'कुलंग' ला येणार का ??

Submitted by Yo.Rocks on 23 September, 2010 - 06:44
ठिकाण/पत्ता: 
कुलंग (आंबेवाडी जि. नाशिक)

कुलंग ट्रेक :

ट्रेक चे नाव काढाल तर.. कोणी हौशीपोटी ट्रेक करतो..कोणी निसर्गवेडा बनून ट्रेक करतो.. तर कोणी ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्यासाठी ट्रेक करतो.. तर कोणी निसर्गाची सुंदरता आपल्या कॅमेर्‍यात बंदीस्त करण्यासाठी ट्रेक करतो.. प्रत्येकाची कारणे वेगळी असू शकतात.. पण आवड एकच भटकंतीची... नि अश्या भटक्या जमातीमधील मंडळींचा मायबोलीवर वावर वाढला आहे.. तर दुसरीकडे आपणही एकदातरी असा अनुभव घ्यावा अशी काही मंडळींमध्ये उत्सुकता आहे..

सांगायचा उद्देश असा की आम्ही काही हौशी मायबोलीकर्स येत्या २-३ ऑक्टो. रोजी 'कुलंग' ट्रेक करणार आहोत... तेव्हा ज्यांना ट्रेक करण्याची इच्छा आहे त्यांनी जरुर सहभागी व्हावे..

स्थळ : कुलंग (आंबेवाडी गाव)
डोंगररांग : कळसुबाई
उंची : अंदाजे ४८२२ फूट
प्रदेश : नाशिक

श्रेणी : मध्यम.. (म्हणावे तसे रॉक पॅचेस नाहीत.. पण पायथ्यापासून वरती पोहोचेस्तोवर ४-५ तास लागतात.. बर्‍यापैंकी मोठा क्लाईंब आहे.. त्यामुळे "किसमे कितना है दम" ची कसोटी मात्र लागेल.. Happy
======
आमचा कार्यक्रम खालीलप्रमाणे -:

१ ऑक्टोबर रोजी दादरहून कसार्‍याला जाणारी शेवटची लोकल (सिएसटीकडून शेवटचा डबा - लेडीज डब्याच्या पुढचा) पकडणार आहोत..
वेळ ठिक रात्री १२.३० वाजता..

कुर्ला १२.४४
विक्रोळी १२.५५
ठाणे ०१.१०
डोंबिवली ०१.३२
कल्याण ०१.४० (पुण्यातून येणार्‍यांना इकडून गाडी पकडावी लागेल)
टिटवाळा ०१.५५
आसनगाव ०२.१७
कसारा २.५६

कसार्‍याहून आंबेवाडी (पायथ्यालगतचे गाव) गावात जीप मार्गे जाणार.(अंदाजे पहाटे ४.३० वा ५.०० वाजता)
तिकडूनच मग थोडे उजाडले की ट्रेक सुरु करणार..
गडावरती पोचण्यास साधारणतः ४-५ तास लागतात..(हे सर्व अधुनमधून घेतल्या जाणार्‍या "क्षणभर विश्रांती" च्या कार्यक्रमावर अवलंबून असेल.. ) पण कसेही करुन दुपारी साडेअकरा- बारा च्या आत वरती पोहोचणे आवश्यक !

एकदा वरती पोहोचलो की हवी तेवढी विश्रांती घेउ शकता..
गडावरतीच दुपारचे नि रात्रीचे जेवण.. (आम्हीच एकत्रपणे जेवण बनवणार असल्याने ह्या जेवणास हॉटेल वा घरच्या जेवणाची चव असेलच असे नाही..)

वरती पोहोचल्यावर झोप घेणे, फ्रेश होणे, जेवण करणे नि आजुबाजूचा परिसर न्याहाळणे इति नियमीत कार्यक्रम पार पाडले जातील.. मग चहापानाचा (जेवण आहे तर चहापाणी पण असेलच.. ) कार्यक्रम आटपून सुर्यास्ताचा सोहळा !

मग काळोखातच चांदण्यात टॉर्चच्या प्रकाशात जेवण बनवण्याचा कार्यक्रम.. शेकोटी.. नि मग डाराडुर (झोपण्याची सोय गुहेतच होईल.. )

३ ऑक्टो. रोजी सुर्योदय बघून नाश्तापाणी आटपून गड उतरायला सुरवात..

गावातच दुपारचे जेवण करुन परतीचा प्रवास. Happy

=========
प्रत्येकी अंदाजे ५५०- ६०० रुपये खर्च येईल.. ( ट्रेनची तिकीट आपापली काढावी.. )

कोणी मिस करु नये म्हणून इथे ह्या ट्रेकची माहिती दिली आहे.. इच्छुकांनी सोमवार दि.२७ सप्टें. पर्यंत जरुर संपर्क साधावा..

फक्त 'हा ट्रेक आहे पिकनीक नाही' हे लक्षात घ्यावे ! Happy तंगडतोड होणारच आहे.. पण ऐनवेळी इतर काही बदल झाल्यास वा गैरसोय झाल्यास नाक मुरडू नये.. Proud ट्रेकमे सब चलाना पडता है ! वो मजा कुछ और है Happy

आतापर्यंत खालील मायबोलीकर येत आहेत..
१. सुन्या
२. विनय भीडे
३. इंद्रा
४. गिरीविहार
५. सुर्यकिरण
६. किश्या
७. रोहीत.. एक मावळा
८. यो रॉक्स
९. प्रसाद गोडबोले
१०.ह बा
११. प्रणव कवळे (अनिश्चित)
१२. सम्या (अनिश्चित)

# कृपया येण्याचे कंफर्म करताना दोनदा विचार करा.. ऐनवेळी कॅन्सलेशन वा टांगारु नकोत..

आपल्यासोबत खालील आवश्यक वस्तू घेउन येणे
१. चादर/चटई/कॅरीमॅट (रात्री कडाक्याची थंडी असेल तेव्हा तशी सोय करा)
२. टॉर्च
३. एक प्लेट, चमचा, नि स्टिलचा छोटा ग्लास (काचेचा नको Proud )
४. अंदाजे दोन लिटर पाणी
५. टाईमपास खाणे (फळे,बिस्कीट्,केक इ.)
६. पावसाळी वातावरण असल्यास विंडचिटर असलेले बरे..

अधिक माहितीसाठी :
सुन्या ९७६४००६२८२ (पुण्याहून ज्यांना यायचे असेल त्यांनी सुन्याला संपर्क करावा)
यो रॉक्स ९८३३२१२५३०
विन्या ९८२०२८४९६६
इंद्रा ९८३३९५३८८७

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोजागिरी आहे ,पण शुक्रवारी .त्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे शनिवारी करुया!!!! कस ????>>> कब है कोजागिरी, कब है कोजगिरी......

मला लेकाला घेउन यायचय >>> मलाही, योग्या, ईंद्रा प्लान करुया रे....

माझी काय गोष्ट आहे?कुणी सांगेल का?>>> Rofl तुम्ही कोण आहात मला माहिती नाही. पण, तुमचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही हे मी खात्रीने सांगू शकतो... कारण गणपत गोगावले हे एका माबोकराच्या कथेतील रेड्याचे नाव आहे. Rofl

ह बा , मला वाटंतय .... आता अलंग मदन करुन यावं ...तोपर्यंत कदाचित कुलंगचा वृत्तांत येईल !!!

ह बा Happy
अरे आज रात्री माझ्याकडचे फोटोजची लिंक पाठवतो सर्वांना.. नि वृत्तांत पण आजच प्रदर्शित रे.. टेंपोपर्यंत पोहोचलोय.. Wink

तिसर्‍या दिवशी

:संपूर्ण वृत्तांत आणि फोटोची वाट पाहून वैतागुन "जेंव्हा टाकायचा असेल वृतांत तेंव्हा टाका आणि माझ्या विपुत लिंक द्या" असे सांगणारा भावला: Angry Angry Angry

तिसर्‍या दिवशी

:संपूर्ण वृत्तांत आणि फोटोची वाट पाहून वैतागुन "जेंव्हा टाकायचा असेल वृतांत तेंव्हा टाका आणि माझ्या विपुत लिंक द्या" असे सांगणारा भावला:
>>>
खरच खूप झाले आता.... Sad

Uhoh ......

शिव्या द्या पण समजून घ्या... यो च्या अंगावर सारख्या जबाबदार्‍या येत असतात...
हो ना.. येता येता वाटेतल्यांना चिरडुन येत्तात...

उद्या सकाळी जर वृत्तांत दिसला नाही तर माझा वृत्तांत मी डिलीट करणार आहे.... :हताश उदास रागावलेला बोलेल ते करणारा बाहुला:

दगडा,
निवांत लिहि रे... वेळ लागतोच असे moments शब्दबद्ध करायला...

पण फोटु तरी द्या की पुढे पाठवून!!

दगडू मामा, मस्त वृतांत टाकलास बघ. अगदी अगदी आम्हाला अपेक्षित होता असाच Wink आता आमचे वृतांत येतील. शुद्ध लेखनाचा भरमसाठ चुका घेऊन Proud

Pages