'कुलंग' ला येणार का ??

Submitted by Yo.Rocks on 23 September, 2010 - 06:44
ठिकाण/पत्ता: 
कुलंग (आंबेवाडी जि. नाशिक)

कुलंग ट्रेक :

ट्रेक चे नाव काढाल तर.. कोणी हौशीपोटी ट्रेक करतो..कोणी निसर्गवेडा बनून ट्रेक करतो.. तर कोणी ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्यासाठी ट्रेक करतो.. तर कोणी निसर्गाची सुंदरता आपल्या कॅमेर्‍यात बंदीस्त करण्यासाठी ट्रेक करतो.. प्रत्येकाची कारणे वेगळी असू शकतात.. पण आवड एकच भटकंतीची... नि अश्या भटक्या जमातीमधील मंडळींचा मायबोलीवर वावर वाढला आहे.. तर दुसरीकडे आपणही एकदातरी असा अनुभव घ्यावा अशी काही मंडळींमध्ये उत्सुकता आहे..

सांगायचा उद्देश असा की आम्ही काही हौशी मायबोलीकर्स येत्या २-३ ऑक्टो. रोजी 'कुलंग' ट्रेक करणार आहोत... तेव्हा ज्यांना ट्रेक करण्याची इच्छा आहे त्यांनी जरुर सहभागी व्हावे..

स्थळ : कुलंग (आंबेवाडी गाव)
डोंगररांग : कळसुबाई
उंची : अंदाजे ४८२२ फूट
प्रदेश : नाशिक

श्रेणी : मध्यम.. (म्हणावे तसे रॉक पॅचेस नाहीत.. पण पायथ्यापासून वरती पोहोचेस्तोवर ४-५ तास लागतात.. बर्‍यापैंकी मोठा क्लाईंब आहे.. त्यामुळे "किसमे कितना है दम" ची कसोटी मात्र लागेल.. Happy
======
आमचा कार्यक्रम खालीलप्रमाणे -:

१ ऑक्टोबर रोजी दादरहून कसार्‍याला जाणारी शेवटची लोकल (सिएसटीकडून शेवटचा डबा - लेडीज डब्याच्या पुढचा) पकडणार आहोत..
वेळ ठिक रात्री १२.३० वाजता..

कुर्ला १२.४४
विक्रोळी १२.५५
ठाणे ०१.१०
डोंबिवली ०१.३२
कल्याण ०१.४० (पुण्यातून येणार्‍यांना इकडून गाडी पकडावी लागेल)
टिटवाळा ०१.५५
आसनगाव ०२.१७
कसारा २.५६

कसार्‍याहून आंबेवाडी (पायथ्यालगतचे गाव) गावात जीप मार्गे जाणार.(अंदाजे पहाटे ४.३० वा ५.०० वाजता)
तिकडूनच मग थोडे उजाडले की ट्रेक सुरु करणार..
गडावरती पोचण्यास साधारणतः ४-५ तास लागतात..(हे सर्व अधुनमधून घेतल्या जाणार्‍या "क्षणभर विश्रांती" च्या कार्यक्रमावर अवलंबून असेल.. ) पण कसेही करुन दुपारी साडेअकरा- बारा च्या आत वरती पोहोचणे आवश्यक !

एकदा वरती पोहोचलो की हवी तेवढी विश्रांती घेउ शकता..
गडावरतीच दुपारचे नि रात्रीचे जेवण.. (आम्हीच एकत्रपणे जेवण बनवणार असल्याने ह्या जेवणास हॉटेल वा घरच्या जेवणाची चव असेलच असे नाही..)

वरती पोहोचल्यावर झोप घेणे, फ्रेश होणे, जेवण करणे नि आजुबाजूचा परिसर न्याहाळणे इति नियमीत कार्यक्रम पार पाडले जातील.. मग चहापानाचा (जेवण आहे तर चहापाणी पण असेलच.. ) कार्यक्रम आटपून सुर्यास्ताचा सोहळा !

मग काळोखातच चांदण्यात टॉर्चच्या प्रकाशात जेवण बनवण्याचा कार्यक्रम.. शेकोटी.. नि मग डाराडुर (झोपण्याची सोय गुहेतच होईल.. )

३ ऑक्टो. रोजी सुर्योदय बघून नाश्तापाणी आटपून गड उतरायला सुरवात..

गावातच दुपारचे जेवण करुन परतीचा प्रवास. Happy

=========
प्रत्येकी अंदाजे ५५०- ६०० रुपये खर्च येईल.. ( ट्रेनची तिकीट आपापली काढावी.. )

कोणी मिस करु नये म्हणून इथे ह्या ट्रेकची माहिती दिली आहे.. इच्छुकांनी सोमवार दि.२७ सप्टें. पर्यंत जरुर संपर्क साधावा..

फक्त 'हा ट्रेक आहे पिकनीक नाही' हे लक्षात घ्यावे ! Happy तंगडतोड होणारच आहे.. पण ऐनवेळी इतर काही बदल झाल्यास वा गैरसोय झाल्यास नाक मुरडू नये.. Proud ट्रेकमे सब चलाना पडता है ! वो मजा कुछ और है Happy

आतापर्यंत खालील मायबोलीकर येत आहेत..
१. सुन्या
२. विनय भीडे
३. इंद्रा
४. गिरीविहार
५. सुर्यकिरण
६. किश्या
७. रोहीत.. एक मावळा
८. यो रॉक्स
९. प्रसाद गोडबोले
१०.ह बा
११. प्रणव कवळे (अनिश्चित)
१२. सम्या (अनिश्चित)

# कृपया येण्याचे कंफर्म करताना दोनदा विचार करा.. ऐनवेळी कॅन्सलेशन वा टांगारु नकोत..

आपल्यासोबत खालील आवश्यक वस्तू घेउन येणे
१. चादर/चटई/कॅरीमॅट (रात्री कडाक्याची थंडी असेल तेव्हा तशी सोय करा)
२. टॉर्च
३. एक प्लेट, चमचा, नि स्टिलचा छोटा ग्लास (काचेचा नको Proud )
४. अंदाजे दोन लिटर पाणी
५. टाईमपास खाणे (फळे,बिस्कीट्,केक इ.)
६. पावसाळी वातावरण असल्यास विंडचिटर असलेले बरे..

अधिक माहितीसाठी :
सुन्या ९७६४००६२८२ (पुण्याहून ज्यांना यायचे असेल त्यांनी सुन्याला संपर्क करावा)
यो रॉक्स ९८३३२१२५३०
विन्या ९८२०२८४९६६
इंद्रा ९८३३९५३८८७

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह बा तु आहेस ना. एकीला तु सांभाळ......
दुसरीला मी सांभाळतो..........

योगेश चल रे येत असलास तर>>>
तुला काही प्रॉब्लेम आहे का सांभाळायला?

योगेश चल रे येत असलास तर>>>>>>हबा, मला खरंच आवडल असतं सगळ्यांबरोबर यायला, पन काहि अपरीहार्य कारणामुळे नाही येता येत :(.
तुमच्या सगळ्यांची धम्माल आत्तापासुनच सुरु झालीयं Happy

पोचलो कुलंगवर रे मी..>>>>>>>>सम्या, सेलिब्रेशन सुरु कर मग लवकर Proud

ह बा तु आहेस ना. एकीला तु सांभाळ......
दुसरीला मी सांभाळतो..........

>>>
किश्या नमस्कार बाबा तुला!!! तुझ्याईतका व्यावसायिक/प्रोफेशनल नवरा जगात दुसरा कुणी नसेल. ट्रेकच एक ठीक आहे. इतर वेळी कोण सांभाळतं दुसरीला?

हबा, मला खरंच आवडल असतं सगळ्यांबरोबर यायला, पन काहि अपरीहार्य कारणामुळे नाही येता येत >>> पुढच्या वेळी नक्की ये!!!

किश्याचा कुलंगवर कडेलोट नक्की झाला आता ! Proud

किश्या, भलतेच नाद आहेत रे तुला ! Proud

हबा, संभाल के बेटा ! ये किश्या है ना तो नादी दिसतोय... मी आता दाढी करून नाय येणार ... Proud

मी आता दाढी करून नाय येणार ... >>> अरे हो रे तरी म्हटलं हा सगळ्यांना दाढी का करायला सांगतोय... त्यातल्या त्यात तुझ्यावर आणि प्रसादवर भलताच डोळा आहे त्याचा. तरी बरं माझी फ्रेन्च कट आहे आणि मी ती आजिबात काढत नाही.

गडावर ह्या किश्याला पालथा झोपवून वर १०० किलोचा दगड ठेऊया म्हणजे कुणाला त्रास द्यायचा नाही. नाहितर तुला आणि प्रसादला रात्रभर जागाव लागेलं... Happy

ह बा...
च्यायला तुचं असा विषय काठलासं की त्या माझ्या बायका आहेत म्हणुन...
अनं माझ्याच उरावर दगड ठेवणार आहेस का....
मला वाटलं की ह्या दोघांची खेचण्यात मला साथ देशील.......

ये... ये....... तु कुंलग वर.......... तुझाच कडेलोट करतो

तुचं असा विषय काठलासं की त्या माझ्या बायका आहेत म्हणुन... >>> तू त्या दगडाचा वापर न वाचता सुन्या आणि प्रसाद वर वापरायचे बोललास त्यामुळे ही घडले.

किश्या तूझ्यावर आधिच दोघांचा डोळा आहे त्यात माझी भर पाडू नकोस... हेल्मेट घालून ये...

नाही रे गंमत करतायत ते कशाला मारतील ते जास्त तुला? जाऊदे तुझ्याविषयीची एक गंमत सांगतो ९९२३६९५१८६ इथे कॉल कर.

माझी पन लई ईच्छा होती रे येण्याची, पन च्यामारी हाफीसात याव लागते आहे.... पन नेकस्ट टाईम नक्कीच येणार.... Happy

नमस्कार मंडळी ! कोण कोणाला भिडणार ते ठरवल का.. Proud

ए सम्या.. तुझे काय नक्की

प्रसाद.. ऑफिस काय रोजचेच रे.. तिकडे टांग मार नि चल Happy

हो यो ठरलना.....
ह बा आणी सुन्या.... ( जो कुस्ती जिंकेल त्याला तो दगड फ्री....)
प्रसाद आणी मी..... ( जो हरेल त्याचा कडेलोट)...

चला लोकहो मी तय्यार आहे....:फिदी:

आज झोपेला सुट्टी ... आणि मग २ दिवस आंघोळीला...:फिदी:

२ दिवस आंघोळीला>>
विन्या, असा अत्याचार करू नकोस.... पाणी भरपुर आहे या दिवसांत तिकडे ... Proud

किश्या, संध्याकाळी तुझं घड्याळ दे माझ्याकडे १० तास काय... कायमचं थांबवतो त्याला..नो टेंशन ! Wink

Pages