कुलंग ट्रेक :
ट्रेक चे नाव काढाल तर.. कोणी हौशीपोटी ट्रेक करतो..कोणी निसर्गवेडा बनून ट्रेक करतो.. तर कोणी ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्यासाठी ट्रेक करतो.. तर कोणी निसर्गाची सुंदरता आपल्या कॅमेर्यात बंदीस्त करण्यासाठी ट्रेक करतो.. प्रत्येकाची कारणे वेगळी असू शकतात.. पण आवड एकच भटकंतीची... नि अश्या भटक्या जमातीमधील मंडळींचा मायबोलीवर वावर वाढला आहे.. तर दुसरीकडे आपणही एकदातरी असा अनुभव घ्यावा अशी काही मंडळींमध्ये उत्सुकता आहे..
सांगायचा उद्देश असा की आम्ही काही हौशी मायबोलीकर्स येत्या २-३ ऑक्टो. रोजी 'कुलंग' ट्रेक करणार आहोत... तेव्हा ज्यांना ट्रेक करण्याची इच्छा आहे त्यांनी जरुर सहभागी व्हावे..
स्थळ : कुलंग (आंबेवाडी गाव)
डोंगररांग : कळसुबाई
उंची : अंदाजे ४८२२ फूट
प्रदेश : नाशिक
श्रेणी : मध्यम.. (म्हणावे तसे रॉक पॅचेस नाहीत.. पण पायथ्यापासून वरती पोहोचेस्तोवर ४-५ तास लागतात.. बर्यापैंकी मोठा क्लाईंब आहे.. त्यामुळे "किसमे कितना है दम" ची कसोटी मात्र लागेल.. 
======
आमचा कार्यक्रम खालीलप्रमाणे -:
१ ऑक्टोबर रोजी दादरहून कसार्याला जाणारी शेवटची लोकल (सिएसटीकडून शेवटचा डबा - लेडीज डब्याच्या पुढचा) पकडणार आहोत..
वेळ ठिक रात्री १२.३० वाजता..
कुर्ला १२.४४
विक्रोळी १२.५५
ठाणे ०१.१०
डोंबिवली ०१.३२
कल्याण ०१.४० (पुण्यातून येणार्यांना इकडून गाडी पकडावी लागेल)
टिटवाळा ०१.५५
आसनगाव ०२.१७
कसारा २.५६
कसार्याहून आंबेवाडी (पायथ्यालगतचे गाव) गावात जीप मार्गे जाणार.(अंदाजे पहाटे ४.३० वा ५.०० वाजता)
तिकडूनच मग थोडे उजाडले की ट्रेक सुरु करणार..
गडावरती पोचण्यास साधारणतः ४-५ तास लागतात..(हे सर्व अधुनमधून घेतल्या जाणार्या "क्षणभर विश्रांती" च्या कार्यक्रमावर अवलंबून असेल.. ) पण कसेही करुन दुपारी साडेअकरा- बारा च्या आत वरती पोहोचणे आवश्यक !
एकदा वरती पोहोचलो की हवी तेवढी विश्रांती घेउ शकता..
गडावरतीच दुपारचे नि रात्रीचे जेवण.. (आम्हीच एकत्रपणे जेवण बनवणार असल्याने ह्या जेवणास हॉटेल वा घरच्या जेवणाची चव असेलच असे नाही..)
वरती पोहोचल्यावर झोप घेणे, फ्रेश होणे, जेवण करणे नि आजुबाजूचा परिसर न्याहाळणे इति नियमीत कार्यक्रम पार पाडले जातील.. मग चहापानाचा (जेवण आहे तर चहापाणी पण असेलच.. ) कार्यक्रम आटपून सुर्यास्ताचा सोहळा !
मग काळोखातच चांदण्यात टॉर्चच्या प्रकाशात जेवण बनवण्याचा कार्यक्रम.. शेकोटी.. नि मग डाराडुर (झोपण्याची सोय गुहेतच होईल.. )
३ ऑक्टो. रोजी सुर्योदय बघून नाश्तापाणी आटपून गड उतरायला सुरवात..
गावातच दुपारचे जेवण करुन परतीचा प्रवास. 
=========
प्रत्येकी अंदाजे ५५०- ६०० रुपये खर्च येईल.. ( ट्रेनची तिकीट आपापली काढावी.. )
कोणी मिस करु नये म्हणून इथे ह्या ट्रेकची माहिती दिली आहे.. इच्छुकांनी सोमवार दि.२७ सप्टें. पर्यंत जरुर संपर्क साधावा..
फक्त 'हा ट्रेक आहे पिकनीक नाही' हे लक्षात घ्यावे !
तंगडतोड होणारच आहे.. पण ऐनवेळी इतर काही बदल झाल्यास वा गैरसोय झाल्यास नाक मुरडू नये..
ट्रेकमे सब चलाना पडता है ! वो मजा कुछ और है 
आतापर्यंत खालील मायबोलीकर येत आहेत..
१. सुन्या
२. विनय भीडे
३. इंद्रा
४. गिरीविहार
५. सुर्यकिरण
६. किश्या
७. रोहीत.. एक मावळा
८. यो रॉक्स
९. प्रसाद गोडबोले
१०.ह बा
११. प्रणव कवळे (अनिश्चित)
१२. सम्या (अनिश्चित)
# कृपया येण्याचे कंफर्म करताना दोनदा विचार करा.. ऐनवेळी कॅन्सलेशन वा टांगारु नकोत..
आपल्यासोबत खालील आवश्यक वस्तू घेउन येणे
१. चादर/चटई/कॅरीमॅट (रात्री कडाक्याची थंडी असेल तेव्हा तशी सोय करा)
२. टॉर्च
३. एक प्लेट, चमचा, नि स्टिलचा छोटा ग्लास (काचेचा नको
)
४. अंदाजे दोन लिटर पाणी
५. टाईमपास खाणे (फळे,बिस्कीट्,केक इ.)
६. पावसाळी वातावरण असल्यास विंडचिटर असलेले बरे..
अधिक माहितीसाठी :
सुन्या ९७६४००६२८२ (पुण्याहून ज्यांना यायचे असेल त्यांनी सुन्याला संपर्क करावा)
यो रॉक्स ९८३३२१२५३०
विन्या ९८२०२८४९६६
इंद्रा ९८३३९५३८८७
ह बा Ultimate Goal is
ह बा
Ultimate Goal is ...... !
भय तिथले संपत नाही , भय तिथले
भय तिथले संपत नाही ,
भय तिथले संपत नाही..
सुजल्या कु*नी आता बसवत नाही..
आता बसवत नाही.
दुसर्या दिवशीही :संपूर्ण
दुसर्या दिवशीही
:संपूर्ण वृतांत आणि फोटोची वाट पाहणारा भावला:
मज्जा आली... आता लवकर
मज्जा आली... आता लवकर वृत्तांत येवुद्यात....
इंड्रा मस्त वृत्तांत. पण हे
इंड्रा मस्त वृत्तांत. पण हे वाचल्यावर मला पुढच्यावेळी यायच की नाही हा विचार करावा लागेल


यो, तुला काय हळदीकुंकू घेऊन यायच का रे सांगायला की टाक वृ. म्हणुन?? लैच भाव खायलास की
सुक्या आणि प्रगो - आता पाडाच एक कैच्याकै
मालक - नक्की पातेल कशान हो घासलत??
श्रेणी : मध्यम.. (म्हणावे तसे
श्रेणी : मध्यम.. (म्हणावे तसे रॉक पॅचेस नाहीत.. पण पायथ्यापासून वरती पोहोचेस्तोवर ४-५ तास लागतात.. बर्यापैंकी मोठा क्लाईंब आहे.. त्यामुळे "किसमे कितना है दम" ची कसोटी मात्र लागेल.. <<<<< दिखावे पे मत जाओ.. अपनी अकल लगाओ !
योग्या जाउंदे लै विनवण्या करु
योग्या जाउंदे लै विनवण्या करु नकोस, बुड जागेवर ठेवायला अडचण येतिये रे त्यांना त्यामुळे हात आणि डोक चालेनास झालय
सुक्या आणि प्रगो - आता पाडाच
सुक्या आणि प्रगो - आता पाडाच एक कैच्याकै <<< शुकु तेवढीही हिम्मत उरली नाहीये !
मालक - नक्की पातेल कशान हो घासलत?? <<< पातेल्याचं माहीत नाही पण मालकास्नी चांगलच घासलं असावं...
कारण संपुर्ण ट्रेक मधे मालकांनी.. पातेल्याच्या बुडाचं आपल्या बुडाशी संदर्भ जुळवण्याचा प्रयत्न केला असेल 
सही खुप धमाल केली... मजा आली
सही खुप धमाल केली... मजा आली राव....
प्रकाशचित्र लवकरच टाकेन....
यो रॉक्सची धावत्या लोकलमधली लावणी नृत्य....
विन्याच्या लावण्या आणि गाणी....
हबा चा गावरान ठसका.....
प्र गो चे चुटकुले......
किश्याचे किस्से.....
गिरीविहारांनी केलेली खिचडी...(इंद्रा आणी मल्ली ची साथ)....
गडावर केलेल्या चहाची चवच न्यारी....
मेणबत्तीच्या प्रकाशात रंगलेली मैफिल......
गडावरुन उतरताना झालेली घसरगुंडी.....
बाकी सर्व माबोकरांनी एकमेकांना दिलेला मदतीचा हात...
खर्या अर्थाने ट्रेकचे सार्थक झाले असे मी म्हणेन.......
अयाई गं, फार ठणकतय का ?
अयाई गं, फार ठणकतय का ? ----- आय मीन डोकं हो !
जोक्स अपार्ट, हा ट्रेक म्हणजे
जोक्स अपार्ट, हा ट्रेक म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिला ट्रेक.. अस्विस्मरणीय अनुभव , एकदम सुंदर टिम वर्क, अगदी अगदी एकही विषय न वगळता केलेली धमाल, किस्से, चुटकुले, फुस्कुल्या अन अगदी वैयक्तीक पातळीवरचे अनुभव अन किस्से, सहभोजन, अगदी अगदी अल्हाद सुर्यास्त, अवर्णनीय आकाशगंगेच दृश्य, चंद्रोदय भन्नाट , सुर्योदय पाहताना .. फक्त त्याची नजर माझ्यावर अन माझी नजर त्याच्यावर.. अगदी THE RISING मधल्या आमिर खानची एंट्री सुद्धा इतकी भारी नव्हती. परतीच्या प्रवासात .. खरी जोखीम .. अन गड उतरल्यावर प्रत्येक अवयवाला शाबुत असल्याचे समाधान... असा होता हा ट्रेक. पुढच्या ट्रेकसाठी अलंग्-मदन्-कुलंग सोडून कधीही तय्यार !
सुक्या आणि प्रगो - आता पाडाच
सुक्या आणि प्रगो - आता पाडाच एक कैच्याकै
>>>> मला सुचत आहे .....
" दमलेल्या ह बा ची कहाणी "
माबोवर ट्रेकींगची मस्ती होती भारी
पुण्याहुन आली होती हबांची स्वारी ...
.
..
..
.
...सुचत आहे ....:फिदी:
नमस्कार सर्वांना.... पाय फार
नमस्कार सर्वांना....
पाय फार बोंबलत आहेत यार....
एक चर्चासत्र : पश्चिम
एक चर्चासत्र : पश्चिम महाराष्ट्राची प्रगती , मराठवाड्याची कुचंबणा आणि मुंबै !
कुलंग ट्रेक वर आलेल्या काही गंमतींपईकी एक ...हे चर्चा सत्र ...थोडेफार इथे टाकत आहे ....पुढे चालु करा ....
स्थळ : कुलुंग
वेळ : सायंकाळी ५- ६
संचलन :सुधीर वागळे ...का कोण तो ....
प्रमुख वक्ते :
विन्या
ह बा
किश्या
उपवक्ते : प्रगो , गिरी , सुक्या ....आणि इतर सगळे
वागळे : तर आजच्या चर्चेचा मुद्दा आहे पशिम्महाराष्ट्राचा विकास ...आणि मराठवाड्याची कुचंबणा ...
विन्या : #$% ची $%^ . तुमच्या @#$ ___$%^ असला कसला विषय घेतलाय &*% .तुमच्य ...&%$#&
किश्या : पश्चिम महाराष्ट्राच्या विकासामुळे आमची कुचंबणा होते .
ह बा : पहिल्यांदा क्लीयर करु पुणे पश्चिम महाराश्ट्रात येत नाही
प्रगो : येकझ्यॅक्ट्ली
हबा : पश्चिम महाराश्ट्र म्हणजे सातारा कराड कोल्हापुर
प्रगो : येकझ्यॅक्ट्ली
हबा : पश्चिम महाराश्ट्राच्या विकासाचे कारण म्हणजे उस शेती . उसाचाशेताचा पुर्ण वापर हेच अल्टीमेट गोल .
प्रगो : येकझ्यॅक्ट्ली
विन्या :#$% ची%^& प्रगो %^& , तुला येकझ्यॅक्ट्ली सोडुन काही बोलता येत नाही काय %^&$ ?
प्रगो : येकझ्यॅक्ट्ली
वागळे : नाही पण आजचा चर्चेचा मुळ आहे ...नाही पण तुम्ही याचं उत्तर द्याच ....
किश्या :
.
.
.
.
बोला
कसे आहात रे सगळे??
कसे आहात रे सगळे??
यो, पुढच्या वेळी वरपर्यंत कार
यो, पुढच्या वेळी वरपर्यंत कार जाईल, तंबू-बिंबू ठोकून कोणी चांगला खानसामा तयार असेल, वरती भांडी स्वच्छ घासणारा माणूस असेल, एखादे हॉस्पिटल किमानपक्षी क्लिनिक असेल आणि गडाच्या पायथ्याशी मसाजकेंद्र असेल असा गड शोध ..... आम्ही पण येऊ.
आणि असा कोणताही गड नाही सापडला तर, नविन बांध आणि मग बोलवर.
प्रगो... येकझ्यॅक्ट्ली पण
प्रगो... येकझ्यॅक्ट्ली
पण अजुन येऊ दे कि राव...सविस्तर...
सलग तीन तासानंतर :संपूर्ण
सलग तीन तासानंतर
:संपूर्ण वृतांत आणि फोटोची वाट पाहत F5 प्रेस करत बसलेला भावला:
पश्चिम महाराष्ट्राची प्रगती ,
पश्चिम महाराष्ट्राची प्रगती , मराठवाड्याची कुचंबणा आणि मुंबै >>
अरे मराठवाड्याची कुचंबना होत नाही रे......
पश्चिम महाराष्ट्र "*******" होतं आहे.
(शब्द आपले आपले भरावे)
पश्चिम महाराष्ट्राचं विधान
पश्चिम महाराष्ट्राचं विधान माझ्याकडून आलं अन त्यातून हा वाद रंगला.. ! चूल पेटवायला.. मल्लीफुकणी , इंद्राकाडी , गिरीगोट्या .. ( गारगोट्या ) सगळे दमले.. पण पश्चिम महाराष्ट्र अन मराठवाडा वाद पेटायला.. फक्त एक ठिणगी जी भल्या भल्यांना आकर्षित करते .. पुरेशी ठरली.
बाकी किशा.. हबा ने सांगितलेला.. पांडव साधनांच्या नावांचा गृहपाठ पुर्ण केलास का रे.
Ohhhhhhhhh...... मला आत्ता
Ohhhhhhhhh......
मला आत्ता कळतंय की मी काय miss केलंय ते...
सर्वांनी लेख एकाच धाग्यावर टाकावेच, पण ते इथे नकोत... please!!
यो दगडा, शब्द सुचत नाहीयेत का? लिही की लेख लवकर!
हबा, आपण म्हंजे लईच इनोदी आहात की!! गझलकार हबा आपणच ना?
आणि हो, वजन कमी असलेलंच बरं... दगडा-धोंड्यांमध्ये कसंही नाचता येतं मग!! आणि लोकल-एसटी मध्ये कुठेही जास्त जागा लागत नाही!! उभं राहायला आणि बसायला तेवढीच जागा पुरते!! (स्वानुभव आहे हा! :D)
दगडा, पुढचा ट्रेक नक्की!! नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये सांग कधीही!
पांडव साधनांच्या नावांचा
पांडव साधनांच्या नावांचा गृहपाठ पुर्ण केलास का रे.>>
काही गरज नाही रे...... बहुतेक हबा लाच त्याची गरज जास्त आहे, कारण "पश्चिम महाराष्ट्र फार पुढारलेला आहे" फार गरज आहे त्यांना....
काही गरज नाही रे...... >>>
काही गरज नाही रे...... >>> किश्या.. गरज नाही कसं राव.. आम्हाला पुन्हा आणीबाणीचं संकटास सामोरं जावं लागेल..
५ x 1 = 10 किंवा 11 असं काहीतरी समीकरण बघाय्ला मिळेल.
सूर्यकिरण, तुझ्या लक्षात आलं
सूर्यकिरण,
तुझ्या लक्षात आलं नाही का?
ह्यांना "पांडव साधनांच्या" वापर करावाच लागतो कारण ऊस खुप आहे यांच्य कडे....
प्र गो... अरे संभाषन कोणीच
प्र गो...
अरे संभाषन कोणीच पुढे नेत नाही....
तु कुठे गेलास??
आता मात्र हद्द झाली नाही ,
आता मात्र हद्द झाली नाही , किती रे अकडताय...
विनय आणि सुर्यकिरण तुम्ही काय थोडक्यात उत्तर दिल्यासारखा वृत्तांत दिला आहे...
<<संपूर्ण वृतांत आणि फोटोची वाट पाहत F5 प्रेस करत बसलेला भावला: >> मी पण बाहुली
संभाषन कोणीच पुढे नेत
संभाषन कोणीच पुढे नेत नाही....>>>>>विषयांतर नको
सलग पाच तासानंतर
:संपूर्ण वृतांत आणि फोटोची वाट पाहत पुन्हा F5 प्रेस करत बसलेला भावला:
मस्त वर्णन वाचून एकेक प्रसंग
सुक्या, चारोळी मस्तच
सुक्या,
चारोळी मस्तच रे.
प्रगो,
त्या फुल्या फुल्या टाकून तू विन्याचा अपमान करतोयस. आणि माबोवर आजकाल शिव्यांना मोकळीक आहे. आशय महत्वाचा आहे भाषा नाही असे काही विद्वान इथे बोलू लागलेत त्यामुळे विन्याच्या तोंडातील सगळ्या शिव्या आणि चर्चेचा विषय मोकळेपणाने मांड.
हबा, आपण म्हंजे लईच इनोदी आहात की!! गझलकार हबा आपणच ना?
>>> होय. तोच मी.
पांडव साधनांच्या नावांचा गृहपाठ पुर्ण केलास का रे.>>
काही गरज नाही रे...... बहुतेक हबा लाच त्याची गरज जास्त आहे, कारण "पश्चिम महाराष्ट्र फार पुढारलेला आहे" फार गरज आहे त्यांना....
>>>> ऐकले का रे, हा किश्या म्हणतो गरज नाही. गडावरून आल्यानंतर याचा शक्तिपात झाला की काय? बाकी मला गरज आहेच. आणि ती मी संपुर्ण माहितीनिशी भागवतोही. उगाच गरज नाही म्हणून मग ह्याच्या त्या ५ कविता हा काय दुसर्यांच्या पेनाने लिहीतो की काय? असा प्रश्न लोकाना पाडत नाही.
juyee आणि योगेश२४ तुमच्या
juyee आणि योगेश२४
तुमच्या साठी वृतांतच्या आधी
Pages