाजूचा परिसर न्याहाळणे इति नियमीत कार्यक्रम पार पाडले जातील.. मग चहापानाचा (जेवण आहे तर चहापाणी पण असेलच.. ) कार्यक्रम आटपून सुर्यास्ताचा सोहळा !
मग काळोखातच चांदण्यात टॉर्चच्या प्रकाशात जेवण बनवण्याचा कार्यक्रम.. शेकोटी.. नि मग डाराडुर (झोपण्याची सोय गुहेतच होईल.. )
३ ऑक्टो. रोजी सुर्योदय बघून नाश्तापाणी आटपून गड उतरायला सुरवात..
गावातच दुपारचे जेवण करुन परतीचा प्रवास.
=========
प्रत्येकी अंदाजे ५५०- ६०० रुपये खर्च येईल.. ( ट्रेनची तिकीट आपापली काढावी.. )
कोणी मिस करु नये म्हणून इथे ह्या ट्रेकची माहिती दिली आहे.. इच्छुकांनी सोमवार दि.२७ सप्टें. पर्यंत जरुर संपर्क साधावा..
फक्त 'हा ट्रेक आहे पिकनीक नाही' हे लक्षात घ्यावे ! तंगडतोड होणारच आहे.. पण ऐनवेळी इतर काही बदल झाल्यास वा गैरसोय झाल्यास नाक मुरडू नये..
ट्रेकमे सब चलाना पडता है ! वो मजा कुछ और है
आतापर्यंत खालील मायबोलीकर येत आहेत..
१. सुन्या
२. विनय भीडे
३. इंद्रा
४. गिरीविहार
५. सुर्यकिरण
६. किश्या
७. रोहीत.. एक मावळा
८. यो रॉक्स
९. प्रसाद गोडबोले
१०.ह बा
११. प्रणव कवळे (अनिश्चित)
१२. सम्या (अनिश्चित)
# कृपया येण्याचे कंफर्म करताना दोनदा विचार करा.. ऐनवेळी कॅन्सलेशन वा टांगारु नकोत..
आपल्यासोबत खालील आवश्यक वस्तू घेउन येणे
१. चादर/चटई/कॅरीमॅट (रात्री कडाक्याची थंडी असेल तेव्हा तशी सोय करा)
२. टॉर्च
३. एक प्लेट, चमचा, नि स्टिलचा छोटा ग्लास (काचेचा नको )
४. अंदाजे दोन लिटर पाणी
५. टाईमपास खाणे (फळे,बिस्कीट्,केक इ.)
६. पावसाळी वातावरण असल्यास विंडचिटर असलेले बरे..
अधिक माहितीसाठी :
सुन्या ९७६४००६२८२ (पुण्याहून ज्यांना यायचे असेल त्यांनी सुन्याला संपर्क करावा)
यो रॉक्स ९८३३२१२५३०
विन्या ९८२०२८४९६६
इंद्रा ९८३३९५३८८७
जुये ते पातेल मला ७५०० ला
जुये ते पातेल मला ७५०० ला पडणार आहे, मायक्रोव्हेव्ह घ्यायच कबूल केल तेव्हा जरा शांतता आली...फिदी:
हा सर्व प्रकार आमची कामवाली
हा सर्व प्रकार आमची कामवाली बाई पहात होती... >> जल्ला तीला किती वाईट वाटलं असेल नै
आता फक्त उद्या तीने एक चमचा अन पातेलं गिफ्ट करावं तुला.. अन ते ही बायको समक्ष... 
मायक्रोव्हेव्ह घ्यायच कबूल
मायक्रोव्हेव्ह घ्यायच कबूल केल तेव्हा जरा शांतता आली... << जल्ला एवढी घासून घासून काय कमवलंस रे विन्या.. शेवटी गमवलचं
सुक्या साल्या हबाच्या
सुक्या साल्या
हबाच्या कवितांनी मजा आणली पण राव्...:स्मित:
जुये ते पातेल मला ७५०० ला
जुये ते पातेल मला ७५०० ला पडणार आहे,
>>
म्हणजे चमचा बॅलन्स आहे तर अजुन. मधुराचा नंबर दे जरा मला..
<<ते पातेल मला ७५०० ला पडणार
<<ते पातेल मला ७५०० ला पडणार आहे, मायक्रोव्हेव्ह घ्यायच कबूल केल तेव्हा जरा शांतता आली>> हो ... जाऊ देत रे ७५०० काय ट्रेकच्या मस्तीपुढे
बायको म्हणेल असच दरवेळी भांडी घेऊन जा ट्रेकला जाताना म्हणजे त्याबदल्यात चांगल्या वस्तू जास्त तगादा न लावता मिळतील. बघ पुढच्या वेळी बायको स्वतःहूनच घरातली भांडी देत जाईल .
म्हणजे चमचा बॅलन्स आहे तर
म्हणजे चमचा बॅलन्स आहे तर अजुन. >>> तो मी बाहेरुन विकत आणिन आणि सांगिन यो कडे राहिलेला...:फिदी: :स्वत: ला हुशार समजणारा बाहुला:
मधुराचा नंबर दे जरा मला.. >>आगाउ कुठली..
बायको स्वतःहूनच घरातली भांडी
बायको स्वतःहूनच घरातली भांडी देत जाईल . >>पण गडावर कोण वाहणार ओझ ? मी घेउन निघेन आणि कोणातरी मित्राकडे ठेवीन म्हणतो, मग घरी जाताना परत घेउन जायची , हाकानाका..
टाके घातलेला? सुक्या, एका
टाके घातलेला?
सुक्या, एका ट्रेकमधे विन्याचा एवढा प्रभाव?
मी फक्त रात्रीचा वृत्तांत लिहीणार असल्याने काही मुद्दे आधी मांडतो आहे. हा माझा वृत्तांत नव्हे.
***************एक महत्वाचा आभार सोहळा************************
स्वतःच्याच घरात बेवारश्याचं मरण मिळालेली ती गोम अनंत काळासाठी स्मरली जावी यासाठी पुढच्या ट्रेकला तिथे गोमाईचे मंदीर उभा करूया. आणि आम्हाला शांतपणे झोपता यावे म्हणून ज्या माबोवीराने गोमीचे शिकराण केले त्याचे आभार पण त्याला गोमहत्येचे पाप लागल्याशिवाय रहाणार नाही हेही तितकेच सत्य आहे.
****************यो रॉक्स एक मृगजळ**************************
या माणसाने राजगडाचे केलेले वर्णन वाचून मी ट्रेकला गेलो. राजगडासारखी धमाल येणार म्हणून गाडीतून उतरल्या उतरल्या गडाकडे पाहिले आणि डयरेक्ट कोमात गेलो. बायको आणी पोरगं डोळ्यापुढं आली. मी एक मरतुकडा कोंबडा आहे आणी कुलंग नावाचा कसाई सुरा उगारून मला गोंजारतो आहे असे काहीतरी चित्र तयार झाले. शेजारच्या छोट्या डोंगरावर गेलं तर चालणार नाही का? असेही विचारून बघितले तर शरद पवारानी आर आर आबाकडे बघत बुटक्या तो बुटक्याच साला म्हणावं तश्या नजरेन मुंबईकरानी माझ्याकडे बघितलं. इंद्रा, विन्या यानी साथ दिली त्याबद्दल त्यांचे आभार.
******************गिरीविहार: दिशाभूल तज्ञ**********************
गडावरून खाली उतरताना माझी घसरण बघून या माणसाला माझी दया आली आणि त्याने मला एक सल्ला दिला " हबा वजन वाढव रे लेका त्याने ग्रीप छान येते उतरताना" त्याचा हा सल्ला मी खूप सिरीयसली लक्षात ठेवला पण दहाच मीनीटात गिरी एका दगडावरून घसरला ते डायरेक्ट समोर झोपलेल्या सुन्याच्या आणि माझ्या अंगावर आला. थोडक्यात वाचलो नाहीतर समाधी बांधावी लागली असती. बर या माणसाच्या घसरण्याचे कारण काय? तर जास्त वजन असल्याने घट्ट असलेला दगड उपटून निघाला. मला वजन वाढवण्याचा सल्ला देऊन त्याला काय साध्य होणार होते कुणास ठाऊक. कदाचीत रात्री च्या मैफिलीत त्याने केलेल्या "अल्टीमेट गोल इज .... काय बरं ते.... विसरलो... अं... अं..." (कुणाला आठवलं तर सांगा रे) या जोकला मी आजिबात हसलो नव्हतो त्यामुळे त्याने हा डाव केला असावा.
असो मला माझा वृत्तांत लिहायचा आहे अजून. यो चा आला की मग आपण साग्रसंगीत कार्यक्रम करूच. तोवर बाकीच्यानी आपापले अनुभव टाकावेत.
ह.बा. <<गाडीतून उतरल्या
ह.बा.

<<गाडीतून उतरल्या उतरल्या गडाकडे पाहिले आणि डयरेक्ट कोमात गेलो. बायको आणी पोरगं डोळ्यापुढं आली. मी एक मरतुकडा कोंबडा आहे आणी कुलंग नावाचा कसाई सुरा उगारून मला गोंजारतो आहे असे काहीतरी चित्र तयार झाले. >>
हबा पश्चिम महाराष्ट्र पेटलाय
हबा
पश्चिम महाराष्ट्र पेटलाय म्हणायचा...:फिदी:
अरे हो विन्या तुझ सांगायचं
अरे हो विन्या तुझ सांगायचं राहिलचं रे....
************विन्या अट्टल बेवडा दिसत नाही*******
हा विन्या येताना मला विचारतोय "ए मी अट्टल बेवडा वाटतोय का रे?" मी म्हटलं "हो" तसा विन्याचा चेहरा अट्टल गुन्हेगारासारखा झाला "अरे दाढी वाढविल्यामुळे वाटत असेल रे" ही त्याची सारवासारवी. तेवढ्यात पडत्या बाजूला टेकू देणारे गोडबोले त्याच्या मदतीला धावले. विन्याची गायनकाला रात्रीच्या वृत्तांतात देईन. आणि त्याची काही महत्वाच्या विषयावरची मतेही सांगायची आहेत. तो एक एक जबरदस्त गायक आणि धमाल विनोदवीर आहे तसेच तो चांगला माणूसही आहे. इंद्रावर त्याने केलेले संस्कार अवर्णणीय असेच आहेत.
अरे विन्या संस्कारवर्ग
अरे विन्या संस्कारवर्ग कधीपासून चालू केलेत
हे छोटे छोटे किस्से वाचुन
हे छोटे छोटे किस्से वाचुन धम्माल येतेय
पूर्ण वृतांताची आणि फोटोची वाट बघतोय. 
रच्याकने, हबा, अरे कुलंगचा पलंग करून गुहेच्या शामियान्यातली चढाईच्या उन्मादान माजलेली संध्याकाळ कशी गेली?
रच्याकने, हबा, अरे कुलंगचा
रच्याकने, हबा, अरे कुलंगचा पलंग करून गुहेच्या शामियान्यातली चढाईच्या उन्मादान माजलेली संध्याकाळ कशी गेली? >>>
कुलंगच्या हातात सापडलेली तलंग होऊन तळमळत होतो रे रात्र होईपर्यंत. गडावर पोहोचल्या पोहोचल्या आजचा आयुष्यातला शेवटचा दिवस हे नक्कीच समजून चाललेलो. गुडघ्याच्या वाट्या काढून चेचून टाकाव्यात असे वाटत होते. सुन्याने दिलेली पेन किलर खल्ल्यावर आणि यो ने दिलेला चहा पिल्यावर जिवात जीव आला. सगळ्यांचा आधार नसता तर वैतागाने उडी मारली असती मी. पण यो आणि सुन्याचा क्षमतेवर आणि काही तासात सर्वांशी झालेल्या मैत्रीवर विश्वासही वाटू लागलेला त्यामुळे दुसर्या दिवशी उतरण्याचं बळ एकवटता आलं.
अरे किती ती उत्सुकता ताणायची.
अरे किती ती उत्सुकता ताणायची. ह.बा. वृतांताची वाट बघतोय, आतुरतेने.
वजन वाढवायचा टिप्स हव्यात का ?
<<अरे किती ती उत्सुकता
<<अरे किती ती उत्सुकता ताणायची. >> खरच
हबा पण यो आणि सुन्याचा
हबा

पण यो आणि सुन्याचा क्षमतेवर आणि काही तासात सर्वांशी झालेल्या मैत्रीवर विश्वासही वाटू लागलेला त्यामुळे दुसर्या दिवशी उतरण्याचं बळ एकवटता आलं.>>>>>सुन्या, यो आणि इतर माबोकर जय हो!!!!
इंद्रावर त्याने केलेले
इंद्रावर त्याने केलेले संस्कार अवर्णणीय असेच आहेत.
हबा पुर्ण वृतांत कधी टाकनारेस ?
योग्या, तु लै मिस्स केलेस...
योग्या, तु लै मिस्स केलेस... तु आला अस्तास तर येई पर्यंत तुझा एक डोळा बंदच झाला असता... (कॅमेराने फोटो काढुन काढुन रे...
एवढं निसर्ग सौंदर्य होतं
)
हबा पुर्ण वृतांत कधी टाकनारेस
हबा पुर्ण वृतांत कधी टाकनारेस ?>>> after yo!
तुझा एक डोळा बंदच झाला
तुझा एक डोळा बंदच झाला असता>>>>>>मल्ल्ली
अरे किती ती उत्सुकता ताणायची.
अरे किती ती उत्सुकता ताणायची. ह.बा. वृतांताची वाट बघतोय,>>> Dinesh Da, yo jovar takat nahi tovar nahi. tyacha vruttant vachayla ji maja aste ti majhya lekhat nasnar. yogy bhashet lokana ha trek samjude. majhyasathi hi avismarniy gosht aahe. me vinodi lihinar aahe tyamule te nantar. pan ek sangato masti, bhiti, dhamal, kalji, sahakary, vijay, he sagle anubhavale ekach trek madhe.
त्या गोमेला पायात चपला
त्या गोमेला पायात चपला घालायला कमी वेळ लागेल, एवढा वेळ त्या यो ला वृतांत टाकायला लागतोय.
पुणेकरांची चुकलेली
पुणेकरांची चुकलेली ट्रेन..
धाब्यावर झालेली सगळ्यांची पहिली भेट...
रोती आणि दाल फ्राय वर तुटुन पदलेले माबोकर..
रात्रीचा जीप प्रवास ...
आणि कुलंग पाहिला ती घटिका ...
गिर्यारोहणाला सुरुवात ...
गप्पा , माबोवरची एकमेकांची उणी धुणी ...:फिदी:
गड चढताना फाफललेले समदे..
लाकड वर न्या म्हणून सांगणारे सुन्या आणि यो , आणि त्या लाकडांच्या ओझ्याने वैतागलेली माकडं...:फिदी:
बहुतांश लोकांचा पाय जितके वेळेस जमिनीला लागला नसेल तितके वेळा बुड खाली आपटल होत.....
वर पोहोचल्याचा आनंद , आणि गुहेत राहायला जागा नसण्याच दु:ख दोन्ही एकाच वेळेस..अशी स्मायली कुठल्याच साईटवर उपलब्ध नाही.
उन्हातच झोपलेले आणि उन्ह उतरायची वाट पहाणारे मूर्ख..
हे घाल , ते पण घाल खिचडीत, करत केलेली खिचडी ...
गिरी म्हणला मी करणार खिचडी ... आम्हाला वाटल त्याला येत असेल बनवता...पण त्याने बायकोने दिलेली कॄती लिहून आणली होती.खिचदी अतिषय छान झाली होती.
मल्ली चुलीची फुंकणी...
भाजलेले पापड आणि मस्त खिचडी...
गडावर सैरसपाटा ... काहिजणांची आंघोळ..
मग चहा.. ज्याने मजा आणली
क्रमश: ......
लाकड वर न्या म्हणून सांगणारे
लाकड वर न्या म्हणून सांगणारे सुन्या आणि यो , आणि त्या लाकडांच्या ओझ्याने वैतागलेली माकडं...

मीच सगळ्यात जास्त लाकडे घेतलेली.
विनय,
काल तू याच कवीतेविषयी बोलत होतास ना? मस्त जमलिये.
ह बा ने जोरदार हशा उडवला
ह बा ने जोरदार हशा उडवला असेल.
असो.
आता पटापट फटु आणि व्रुतांत येवुदेत.
म्हणजे गेलो नाही तेच बर केल अस मनातल्या मनात म्हणता येइल.
कधी नव्हे ते या ट्रेकला
कधी नव्हे ते या ट्रेकला उतरताना सारखे आपटत होतो.
एकदा तर कडेलोट होता होता वाचलो होते... योग्याला अन वाटेच्या कडेवरील कारवीला लाख लाख धन्यवाद...
ट्रेकचा कळस म्हणजे पहाटे साडेचार वाजता पाहिलेले आकाश....
संध्याकाळी टाक्यात केलेली आंघोळ अन फक्काड चहा.....
रात्रीचा वाद-विवाद (मराठवाडा विरुद्द पश्चिम महाराष्ट्र)....
गुरुवर्य हबा यांच्या कविता अन बरयाच विषयावरील आत्मचिंतन.....
परतीच्या प्रवासातील ट्रेन मध्ये म्हटलेली गाणी.....
"अल्टीमेट गोल इज .... काय बरं ते.... विसरलो... अं... अं...">>> हबा परत सांगुका....
बहुतांश लोकांचा पाय जितके
बहुतांश लोकांचा पाय जितके वेळेस जमिनीला लागला नसेल तितके वेळा बुड खाली आपटल होत.....
>> बापरे... ह ह पु वा.....
Office madye aahe he visavin gele....
Please lavakar lekh liha na.... please...
अरे सहीच ट्रेलर टाकलय.....
अरे सहीच ट्रेलर टाकलय..... आता मुख्य चित्रपटांची individula versions येऊ द्यात.
हबा ....
:गणपत गोगावलेचा बॉस म्हणजे काय mystery प्रकरण आहे ब्वा? अशा विचारात पडलेली बाहुली:
इंद्रधनुष्य >>>> झकास वर्णन! कुलंग गडावरिल गोमेशी लढाई तर खासच!
तुमचे 'चहाचे झुरके'
वाचून आता माझा जीव पण चहाच्या झुरक्यांकरता झुरायला लागलाय ... जातेच आता चहा करायला!
यो, पुढच्या वेळी वरपर्यंत कार जाईल, तंबू-बिंबू ठोकून कोणी चांगला खानसामा तयार असेल, वरती भांडी स्वच्छ घासणारा माणूस असेल, एखादे हॉस्पिटल किमानपक्षी क्लिनिक असेल आणि गडाच्या पायथ्याशी मसाजकेंद्र असेल असा गड शोध ..... आम्ही पण येऊ.
Pages