Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42
ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा
पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पार्सिपेनीचं राजभोग बंद
पार्सिपेनीचं राजभोग बंद झाल्याचं कानावर आलेलं. तेव्हा सिंडे आधी फोन करुन चौकशी कर किंवा जर्सी सिटीतून आण.
सायो, प्वाईंट! बाई, काही एडिट
सायो, प्वाईंट! बाई, काही एडिट करायचे असेल तर सांगा हां.


मृ,
अरे तो जिलब्या बनवतो की नाही हे विचारुन घ्या फक्त. मी कधी पाहिल्या नाही त्याच्याकडे जिलब्या.
राजभोगकडे जिलब्या असतात. मी
राजभोगकडे जिलब्या असतात. मी खाल्ल्या आहेत.
बंद झालं? कधी? बुवा तर
बंद झालं? कधी? बुवा तर म्हणाले तिथून पोळ्या आणतात म्हणून?
http://www.rajbhog.com/index_main.asp?sid=144600473
ही वेबसाईट दिसत्ये. तिथेही पार्सिपेनीचं नाव नाही. कमाल आहे!
बंद झालं? कधी? बुवा तर
बंद झालं? कधी? बुवा तर म्हणाले तिथून पोळ्या आणतात म्हणून?
http://www.rajbhog.com/index_main.asp?sid=144600473
ही वेबसाईट दिसत्ये. तिथेही पार्सिपेनीचं नाव नाही. कमाल आहे!
>>>>>>
हे अगदी विशिष्ठ शहरात घडल्यासारखं वाटले आता झक्कींना..... पण नाही हे तिकडेच घडतय...
रच्याकने... तुमच्या ह्या मेगा ए.वे.ए.ठी. ला हार्दिक शुभेच्छा.... वृत्तांत येतीलच....
स्वाती, शेजारणीकडून बंद
स्वाती, शेजारणीकडून बंद झाल्याचं ऐकलं हल्ली हल्लीच. तेव्हा फोन करुन खात्री करुन घ्या.
बंद नाही रे झालं! सायो, कायकू
बंद नाही रे झालं! सायो, कायकू अफवा फैलारी तू? त्या बिचार्याचा आधीच धंदा तसा "बशेल" आहे. हो, परवाच तिथुन पोळ्या आणल्या.
९७३-३३५-२२२० नंबर आहे. मीच
९७३-३३५-२२२० नंबर आहे. मीच फोन केला असता, पण सिंडे, तूच कर म्हणजे काय त्या चौकशा करता येतील तुला. आधी ऑर्डर द्यावी लागणार असेल तरी देता येईल.
या एवेएठिचा अधिकॄत वॄत्तांत
या एवेएठिचा अधिकॄत वॄत्तांत लिहीण्याची जबाबदारी कोण घेणार ते आत्ताच सांगा.
नियमाप्रमाणे भाई आणि झक्कींकडे अर्जी द्यायची आहे..
(मी आधीच हात झटकले आहेत.. )
अहो विचारायचं काय देसाई? ए वे
अहो विचारायचं काय देसाई? ए वे ए ठि म्हणजे आनंदसोहळा! ज्याला आनंद झाला त्यानी लिहीला वृत्तांत, त्यात अधिकृत अनाधिकृत काय आहे?
मागच्या वेळी चेष्टा म्हणुन फक्त एकमेकांच्या वृत्तांताची खिल्ली उडवणं चालू होतं, येवढच. टिंगल टवाळीत पण मजाच आहे की?
धन्यवाद हो बाई. नंबर एडिट करु
धन्यवाद हो बाई. नंबर एडिट करु नका
बारा गटगचा वृतांत बाराकरांनीच लिहा.
झक्कींचे आई-वडील लिहीणार
झक्कींचे आई-वडील लिहीणार वॄत्तांत ?
(रहावले नाही)...
अफवा नव्हे रे, जे ऐकलं ते
अफवा नव्हे रे, जे ऐकलं ते सांगितलं.

नवीन बीबी उघडून लिहिण्यापेक्षा एकाच ठिकाणी ज्याला हवं त्याला लिहू देत की.
>>>आधीच धंदा तसा "बशेल" आहे.>>>
आता वृत्तांत लिहिण्यावरही आडकाठी असणारे का?
Saturday Partly sunny with a
Saturday
Partly sunny with a chance of showers and thunderstorms. Hot. Humid with highs in the mid 90s. West winds 5 to 10 mph. Chance of rain 30 percent. Heat index values up to 103.
झक्कींची आई लिहीणार वॄत्तांत ?
बाई, कार्यक्रम घराच्या आत
बाई, कार्यक्रम घराच्या आत असणार आहे की बाहेर? की सस्पेन्स ठेवणार आहात?
आरं द्येवा. लई गर्मी व्हय.
आरं द्येवा. लई गर्मी व्हय. 'स्प्रिंकलर विहार' करा. संयुक्तासोल्जर्सएक्स्प्रेस गाडीगाडी खेळा. फोटोत पोज देताना सिंडीला विचारून घेत चला. अशीतशी पोज दिली की ती भडकते.
अशीतशी पोज दिली की ती भडकते.
अशीतशी पोज दिली की ती भडकते. >>>>> हौ, आणि मग पार्ल्यात येऊन चिडचिड करते अशी...
येवढं पुरे का?
२ झाले बर्का.
२ झाले बर्का.
बुवा, आता इथे जुंपणारे.
बुवा,
आता इथे जुंपणारे. तेव्हा खुर्च्या, पॉपकॉर्नची व्यवस्था करा रे.
खुर्च्या तर शिंडीच आणणार
खुर्च्या तर शिंडीच आणणार आहे.. मक्याच्या लाह्यांचे बघतो..
अरे उगाच मोजू नकोस, आई शप्पत
अरे उगाच मोजू नकोस, आई शप्पत मी चेष्टा करतोय!! ह्याच्यात कसलं आलय तिरकस बोलणं? खरच केली होती की तिनी चिडचिड, हो की नाही सिंड्रेला?
बुवा, स्वातीने दहशत्वादी
बुवा, स्वातीने दहशत्वादी कँपात तुमच्याकरता लिहिलंय. ते वाचून, डोकं शांत ठेवून योग्य तो निर्णय घ्यावा.
चिडचिड नव्हती केली, कोण आहे
चिडचिड नव्हती केली, कोण आहे असे विचारले होते.
(No subject)
अंजली, तुझ्या खुर्च्या बोर
अंजली, तुझ्या खुर्च्या बोर झाल्या. काही तरी नवं बोल.
वाह्यात कमेंरट्स>>>>>>
वाह्यात कमेंरट्स>>>>>> वाह्यातचा अर्थ समजतो का?
ठीक आहे, तुला उद्देशून लिहीली म्हणुन काढतो. नुसतच घोडं दामटवून काही उपयोग नाही. सॉरी हां!
तुम्ही काहीतरी नविन काढा.. मग
तुम्ही काहीतरी नविन काढा.. मग मी नवं बोलते
<बारा गटगचा वृतांत
<बारा गटगचा वृतांत बाराकरांनीच लिहा>
हे वाचून वाईट वातले. अहो एवे एठि बारात आहे पण फक्त बाराकरच नाही तर इतरहि निरनिराळ्या देशातून लोक येणार. तर वैद्यबुवांचे ऐका, नि 'ज्याला आनंद झाला त्यानी लिहीला वृत्तांत'(टीपः कुणाला काही आवडले नाही तरी लिहा. आम्हाला राग येत नाही, कारण आम्ही ते अनुल्लेखाने मारतो.)
<तो उजवीकडून दुसरा टकला कोण आहे? त्याचं तोंड असं उघडं का आहे म्हणे>
तो मी. सतत बोलत असल्याने तोंड नेहेमी उघडेच असते.
<झक्कींचे आई-वडील लिहीणार वॄत्तांत > लै हुष्षार, पण...
अहो त्यांचे आत्मे सुखात असावेत अशी आशा करतो, त्यांना कशाला या असाSर संसारात परत ओढता?
आणि आजच एव्हढे बोलल्यावर उद्या काय करणार? एकमेकांची तोंडे बघत बसणार का?
बायकांचे ठीक आहे, सर्व बायका नेहेमी एकदम बोलत असतात, नि कोण काय बोलतय् हे कुणालाहि कळत नाही. म्हणून तेच तेच परत बोलले तरी चालते.
पण पुरुषांचे तसे नाही. वृत्तांताबद्दल वैद्यबुवा नि परदेसाई यांचे म्हणणे एकदा कळले, आता पुनः काही त्यावर बोलणार नाही. असे करून सगळे विषय संपले म्हणजे?
अरेच्या लोक वाढले वाटते!
अरेच्या लोक वाढले वाटते!
(मनातः भाकरी कमी पडणार की काय ? )
बर कोणी लहान पोरं येणार आहेत का? माझी लेक मी येते म्हणत होती , म्हणून विचारतेय
>>>बायकांचे ठीक आहे, सर्व
>>>बायकांचे ठीक आहे, सर्व बायका नेहेमी एकदम बोलत असतात, नि कोण काय बोलतय् हे कुणालाहि कळत नाही. म्हणून तेच तेच परत बोलले तरी चालते. >>>>> झक्की, हे तुमचं आवडतं कोट आहे हां
Pages