कुलंग ट्रेक :
ट्रेक चे नाव काढाल तर.. कोणी हौशीपोटी ट्रेक करतो..कोणी निसर्गवेडा बनून ट्रेक करतो.. तर कोणी ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्यासाठी ट्रेक करतो.. तर कोणी निसर्गाची सुंदरता आपल्या कॅमेर्यात बंदीस्त करण्यासाठी ट्रेक करतो.. प्रत्येकाची कारणे वेगळी असू शकतात.. पण आवड एकच भटकंतीची... नि अश्या भटक्या जमातीमधील मंडळींचा मायबोलीवर वावर वाढला आहे.. तर दुसरीकडे आपणही एकदातरी असा अनुभव घ्यावा अशी काही मंडळींमध्ये उत्सुकता आहे..
सांगायचा उद्देश असा की आम्ही काही हौशी मायबोलीकर्स येत्या २-३ ऑक्टो. रोजी 'कुलंग' ट्रेक करणार आहोत... तेव्हा ज्यांना ट्रेक करण्याची इच्छा आहे त्यांनी जरुर सहभागी व्हावे..
स्थळ : कुलंग (आंबेवाडी गाव)
डोंगररांग : कळसुबाई
उंची : अंदाजे ४८२२ फूट
प्रदेश : नाशिक
श्रेणी : मध्यम.. (म्हणावे तसे रॉक पॅचेस नाहीत.. पण पायथ्यापासून वरती पोहोचेस्तोवर ४-५ तास लागतात.. बर्यापैंकी मोठा क्लाईंब आहे.. त्यामुळे "किसमे कितना है दम" ची कसोटी मात्र लागेल.. 
======
आमचा कार्यक्रम खालीलप्रमाणे -:
१ ऑक्टोबर रोजी दादरहून कसार्याला जाणारी शेवटची लोकल (सिएसटीकडून शेवटचा डबा - लेडीज डब्याच्या पुढचा) पकडणार आहोत..
वेळ ठिक रात्री १२.३० वाजता..
कुर्ला १२.४४
विक्रोळी १२.५५
ठाणे ०१.१०
डोंबिवली ०१.३२
कल्याण ०१.४० (पुण्यातून येणार्यांना इकडून गाडी पकडावी लागेल)
टिटवाळा ०१.५५
आसनगाव ०२.१७
कसारा २.५६
कसार्याहून आंबेवाडी (पायथ्यालगतचे गाव) गावात जीप मार्गे जाणार.(अंदाजे पहाटे ४.३० वा ५.०० वाजता)
तिकडूनच मग थोडे उजाडले की ट्रेक सुरु करणार..
गडावरती पोचण्यास साधारणतः ४-५ तास लागतात..(हे सर्व अधुनमधून घेतल्या जाणार्या "क्षणभर विश्रांती" च्या कार्यक्रमावर अवलंबून असेल.. ) पण कसेही करुन दुपारी साडेअकरा- बारा च्या आत वरती पोहोचणे आवश्यक !
एकदा वरती पोहोचलो की हवी तेवढी विश्रांती घेउ शकता..
गडावरतीच दुपारचे नि रात्रीचे जेवण.. (आम्हीच एकत्रपणे जेवण बनवणार असल्याने ह्या जेवणास हॉटेल वा घरच्या जेवणाची चव असेलच असे नाही..)
वरती पोहोचल्यावर झोप घेणे, फ्रेश होणे, जेवण करणे नि आजुबाजूचा परिसर न्याहाळणे इति नियमीत कार्यक्रम पार पाडले जातील.. मग चहापानाचा (जेवण आहे तर चहापाणी पण असेलच.. ) कार्यक्रम आटपून सुर्यास्ताचा सोहळा !
मग काळोखातच चांदण्यात टॉर्चच्या प्रकाशात जेवण बनवण्याचा कार्यक्रम.. शेकोटी.. नि मग डाराडुर (झोपण्याची सोय गुहेतच होईल.. )
३ ऑक्टो. रोजी सुर्योदय बघून नाश्तापाणी आटपून गड उतरायला सुरवात..
गावातच दुपारचे जेवण करुन परतीचा प्रवास. 
=========
प्रत्येकी अंदाजे ५५०- ६०० रुपये खर्च येईल.. ( ट्रेनची तिकीट आपापली काढावी.. )
कोणी मिस करु नये म्हणून इथे ह्या ट्रेकची माहिती दिली आहे.. इच्छुकांनी सोमवार दि.२७ सप्टें. पर्यंत जरुर संपर्क साधावा..
फक्त 'हा ट्रेक आहे पिकनीक नाही' हे लक्षात घ्यावे !
तंगडतोड होणारच आहे.. पण ऐनवेळी इतर काही बदल झाल्यास वा गैरसोय झाल्यास नाक मुरडू नये..
ट्रेकमे सब चलाना पडता है ! वो मजा कुछ और है 
आतापर्यंत खालील मायबोलीकर येत आहेत..
१. सुन्या
२. विनय भीडे
३. इंद्रा
४. गिरीविहार
५. सुर्यकिरण
६. किश्या
७. रोहीत.. एक मावळा
८. यो रॉक्स
९. प्रसाद गोडबोले
१०.ह बा
११. प्रणव कवळे (अनिश्चित)
१२. सम्या (अनिश्चित)
# कृपया येण्याचे कंफर्म करताना दोनदा विचार करा.. ऐनवेळी कॅन्सलेशन वा टांगारु नकोत..
आपल्यासोबत खालील आवश्यक वस्तू घेउन येणे
१. चादर/चटई/कॅरीमॅट (रात्री कडाक्याची थंडी असेल तेव्हा तशी सोय करा)
२. टॉर्च
३. एक प्लेट, चमचा, नि स्टिलचा छोटा ग्लास (काचेचा नको
)
४. अंदाजे दोन लिटर पाणी
५. टाईमपास खाणे (फळे,बिस्कीट्,केक इ.)
६. पावसाळी वातावरण असल्यास विंडचिटर असलेले बरे..
अधिक माहितीसाठी :
सुन्या ९७६४००६२८२ (पुण्याहून ज्यांना यायचे असेल त्यांनी सुन्याला संपर्क करावा)
यो रॉक्स ९८३३२१२५३०
विन्या ९८२०२८४९६६
इंद्रा ९८३३९५३८८७
मी पण बॅग पॅक करून हापिसात...
मी पण बॅग पॅक करून हापिसात... तय्यार आहे.
संध्याकाळी तुझं घड्याळ दे
संध्याकाळी तुझं घड्याळ दे माझ्याकडे १० तास काय... कायमचं थांबवतो त्याला..नो टेंशन !>>>>> सुन्या
कुलंगवर अंघोळीची सोय आहे.
कुलंगवर अंघोळीची सोय आहे.
8 hours to go...............
8 hours to go...............
संध्याकाळी तुझं घड्याळ दे
संध्याकाळी तुझं घड्याळ दे माझ्याकडे १० तास काय... कायमचं थांबवतो त्याला..नो टेंशन !>>>>> सुन्या
>>>>>>>
माझ्याकडे घड्याळ नाही...
ऑ ल द बे स्ट
ऑ ल द बे स्ट
ध न्य वा द
ध न्य वा द
ऑ ल द बे स्ट! एन्जॉय करा...
ऑ ल द बे स्ट! एन्जॉय करा... धमाल करा!!!
किश्या , मोबाइल आहे का मोबाईल
किश्या , मोबाइल आहे का मोबाईल .. ???? (मोबाइल मधलं घड्याळ :फिदी:)
किश्या , मोबाइल आहे का मोबाईल
किश्या , मोबाइल आहे का मोबाईल .. ???? (मोबाइल मधलं घड्याळ )>>
नाही रे...... मी दिवसा उन्हावरुन अनं रात्री चांदन्यवरुन वेळ काठतो.....
नाही रे...... मी दिवसा
नाही रे...... मी दिवसा उन्हावरुन अनं रात्री चांदन्यवरुन वेळ काठतो..... <<< आयला.. मग तर तू किश्या नाही.. नाश्या आय मिन नास्या आहेस
किश्या, मोबाइल नाही ????
किश्या, मोबाइल नाही ???? :अओ:..
मग ते.... सिमकार्ड कुठे घालतो !
८ : ३० स्वारगेट बस
८ : ३० स्वारगेट बस स्थानक.
मला ओळखण्याची खूण :मी माझ्या आधी माझी गुप्तहेर पुढे पाठवणार आहे. निळी जीन्स, व्हाईट टी शर्ट, मोकळे केस अशी तरूणी दिसताच तिला कोडवर्ड मधे प्रश्न विचारा. कोडवर्ड आहे : तुझ्या जिवीचा जिवलग कुठे शेण खात बसलाय?
किश्या, मोबाइल नाही ????
किश्या, मोबाइल नाही ???? ..
मग ते.... सिमकार्ड कुठे घालतो ! >>>
दुसर्यांच्या मोबाईल मधे.....:हहगलो:.........
तुझ्या जिवीचा जिवलग कुठे शेण
तुझ्या जिवीचा जिवलग कुठे शेण खात बसलाय>>
हसुन हसुन पोट दुखत आहे......
ए ती लोकल स्लो आहे का ??? तसे
ए ती लोकल स्लो आहे का ??? तसे असेल तर मी कांजुर्मार्ग येथे चढेन !!
हो ! ती स्लो लोकल आहे...
हो ! ती स्लो लोकल आहे... कांजुर्मार्ग ला १२:५८ ची वेळ आहे..
अरे ती लोकल पुण्यात किती वा.
अरे ती लोकल पुण्यात किती वा. पोहचेल याचा काही अंदाज

यो आलो असतो रे पन हफीसात
यो आलो असतो रे पन हफीसात टांगारू झालो तर हाफीसवाले मला कागांरू करतील....
यो डायरेक्ट रविवारी चालेल का
यो डायरेक्ट रविवारी चालेल का रे आलो तर....
यो डायरेक्ट रविवारी चालेल का
यो डायरेक्ट रविवारी चालेल का रे आलो तर>>>>>>नको, पश्या, त्यापेक्षा डायरेक्ट पुढच्या आठवड्यातच ये मायबोलीवर आणि फोटु बघ
हाकानाका 
रच्याकने, मीपण तेच करणार आहे
योग्या, बात में दम है...
योग्या, बात में दम है... वैसाहीच करना पडेगा मेरू को लगता है.
हाफीसवाले मला कागांरू
हाफीसवाले मला कागांरू करतील.... >>>>पोटाला पिशवी बांधलेला पश्या कसा दिसेल त्याचा विचार करतोय
:गहन विचारात असलेला भावला:
6 hours to go
6 hours to go
कीश्या XXXखोरा जीव नकोस जाळू
कीश्या XXXखोरा जीव नकोस जाळू अस बोलुन-बोलुन
कीश्या XXXखोरा जीव नकोस जाळू
कीश्या XXXखोरा जीव नकोस जाळू अस बोलुन-बोलुन >>
5:55 hours to go
मस्त धमाल चाललीये... लोक हो,
मस्त धमाल चाललीये... लोक हो, चालू द्यात... मला मी केलेले ट्रेक आठवले... धमाल करा...
5:55 hours to go>>>>>>>
5:55 hours to go>>>>>>> ईईईईईईईईईईईईईईईईईईई

4 hours to go
4 hours to go
मस्त धम्माल करा. व्यवस्थित जा
मस्त धम्माल करा. व्यवस्थित जा आणि सर्व अवयवांसहित परत या.
धम्माल ट्रेकसाठी माझ्याकडुन धम्माल शुभेच्छा!!!!
Pages