'कुलंग' ला येणार का ??

Submitted by Yo.Rocks on 23 September, 2010 - 06:44
ठिकाण/पत्ता: 
कुलंग (आंबेवाडी जि. नाशिक)

कुलंग ट्रेक :

ट्रेक चे नाव काढाल तर.. कोणी हौशीपोटी ट्रेक करतो..कोणी निसर्गवेडा बनून ट्रेक करतो.. तर कोणी ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्यासाठी ट्रेक करतो.. तर कोणी निसर्गाची सुंदरता आपल्या कॅमेर्‍यात बंदीस्त करण्यासाठी ट्रेक करतो.. प्रत्येकाची कारणे वेगळी असू शकतात.. पण आवड एकच भटकंतीची... नि अश्या भटक्या जमातीमधील मंडळींचा मायबोलीवर वावर वाढला आहे.. तर दुसरीकडे आपणही एकदातरी असा अनुभव घ्यावा अशी काही मंडळींमध्ये उत्सुकता आहे..

सांगायचा उद्देश असा की आम्ही काही हौशी मायबोलीकर्स येत्या २-३ ऑक्टो. रोजी 'कुलंग' ट्रेक करणार आहोत... तेव्हा ज्यांना ट्रेक करण्याची इच्छा आहे त्यांनी जरुर सहभागी व्हावे..

स्थळ : कुलंग (आंबेवाडी गाव)
डोंगररांग : कळसुबाई
उंची : अंदाजे ४८२२ फूट
प्रदेश : नाशिक

श्रेणी : मध्यम.. (म्हणावे तसे रॉक पॅचेस नाहीत.. पण पायथ्यापासून वरती पोहोचेस्तोवर ४-५ तास लागतात.. बर्‍यापैंकी मोठा क्लाईंब आहे.. त्यामुळे "किसमे कितना है दम" ची कसोटी मात्र लागेल.. Happy
======
आमचा कार्यक्रम खालीलप्रमाणे -:

१ ऑक्टोबर रोजी दादरहून कसार्‍याला जाणारी शेवटची लोकल (सिएसटीकडून शेवटचा डबा - लेडीज डब्याच्या पुढचा) पकडणार आहोत..
वेळ ठिक रात्री १२.३० वाजता..

कुर्ला १२.४४
विक्रोळी १२.५५
ठाणे ०१.१०
डोंबिवली ०१.३२
कल्याण ०१.४० (पुण्यातून येणार्‍यांना इकडून गाडी पकडावी लागेल)
टिटवाळा ०१.५५
आसनगाव ०२.१७
कसारा २.५६

कसार्‍याहून आंबेवाडी (पायथ्यालगतचे गाव) गावात जीप मार्गे जाणार.(अंदाजे पहाटे ४.३० वा ५.०० वाजता)
तिकडूनच मग थोडे उजाडले की ट्रेक सुरु करणार..
गडावरती पोचण्यास साधारणतः ४-५ तास लागतात..(हे सर्व अधुनमधून घेतल्या जाणार्‍या "क्षणभर विश्रांती" च्या कार्यक्रमावर अवलंबून असेल.. ) पण कसेही करुन दुपारी साडेअकरा- बारा च्या आत वरती पोहोचणे आवश्यक !

एकदा वरती पोहोचलो की हवी तेवढी विश्रांती घेउ शकता..
गडावरतीच दुपारचे नि रात्रीचे जेवण.. (आम्हीच एकत्रपणे जेवण बनवणार असल्याने ह्या जेवणास हॉटेल वा घरच्या जेवणाची चव असेलच असे नाही..)

वरती पोहोचल्यावर झोप घेणे, फ्रेश होणे, जेवण करणे नि आजुबाजूचा परिसर न्याहाळणे इति नियमीत कार्यक्रम पार पाडले जातील.. मग चहापानाचा (जेवण आहे तर चहापाणी पण असेलच.. ) कार्यक्रम आटपून सुर्यास्ताचा सोहळा !

मग काळोखातच चांदण्यात टॉर्चच्या प्रकाशात जेवण बनवण्याचा कार्यक्रम.. शेकोटी.. नि मग डाराडुर (झोपण्याची सोय गुहेतच होईल.. )

३ ऑक्टो. रोजी सुर्योदय बघून नाश्तापाणी आटपून गड उतरायला सुरवात..

गावातच दुपारचे जेवण करुन परतीचा प्रवास. Happy

=========
प्रत्येकी अंदाजे ५५०- ६०० रुपये खर्च येईल.. ( ट्रेनची तिकीट आपापली काढावी.. )

कोणी मिस करु नये म्हणून इथे ह्या ट्रेकची माहिती दिली आहे.. इच्छुकांनी सोमवार दि.२७ सप्टें. पर्यंत जरुर संपर्क साधावा..

फक्त 'हा ट्रेक आहे पिकनीक नाही' हे लक्षात घ्यावे ! Happy तंगडतोड होणारच आहे.. पण ऐनवेळी इतर काही बदल झाल्यास वा गैरसोय झाल्यास नाक मुरडू नये.. Proud ट्रेकमे सब चलाना पडता है ! वो मजा कुछ और है Happy

आतापर्यंत खालील मायबोलीकर येत आहेत..
१. सुन्या
२. विनय भीडे
३. इंद्रा
४. गिरीविहार
५. सुर्यकिरण
६. किश्या
७. रोहीत.. एक मावळा
८. यो रॉक्स
९. प्रसाद गोडबोले
१०.ह बा
११. प्रणव कवळे (अनिश्चित)
१२. सम्या (अनिश्चित)

# कृपया येण्याचे कंफर्म करताना दोनदा विचार करा.. ऐनवेळी कॅन्सलेशन वा टांगारु नकोत..

आपल्यासोबत खालील आवश्यक वस्तू घेउन येणे
१. चादर/चटई/कॅरीमॅट (रात्री कडाक्याची थंडी असेल तेव्हा तशी सोय करा)
२. टॉर्च
३. एक प्लेट, चमचा, नि स्टिलचा छोटा ग्लास (काचेचा नको Proud )
४. अंदाजे दोन लिटर पाणी
५. टाईमपास खाणे (फळे,बिस्कीट्,केक इ.)
६. पावसाळी वातावरण असल्यास विंडचिटर असलेले बरे..

अधिक माहितीसाठी :
सुन्या ९७६४००६२८२ (पुण्याहून ज्यांना यायचे असेल त्यांनी सुन्याला संपर्क करावा)
यो रॉक्स ९८३३२१२५३०
विन्या ९८२०२८४९६६
इंद्रा ९८३३९५३८८७

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही शक्य होणार मित्रा. ४ तारखेला मी उडतोय आणि नोव्हेंबर मध्ये तीनही किल्ले एकत्र करायचा प्लान आख्लाय... Happy

मी येणार ............................................................................................. नाही.

सॉरी मित्रा नाहीच जमू शकत आहे. ३ तारखेला कॉमनवेल्थ गेम्स सुरू होत आहेत. यायची प्रचंड इच्छा आहे पण परिस्थितीने रोखून धरलेय.
जाऊदे तुम्ही मस्त एन्जॉय करा, भरपूर फोटो काढा.
मनापासून शुभेच्छा.

येऊ शकणार नाहीच, पण थोड्या सूचना करु का ?
इलेक्ट्राल ची पाकिटे अवश्य घ्या. लिंबूफूल, मीठ आणि साखर एकत्र करुन जवळ ठेवा. आयत्यावेळी पाण्यात मिसळून सरबत करता येते. सुपारीच्या पानाच्या देठाच्या पत्रावळ्या मिळाल्या तर घ्या, लवचिक आणि मजबूत असतात. शिवाय वजन नसते.
कोरडे पिठ (कणीक, रवा, थोडी साखर आणि मिठ ) मिसळून घ्या. त्याला जमेल तितके तूप चोळा.
करायच्या वेळी, त्यात थोडे पाणी घालून, घट्ट मळा आणि त्याचे गोळे करुन निखार्‍यावर भाजा. त्यात तूप साखर घालून खा.(तूपाचे टेट्रा पॅक्स मिळतात) कमी भांड्यात होणारा प्रकार आहे हा. (बाट्या चुर्मा) फॉईल नेलीत तर त्यात गुंडाळून भाजता येते. डाळ (मूग किंवा मसूर ) वगैरे नेलीत, तर ती एका बाटलीत, पाण्यात भिजत ठेवा, मग शिजवा, पटकन शिजते. तिखटासाठी अळशीची चटणी घ्या. मिरच्या, कांदे, लसूण, वांगी हे सगळे थेट विस्तवावर, किंवा फॉईलमधे गुंडाळून भाजा. हे सगळे भाजून, कुस्करून छान तोंडीलावणे होते. सागाची पाने वाटेत दिसली तर घ्या. त्यावर पदार्थ ठेवता येतात.
उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून, छोटे कांदे डोक्यावरच्या फडक्यात बांधा.
ग्लुकोजच्या बिस्किटांपेक्षा नाचणीची बिस्किटे घ्या, तहान लागत नाही. खजूर वा खारीक आणि इतर सुका मेवा घ्या. खजूराने आम्लपित्ताचा त्रास होत नाही. चहासाठी सुंठ आणि गवती चहा अवश्य घ्या.
सुकेळी मिळतात (वसई स्टेशनच्या बाहेर, दादरला शिवाजी मंदिरच्या आजूबाजूला ) ती घ्या. त्यात भरपूर खनिजे असतात. पण भेळ शक्यतो नको, फार कोरडी असते.
बरेच दिवस झाले, भारतात असा ट्रेक करुन !!

रिकामटेकडे धंदे.. .. त्यापेक्षा एखादी निवांत जागा बघावी, तिथे जमावं, बसावं , ग्रंथवाचन करावं , उपस्थीत असलेल्यांची आणी त्याहुन जास्त नसलेल्यांची उणीदुणी काढावीत, माबो वरच्या ज्वलंत बाफ, (अ)विचारवंतांबद्दल आणी इतर कुलंगडीं बद्दल व्यापक , उद्बोधक मनोरंजनात्मक चर्चा करावी आणी लोड ( अम्याच्या माशीणी होतात तसं नव्हे, हे लोड वायलं ) होउन घरी परतावे. नसत्या कुलंगडी कुणी सांगितल्येत. Angry

मी... ये.... णा...र... ना... ही .

एक रात्र गडावर काढायची आहे... सोबत कॅरीमॅट, टॉर्च जरूर असावा. >>> हायला, अख्खा होल्डॉल न्यावा लागतो? Uhoh

परत कधी छोटुसा ट्रेक कराल तेव्हा येईन Happy
दगडा, तुला छोटा ट्रेक बिलो डिग्निटी वाटला तर तू ४-५ वेळा चढून उतर. हाकानाका. (ही आयडिया कुणीतरी फोनात सांगितली मला तुला सांगायला Proud )

दिनेशदा.. खूपच धन्यवाद उपयुक्त माहितीबद्दल.. नक्कीच प्रयत्न करेन.. Happy

ए पर्‍या.. तू आजिबात कुलंगडीमध्ये पडू नकोस... तुझ्यासाठी 'अलंग-मदन' बाजूला ठेवलाय.. Proud

अके.. Lol

किश्या, तो सिरियसली बोलत नाहिये. हे सगळे एकमेकांचे मित्र आहेत त्यामुळे तेवढी मस्करी त्यांच्यात चालतेच. तुम्ही लोड घेऊ नका Happy

मी ही सिरियसली बोलत नाहिये...
आता ती हास्याची ग्राफीक का आली नाही ते माहीत नाही...
पण राग आला असेत तर क्षमा करावी..
अश्विने के सॉरी.....
परेश, सॉरी....

फार छान कार्यक्रम!!
पण माझी नाशिक प्रांताची एक मोहिम ठरते आहे....
ती जर बारगळली तर नक्की येइन!
सोमवारपर्यंत सांगेन.....:)

जा मावळ्यांनो मोहिम फत्ते करूनच या Happy
भरपूर फोटो काढा आणि आल्यावर मस्त वृतांत लिहा.
तुमच्या फोटो आणि वृतांतामधुनच आम्ही Virtual Tour करू. Happy

फक्त 'हा ट्रेक आहे पिकनीक नाही' हे लक्षात घ्यावे ! तंगडतोड होणारच आहे.. पण ऐनवेळी इतर काही बदल झाल्यास वा गैरसोय झाल्यास नाक मुरडू नये.. >>>>यो, हे सांगणे मात्र मस्टच हां Wink

योरा, सहज काही ट्रेकर्सच्या ब्लॉग मधून फेरफटका मारून आलो. सॉलिड Adventures आहे हा ट्रेक. मस्त मजा येणार आहे. तुम्ही सगळी तयारी करून ठेवा. मी गडावर पोहचलो कि तोफांची सलामी देईलच. Proud

योग्या Proud
मी मदन अलंग कुलंगच्या ट्रेक्सचे आधी फोटु पाहिलेत.
आणि तुम्हाला त्रास द्यायची इच्छा नाहिये म्हणून मी येत नाय. Proud

असो.
खरतर मी बिजी असेन ३ ला त्यामुळे नाय रे जमत. Sad
फटु बघुन आनंद मानेन.

ठरल म्हणजे ठरल.... >> ये हुई ना बात.. Happy
अके Happy
किश्या.. तूझी तयारी झाली का.. Wink

चिन्मय.. तसे काही झाल्यास नक्की कळव !

तुमच्या फोटो आणि वृतांतामधुनच आम्ही Virtual Tour करू. >> तुला यावेळी सुट दिली आहे.. पण नेक्स्ट ट्रेकला फोटो नि वृ. टाकायची जबाबदारी तुझ्यावर असणारेय हे समजून जा.. Proud

सुकी.. समजा हा ट्रेक करताना तुला जर "सॉलिड Adventures" नाही वाटला तर डोन्ट वरी.. आपण तो धाडसी बनवू.. Proud मग काय सलामी द्यायची ती दे..

ह बा.. तयारी झालेली दिसतेय.. तुम्ही पण येणार का ??

ए झक्या.. त्रास बिस कसला नाय.. जमत असेल तर चुपचाप यायला लाग.. उगीच नाटकं नकोत... मी तर म्हणतो तू येच !

तु हो पुढे......मी आलोच.....
पण या वेळी फक्त मनाने.....पुढ्च्या वेळी देहानेसुदधा....
यो...नाही रे जमणार यावेळी....पण तुझ्यफोटोन मधे मी नक्की येइन...एडिट करुन...!!!

Yo.Rocks.....
मी तय्यार.......... आहे...............
मी फक्त शुक्रवार ची वाट पाहत आहे रे......

योरा.. २५ ला पुण्यात होतास तर एक फोन करायचास ना रे. असोत आज किंवा उद्या सुन्याची भेट घ्यावीच लागणार या संदर्भात.

अरे सूकी.. योगीकडून कळले तू गावी आहेस म्हणून... तू सुन्याशी बोलुन ठरव सगळे..

ह बा.. आताच सुन्याकडून कळले... मस्त Happy

प्रसिक.. नक्की.. तूला वचन देतो.. Proud

यो.....
तुझ्या मैत्रीनीच काय ठरलं आहे?
प्लिज लवकर सांग. म्हणजे माझ्या मैत्रीनीला मला सांगता येईल..

तोषा.. मी पाण्यात डुबकी मारल्यावर .. तुझ्या गरम पाण्याची सोय आपोआप होईल Wink Proud

शेवटी सुर्याचे किरण ना आम्ही Proud

Pages