न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २४ जुलै २०१०

Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42

ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा

पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.

gtg_list२.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माणूस, कालच सौ. ने आठवण काढली होती. ते मागच्या वेळी आले होते ते, खूप मदत करत होते कामात, आहेत इथेच का गेले भारतात परत?

आता त्यांचं लग्न झालय आणि ते बिन-कामाचे झालेत असं तुम्ही सांगितलत की नाही ? Proud

मा/बामा सकाळी आमच्या घरी या नाष्ट्याला, सगळे बरोबर निघू. अजून १-२ नेहमीचे यशस्वी कलाकार येणार आहेत(च) Happy

बाई, खुर्च्या आणु का ? मला बाईंच्या घराजवळच्या राजभोगचा पत्ता/नंबर काही तरी द्या प्लीज.

(बाईंचा दोनदा उल्लेख आल्याने तीन वेळा पोस्ट एडिट करतेय, नाईलाज आहे :फिदी:)

आता त्यांचं लग्न झालय आणि ते बिन-कामाचे झालेत असं तुम्ही सांगितलत की नाही ?>>>>>> अगदी खरय!
लग्नानंतर सगळे खुप कामाचे पुरुष बिनकामाचे आणि बायका (लग्ना आधी) कितीही बिनकामाच्या असल्या तरी अचानक खुप कामाच्या होतात.

हो भांडणं लागली की इतरांना बसून बघायला खुर्च्या नकोत ?>> फळ्यांवर बसत नाहीत का आता ? एव्हढ्यातच फळी बदलली ? Lol

भाई एक(च) लिवा वो.

आणि मग त्याना वाटेल तसे एका फळीतुन दुसर्‍या फळीत जाता येते. Happy

स्वाती अपडेट केलीस की त्या ईमेजची लिंक दे मला. म्हणजे मला परत अपलोड करायला नको. Happy

अ अ गो म्हैसूरपाक : चणाडाळीच्या पिठापासून (म्हणजे बेसन वापरून)
बटाटेवडे : बेसनाचं आवरण (पुन्हा आत बटाटे)
झुणका : भरभक्कम कांदे आणि बेसन
पालेभाजी : बहुतेक पीठ पेरून किंवा बेसनाने दाटपणा आणून
जिलब्या : मैदा
काहीतरी : अननोन डेंजर
स्नॅक्स : ढोकळे (बेसन), फरसाण (बेसन), सुरळीच्या वड्या (बेसन)

स्वातीच्या घराचा ह. म. : प्राइसलेस.

बाई, आधीची gtglist_0.jpg ही फाईल उडवा. आणि नविन फाईल याच नावाने चढवा की झाले काम !

अर्रर्रर्र ... भाईंनी तुझी फाईल कॉपी करून स्वतःच्या खिशात टाकली आहे. भाईंनाच लिंक द्यावी लागणार.

स्वाती, खिडक्या दारं उघडी ठेव. लिस्टितले पदार्थ वाचूनच झक्कींनी एअरकंडिशनिंग बिघडल्याचं कारण सांगितलं असावं असा मला तरी दाट संशय आहे.

एअर कंडिशनिंग बिघडले नाही. नाहीच आहे आमच्या घरी!! वर्षातून जेमतेम दोन आठवडे गरज भासत असे. तेसुद्धा दुपारी एक दोन तास, नि रात्री एक दोन तास. मग पहिले मोडल्यावर दुसरे घेतलेच नाहीत. पण यंदा मात्र कहरच उन्हाळा, नि अजून जुलैच आहे, ऑगस्ट यायचाच आहे.
मला थंडीचा त्रास होत नाही, पण उन्हाळा सहन होत नाही!!

पण उन्हाळा सहन होत नाही!!>>>> Uhoh तरीही एसी शिवाय रहाताय आणि विशिष्ट शहरातल्यांना नावं ठेवता? शोनाहो झक्की. Wink

हे पहिलेच वर्ष जेंव्हा एव्हढा उन्हाळा पाहिला.

पुढल्या वर्षी सप्टेंबरमधेच संमेलन ठेवू, मग या आमच्याकडे. तोपर्यंत कदाचित् घरचे टोमॅटो नि मिरच्या नि वांगी खायला मिळतील!!

Pages