'कुलंग' ला येणार का ??

Submitted by Yo.Rocks on 23 September, 2010 - 06:44
ठिकाण/पत्ता: 
कुलंग (आंबेवाडी जि. नाशिक)

कुलंग ट्रेक :

ट्रेक चे नाव काढाल तर.. कोणी हौशीपोटी ट्रेक करतो..कोणी निसर्गवेडा बनून ट्रेक करतो.. तर कोणी ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्यासाठी ट्रेक करतो.. तर कोणी निसर्गाची सुंदरता आपल्या कॅमेर्‍यात बंदीस्त करण्यासाठी ट्रेक करतो.. प्रत्येकाची कारणे वेगळी असू शकतात.. पण आवड एकच भटकंतीची... नि अश्या भटक्या जमातीमधील मंडळींचा मायबोलीवर वावर वाढला आहे.. तर दुसरीकडे आपणही एकदातरी असा अनुभव घ्यावा अशी काही मंडळींमध्ये उत्सुकता आहे..

सांगायचा उद्देश असा की आम्ही काही हौशी मायबोलीकर्स येत्या २-३ ऑक्टो. रोजी 'कुलंग' ट्रेक करणार आहोत... तेव्हा ज्यांना ट्रेक करण्याची इच्छा आहे त्यांनी जरुर सहभागी व्हावे..

स्थळ : कुलंग (आंबेवाडी गाव)
डोंगररांग : कळसुबाई
उंची : अंदाजे ४८२२ फूट
प्रदेश : नाशिक

श्रेणी : मध्यम.. (म्हणावे तसे रॉक पॅचेस नाहीत.. पण पायथ्यापासून वरती पोहोचेस्तोवर ४-५ तास लागतात.. बर्‍यापैंकी मोठा क्लाईंब आहे.. त्यामुळे "किसमे कितना है दम" ची कसोटी मात्र लागेल.. Happy
======
आमचा कार्यक्रम खालीलप्रमाणे -:

१ ऑक्टोबर रोजी दादरहून कसार्‍याला जाणारी शेवटची लोकल (सिएसटीकडून शेवटचा डबा - लेडीज डब्याच्या पुढचा) पकडणार आहोत..
वेळ ठिक रात्री १२.३० वाजता..

कुर्ला १२.४४
विक्रोळी १२.५५
ठाणे ०१.१०
डोंबिवली ०१.३२
कल्याण ०१.४० (पुण्यातून येणार्‍यांना इकडून गाडी पकडावी लागेल)
टिटवाळा ०१.५५
आसनगाव ०२.१७
कसारा २.५६

कसार्‍याहून आंबेवाडी (पायथ्यालगतचे गाव) गावात जीप मार्गे जाणार.(अंदाजे पहाटे ४.३० वा ५.०० वाजता)
तिकडूनच मग थोडे उजाडले की ट्रेक सुरु करणार..
गडावरती पोचण्यास साधारणतः ४-५ तास लागतात..(हे सर्व अधुनमधून घेतल्या जाणार्‍या "क्षणभर विश्रांती" च्या कार्यक्रमावर अवलंबून असेल.. ) पण कसेही करुन दुपारी साडेअकरा- बारा च्या आत वरती पोहोचणे आवश्यक !

एकदा वरती पोहोचलो की हवी तेवढी विश्रांती घेउ शकता..
गडावरतीच दुपारचे नि रात्रीचे जेवण.. (आम्हीच एकत्रपणे जेवण बनवणार असल्याने ह्या जेवणास हॉटेल वा घरच्या जेवणाची चव असेलच असे नाही..)

वरती पोहोचल्यावर झोप घेणे, फ्रेश होणे, जेवण करणे नि आजुबाजूचा परिसर न्याहाळणे इति नियमीत कार्यक्रम पार पाडले जातील.. मग चहापानाचा (जेवण आहे तर चहापाणी पण असेलच.. ) कार्यक्रम आटपून सुर्यास्ताचा सोहळा !

मग काळोखातच चांदण्यात टॉर्चच्या प्रकाशात जेवण बनवण्याचा कार्यक्रम.. शेकोटी.. नि मग डाराडुर (झोपण्याची सोय गुहेतच होईल.. )

३ ऑक्टो. रोजी सुर्योदय बघून नाश्तापाणी आटपून गड उतरायला सुरवात..

गावातच दुपारचे जेवण करुन परतीचा प्रवास. Happy

=========
प्रत्येकी अंदाजे ५५०- ६०० रुपये खर्च येईल.. ( ट्रेनची तिकीट आपापली काढावी.. )

कोणी मिस करु नये म्हणून इथे ह्या ट्रेकची माहिती दिली आहे.. इच्छुकांनी सोमवार दि.२७ सप्टें. पर्यंत जरुर संपर्क साधावा..

फक्त 'हा ट्रेक आहे पिकनीक नाही' हे लक्षात घ्यावे ! Happy तंगडतोड होणारच आहे.. पण ऐनवेळी इतर काही बदल झाल्यास वा गैरसोय झाल्यास नाक मुरडू नये.. Proud ट्रेकमे सब चलाना पडता है ! वो मजा कुछ और है Happy

आतापर्यंत खालील मायबोलीकर येत आहेत..
१. सुन्या
२. विनय भीडे
३. इंद्रा
४. गिरीविहार
५. सुर्यकिरण
६. किश्या
७. रोहीत.. एक मावळा
८. यो रॉक्स
९. प्रसाद गोडबोले
१०.ह बा
११. प्रणव कवळे (अनिश्चित)
१२. सम्या (अनिश्चित)

# कृपया येण्याचे कंफर्म करताना दोनदा विचार करा.. ऐनवेळी कॅन्सलेशन वा टांगारु नकोत..

आपल्यासोबत खालील आवश्यक वस्तू घेउन येणे
१. चादर/चटई/कॅरीमॅट (रात्री कडाक्याची थंडी असेल तेव्हा तशी सोय करा)
२. टॉर्च
३. एक प्लेट, चमचा, नि स्टिलचा छोटा ग्लास (काचेचा नको Proud )
४. अंदाजे दोन लिटर पाणी
५. टाईमपास खाणे (फळे,बिस्कीट्,केक इ.)
६. पावसाळी वातावरण असल्यास विंडचिटर असलेले बरे..

अधिक माहितीसाठी :
सुन्या ९७६४००६२८२ (पुण्याहून ज्यांना यायचे असेल त्यांनी सुन्याला संपर्क करावा)
यो रॉक्स ९८३३२१२५३०
विन्या ९८२०२८४९६६
इंद्रा ९८३३९५३८८७

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज ज्याम घाईगडबडीत !! जवळपास तयारी पूर्ण ... तेव्हा मित्रहो थेट लोकलमध्ये भेटू !!

बाकी मित्रमंडळी शुभेच्छांसाठी धन्यवाद ! Happy

प्रगो.. कांजुरमार्ग १२.५८ तिकडून चढलास तरी चालेल.. पाचदहा मिनीटे अगोदरच प्लॅटफॉर्मवर हजर रहा म्हणजे झाले... शेवटून लेडीजच्या पुढचा डबा पकड.. Happy तसा फोन करेनच म्हणा तूला..

बाकी गाडी मिस झाली तर ट्रेक मिस होईल.. सो वेळेला पक्के रहा सगळ्यांनी Happy

धन्यवाद योगेश२६>>>>ह बा हे २ कुठुन अ‍ॅड केलेत

>>>> तुमच्या अकाउंटला दोन वर्ष झाली आता. त्यावेळी आपण २४ होता आता २६.३८ झालात.

मला वाटलं वय आहे.... म्हणजे बदलण्यात अर्थ नाही. असो.

वरील विविक्षीत प्रतिसाद तदनंतरच्या प्रतिसादांचा संदर्भ लक्षात घेऊन निर्देशित पद्धतीने म्हणजेच खालील प्रमाणे वाचावा.
धन्यवाद योगेश२४!

प्रगो.. कांजुरमार्ग १२.५८ तिकडून चढलास तरी चालेल>>> बर मी १२:३० ला च प्ल्यॅट फोर्म वर असेन !!!

नो रिस्क !!!

किश्या तुझी घटका भरत आली आता !!!! Proud

किश्या सॉलिड डेंजर माणूस आहे मी त्याला पहिला काल. फ्रेंच कट दाढी, बेवड्यासारखे डोळे, कुठल्याही प्रकारे सदगृहस्थ वाटत नाही. उगाच त्याला कुणी चिडवू नका रे!

किश्या सॉलिड डेंजर माणूस आहे मी त्याला पहिला काल. फ्रेंच कट दाढी, बेवड्यासारखे डोळे, कुठल्याही प्रकारे सदगृहस्थ वाटत नाही. उगाच त्याला कुणी चिडवू नका रे!

>>> शिवाय त्याला " नवाबी शौक " असण्याचा अंदाज नुकताच वर्तवण्यात आला आहे ...म्हणुनच "श्रीं"नी कुलंगगडावर त्याचे समुळ पारिपत्य करण्याचे योजले आहे !!! Proud

बाकी कुलंग म्हणजेच रतनगड का ? Uhoh

हुड..हुड ....कुलंग कुलंग...
हुड..हुड ....कुलंग कुलंग.....

धमाल मजा मस्ती...
खेळुन आलो कुलंग संगे कुस्ती.....

ल व क र च Happy
सहभागी मायबोलीवीरांचे धन्यवाद Happy

प्रत्येकाने आपापल्या परिने अनुभव लिहा म्हणजे वाचायला मजा येइल.. मग १३ वृत्तांत पडले तरी चालतील.. Proud

हो तुझा वृत्तांत आला की मी लगेच टाकतो. मी प्रामुख्याने णपत गोगावलेच्या बॉस Happy चे आपण गायलेले गोडवे आणि रात्रीची धमाल मैफिल याविषयी लिहीणार आहे. Happy

Pages